अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांना राजीनामा द्यावाच लागला.
 शनिवारी दुपारी देशाच्या राजकारणात एक प्रचंड मोठी घडामोड घडली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी मागच्या 36 दिवसांपासन जंतरमंतरवर आंदोलन करत होती. हे आंदोलन देशभरात पसरलं होतं याच दरम्यान सोनम वांगचूक यांच 26 दिवसांचे उपोषण देखील झालं. 20 जुलैला दिल्लीमध्ये संसदेवर मोठा मोर्चा देखील निघाला. या सगळ्या लढ्याला आता प्रचंड मोठं यश मिळालेल असून धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालाय पण नेमकं घडलं काय धर्मेंद्र प्रधान

 यांचा राजीनामा कसा झाला पडद्यामागे कोणकोणत्या घडामोडी घडल्या जाणून घेऊयात या बातमी मधून  प्रधान यांनी शनिवारी दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकत स्वतः आपल्या राजीनाम्याची घोषणा केली धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याबाबत सांगितलय की नीट पेपर फुटीच्या विरोधात आम्ही पावलं उचलली होती पण काही जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना भरकटण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे व्यथित झालो आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय असं धर्मेंद्र प्रधान

 यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलेल आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच पहिलं कारण दिसतं ते म्हणजे आंदोलन देशभर पसरणं सीजेपीच जंतरमंतर वरच आंदोलन हे गेल्या 36 दिवसांपासून सुरू होतं पण 20 जुलैच्या संसदेवरच्या मोर्च्यानंतर या आंदोलनाला जास्तच व्यापक स्वरूप आलेलं गेल्या पाच दिवसांमध्ये दिल्ली सोबतच देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा शहरांमध्ये सुद्धा आंदोलनान उग्र पेठ घेतला होता. या सगळ्या आंदोलनांमध्ये जोपर्यंत प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणारच नाही असा सगळ्यांचा सुरू होता. 
24 जुलैला सीजेपी कडून जो देशव्यापी आंदोलनाचा नारा देण्यात आला होता त्याला सुद्धा संपूर्ण देशभरातन प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. सरकारी या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी सगळे प्रयत्न करत होतं. सोनम वांगचूक यांच्या उपोषणामुळे हे आंदोलन देशभर पोहोचल्यान त्यांनी वांगचूक यांना आश्वासन देऊन त्यांच उपोषण देखील सोडवलं पण हे सगळं होऊन सुद्धा सीजेपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शेवटपर्यंत ठाम राहिली. त्यानंतर सरकारन केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सचिवांची बदली केली. तसच शुक्रवारी रात्री नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडन नीट पेपरफुटी प्रकरणात 47

 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं. त्यामुळे राजीनाम्यापेक्षा सरकार शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे प्रयत्न करून तरुणांना प्रतिसाद देतय असं दिसत होतं. पण तरीसुद्धा जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असं अभिजीत दिपके आणि सीजेपीच म्हणणं होतं. शनिवारी सकाळी सुद्धा जर राजीनामा झाला नाही तर जी यता थांबणार नाहीत. 20 जुलै पेक्षा मोठा आंदोलन होईल. राजीनामा घ्या नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचाही नंबर लागेल असा इशारा दीपकेंनी दिला. त्यामुळे सगळे प्रयत्न करून सुद्धा आंदोलन शांत होत

 नसल्यान दिल्लीच्या बाहेर देशभरात आंदोलन पसरल्यान सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं भाग पडलय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच दुसरं कारण दिसते ते म्हणजे सरकारवरचा दबाव हा वाढत चालला होता. फक्त कॉक्रोच जनता पार्टीच नाही तर देशाचे विरोधी पक्ष सुद्धा या मुद्द्यावरन आक्रमक झालेले 20 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे पण त्या दिवसापासून विरोधकांनी हा मुद्दा संसदेत लावून धरला होता. विरोधक राजीनाम्याच्या मागणीवरती ठांब होते त्यामुळे संसदेच कामकाज सातत्याने ठप्प होत होतं राहुल गांधी आणि काँग्रेस

