देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं घर म्हणजेच अँटिलिया नेहमी चर्चेचा विषय असतं. . मात्र, जगातील सर्वांत महागडं घर हे मुकेश अंबानीं यांचं अँटिलीया नाहीय तर . जगातील सर्वात महागडं घर गुजरातमध्ये आहे. ज्या घराचं नाव आहे लक्ष्मी विलास पॅलेस ? या निवास स्थानाला पाहून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सुद्धा फिदा झाले होते... चला तर मग जाणून घेऊयात हे घर आहे कोणाचं ?लक्ष्मी विलास पॅलेस कुठे आहे? त्या राजवाड्याचा इतिहास काय ? त्याला जगातील सर्वात मोठ्या राजवाड्याचा दर्जा कसा मिळाला, अंबानी पेक्षा जास्त किंमत असलेल्या या घराची वैशिष्टयै काय आहेत ? आलिशान घर कोणाचं आहे .. चला तर मग हेच जाणून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून
भारतामध्ये अलिशान घरे, ऐतिहासिक वस्तू, राजवाडे यांची काही कमी नाही या पैकी एक गुजरात राज्यातील वडोदरा शहरातील लक्ष्मी विलास पॅलेस भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवास स्थान बद्दल सर्वांना माहिती असली तरी लक्ष्मी विलास पॅलेस हे खासगी निवासस्थान त्याच्या सौंदर्या मुळे व ऐतिहासिक इतिहासामुळे महत्वाचे ठरले आहे
तर हे आलिशान भव्य घर आहे बडोद्याच्या गायकवाड कुटुंबांचे वयाच्या 46 व्या वर्षी ही आपल्या सौंदर्या मुळे चर्चेत असलेल्या महाराणी राधिका राजे गायकवाड यांचे हे घर आहे, महाराणी राधिका राजे गायकवाड ह्या बडोद्याचे महाराज समरजीत सिंह राव गायकवाड यांच्या पत्नी आहेत आणि त्या जगातील सर्वात महागड्या घरात राहतात .
महाराज समरजीत सिंह राव गायकवाड हे बडोद्याचे सोळावे महाराज आहेत ते सण 2012 साली बडोदा राजघराण्यातील सिंहासनावर विराजमान झाले.
त्यांना श्रीमंत महाराज कुमारी पद्माजा राजे गायकवाड व नारायणी राजे गायकवाड या दोन मुली आहेत.
या राज घराण्याची वास्तू अगदी पाहण्यासारखी आहे. 700 एकर मध्ये असलेला हा राजवाडा ब्रिटिश पॅलेसच्या राजघराण्याच्या बॅकिंगहम पॅलेस पेक्षा चार पट मोठा आहे. तर 25000 कोटी हून याची किंमत असल्याचे सांगितले जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये या खाजगी निवासाला सर्वात महागडे घर म्हणून ओळख मिळाली गुजरात मध्ये वडोदरा शहरातील हा राजवाडा ऐतिहासिक आहे कारण तो 1900 व्या शतकातील आहे. त्या काळजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या राजवाड्याचे बांधकाम 1890 साली बांधून पूर्ण केले. या राजवाड्याचे पूर्ण बांधकाम हे ब्रिटिश आर्किटेक्चर रॉबर्ट फेलो चिशोल्म ,मेजर चार्ल्स मॅट यांच्या देखरेखी खाली करण्यात आले होते त्यावेळी या राजवाड्याच्या बांधकामासाठी तब्बल 27 लाख रुपये म्हणजेच एक लाख ऐंशी हजार पाउंड खर्च आलाय लक्ष्मी विलास पॅलेस चे बांधकाम त्या काळाच्या आधुनिक व उत्तम अशा तंत्रज्ञानाचे बांधकामाचे शैलीचे उत्तम उदाहरण आहे
तीस लाख चौरस फुटामध्ये बांधलेला हा राजवाडा आहे तर या राजवाड्याचे आकारमान मुकेश अंबानीच्या निवासस्थानापेक्षा 61 पट जास्त क्षेत्रफळ आहे. या राजवाड्यामध्ये 170 खोले आहेत ज्या या राजवाड्याला शोभून दिसतात व या राजवाड्याचे वैभव वाढवतात. या राजवाड्याची रचना ही राजेशाही थाटात करण्यात आलेली आहे राजवाड्याचा शाही सौंदर्याचा प्रत्येक पैलू राजकीय थाटाचा आपणास दिसून येतो या राजवाड्या मधील आधुनिक असे सुविधांनी सुसज्ज अशा पॅलेस मध्ये काय काय आहे ते पाहूया ? शाही घोड्यांचे निवासस्थान ,स्विमिंग पूल ,गोल कोर्ट अनेक सुंदर बागा, तसेच रॉयल म्युझियम आहे याच राजवाड्याचा एक भाग सध्या रॉयल म्युझियम म्हणून वापरला जात आहे. इथं गायकवाड कुटुंबीयांचा ऐतिहासिक वारसा शस्त्र-अस्त्र, अमूल्य कलकृती व प्राचीन वस्त्रा चा अमूल्य वारसा जतन केला जात आहे. या वास्तुशालीमध्ये युरोपीयू वेस्टर्न आणि मुघल या शैलींचा वापर केलेला दिसत आहे .आज लक्ष्मी विलास पॅलेस चा भाग सर्वसामान्य व्यक्तींसाठी पाहण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे.
