इराण विरुद्ध अमेरिका यांच्या युद्धामध्ये इतक्या दिवसांपासून ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट आता घडायला लागली आहे अमेरिकेने इराणमध्ये आपलं सैन्य उतरवण्याची तयारी पूर्ण केलेली असून अमेरिकन सैन्य लवकरच इराणच्या जमिनीवरती उतरण्याची शक्यता आहे युद्धामध्ये जर इराणचा पराभव करायचा असेल तर अमेरिकेसमोर एकच पर्याय होता तो म्हणजे बूट्स ऑन द ग्राउंड अर्थातच इराणमध्ये सैन्य उतरवणं युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि इजराईल हे सातत्याने इराण वरती मिसाईलनेच हल्ले करत होते या हल्ल्यामध्ये इरानच्या अनेक मोठ्या नेत्यांचा मृत्यूही झालाय पण
तरीसुद्धा इरान काही हार मानायला तयार नाहीये त्यामुळे आता अखेर युद्धाच्या 30 दिवसानंतर अमेरिकेने आपलं सैन्यच इराणमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसून येतय अमेरिकेचे जवळपास साडे तीन हजार सैनिक हे मिडल ईस्ट मध्ये पोहोचल्याची माहिती आहे हे सैनिक लवकरच इराणमध्ये घुसणार आहेत असं सुद्धा म्हटलं जातय महत्त्वाचं म्हणजे इराण सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली असून अमेरिकन सैनिकांचे स्वागत असल्याचं इराणने म्हटलय नेमकं काय घडतय अमेरिकन सैनिक मिडल ईस्ट मध्ये कसे पोहोचले ते इराणमध्ये घुसणार असल्याचं का म्हटलं जातय आणि यामुळे हे
युद्ध आणखीन किती मोठं होऊ शकतं समजून घेऊयात आजच्या या बातमी मधून सगळ्यात आधी मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेल्या अमेरिकन सैनिकांबाबत जाणून घेऊयात युएसएस ट्रिपोली ही अमेरिकेची युद्धनौका आहे ही युद्धनौका 3डेती हज अमेरिकन सैनिकांना घेऊन कतार मध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे हे सैनिक 27 मार्चला ला मिडल ईस्ट मध्ये पोहोचले होते. युएस सेंट्रल कमांडन शनिवारी 28 मार्चला या बाबतीतली माहिती दिली आहे. मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेले हे अमेरिकन सैनिक काही साधे सुधे नाहीयेत.
ते युएस मरीन कॉप्स आहेत. ज्यांना फक्त मरीन्स असही म्हटलं जातं. हे सैनिक म्हणजे अमेरिकेचे मरीन कमांडोज आहेत. जे स्पेशल ऑपरेशन्स राबवण्यासाठी ओळखले जातात. आता ते मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेत. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे अमेरिका इरानमध्ये ग्राउंड ऑपरेशन करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सैनिक जे युएसएस ट्रिपोली या युद्धनौकेने मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेत ती युद्धनौका सुद्धा काही साधी सुधी नाहीये ती एक अमफिबियस असल शिप आहे जी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी युद्ध लढू शकते. ही युद्धनौका एफ35 स्टील फायटर आणि ओस्प्रे सारखे ऍडव्हान्स मिलिट्री एअरक्राफ्ट हँडल
करू शकते. खास करून जमिनीवरती सैनिक उतरवायचे असतील तर ही युद्धनौका सगळ्यात उपयोगी आहे. फक्त दोनच आठवड्यांपूर्वी ही युद्धनौका जपानमध्ये तैनात होती. तिच्यावरचे अमेरिकन सैनिक हे तैवानच्या समुद्रात सराव करत होते. पण तिला तिथून अचानक मिडल ईस्ट मध्ये बोलावण्यात आले. याचाच अर्थ अमेरिका काहीतरी मोठं करणार आहे असं म्हटलं जातय. तसं पाहिलं तर मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेचे आधीच तब्बल 50 हज सैनिक हे तैनात आहेत. आता यामध्ये आणखी 3डेती हज सैनिक हे आलेले दिसतायत. मागच्या 20 वर्षांमध्ये अमेरिकेने मिडल ईस्ट मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सैनिक
तैनात केलेले आहेत. या सगळ्याचा अर्थ अमेरिका इरानमध्ये आपले सैनिक उतरवणार आहे असं म्हटलं जातय. अमेरिकन मीडियामध्ये सुद्धा याची चर्चा जोरदार चालू आहे. वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार पेंटागॉन इराणमध्ये अनेक आठवडे चालणाऱ्या जमिनीवरच्या युद्धाची तयारी करतय. या वृत्तपत्रान अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानेच ही माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये असही म्हणण्यात आलय की पेंटागॉन इराणमध्ये सैन्य उतरवण्याची तयारी ही पूर्ण केली आहे पण अजून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडन मंजुरी मिळालेली नाहीये. ट्रम्प यांच्याकडन मंजुरी
