21 मेला रिलीज झालेला देऊळबंद दोन आता परीक्षा देवाची , देऊळबंद दोन हा सिनेमा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय पहिल्या चार दिवसात या सिनेमान 18 कोटी 59 लाखांचे कलेक्शन केलय तर पहिल्याच वीकेंडला हा सिनेमा बघण्यासाठी थिएटर बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या पुणे-मुंबई सारख्या शहरांपासून ते ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. 2015 मध्ये आलेल्या देऊळ बंदानंतर तब्बल 11 वर्षांनी आलेल्या या दुसरा भाग प्रेक्षकांना पुन्हा एकदा आकर्षित करतोय. दुष्काळ कर्जबाजारीपणा यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी
हा गंभीर सामाजिक विषय या सिनेमातून मांडण्यात आलाय पण हा विषय मांडताना थेट स्वामी समर्थांना परीक्षेला उभी करणारी आणि व्यवस्थेला जाब विचारणारी एक साधी शेतकरी महिला या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे त्यामुळे हा विषय ग्रामीण महाराष्ट्राच्या मनाला भिडताना दिसतोय पण फक्त भावनिक विषयामुळे देऊळ बंद दोन चालतोय का? की त्याची अजून काही कारण आहेत देऊळबंद दोन हिट का होतोय जाणून घेऊया त्या बातमी मधून
सगळ्यात आधी देऊळबंद दोन ने गेल्या चार दिवसात केलेल्या कमाई बद्दल बोलूयात 21 मे ते 25 मे या चार दिवसात देऊळबंद दोन ने देशभरात एकूण 18 कोटी 59 लाखांच ग्रॉस कलेक्शन तर 15 कोटी 75 लाखांच नेट कलेक्शन केलय पहिल्या चारही दिवसात देऊळबंद दोन च्या कलेक्शन मध्ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळतय 21 मेला 2.45 कोटी 22 मेला 2.55 कोटी एवढं कलेक्शन देऊळबंद दोन ने केलं पण शनिवार रविवारी देऊळबंद दोन चा वीकेंड ब्लास्ट पाहायला मिळाला. शनिवारी देऊळबंद दोन ने 4.85 कोटी तर रविवारी 5.90 कोटींची कमाई केली. मुंबईत या चित्रपटाचे सर्वाधिक शो लागले असून पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सांगलीत सुद्धा देऊळबंद दोन ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.
त्यामुळे देऊळबंद दोन ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते आता देऊळबंद दोन हिट होण्याच पहिलं कारण म्हणजे सामाजिक विषयाला श्रद्धेची जोड 2015 मध्ये जेव्हा प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित देऊळबंद सिनेमा आला त्या सिनेमात विज्ञान विरुद्ध अध्यात्म यातला संघर्ष दाखवण्यात आला होता. राघव शास्त्री हा नासा मधला नास्तिक शास्त्रज्ञ भारतात परत आल्यावर लोकांच्या श्रद्धेला आव्हान देतो आणि परिसरातल स्वामी समर्थांचे मंदिर बंद पाडतो.
त्यानंतर घडणाऱ्या चमत्कारी घटना स्वामी समर्थांच्या येण्यान राघवच्या आयुष्यात झालेले बदल नास्तिक ते निस्सिम भक्त असा त्याचा झालेला प्रवास ही गोष्ट प्रेक्षकांना भावली होती. थोडक्यात देवान घेतलेली भक्ताची परीक्षा हा देऊळबंदच्या पहिल्या भागाचा गाभा होता. पण देऊळबंद दोन च कथानक त्यापेक्षा वेगळे आहे इथे स्वामी समर्थ आणि भक्ती याभोवती ही गोष्ट फिरते पण देऊळबंद दोन मध्ये एका सामान्य शेतकरी महिलेचा संघर्ष दाखवण्यात आलाय नैसर्गिक संकट कर्जाचा बोजा आणि त्यामुळे मृत्यूला कवटाळणारा शेतकरी हा गंभीर सामाजिक विषय या सिनेमातून प्रवीण तरडेंनी मांडलाय पण हा विषय मांडताना संगीता नावाची एक शेतकरी. महिला थेट स्वामींच्या अस्तित्वाला आव्हान देत त्यांचीच परीक्षा घेते भक्ताचा देवाशी असलेला हक्काचा पण आक्रमक संघर्ष प्रत्येकाला भावणारा असल्याचं प्रेक्षकांच मत आहे. यासोबतच थेट प्रवीण तरडेंचे पटकथा आणि संवाद यामुळं हा विषय प्रत्येकाच्या मनाला भिडतो. बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा त्यात शेतकऱ्याची या देशात सगळं ओरिजनल आहे. डुप्लिकेट फक्त शेतकरी आहे. अशा संवादांमुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आपलीच वाटते.
