पुणे हिंजवडी मिनी बसला आग लागल्याने भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू ......

पुणे हिंजवडी बसला आगीची घटना

१९ मार्च २०२५ रोजी पुण्यातील हिंजवडी परिसरात व्योमा ग्राफिक्स कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि दहा जण जखमी झाले. ही घटना सकाळी ७:३० वाजता आयटी पार्कच्या फेज १ येथील हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयासमोर घडली.

घटनेची माहिती

या दुर्घटनेत चार जणांचा कार्य  होरपळून मृत्यू झाला त्यांची नावे खालील प्रमाणे

मृत्यू: सुभाष सुरेश भोसले , वय 42,रा.वारजे, शंकर शिंदे, वय 58 रा. नरे आंबेगाव, गुरुदास लोकरे , वय 40 रा. हनुमान नगर कोथरूड,आणि राजू चव्हाण वय 40 रा.धायरी वडगाव ,हे चार जण मृत्युमुखी पडले. तर जखमी मध्ये जनार्दन हंबर्डेकर चालक, वय 57 रा.वारजे, संदीप शिंदे वय 37 राहणार नऱ्हे, विश्वनाथ जोरी वय 52 रा  कोथरूड,  विश्वास लक्ष्मण खानविलकर, पुणे , प्रवीण निकम, चंद्रकांत मलजी वय 52 , दोघे रा. कात्रज, जख्मी झाले जखमींपैकी दोघे ४०% पेक्षा जास्त भाजले आहेत आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे तर काही जण किरकोळ भाजले आहेत. विश्वास कृष्णा गोडसे ,मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे ,प्रदीप बाबुराव राऊत, हे सुखरूप बाहेर पडले.


आगीचे कारण: गाडी चालू असताना चालकाच्या सीटजवळ आग लागल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. चालक पळून जाण्यात यशस्वी झाला, परंतु मागचा बाहेर पडण्याचा मार्ग न उघडल्याने काही प्रवासी अडकले होते. आगीचे कारण अद्याप तपासात आहे, इंजिनमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिक संकेत आहेत.


आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तातडीने तैनात करण्यात आले. जखमींना अतिदक्षता विभागात असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून उपचार घेण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात आले.


सुरक्षा आवश्यक आहे

या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीबाबत गंभीर सुरक्षा चिंता निर्माण झाल्या आहेत. काही चालकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षणाचा अभाव आहे यावर भर देऊन आयटी कर्मचारी मंचाने कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे ऑडिट करण्याची मागणी केली. युनियनने असेही नमूद केले की खर्च कमी करण्यासाठी कंपन्यांनी अपुरे सुरक्षा उपायांसह तृतीय-पक्ष ऑपरेटरना वाहतूक आउटसोर्स केली आहे. आगीचे कारण आणि शेवटचा उपाय का अयशस्वी झाला याबद्दल अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.


शॉर्ट सर्किट झाल्या चा अंदाज:

प्राथमिक तपासणी नुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला नुसार गाडी मध्ये वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्या कारणाने ही आग लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे .


पुण्यातील हिंजवडी भागात आगीच्या घटनेत सहभागी असलेल्या मिनीबसच्या देखभालीच्या नोंदींबद्दल शोध निकालांमध्ये विशिष्ट माहिती मिळालेली नाही. तथापि, मिनीबस ऑपरेटरसाठी किमान १५ महिने देखभालीच्या नोंदी राखण्यासाठी हा मानक उपाय आहे. या नोंदींमध्ये सहसा हे समाविष्ट असते:


वाहनाचे फिटनेस अहवाल


सुरक्षा तपासणी अहवाल


पासिंग प्रमाणपत्र 


सेवा इतिहास


दुरुस्ती नोंदी


वाहन रस्त्यावर राहते आणि सुरक्षितता नियमांचे पालन करते याची खात्री करण्यासाठी हे दस्तऐवज महत्त्वाचे आहेत. जर विचाराधीन मिनीबस अशा मानकांनुसार चालवली गेली असेल, तर तिच्याकडे पुनरावलोकनासाठी दस्तऐवजीकृत देखभालीचा इतिहास उपलब्ध मिळायला हवा . ज्यावरून वाहन कंत्राटदार सर्व नियमांची अंमलबजावणी करीत होते का नाही हे समजेल 


वाहनांची फिटनेस प्रमाणपत्र तपासण्याची यंत्रणाच नाही 

एकदा वाहन कंपनीकडे लावले की वाहन मालक चिंतामुक्त राहतात वाहनांची देखभाल दुरुस्ती कडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र तपासण्याची यंत्रणा कंपनीकडे नसल्याने त्या महत्त्वाच्या कडे दुर्लक्ष होते. वाहन कंपनीकडे कंत्राटी लावल्यानंतर प्रत्येक कंपनीने त्याचा मंथली फिटनेस रिपोर्ट अहवाल घेणे गरजेचे आहे पण त्या वाहनाचे फिटनेस कोणत्या एककामध्ये मोजले जाते हे कंपनीला माहित नसते कंपनीने व कंत्राटदाराने त्याची योग्य माहिती करून वेळोवेळी वाहनांची फिटनेस तपासणी केली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना परत घडणार नाही व कोणाची जीवित हानी होणार नाही. 