मिळाल्यानंतर अमेरिकन सैनिक आपली कारवाई सुरू करतील. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अमेरिका इराण वरती कुठे हल्ले करणार? अमेरिका आपले सैनिक इराणमध्ये कुठे उतरवणार? तर वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार पेंटागॉन हे इराणच्या ताब्यात असलेलं खर आयलंड वरती हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय हॉर्मोच्या सामुद्रधुनीला लागून असलेल्या इराणच्या किनारपट्टीवर सुद्धा सैन्य उतरणाबाबत विचार केला जातोय. खरं तर खर गायलंड हे पर्शियन आखातात असलेले एक छोटस बेट आहे त्याच क्षेत्रफळ फक्त 20 चौरस किलोमीटर इतकच आहे हे बेट इराणच्या भुशहर
प्रांताच्या किनारपट्टीपासन फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे पण आकारान एवढं लहान असून सुद्धा हे बेट इराणी तेलाच्या अर्थव्यवस्थेचा कडा समजलं जातं इराणच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी तब्बल 90 ते 95 टक्के निर्यात एकट्या खर गायलंडवरन केली जाते. या बेटाच्या अवतीभवती असणार पाणी अत्यंत खोल असल्यामुळे मोठमोठ्या तेलवाहू जहाजांना इथे सहज पोहोचता येतं त्यामुळे या बेटाला खूप महत्त्व मिळालेल आहे या बेटावर असलेल्या टँक फार्म मध्ये तब्बल दोन कोटी 40 लाख बॅरल्स कच्च तेल हे साठवून ठेवता येतं हे तेल पाईपलाई द्वारे या बेटावर
आणलं जातं आणि त्यानंतर मोठ्या तेलवाहू जहाजांच्या माध्यमातन त्याची अन्य देशांमध्ये निर्यात केली जाते. यामुळेच हे बेट इराण साठी खूप महत्त्वाच आहे आणि आता अमेरिका आपल्या हल्ल्याची सुरुवात याच वेटापासून करणार आहे असं म्हटलं जातय तसं पाहायला गेलं तर अमेरिकेन या आधी सुद्धा खर आयलंड वरती हल्ला केलेला होता पण तेव्हा अमेरिकेन फक्त या आयलँड वरच्या मिलिटरी बेसेसला टार्गेट केलं होतं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते की अमेरिकेनं जाणीवपूर्वक आयलँड वरच्या तेलाच्या ठिकाणांना टार्गेट केलेलं नाहीये पण अमेरिका भविष्यात असं करू शकते असा
इशारा सुद्धा ट्रम्प यांनी दिला होता. आता अमेरिका याच आयलँड वरती थेटपणे सैन्य उतरवण्याची शक्यता आहे आणखी काही रिपोर्ट्स नुसार ट्रम्प प्रशासन हे मिडल ईस्ट रिजनमध्ये अतिरिक्त द हज सैनिक पाठवण्याच्या विचारात आहे जर हे सगळे धागे जोडले तर यातन एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे अमेरिका इराणमध्ये ग्राउंड ऑपरेशन करणार आहे. आता अमेरिकेच्या या सगळ्या तयारीवरती आणि संभाव्य जमिनी हल्ल्यावरती इराण कडन सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. शनिवारी 28 मार्चला तेहरान टाइम्स या इराणच्या आघाडीच्या इंग्लिश न्यूज पेपरन आपल्या पहिल्याच पानावर एक हेडलाईन दिलेली
ही हेडलाईन होती वेलकम टू हेल नरकात स्वागत आहे. हा इशारा अमेरिकन सैनिकांसाठी होता वेगळं सांगायची गरज नाहीये. या हेडलाईन खाली लिहिलं होतं की जर अमेरिकन सैनिक इराणच्या जमिनीवरती उतरले तर त्यांचा फक्त मृतदेह इराण मधून परत जाईल. याचाच अर्थ इराण सुद्धा अमेरिकेच्या या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयारीत असल्याचं दिसतंय. दोनच दिवसांपूर्वी बातमी आली होती की इराण हा अमेरिकेविरुद्ध जमिनीवरच्या लढाईसाठी तब्बल 10 लाख सैनिकांची फौज उभी करतोय. इराणच्या तनसीम न्यूज या स्थानिक वृत्त संस्थेने लष्करी सूत्रांचा हवाला देत ही बातमी दिली होती. या रिपोर्टमध्ये
असं म्हटलं गेलं होतं की अमेरिका इरान वरती जमिनीवरन हल्ला करण्याची शक्यता ही वाढलेली आहे. त्यामुळे आता इराणच्या तरुणांमध्ये सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. मागच्या काही दिवसात इरानी तरुण मोठ्या संख्येने बसीस फोर्स आयआरजीसी आणि सैन्यामध्ये भरती होण्यासाठी अर्ज करतायत. इरानी आर्मीचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अली जहानशाही यांनी सुद्धा अमेरिकेला इशारा दिलाय. ते असं म्हणालेत की जमिनीवरच युद्ध इराणच्या शत्रूला महागात पडेल. इराण अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे म्हणजेच काय तर आता इराण सुद्धा अमेरिकेला
तितक्याच ताकदीने उत्तर देणार आहे असं चित्र दिसतय एकूणच काय तर आता इरान आणि अमेरिका यांच्यामध्ये फुल स्केल वॉर होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांकडन ज्या प्रकारे हालचाली केल्या जातायत ते पाहता हे युद्ध आता तरी दीर्घकाळ चालेल असंच म्हटलं जातय. आता या युद्धाचे परिणाम काय होतात? अमेरिका खर गायलँड वरती खरच आपलं सैन्य उतरवते का आणि अमेरिकन सैनिक आले तर इराण त्यांना कसं प्रति उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं अमेरिका इरानमध्ये आपलं सैन्य उतरवेल का या बाबतीतली तुमची मत आणि प्रतिक्रिया
कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
0 टिप्पण्या