५ शास्त्रज्ञांची टीम मालदीव्सच्या समुद्रातल्या प्रसिद्ध 'शार्क केव्ह' मध्ये शिरली पण ही टीम परत समुद्राच्या बाहेर आलीच नाही. काय घडले त्या शार्क केव्ह मध्ये ?


Maldives shark caves 

मालदीव जगातले सगळ्यात सुंदर बीच इथे बघायला मिळतात. इथल्या समुद्रातलं काचेसारखं स्वच्छ पाणी किनाऱ्यावरची पांढरी शुभ्र रेती आणि लक्जरी वॉटर विला जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतात. पण याशिवाय इथल्या समुद्राच्या आतली जीवसृष्टी पाहण्यासाठी आणि तिचा अभ्यास करण्यासाठी जगभरातले डायव्हर्स पर्यावरण शास्त्रज्ञ, ओशनोग्राफर, मरीन बायोलॉजिस्ट आणि हायड्रोजलॉजिस्ट येत असतात. त्यापैकीच एक इटलीच्या जेनोवा विद्यापीठातील पर्यावरण शास्त्राच्या प्राध्यापिका मोनिका मोंटे फाल्कोने गेल्या 20 वर्षांपासून त्या मालदीवच्या समुद्राचा अभ्यास करत आहेत. 


14 मेला अशाच एका अभ्यास मोहिमेसाठी मोनिका आपली मुलगी जॉर्जिया सोबत एकूण पाच जणांची टीम घेऊन मालदीवच्या समुद्रातल्या प्रसिद्ध शार्क केव मध्ये उतरल्या पण ही टीम परत समुद्राच्या बाहेर आलीच नाही काही तासांनी त्यांना शोधायला रेस्क्यू टीम गेली तेव्हा त्यांना गुहेच्या दारावर एक मृतदेह तरंगताना दिसला पण इतर चार जण बेपत्ता होते बराच वेळ शोधल्यानंतर सुद्धा ते सापडले नाही दरम्यान दुसऱ्या दिवशी शोध मोहीम पुन्हा सुरू झाली पण यात शोधायला गेलेल्या एकाचा मृत्यू झाला शेवटी 17 मेला फिनलँडून बोलावलेल्या स्पेशल रेस्क्यू टीमन शार्क



केव मध्ये शोध मोहीम सुरू केली आणि गुहेच्या आतल्या चेंबर्स मध्ये सापडले चार तरंगणारे मृतदेह या पाचही गुड मृत्यूंबद्दल वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी काही गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलेत मालदीव मध्ये एकाच दिवशी एकाच गुहेत पाच जणांचा मृत्यू कसा झाला त्यांचा शोध घ्यायला चार दिवसांचा वेळ का लागला आणि त्या मृत्यूंवरून कोणते आरोप केले जात आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या बातमी मधून जाणून घेऊया मोनिका मोंटे फाल्कोने या इटलीच्या जेनुवा युनिव्हर्सिटीत पर्यावरण शास्त्राच्या



प्रोफेसर म्हणून काम करतात त्यांनी संशोधनासाठी आतापर्यंत पाच हजारापेक्षा जास्त डाईव््स केलेत समुद्राच्या आत जाऊन वेगवेगळे नमुने गोळा करून त्यावर संशोधन करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या त्यांच्याकडे सायंटिफिक डायव्हच सर्टिफिकेट सुद्धा होतं मोनिका यांनी जगभरातल्या वेगवेगळ्या समुद्रांमध्ये संशोधन केलं असलं तरी गेल्या 20 वर्षांपासून त्या मालदीवच्या समुद्राचा अभ्यास करत होत्या गेल्या काही वर्षांपासून त्यांना वाऊ अटोल बेटाजवळच्या शार्क के बद्दल माहिती घ्यायची होती त्यासाठी मोनिका त्यांच्याच विद्यापीठात