पहिल्या भागाप्रमाणे देऊळबंद दोन मध्ये स्वामी फक्त एका घरात राहत नाही तर ते ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरात सामान्य माणसासारखे वावरतात. संकटात सापडलेल्या कुटुंबाला थेट मदत करण्याऐवजी ते त्यांना स्वतः लढण्याची ताकद कशी देतात ही मांडणी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. हा सिनेमा फक्त चमत्कारांवर भर देत नाही तर कथेचा मोठा भाग हा शेतकऱ्यांचे प्रश्न बोगस बियाण्यांचे रॅकेट कर्जबाजारीपणा सदूशेठ कडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक आणि ग्रामीण भागातील राजकारण यावर आधारित आहे यामुळे देऊळबंद दोन फक्त आध्यात्मिक सिनेमा न राहता सामाजिक आणि वास्तववादी ठरतो
जस जशी गोष्ट पुढे सरकते तस तशी प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढत जाते संगीता या शेतकरी महिलेचा आव्हान स्वामी समर्थ कस पेळणार गावात येणाऱ्या संकटांमधून ते लोकांना कसा मार्ग दाखवणार हा प्रवास जास्त थरारक आणि उत्सुकता वाढवणारा असल्याच मत प्रेक्षकांनी मांडलय देऊळबंद दोनला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याच दुसरं कारण म्हणजे ग्रामीण प्लस शहरी प्रेक्षकांचा कनेक्ट ग्रामीण प्रेक्षकांसाठी या सिनेमातल जग खूप ओळखीच आहे दुष्काळ शेतीच नुकसान कर्जाचा ताण गावच राजकारण देवस्थानांभवती फिरणारी सत्ता आणि संकटात देवाकडे आशेन बघणारा सामान्य माणूस हे सगळं ग्रामीण भागात रोजच्या आयुष्याचा भाग आहे पण दुसरीकडे शहरी प्रेक्षक सिनेमाशी वेगळ्या पद्धतीने कनेक्ट होतात
शहरातल्या माणसान शेतीपाई शेतकऱ्याची झालेली माती हे वास्तव अनुभवलं नसेल पण व्यवस्थेच्या विरुद्धचा त्याचा लढा हा रोजचाच आहे कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रचंड ताणतणाव महागाई नोकरीची अस्थिरता आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे येणारी असहायता शहरातला प्रत्येक माणूस अनुभवतोय त्यामुळेच या सिनेमातील शेतकरी महिलेचा फसवणूक करणाऱ्या प्रवृत्ती बद्दलचा लढा शहरी भागातल्या प्रेक्षकांना विशेषतः महिलांना आपलासा वाटतो. माझ्या कष्टाचं काय तू देव आहेस ना मग चुकीच्या माणसांना शिक्षा का नाही होत? हा शेतकरी महिलेन स्वामींना केलेला प्रश्न शहरी माणूस
सुद्धा हतबलतेतून अनेकदा देवाला विचारतो यातून ही गोष्ट फक्त शेतकरी वर्गाचीच नाही तर सामान्य नोकरदार माणसाची होणारी कोंडी सुद्धा दाखवते त्याचसोबत सुशिक्षित शहरी तरुणांना अंधश्रद्धे ऐवजी कष्टाच महत्त्व सांगणारा स्वामींचा तार्किक दृष्टिकोन सुद्धा प्रचंड भावतो स्वामी समर्थांचे ग्रामीण भागासह शहरी भागातही लाखो भक्त आहेत देऊळ बंदच्या पहिल्या भागातली गोष्ट ही शहरी भागातल्या उच्चशिक्षित तरुणाभवती फिरणारी होती. त्याला सुद्धा शहरी भागातल्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे 11 वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर स्वामी समर्थांवर आधारित
