लोणावळा पुणे:-
भुशी डॅम च्या प्रवाहात नातेवाईकांच्या डोळ्यादेखत पाच जणांचे कुटुंब गेले वाहून.
पुण्यातील प्रसिद्ध लोणावळा येथील भुशी धरण च्या मागच्या बाजूची धबधब्यातील भिजण्यासाठी गेलेले पर्यटक कुटुंब तीव्र प्रवाहामध्ये वाहून गेले. रविवारी दुपारी ही घटना घडली. सर्व कुटुंब हे हडपसर येथील राहणारे होते. सध्या संतत धार पावसाच्या सरीमुळे पाण्याच्या पातळीमध्ये बदल होत आहे व पाण्याची पातळी वाढत आहे पर्यटक पण मान्सून पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी विशेष अशा मान्सून पर्यटन स्थळांना भेटी देत असतात अशाच अशाच मान्सून पर्यटनाची आनंद लुटण्यासाठी हडपसर येथील अन्सारी कुटुंब हे गेल्या रविवारी भुशी धरण येथे गेले होते भुशी धरणा वरती पावसाळ्यामध्ये भरपूर गर्दी असते हजारो पर्यटक या स्थळाला भेट देत असतात व पावसाची मजा लुटत असतात. अन्सारी कुटुंब हे तिथे भूषी डॅम च्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याजवळ भिजण्या साठी गेले होते, अन्सारी परिवारातील 15 जण वर्षा विहारासाठी आले होते मुले पूर्वेकडील प्रवाहत खेळत होती, पावसाचा जोर वाढत असल्याने प्रवहाचा वेग वाढत होता मुलांना त्याचा अंदाज आला नाही. परिणामी मुलंही त्यात वाहून गेली व त्यांना वाचवणारी नूर अन्सारी याही या वाहून गेल्या या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले त्यामध्ये चार मुले आणि एक महिला यांचा समावेश होता.
नूर शाहिस्ता अन्सारी वय 35, आमीना आदिल अन्सारी वय 13, मारिया अन्सारी वय 7, हुमेदा अन्सारी वय 6, अदनान अन्सारी वय 4, सर्व राहणार हडपसर पुणे, अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत
प्रवाहाचा वेग तीव्र असल्याने इतरांना त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. झालेल्या दुर्घटनेमधील बचाव पथकाने दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे उर्वरित लोकांचा शोध चालू आहे.
अशा दुर्घटना वारंवार घडू नये याकरता प्रशासनाने योग्य नियोजन करावे तसेच या ठिकाणी दुर्घटना घडू शकते अशा धोक्याच्या ठिकाणी प्रशासनाने पर्यटकांना मज्जाव करावा की जिथे कोणत्याही पर्यटक जाऊ नये.
पर्यटकांनीही स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आनंदाच्याभरामध्ये वाहवत न जाता आपल्या कुटुंबातील व्यक्तींची योग्य काळजी घेतली पाहिजे लहान मुले काय करत आहेत याची दक्षता घेतली पाहिजे धोक्याच्या ठिकाणापासून त्यांना दूर केले पाहिजे जेणेकरून अशा दुर्घटना घडणार नाही .
प्रशासन व पर्यटक यांनी योग्य काळजी घेतल्यास
अशा घटना वारंवार घडणार नाही
0 टिप्पण्या