अभिनेता मुकुल देव यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन.....हिंदी ,पंजाबी, तेलगू, मल्याळम , बंगाली अशा अनेक भाषांच्या सिनेमात त्याने त्याच्या ऍक्टिंगची छाप सोडली होती


 कॉमेडी असो नाहीतर व्हिलन्  ,

पोलिसांचे कॅरेक्टर असो, तर कधी  गुन्हेगार ,तर कधी हिरोचा मित्र ,तर कधी स्वतः नायक ,अभिनय भाषाशैली आणि स्वभाव तिन्ही गोष्टी परिपूर्ण गुणसंपन्न असलेला कलाकार म्हणजे जे मुकुल देव हिंदी ,पंजाबी, तेलगू, मल्याळम , बंगाली अशा अनेक भाषांच्या सिनेमात त्याने त्याच्या ऍक्टिंगची छाप सोडली होती  सन ऑफ सरदार मध्ये त्याने धुमाकूळ घातला होता  तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. पण हा हसरा चेहरा आता कायमचा  दूर निघून गेला आहे. 23 मे 2025 रोजी वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी मुकुल देव यांचे निधन झाले आहे आणि त्याच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीने गुणी संयमी अनेक चांगला कलाकार गमावला आहे.



मुकुल देव हा एक प्रोफेशनल पायलट सुद्धा होते हे फार कमी लोकांना माहिती आहे त्याचे जाण्याने त्याचा भाऊ राहुल देव आतून  तुटलाय आजच्या या लेखामध्ये आपण मुकुल देव च्या सिने चित्रपटात कारकिर्दी बद्दल व त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया  त्याने अभिनयाचे प्रवासापासून ते वैमानिक होण्याचे स्वप्न पासून मागे सोडलेल्या आठवणी प्रेरणादायी आहेत मित्रहो माणूस किती मोठा झाला हे त्याच्या कामगिरी वरून कळते पण माणूस किती चांगला होता हे तो व्यक्ती गेल्यानंतर समजते अभिनेता मुकुल देव यांचे आयुष्य ह्या वाक्याला तंतोतंत साजेसे होते. अत्यंत, सुंदर, नम्र, संयमी, आणि प्रतिभावान व्यक्ती म्हणून मुकूल देव यांचे 23 मे 2025 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं त्यांच्या जाण्याने संपुर्ण हिंदी, पंजाबी,  दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीत शोक पसरला आहे.


मुकुल देव यांचा जन्म 17 सप्टेंबर 1970 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे बालपण अगदी साधे, सोज्वळ, होते . घरात शिक्षणाचे आणि  संस्काराचे मोठं महत्व होते आणि तसेच वातावरण होते . वडील लष्करात असल्यामुळे लहानपणापासून अंगामध्ये शिस्त भिनली होती त्यासोबत वडिलांनी शिकवले होते स्वप्न बघण्याचे आणि ते पूर्ण करण्याची इच्छा महत्वकांक्षा, लहानपणीचं त्यांचं एक स्वप्न होतं वैमानिक व्हायचं हो त्यांना पायलट व्हायचं होतं आकाशात भरारी घेण्याचे त्यांना विलक्षण आकर्षण होतं 


म्हणूनच त्यांनी पायलट होण्याचं प्रशिक्षणही घेतलं ते सुद्धा दिल्लीमधल्या  एव्हिएशन अकॅडमी मधून ते ट्रेनिंग दरम्यान प्रोफेशनल पायलट झाले पण म्हणतात ना नियतीने त्यांच्यासाठी वेगळच प्लॅनिंग केलं होतं त्यांना त्यांना उत्साह आभारी जायचं होतं पण विमानातून नाही तर ऍक्टिंगच्या क्षेत्रा मधून  पुढे जाऊन कोणास ठाऊक त्यांना  विमानाच्या इंजिनाच्या आवाजा ऐवजी ॲक्टिंग चे भाव विश्व खुणावू लागले त्यांचा मोठा भाऊ राहुल देव हा आधी पासूनच फिल्म इंडस्ट्री मध्ये आपले नशीब आजमावत होता राहुलची शरीर यष्टी जोरात होती त्यामुळे फार अक्टिंग न येता पण तो इंडस्ट्री मध्ये टिकून होता पण मुकुल ने बॉडी पेक्षा एक्स्प्रेशन वर काम केलं तो नैसर्गिक अक्टिंग करायचा ती सुद्धा खूप सहजतेने आणि उत्तम अशी त्याने भावाची मदत न घेता आपली वेगळी वाट निर्माण केली अक्टिंग चे शिक्षण घेताना त्याने स्वतःला अक्षरशः झोकून दिले मुंबईच्या रोशन तनेजा अक्टिंग स्कूल मधून तो अक्टिंग शिकला तो पण उच्च दर्जाचा आणि मग सुरू झाली त्याची चंदेरी पडद्यावरची संघर्ष गाथा मुकुल देव याने आपल्या करियर ची सुरुवात 1996 साली दस्तक या नावाच्या चित्रपटाद्वारे केली या चित्रपटात मुकुल खलनायकाच्या भूमिकेत होता पहिल्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका करणे हे खूप धाडसाचे काम होते पण मुकुलने हे धाडस केले व ते लक्षवेधी ठरले, नंतर कृष्णा अर्जुन, काही दिया जले कही जिया सारख्या टीव्ही मालिके मधून त्याने आपली ओळख अधिक घट्ट केली तसेच त्या काळी चॅनेल वाहिन्यांचे जाळे आजच्या इतके पसरले नव्हते त्यावेळी डीडी 1 म्हणजेच दूरदर्शन हे खूप प्रसिद्ध होते त्यावरील एक से बढकर एक या  चित्रपट गीताच्या कॉमेडी सीरियल मध्ये ही त्यांनी भूमिका साकारली होती ज्या मध्ये जावेद जाफरी, व अन्य कलाकारांनी