रिसर्च फेलो म्हणून काम करणाऱ्या मुरल ओडेनिनो आणि मरीन बायोलॉजिस्ट फेडरिको गुवालतेरी यांना घेऊन मालदीवला आल्या या वैज्ञानिकां व्यतिरिक्त मोनिका यांनी प्रोफेशनल डायव् असलेली त्यांची मुलगी जॉर्जिया सोमाकाल हिला सोबत घेतलं होतं त्यांनी जेनोवा विद्यापीठ आणि मालदीव च्या सरकारकडून एका संशोधनासाठी म्हणून समुद्रात जाण्याची परवानगी घेतली होती. तसं बघायला गेलं तर मालदीव मध्ये डायविंग साठी 30 मीटर म्हणजेच 98 फूट खोल एवढ्याच खाली जाण्याची परवानगी असते पण परवानगी रद्द होण्याच्या भीतीने आपण 50 मीटर खोल असलेल्या शार्क के मध्ये जातोय हे मोनिका


यांनी मालदीवच्या सरकार पासून लपवलं होतं ठरल्याप्रमाणे 14 मेला मोनिका यांची टीम वाऊ बेटावर पोहोचली तिथून त्यांनी ड्यूक ऑफ योक नावाची बोट घेतली आणि ते समुद्रात चार किलोमीटर आत गेले समुद्रात उतरण्या आधी सगळ्यांनी यांनी केफ डायविंग साठी लागणारं फुल बॉडी थर्मल सूट ट्रिमिक्स सिलेंडर स्टँडर्ड स्कबा गिअर्स आणि पावरफुल डाईव्ह लाईट घालणं गरजेचं होतं पण या सगळ्यांनी एखाद्या सामान्य डायव्हर सारखं अगदी साधं वेटसूट घातलं आणि ते समुद्रात उतरले यावेळी मोनिका आणि इतर तीन संशोधकांसोबत जियानलुका बेनेडेट्टो असे एकूण पाच जण होते. बेनेडेटो हे प्रोफेशनल


डायव्हर आणि डायविंग इन्स्ट्रक्टर होते म्हणूनच त्यांना हे ऑपरेशन लीड करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे काही लोकांना बोटीवर ठेवून सकाळी 10:30 वाजता मोनिका यांची टीम पाण्यात उतरली. आम्ही दीड ते दोन तासात परत येऊ असं मोनिका यांनी बोटीवरच्या आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं. पण अडीच तास झाले तरीही मोनिका आणि त्यांची टीम बाहेर आली नाही त्यामुळे बोटीवरच्या ड्रायव्ह्सनी समुद्रात काही अंतर जाऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण कोणीच सापडत नव्हतं मग लगेचच मदत मागण्यासाठी त्यांनी मालदीवच्या कोस्टगार्ड


डिपार्टमेंटला सगळा प्रकार सांगितला त्यांनी लगेचच मोनिका आणि त्यांच्या सोबतच्या चार जणांना बेपत्ता म्हणून घोषित केलं आणि लोकल डायव्हर्सला त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं लोकल डायव्हर्सनी शोध सुरू केला. सुरुवातीच्या अर्ध्या तासातच त्यांना शार्क केफच्या तोंडावर इन्स्ट्रक्टर जियानलुका बेनेडक्टो यांचा मृतदेह तरंगताना दिसला तो मृतदेह बाहेर काढण्यात आला पण बाकी चार जण अजूनही बेपत्ताच होते नंतर डायव्हर्सने गुहेच्या आत जाण्याचा प्रयत्न केला पण वातावरण अचानक खराब झाल्यान आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने समुद्राच्या आतलं पाणी वेगाने


वाहू लागलं त्यामुळे डायव्हर्सना एका जागी स्थिर राहणं कठीण होत होतं म्हणून ते लगेचच समुद्राच्या बाहेर आले दुस दुसऱ्या दिवशी सुद्धा वातावरण तसंच होतं. तरीही डायव्हर्स आत शिरले पण 24 तासात वातावरणात झालेल्या अस्थिरतेमुळं पाणी गढूळ झालं होतं.व्हिजिबिलिटी अगदी कमी असल्यानं शोध मोहीम अशक्य होत होती. म्हणून 15 मेला सुद्धा शोध घेता आला नाही. 16 मेच्या सकाळी वातावरणात थोडा बदल झाल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील शोधकार्याचे आदेश दिले. त्यानंतर कोस्टगार्डच्या आठ


