अपघात नाही घातपात, पुण्यातल्या टेम्पो ट्रॅव्हलर बसला लागलेल्या आगीचं सत्य गुरुवारी 20 मार्चला रात्री बाहेर आलं. टेम्पो चालकानंच सीटखाली केमिकल ठेऊन या टेम्पोला आग लावली आणि त्यानंतर ही सगळी घटना घडली, हे तपासात स्पष्ट झालं. या आगीत ड्रायव्हरनं बसमधून पळ काढला, बसमध्ये बसलेले काही कर्मचारी सुद्धा उतरु शकले, पण या आगीत चार कर्मचाऱ्यांचा जळून मृत्यू झाला. 19 मार्चच्या सकाळी घडलेल्या या घटनेचं सत्य 20 तारखेला बाहेर आलं, पण तोवर चर्चा अपघाताचीच होती. विषय अगदी बसच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत गेला होता. पण मग हा घातपात असल्याची लिंक पोलिसांनी कशी शोधून काढली, यात चालक दोषी असल्याचं कसं समजलं ? सीसीटीव्ही फुटेजमधून नेमकं काय समोर आलं ? आरोपी चालकाच्या कुटुंबानं नेमका काय दावा केला आहे आणि या सगळ्यात मनोविकाराची चर्चा का होत आहे ? पाहुयात या लेखामधून.
सध्या या घटनेचा 28 सेंकदाच सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होतय
यामध्ये हिंजवडी येथील फेज 1 मधील तमन्ना सर्कल वरून फेज 1च्या दिशेने ही बस जात होती सकाळची वेळ असल्या कारणाने रस्त्यावर वाहनांचे मोठी वर्दळ होती यातच व्योम ग्राफिक्स च्या कर्मचाऱ्यांची बस होती तिथल्या HAL कंपनी च्या वळणावर ही बस थांबली होती काही वेळाने ऑरेंज कलरचा टीशर्ट घातलेली व्यक्ती बाहेर आली त्या व्यक्तीच्या उजव्या खिशाला आग लागल्याचे दिसत होते पण बस सुरूच होती त्यानंतर आणखी एक व्यक्ती बाहेर पडली आणि काही वेळातच बस उतारा वर लागली पटापटा तीन ते चार व्यक्तींनी बस मधून बाहेर उड्या मारल्या पुढे ही बस रस्त्यावरील असलेल्या दोन झाडावर जाऊन धडकली त्या 100 मी . अंतरात बस मधून आगीचा भडका उडाल्याचे दिसतंय
आणखी एक सीसीटीव्ही फुटेज वायरल होते ज्यात बस झाडाला धडकल्यानंतर मोठा भडका झाल्याचे दिसते या दोन्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक गोष्ट समान आहे बसला आग लागल्यानंतर लगेच आगीचा भडका उडतोय हीच गोष्ट तपासामध्ये महत्वाची ठरली पोलिसांना जी प्राथमिक माहिती देण्यात आली होती त्यानुसार बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती पण पोलिसांना आपला अनुभव आणि सीसीटीव्ही फुटेज द्वारे एक प्रश्न पडला जर कारण शॉर्टसर्किट झाल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे लागली होती तर इतक्या लवकर भडका कसा काय? उडाला कारण शॉर्टसर्किटमुळे लगेच भडका उडत नाही यावरून पोलिसांनी ही आग लागलेली नाही तर लावलेली आहे याचा अंदाज बांधला त्या दृष्टीने तपास सुरू केला
व सीसीटीव्हीचे फुटेज चे बारकाईने निरीक्षण केले. कंपनीतल्या काही कर्मचाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली त्यातून त्यांना एका माणसावरती संशय बळावला टेम्पो ट्रॅव्हलर चालक जनार्दन हंबर्डेकर.
पोलिसांनी बस जळून चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे सुरुवातीला हा अपघाताचा गुन्हा नोंदवला होता. पण या संशयानंतर घातपाता चे अँगल पुढे आला त्याच तपासात एक महत्त्वाची लिंक मिळाली
पोलिसांना चालक जनार्दन हंबर्डे कर याचा प्रवाशांसोबत दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असे अशी माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी त्यांची काही भांडणे ही झाली होती एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये जनार्दन हंबर्डेकर वाकून काहीतरी करताना दिसला आगी नंतर थांबलेली बस सुरू कशी झाली हाही प्रश्न पडला पण सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरला तो गाडी जळलेल्या काही अंतरावर माचिस सापडली मग पोलिसांनी हंबर्डीकर ची चौकशी करण्याचे ठरवले हंबर्डीकरने बस जळल्यानंतर चक्कर येण्याचे नाटक केले होते .