सुशोभीकरण आणि सुविधा
आतील आणि कलाकृती: राजवाडा उत्कृष्ट मोज़ेक, झुंबर आणि राजा रवी वर्माच्या चित्रांसह कलाकृतींनी सजवलेला आहे. बांधकामाच्या वेळी ते लिफ्ट आणि अंतर्गत टेलिफोन एक्सचेंज सारख्या आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज होते.
दरबार हॉल: या शाही हॉलमध्ये व्हेनिस मोज़ेक फ्लोअरिंग आणि बेल्जियमच्या स्टेन्ड ग्लास खिडक्या आहेत, ज्याचा वापर अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैफिलींसाठी केला जातो.
मनोरंजक वैशिष्ट्ये: पॅलेस ग्राउंडमध्ये गोल्फ कोर्स, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, पर्ल बाग क्रिकेट ग्राउंड आणि एक लहान प्राणीसंग्रहालय (ऐतिहासिकदृष्ट्या) समाविष्ट आहे.
सकाळी दहा ते पाच या वेळेत पर्यटकांना या राजवाड्यात भेट देता येते व या राजवाड्याचे अप्रतिम असे सौंदर्य अनुभवता येते
या वाड्याच्या अप्रतिम सौंदर्य वास्तुशाही बागा सुसज्जीत असे सुशोभित कलाकृती व भव्य दिव्य असे नक्षीकाम पाहून कोणीही या वास्तूच्या प्रेमात पडतील हे साहजिकच आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे नेहमी त्यांनी बांधलेल्या अँथिलिया या निवासस्थानामुळे नेहमी चर्चेत असतात त्यांच्या या निवासस्थानाची किंमत पंधरा हजार करोड आहे असे मानले जाते तसेच लक्ष्मी विलास पॅलेस ची किंमत ही 25000 करोड च्या वरती अंदाजे मानले जाते मुकेश अंबानी यांचे निवास कितीही सुसज्जित व आधुनिक असले तरी लक्ष्मी विलास सारख्या पॅलेसचे ऐतिहासिक कलाकृती आणि सुशोभित वैभवाची सर अँटेलिया ला येऊ शकत नाही.
लक्ष्मी विलास पॅलेस हा म्हैसूर पॅलेस आणि सिटी पॅलेस या दोन्हींना आकार आणि आधुनिक वैशिष्ट्यांमध्ये ओलांडतो.
हे मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलियापेक्षा अधिक विस्तृत आहे, ज्यामुळे ते केवळ ऐतिहासिक भव्यतेचे प्रतीकच नाही तर जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान म्हणून एक विक्रमी स्थान देखील आहे.
केवळ संग्रहालय किंवा पर्यटक आकर्षण म्हणून काम करणाऱ्या इतर अनेक राजवाड्यांप्रमाणे, ते पर्यटकांसाठी अंशतः प्रवेशयोग्यतेसाठी एक खाजगी निवासस्थान आहे.
लक्ष्मी विलास पॅलेसचा आकार, इंडो-सारचेनिक डिझाइन आणि आधुनिकतेचे अद्वितीय संयोजन भारतातील इतर राजवाड्यांपेक्षा वेगळे आहे आणि जागतिक स्तरावर शाही वैभवाचा जिवंत वारसा म्हणून आहे.
पर्यटकांचे आकर्षण: हा राजवाडा पर्यटकांसाठी खुला आहे, जो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि स्थापत्य इतिहासाची झलक दाखवतो.
ऐतिहासिक महत्त्व लक्ष्मी विलास पॅलेस या राजवाड्याला भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी विदेशामध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती .त्यावेळी सयाजीराव महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची याच राजवाडा वर भेट झाली होती व त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आपल्या संस्थानांमध्ये काम करण्याची इच्छा आहे सयाजीराव गायकवाड महाराजांनी व्यक्त केली होती.
तसेच लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये हाय प्रोफाईल व्यक्ती राजकारणी व बिझनेस मॅन यांच्या मिटींग होत असतात .
महान अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही या वाड्याचे भरभरून असे कौतुक केले होते ते चक्क सुद्धा या वाड्यावरती फिदा झाले होते. या राजवाड्याचे वैभव पाहून कुणालाही अप्रूप वाटेल तर दरवर्षी गायकवाड कुटुंबांच्या शाही वैभवचे दर्शन करण्यासाठी अनेक लोक बहुसंख्येने पर्यटक गर्दी करतात. या राजवाड्याचे वैभव आणि शाही वारसा पाहण्यासाठी आपणही गुजरातला एकदा अवश्य भेट द्या आणि जर आपण गुजरात ला गेल्यावर तरी बडोदा येथील नक्की लक्ष्मी विलास पॅलेस ला भेट द्या एका अभूतपूर्व ऐतिहासिक व कलाकृतीने नटलेल्या
अशा वास्तूस आपण जरूर भेट द्या आपल्याला या वास्तू बद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा
आम्ही तुम्हाला विश्वास पूर्वक सांगतो की हा महाल व राज वैभव काय असते ते तुम्ही येथे आल्यावर तुम्हाला समजेल अप्रतिम क्षण आणि राजशाही जीवनाचा सुंदर आनंद अनुभव हा राजवाडा तुम्हाला देऊन जातो आणि ह्या अनुभवाने तूम्ही नक्की भारावून जाताल.
सुमारे 700 एकर मध्ये विस्तारलेला हा राजमहल आपणाला भारताच्या पूर्वी असलेल्या वैभवतेने सौंदर्याचा परंपरेचा समृद्धीची ग्वाही देतो.
0 टिप्पण्या