डायव्हर्सनी शोध मोहीम सुरू केली. थोडा वेळ पाण्यात राहिल्यानंतर ही टीम बाहेर आली पण त्यांच्या टीम मधले स्टाफ सर्जंट मोहम्मद महुदी बाहेर आलेच नाही हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून उरलेल्या सात जणांच्या टीमन पुन्हा आत जाऊन पाहिलं तेव्हा शार्क केफच्या तोंडावर महुदी यांचा मृतदेह तरंगताना दिसला. पाण्याचा दाब वेगाने बदलल्यामुळे महुदी यांना डीकंप्रेशन इलनेसचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मोनिका आणि त्यांच्या टीमला शोधायला गेलेल्या मालदीवच्या लोकल डायव्ह्सचा मृत्यू झाल्याने मालदीव सरकारन मोनिका यांच्या


टीमला शोधणार सर्च ऑपरेशन ताबडतोप बंद केलं आता शार्क केव समुद्राच्या 50 मीटर आत आहे तिथे फार वेळ तक धरण्यासाठी आधुनिक उपकरण लागणार होती जी स्थानिक डायव्हर्स आणि कोस्ट गार्डच्या टीम कडे नव्हती म्हणून मालदीव सरकारन फिनलँडच्या डायव्हर्स अलर्ट नेटवर्कच्या तीन स्पेशल डीपसी केव डायव्ह्सना बोलावून घेतलं 17 मेला ही टीम मालदीव मध्ये दाखल झाली 18 मेला त्यांनी शोध मोहीम सुरू केली त्यांनी गुहेच्या आत रिमोट कंट्रोल कॅमेरा पाठवला या गुहेत अनेक चेंबर्स होते त्यातल्या दुसऱ्या चेंबर मधून जाणाऱ्या कॅमेराला डाव्या बाजूला एक हिडन आणि अरुंद बोगदा


दिसला विशेष म्हणजे हा बोगदा शार्क केफच्या नकाशातच नव्हता. कॅमेरा आत सोडल्यावर मोनिका त्यांची मुलगी आणि बाकी दोन सायंटिस्ट यांचे मृतदेह बोगद्याच्या भिंतीला टेकून एकमेकांच्या जवळच तरंगताना दिसले आता मृतदेहांचा शोध लागला होता पण जिथे मृतदेह होते तो बोगदा अरुंद असल्यानं आणि त्याच्या आजूबाजूला शार्क माशांचा वावर असल्यानं ते बाहेर काढणं सोपं नव्हतं म्हणून 19 आणि 20 मेला प्रॉपर प्लॅनिंग करून फिनलच्या डायव्हर्सच्या मदतीन चारही मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले एकाच गुहेत मोनरिका यांच्यासह त्यांची पाच


जणांची टीम तर लोकल ड्रायव्ह महुदी अशा सहा जणांच्या मृत्यूस नेमकं कारण काय हा प्रश्न निर्माण झाला याबाबत बोलताना इटालियन हायपरबेरिक मेडिसिन सोसायटीने सांगितलं की समुद्रातील वेगवान प्रवाहांमुळे गुहेच्या तोंडाशी व्ेंचुरी इफेक्ट तयार झाला असावा यामध्ये अरुंद जागेमुळे पाण्याचा वेग अचानक वाढतो आणि तिथला प्रवाह सुरू होतो याच प्रवाहामुळे टीम आत ढकलली गेली असावी बाहेर येण्याच्या प्रयत्नात त्यांनी केलेल्या हालचालीमुळे ळ भिंतीवरची वाळू पाण्यात मिसळली असावी ज्यामुळे त्यांना रस्ता दिसला नसावा त्यामुळे घाबरून जाऊन त्यांनी जास्त