भूमिका साकारली होती त्या वेळी जी मुले लहान होती ती आज चाळीशी मध्ये असतील . टीव्ही मालिके पासून ते 70 MM मोठ्या पडद्यापर्यंत पोहचण्याचा या प्रवासात मुकुल देव यांच्या कारकिर्दीत विविध रंग होते विविध अभिनयाचे कंगोरे होते.


 कुमार sat 42, आर्य, राजुचाचा, मुझसे शादी करोगी, साहेब बीबी और गँगस्टर 3 , यमला पगला दिवाणा, वजूद, जय हो, मेरे दो अनमोल रत्न, शरीक, कोहराम, इस्की टोपी उसके सर,

अश्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला पण तो लक्षात राहिला तो अजय देवगण यांच्या सन ऑफ सरदार या चित्रपटातील वेंधळट व खुनशी कॅरेक्टर मुळे 

सिनेमात अजय देवगण चां पाठलाग करताना पाहून कोणालाही हसू आले नाही असे झाले नाही बाकी त्याने हिंदीमध्ये अपेक्षा न ठेवता पंजाबी, तेलगू, मल्याळम, बंगाली, अशा अनेक भाषा चित्रपटांमध्ये त्याने काम केले . त्याच्या अभिनयात एक सहजपणा होता जो अगदी इरफान खान कडे होता तसाच त्याचे डोळे सुद्धा इरफान खान सारखे काहीं न बोलता बरेच काही बोलून जात असे सगळे हावभाव अगदी सहजतेने त्याच्या चेहऱ्यावरून व डोळ्यातून व्यक्त होत असे कोणत्याही मिळालेल्या भूमिकेचा तो त्या भूमिकेत घुसून अगदी समरस पने एकजीव होवून अभिनय करत असत. मुकुल जे पात्र साकारत ते अगदी जिवंत करत असत की कधी कधी प्रश्न पडत की पात्र खरच जिवंत आहे का इतके असूनही मुकुल देव हे नाव कधी चर्चेच्या झगमटात नव्हते न बातम्या, न सोशल मीडियावर त्याला न बळच टीआरपी चां ध्यास न प्रसिद्धीचा हव्यास तो नेहमी शांत पणे यायचा व आपले काम करून निघून जायचा ते ही शांतपणे जसा तो आता निघून गेला 

कायमचा तो कधी कोणत्या कॉन्ट्रेव्हर्सी मध्ये अडकला नाही.

मुकुलचे आपल्या आई वडिलांशी खूप घट्ट नाते होते त्यांच्या जाण्याने मुकुल खूप एकाकी पडला होता त्याच्या मनावर खूप परिणाम झाला होता. गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये मुकुल वर उपचार सुरू होते तो भयंकर डिप्रेशन मध्ये गेला होता तो स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नव्हता असे त्याचे मित्र विंदू दारा सिंग यांच्या कडून समजले विंदू दारा सिंग व मुकुल देव हे दोघेही खूप छान मित्र होते विंदू म्हणाला की मुकुल सोबत घालवलेला टाइम हा माझ्यासाठी खूपच क्वालिटी टाइम होता दोघानाही सन ऑफ सरदार मध्ये एकत्र काम केले होते त्यात ते दोघेही संजय दत्त चे लहान भाऊ दाखवले होते .

                    नेहमी हसून खेळून स्वभावातलेचे वातावरण आनंदी ठेवणारा भाऊ रुग्णालयाच्या बेडवर पाहून राहुल देव खचून गेला होता. मुकुल ला एक मुलगी आहे सूत्रानुसार अंदाजे मुकुलची अंदाजे मालमत्ता 40 कोटी च्या आसपास आहे त्याच्या पश्चात त्यांची मुलगी त्यांची वारस आहे मुंबईत त्यांचे घरही आहे जिथे ते वास्तव्यास होते. त्यांचे जवळचे मित्र विंदू यांच्या कडून कळले की ते काही दिवसापासून स्वतःला दूर ठेवत होते व ते स्वतःला एकटे पाडले होते आई वडिल व विवाहिक जीवनात झालेल्या घटस्फोट त्यामुळे त्यांना धक्का बसला होता त्यामूळे ते मानसिक दृष्ट्या खचून गेले होते त्यातच ते आजारी पडले होते व आपल्या आजाराचे मित्र मंडळींना कुटुंबियांना कळू दिले नाही अशा परिस्थितीत मुकुल देव हे अल्पशा आजारामुळे काल रात्री 23 मे रोजी मुकुलचे निधन झाले . मुकुल देव यांनी जरी आज या जगातून निरोप घेतला असला तरीही त्याचा उत्तम, जिवंत अभिनय प्रेक्षकांना नेहमीच त्यांची आठवणं करून देत राहील त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्मित हास्य नेहमी प्रेक्षकांना स्मृतीत राहील अश्या या हरहुन्नरी कलाकारां ला युनिक मराठी चा मानाचा मुजरा. मुकुल देव यांना भावपुर्ण श्रद्धांजली....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या