सिनेमा बघण्यासाठी सिंगल स्क्रीन पासून ते मल्टिप्लेक्स पर्यंत प्रेक्षकांची गर्दी होताना दिसते. गेल्या काही वर्षात शहरी प्रेक्षकांमध्ये रुटेड कंटेंट बघण्याचे प्रमाण वाढलय. गावाकडच वास्तव मातीतली भाषा स्थानिक संस्कृती आणि वास्तववादी पात्र असलेले सिनेमे शहरातल्या तरुण वर्गाला सुद्धा आकर्षित करतायत त्यामुळेच देऊळबंद दोन हा फक्त ग्रामीण महाराष्ट्राचा सिनेमा राहत नाही तर तो एका सामान्य माणसाच्या संघर्षाची गोष्ट बनतो आणि हेच या सिनेमाच सर्वात मोठं यश असल्याचं सांगितलं जातय. देऊळबंद दोन प्रेक्षकांना आवडण्या मागचं तिसर आणि
महत्त्वाचं कारण म्हणजे तरडे दांपत्याचा संघर्ष आणि तगडी स्टार कास्ट प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत आजवर प्रवीण तरडेंनी लेखक दिग्दर्शक अभिनेता म्हणून वेगवेगळ्या कलाकृतींतून स्वतःला सिद्ध केलय स्नेहल तरडे यांनी सुद्धा धर्मवीर फुलवंती अशा सिनेमांतून आपल्या अभिनयाची चुडूक दाखवली आहे फुलवंती सिनेमाच्या दिग्दर्शिका म्हणून सुद्धा त्यांचं कौतुक झालं होतं पण देऊळबंद दोन सहा टीझर लॉन्च तरडे दांपत्याकडून अक्कलकोट इथं स्वामी समर्थांच्या मंदिरात करण्यात आला. तेव्हा आपल्या स्ट्रगल बद्दल सांगताना स्वामी
समर्थांच्या येण्यान आपल्या आयुष्यात कसे बदल झाले याबद्दल या दांपत्याने सांगितलं आमच्या कष्टांना फळ स्वामी कृपेमुळे मिळाल्याचं स्नेहल तरेंनी यावेळी सांगितलं देऊळबंद सिनेमा हा प्रवीण तरेंचा पहिला सिनेमा त्यानंतर स्नेहल तरडे यांची मध्यवर्ती भूमिका असलेला देऊळबंद दोन हा सिनेमा ही स्वामींचीच कृपा असल्याचं स्नेहल तरडे म्हणाल्या त्यावेळी त्या भाऊकही झाल्या होत्या. तर प्रवीण तरडे यांनी स्नेहल यांच्या भूमिकेचे कौतुक करताना स्नेहलच काम पुढची अनेक वर्ष लक्षात राहील असं सांगितलय. यासोबतच मी शेतकऱ्याचा पोरगा असल्यान माझ्या प्रत्येक
सिनेमात मी शेतीच वास्तव उभारण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक विषय घेतल्यामुळेच माझा एकही सिनेमा आजवर फ्लॉप गेला नाही असं तरडे म्हणाले. त्यामुळे तरडे दांपत्याचा स्ट्रगल त्यांची कलाकृती याच भरपूर कौतुक होतय. तसच पहिल्या भागाप्रमाणेच देऊळूबंद दोन मध्ये सुद्धा मोहन जोशी हे ज्येष्ठ अभिनेते स्वामी समर्थांची भूमिका साकारतायत. वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा मोहन जोशीनी या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे पॅरालिसिस सारख्या गंभीर आजारातून उभे राहत मोहन जोशीनी जिद्दीन सलग 33 तास शूट केलय या सिनेमात स्वामी समर्थांची मोहन
जोशींनी केलेली भूमिका ही आजवरच्या त्यांच्या कामातली सर्वोत्तम भूमिका असल्याचं स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरेंनी सांगितलय. यासोबतच प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई, गश्मीर महाजनी यांच्या भूमिकांनी सुद्धा या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचं सांगितलं जातय. त्यामुळेच देऊळबंद दोन बघण्यासाठी प्रेक्षकांनी रांगा लावल्यात. देऊळबंद दोन सिनेमा चालण्याची नेमकी कारणं कोणती? तुम्ही देऊळबंद दोन बघितला असेल तर सिनेमाचा तुमचा अनुभव काय तो कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी unik मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
0 टिप्पण्या