मुंब्रा येथे मराठी -हिंदी भाषेतील वाद पुन्हा पेटला, मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याने एका मराठी तरुणाला जाहीर माफी मागावी लागली. ...

सध्या गेली काही दिवस मुंबई मध्ये मराठी विरुद्ध गैर मराठी भाषा असा संघर्ष पहावयास मिळत आहे त्यातच आता नाविन घटना घडली असून.

मुंब्रा येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेने मराठी-हिंदी भाषेतील वाद पुन्हा पेटला असून, एका फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याने एका मराठी तरुणाला जाहीर माफी मागावी लागली. मराठी बोलता येत नसलेल्या विक्रेत्याने इतरांना मदतीसाठी हाक मारल्याने हाणामारी झाली. विशाल गवळी असे या तरुणाचे नाव असून, त्याने दबावाखाली माफी मागितल्याची नोंद करण्यात आली होती, ज्यामुळे या प्रदेशातील मराठी आणि बिगरमराठी भाषिकांमध्ये वाढत्या तणावाबाबत संताप आणि चर्चांना उधाण आले आहे.

. राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला असून, असे वाद सुरू राहिल्यास संभाव्य परिणामांचा इशारा दिला आहे

फळविक्रेत्याला मराठी का येत नाही? विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. विशेष म्हणजे पोलिसांनी देखील आपली कर्तव्य पार पाडून मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी तक्रार दाखल केली. या मराठी तरुणाला मुंब्रा येथील जमावाने प्रचंड शिवीगाळ देखील केली. या प्रकरणावरुन आता रोष व्यक्त केले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?...

मुंब्रामध्ये एक मराठी तरुणाने एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना भाषेवरुन वाद झाला. मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावरुन वाद झाला. मला मराठी येत नाही. मी हिंदीत बोलणार, असं फळ विक्रेता बोलताच मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन”, असं बोलू लागला. यामुळे इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशी यांनी येवून मराठी तरुणाला घेरले. मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे शांत राहू दे, असं मुंब्र्यातील स्थानिक बोलू लागले. यामुळे वाद चिघळला आणि मराठी तरुणाला माफी मागायला जमावाने भाग पाडले.

आम्हाला मराठी येत नाही, काय करायचे ते कर असं गर्दीतले लोकं बोलत होते, ही ⁠घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ⁠हिंदी येते तर हिंदीत बोल, वाद कशाला करतो असं बोलून मराठी तरुणाला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. ⁠विशाल गवळी असे तरुणाचे नाव असून त्याला आईने फळं आणायला पाठवले होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल होत आहे .

सोशल मीडिया वर या प्रकरणात दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. सध्याचे वातावरण पाहता प्रशासनाने योग्य अशी भूमिका घेतली पाहिजे जेणकरून समाजामध्ये प्रेम सलोख्याचे संबंध निर्माण झाले पाहिजे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या