अनेकदा वाहनांचे सर्विसिंग योग्य ठिकाणी केले जात नाही काही त्रुटी शिल्लक राहिल्या की आग लागण्याचे प्रकार घडतात वाहनांचे खोल आणि ऑइल यांची तपासणी वरचेवर केली पाहिजे याकडे प्रवासी वाहनांचे दुर्लक्ष होते ज्यामुळे अशा घटना घडू शकतात.


हिंजवडी मध्ये 600 कंपन्या कार्यरत असून 300 कंपन्या पूर्णपणे कार्यालयीन कामासाठी खुले आहेत काही मध्ये वर्क फ्रॉम होम आणि दिवसाआड कार्यालयीन काम चालू असते वीकेंडला तीन दिवस सुट्टी असते . कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे होणारे त्रास वाचवण्यासाठी व वाढत्या ट्रॅफिकच्या समस्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना घरापासून कॅब किंवा बसेसची सुविधा करते. यामध्ये एक ते दोन कर्मचाऱ्यांसाठी कॅब कार तर थोड्या मोठ्या प्रमाणावर दहा ते बारा व्यक्तींसाठी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस यांची व्यवस्था केली जाते. एका मिनी बस मध्ये दहा ते बारा किंवा 17 ,19 अशी आसन व्यवस्था असते.

हिंजवडीत वाहनांचे आठ ते दहा ठेकेदार आहेत. 

हिंजवडी सिक्युरिटी कंपनी हाउसकीपिंग असे ठेके कंपनीकडून दिले जातात हे ठीक हे स्थानिक नेत्यांच्या नातेवाईक कार्य करण्याच्या कंपन्यांना दिले जातात यात मोठा हस्तक्षेप असतो या खालोखाल गाड्यांचा ठेका देण्यात येत असतो. 

हिंजवडी असे आठ ते दहा ठेकेदार असून त्यांची बरीच वाहने हे अशा कंपन्यांना कंत्राटावर लावलेली असतात चालकासह ही वाहने त्या कंपन्यांना कंत्राटावर पुरत येत असतात. या वाहनांना महिन्याच्या भाडेतत्त्वावरती ठराविक रक्कम ठरवली जाते ज्यामध्ये त्यांचे वर्षाचे ते तीन वर्षाचे करार कंपनीसोबत केलेले जातात. हिंजवडी मध्ये दिवसाला तीन शिफ्ट असे मिळून सुमारे चार लाखाहून जास्त कर्मचारी रोज प्रवास करत असतात. 

मिनी बस मधून लीड कर्मचारी बँक ऑफिस कर्मचारी तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी असे सर्वच प्रकारचे कर्मचारी रोज दैनंदिनिय प्रवास करत असतात. 


इंडस्ट्रीज असोसिएशन गस्त घालणार का ?

बुधवारच्या दुर्घटनेमुळे धन्यवाद चा वापर करणाऱ्या चार लाखावर कर्मचाऱ्यांच्या जीवांचा प्रश्न निर्माण झाला आहे काही वर्षांपूर्वी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन कडून जास्त सुरू होते गस्ती वेळी वाहनांची तपासणी करण्यात येत असे.

मात्र सध्या ही गस्त बंद असल्याचे कर्मचारी सांगतात हिंजवडी आयटी पार्क मधील ठेकेदारी कामात हस्तक्षेप होत असताना असोसिएशन कडून काहीच कारवाई केली जात नाही. 

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह प्रवाशांचा प्रश्न ऐरणीवर हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ने आन करण्यासाठी मिनी बसचा पर्याय स्वीकारला होता परंतु ठेकेदारांकडून देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सुरक्षित वाहनेही धोकादायक बनले आहेत यामुळे वरील घटनेप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या हकनाक बळी गेला आहे.


हिंजवडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्या 

या घटनेचे पडसाद विधानसभा सभागृहात पण पाहायला मिळाले झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आमदार हेमंत रासने यांनी सरकारला या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. 

राज्य सरकारने संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी आणि कुटुंबियांना न्याय द्यावा अशी दुर्घटना टाळण्यासाठी तोच पावले उचलावीत आग लागलेल्या संबंधित वाहनाची देखभाल आणि सुरक्षा तपासणी झाली होती का याचा अहवाल याचा सखोल तपास करावा अशी मागणी ही रासने यांनी केली आहे. घटनेच्या वेळी मिनी बसमध्ये दहा ते बारा कर्मचारी होते अचानक ड्रायव्हरच्या पायापाशी आग लागल्याने ड्रायव्हर चालते गाडीमधून खाली उतरला व इतर कर्मचारी ही जी पुढे असल्याने त्वरित घाईने खाली उतरले परंतु मागे बसलेले चार जणांना लागलेल्या मोठ्या आणी मुळे बाहेर पडता आले नाही व मागील सीटचे इमर्जन्सी डोर न उघडल्यामुळे चौघा जणांचा अतिशय करून अंत झाला. या घटनेची माहिती होताच त्वरित आमदार हेमंत रासने यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने निर्देश द्यावे अशी विनंती केली.

कंपनी ही केवळ दोन मिनिटांच्या अंतरावर असताना ही घटना घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या