 पक्षाने या मुद्दावरन पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर मोठं आंदोलन उभं केलेलं त्यादरम्यान राहुल गांधी प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की देखील झाली होती ज्यावरन विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं त्यामुळे सरकारवरती दबाव वाढत होता. इतकच नाही तर 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी ज्या प्रकारे आंदोलकांवर कारवाई केली त्यामुळे गृह मंत्रालयावरन सुद्धा सवाल हे उपस्थित केले जात होते. महत्त्वाचं म्हणजे सरसघचालक मोहन भागवत भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी अशा नेत्यांनी सुद्धा

 यावरन मोदी सरकारला धारेवर धरलेलं जर आंदोलन आणखी चिघळल असतं तर थेट मोदींच्या खुर्चीवरती प्रश्न उपस्थित झाले असते अभिजीत दीपके यांनी प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर मोदींचा राजीनामा मागू असा पवित्रा घेतला होता. या सगळ्याचा दबाव सरकारवरती वाढत चाललेला आणि त्यामुळेच सरकारन अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाय असं म्हटलं जातय आता सरकारन प्रधानांचा राजीनामा घेण्याच तिसरं कारण दिसतं ते म्हणजे मोदी सरकारची वोट बँक दुरावण्याची भीती आजपर्यंत मोदी सरकारन आपल्या 12 वर्षांच्या काळात अनेक आंदोलन हाताळली शेतकरी आंदोलन असेल सीए

 एनआरसीचा प्रोटेस्ट असेल पण अशा प्रकारच्या आंदोलनात मोदी सरकारला आपल्या वोट बँकेचा अंदाज होता तो अंदाज घेऊनच या आंदोलनांना मोदी सरकार टॅकल करत होतं निवडणुकीची गणित ओळखून शेतकरी आंदोलन देखील थांबवण्यात आलं होतं पण सीजेपीच आंदोलन पूर्णपणे वेगळ्या पातळीवर बिल्ड झालं होतं. भारताच्या सरन्यायाधीशांनी देशाच्या तरुणांना उद्देशून कॉक्रोच म्हटलं आणि सीजेपी सारखा पक्ष उभा राहिला. त्यांनी देशातल्या शिक्षण व्यवस्थेतल्या घोटाळ्यावरन सरकारला धारेवर धरलं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि थेट देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली.

 आधी देशातल्या 20 पेक्षा जास्त ठिकाणी आंदोलन झाल्यावर सोनम वांगचूक यांचे उपोषण आणि जंतर मंतरवर एक महिना चाललेल्या आंदोलनाला 20 जुलैला हिंसक वळण मिळालेलं लाठीच्या झाला आणि या आंदोलनाला देशभरात पाठिंबा मिळाला. खरं तर या आंदोलनात सहभागी झालेल्या जेनजी वर्गान मोदी सरकारला आणि पोलिसांना न घाबरता न भेडबाट ठेवता आपली मत मांडायला लाठी चार्ज नंतर सुद्धा जंतरमंतर वरती आंदोलनासाठी जमायला सुरुवात केली. पुणे असेल, मुंबई असेल अशा ठिकाणी मोठमोठी आंदोलन झाली. राजकीय पक्षांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. 

ज्या तरुण वर्गाने मोदी सरकारला 2014
मध्ये तारलं निवडून आणलं तोच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात विरोधात गेल्यान मोदी सरकारला याचा भविष्यात फटका बसणार याची जाणीव सरकारला व्हायला लागली. त्यात या तरुण वर्गाला विरोधक आपल्या बाजूने खेचून घेतील ही परिस्थिती देखील तयार झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्य रात्री 12- वाजता इंस्टावरती व्हिडिओ टाकून पंतप्रधान मोदींनी सुद्धा या झेंजी आंदोलनाची दखल घेतली आणि या वोट बँकेशिवाय राजकारण चालणार नाही हे भाजपच्या लक्षात आलं. त्यातच आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवतांनी तरुण पिढीशी संवाद साधा असं वक्तव्य केलं थोडक्यात ही वोट बँक आपल्या हातून

 निसटण्याच्या भीतीनेच धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झालाय असं म्हणता येतं एकंदरीतच काय तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही घटना ऐतिहासिक आहे. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या काळात एखाद्या मंत्र्याने राजीनामा देण्याची ही घटना क्वचितच घडली आहे त्यामुळे आता पुढे काय होतं सरकारवरती याचा कसा परिणाम होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी आमच्या unik marathi चॅनलला सबस्क्राईब करा 
x