पण त्यानंतर त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते तिथे तो बेशुद्ध असल्याचे सांगितले मग पोलिसांनी तो शुद्धीवर येण्याची वाट बघतीली.20 मार्च ला त्यांनी चौकशी केली त्यानी पोलिसांना जो जबाब दिला यातूनच हे सर्व सत्य बाहेर आले हंबर्डीकर पोलिसांना सांगितले की बस ला आग लावून शॉर्ट सर्किट ने आग लागल्याचे चा बनाव करायचा याचे प्लॅनिंग त्यानी एक दिवसा आधीच केले होते तो ज्या कंपनीत काम करतो तिथून च त्याने बेंझिन नावाचे केमिकल घेतले होते तसेच कापडाचे काही चिंध्या त्यांनी ठेवल्या होत्या दुसऱ्या दिवशी तो कामावर आला व केमिकल सोबत आणले व बसच्या प्रवासात उतार कुठे? लागतो याचा अचुक अंदाज घेऊन त्याने उताराच्या अगदी जवळ हा प्लॅन अमलात आणला त्याने काडी पेटीने कापडाच्या चिंध्याना आग लावली व धावत्या गाडी मधून उडी मारली त्यात तो ही किरकोळ जख्मी झाला पुढे बस झाडाला जाऊन धडकली व स्फोट झाला बसमधून मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ बाहेर पडू लागले या आगीच्या लोळामुळे व धुरामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर पडणे अशक्य झाले होते.
त्यांनी शेवट पर्यंत मागचा दरवाजा उघडण्याचा व काचा फोडण्याचा आतोनात प्रयत्न केला पण त्यांना त्यात काही यश आले नाही व त्यात त्या चार जणांचा जिवंत पणे जळून मृत्यू झाला.
जनार्दन हंबर्डेकर यांनी आपण हे सर्व कंपनी ने दिवाळीचा बोनस कापला व कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली इतकचं काय तर जेवणाच्या वेळी पण कामे सांगितले बस मधल्या काही जणांशी पिक अप ड्रॉप वरून वाद झाले होते यासर्व रागातच आपण हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले पण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी काही वेगळाच दावा केला आहे .
हंबर्डिकर ची पत्नी व भावाणे त्याला नाहक पणे या प्रकरणात गोवले गेले आहे असा आरोप केला आहे तसेच जनार्दन शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब कसा नोंदवला गेला असे त्यांचे म्हणणे आहे . ज्या बसला आग लागली त्या मध्ये जनार्दन चे नातेवाईक म्हणजेच भाऊजी सुद्धा होते आपले नातेवाईक असताना ही तो बस जळण्याची रिस्क का ? घेईल
दुर्घटनेत काही प्रवाशांना साधे खरचटले पण नाही मग ते पेटत्या बस मधून बाहेर कसे पडले ?
जनार्दन ने कंपनीतून केमिकल आणले तर कंपनीत कोणी का त्याला थांबवले नाही?
असे अनेक प्रश्न हुंबर्डीकर च्या नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत.
हुंबर्डीकर ने जरी सांगितले असले की त्यांचा पगार कंपनी ने थकवला आहे तरी कंपनी चे मालक हितेन शहा यांनी सांगितले कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आम्हीं वेळेत केले आहेत. व हुंबर्डीकर चा पगार ही आम्हीं थकवाला नाही .
पण त्याच्या कडे केमिकल कुठून आलं ते माहित नाही आता या प्रकरणात आणखी एक चर्चा होते ती मानसिक आजाराची जनार्दन हंबर्डेकर यांनी आपण हे कृत्य रागातून केल्याचे सांगितले असले तरी त्याच्या या कृती मागे मानसिक आजार होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मानसोपचाराच्या मते जनार्दन हंबर्डेकर यांनी जे काही रागातून केले त्यातून त्याला बॉर्डर लाइन पर्सनलिटी डिसअर्डर म्हणजेच व्यक्तिमत्त्व मनोविकार असण्याची शक्यता आहे . अशा व्यक्तीच्या भावना व नातेसंबंध अस्थिर असू शकतात यामध्ये व्यक्ती कोणताही विचार न करता काहीही करू शकता ते पुढचा मागचा विचार करत नाहीत यांच्यामध्ये सोडाची भावना असते व महत्त्वाचे सूड घेत असताना त्यांना आनंद होत असतो साहजिकच यातून समाजाची हानी होणाऱ्या गोष्टी घडू शकतात. अशी व्यक्ती स्वतःलाही इजा करून घेऊ शकते. असे आजार लहानपणी एखादी घटना घडली असेल किंवा अनुवंशिकतेमुळे होऊ शकते
अर्थातच जनार्दन हंबर्डे करला हा आजार आहे का हे कृत्य आजारातून केले आहे का? याबद्दल काही स्पष्ट माहिती पुढे आलेली नाही.
कायदेशीर कार्यवाही
हंबरडेकर यांच्यावर भारतीय गणवेश संहितेच्या (INC) विविध कलमांखाली त्याच्या कृतींमुळे मृत्यू आणि गंभीर शारीरिक हानी पोहोचवल्याचा आरोप आहे. घटनेत झालेल्या जखमांवर उपचार सुरू असल्याने त्याला अद्याप औपचारिक अटक करण्यात आलेली नाही.
0 टिप्पण्या