प्रमाणात सोबत आणलेल्या सिलेंडर मधला ऑक्सिजन घेतला आणि तो लवकरच संपून गेल्यान ऑक्सिजन अभावी सगळ्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय पण दुसरीकडे असही सांगितलं जातय की मोनिका आणि ऑपरेशनचे इन्स्ट्रक्टर जिया नलुका यांनी पाण्यात उतरताना गुहेत लागणारी उपकरण सोबत न नेता अगदी साधारण उपकरण नेल्यामुळे त्यांना गुहेतून बाहेर येण शक्य झालं नाही या उपकरणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे ते रिब्रीधर सिलेंडर जे सोडलेला श्वास पुन्हा शुद्ध करून देतं आणि जवळपास तीन तासांपर्यंत बॅकअप देत पण मोनिका यांच्या टीमने साधे ऑक्सिजन


सिलेंडर नेले होते बाहेर येण्यासाठी लावल्या जाणाऱ्या गाईडलाईन रील्स सुद्धा लावल्या नव्हत्या शिवाय त्यांच्याकडे गुहेत असलेल्या गडद अंधारात वाट शोधण्यासाठी लागणारे डाईव्ह लाईट सुद्धा नव्हते त्यामुळे आपल्याच निष्काळजीपणामुळे या सगळ्यांचे जीव गेल्याचं सांगितलं जात पाण्याच्या 50 मीटर आत असलेल्या शार्क केव मध्ये प्रचंड अंधार असतो त्यातल्या भिंतीला हलकासा जरी धक्का लागला तरी पूर्ण पाणी गढूळ होतं या गोष्टी 20 वर्ष समुद्राच्या अभ्यासात घालवलेल्या मोनिका यांना माहित होत्या तरीही त्यांनी एवढी रिस्क का घेतली असे प्रश्न विचारले जातात


मोनिका यांचे पती कार्लो सोमाकाल यांनी माझी पत्नी स्वतःच्या आणि मुलीच्या जीवावर वेचणारा एवढा मोठा धोका पत् करणार नाही असं म्हणत तपासावर शंका उपस्थित केल्यात. सोबतच जेनोवा युनिव्हर्सिटीने जाहीर केलय की आम्ही मोनिका यांना फक्त वरच्या भागातले सॅम्पल्स गोळा करण्यासाठी पाठवलं होतं. 50 मीटर खोल असलेल्या गुहेत जाण्याचा निर्णय हा त्यांनी वैयक्तिक रित्या घेतला होता. मोनिका त्यांची मुलगी आणि बाकी तिघेही प्रोफेशनल डायव्हर्स होते. आपण कुठे जातोय याची त्यांना कल्पना होती. तरीही त्यांनी जीवावर बेथणारी ही रिस्क का घेतली हा प्रश्न कायम आहे


निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेला की अवघड असलेल्या शार्क केव मुळे असही विचारलं जातय लोकल ड्रायव्ह महुदी यांच्या मृत्यूबद्दल सुद्धा कोणतीही माहिती न देण्यात आल्यान मालदीवच्या शार्क केव मधल्या या मृत्यूच गुड आता चांगलंच वाढलय हे गुड उलगडणार की कायम एक रहस्य म्हणूनच राहणार हे पाहणं आता महत्त्वाच असणार आहे मालदीवच्या शार्क केव बद्दल आणि त्यात झालेल्या सहा मृत्यूंबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.



#UnikMarathi365

मालदीव्स, शार्क केव्ह, समुद्र रहस्य, ५ शास्त्रज्ञ, गायब टीम, समुद्रातील रहस्य, शार्क हल्ला, अंडरवॉटर मिशन, धक्कादायक बातमी, रहस्यमय घटना, डीप सी एक्सप्लोरेशन, वायरल मराठी न्यूज, थरारक कथा, समुद्रातील गूढ, Unik Marathi 365, Shark Cave Mystery, Maldives Mystery, Missing Scientists, Ocean Exploration, Viral Story, Mystery News, Deep Sea Mystery.

#UnikMarathi365 #MarathiNews #MarathiStory #ViralNews #Mystery #SharkCave #Maldives #OceanMystery #SharkAttack #SeaMystery #BreakingNews #ViralMarathi #TrendingNow #InterestingFacts #HiddenTruth #UnderwaterMystery #ScaryStory #ThrillerStory #Adventure #DeepSea #MarathiViral #NewsUpdate #FactOrMystery #OceanSecrets #ShockingNews


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या