महा अमृत पोर्टल टंकलेखन (Typing) प्रोत्साहन योजना २०२६' ज्या विद्यार्थ्यांनी GCC-TBC (मराठी/हिंदी/इंग्रजी ३०/४०/६० wpm) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांना सरकारमार्फत ६,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
नमस्कार मित्रांनो unik marathi 365 या आपल्या चैनल वर स्वागत आहे.आपल्या चॅनलवर कायमच शासकीय योजनांची सर्वात अचूक आणि प्रॉपर माहिती दिली जाते. आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ही योजना आहे महा अमृत पोर्टल मार्फत राबवली जाणारी जीसी टीबीसी संगणक टंकलेखन प्रोत्साहन भत्ता योजना ज्या विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी किंवा इंग्रजी विषयामध्ये 30, 40 किंवा 60, शब्द प्रति मिनिट या वेगाने टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा सर्व
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारकडून आता 6500 रुपयांचे थेट अनुदान दिले जात आहे यावर्षी या योजनेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. विशेषतः कागदपत्रे पोस्टाने पाठवण्याची अट रद्द होऊन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पात्रता लागणारी कागदपत्रे आणि स्टेप बाय स्टेप ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता आपण सर्वात आधी या योजनेच्या पात्रतेबद्दल जाणून घेऊया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे
निकष आहेत. पहिली अट म्हणजे अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा किंवा ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्या निकालाची प्रत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अमृत संस्थेकडून लाभ घेण्यापूर्वी तुम्ही संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयंभूषणापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिक निकषानुसार अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक
उत्पन्न आठ लाखांच्या आत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही यापूर्वी टायपिंग परीक्षेसाठी इतर कोणत्याही संस्थेकडून अशा प्रकारचे अर्थसहाय्य घेतलेले नसावे असे स्वयंघोषणापत्र आणि तुमच्या टायपिंग संस्था चालकांचे प्रमाणपत्र अर्जात जोडावे लागेल यासोबतच आधार कार्डची स्वस्वाक्षांकित सेल्फ अटेस्टेड प्रत आणि तुमच्या वैयक्तिक बँक खात्याचा संपूर्ण तपशील ज्यात बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड अचूक असणे गरजेचे आहे.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाबद्दल सांगायचे तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संगणक टंकलेखन परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी 30, 40, 50 किंवा 60 शब्द प्रति मिनिट यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत त्यांना एक रकमी 6500 रुपयांचे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातील. लक्षात ठेवा या 6500 रुपयांशिवाय इतर कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा लाभ या योजनेत मिळणार नाहीत. यावर्षीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे
तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कुठेही चक्रा मारण्याची गरज नाही ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची डिजिटल स्क्रुटिनी होईल आणि पात्र ठरताच रक्कम जमा होईल ऑनलाईन अर्ज सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे काही कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे यामध्ये तुमचा स्पष्ट फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली असावी उत्पन्नाचा दाखला किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हे सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे असावे याव्यतिरिक्त महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून डोमिसाईल प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा बदली प्रमाणपत्र
जवळ ठेवा अर्ज भरताना हे सर्व दस्तवच पीडीएफ स्वरूपात आणि योग्य साईजमध्ये तयार ठेवावेत जेणेकरून अपलोड करताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही आता वळूया प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेकडे चला तर वेळ न घालवता फॉर्म कसा भरायचा तर या संदर्भात माहिती घेऊया तर येथे स्टार्ट प्लकेेशन आहे या टॅब वरती क्लिक करायचा आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी डॉक्युमेंट तयार ठेवलेले आहेत यस करायचा आहे. प्रोसीड टू प्लकेेशन या टॅबवर क्लिक करायचा आहे. जर यापूर्वी तुम्ही अर्ज केला असाल तर मोबाईल नंबर पासवर्ड टाकून डायरेक्ट लॉगिन करू शकता.
तुम्ही पहिल्यांदाच येथे येत असाल तर रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचा आहे. इथे तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर जनरेट ओटीपी यावर क्लिक करायचा आहे. तो टाईप करून जनरेट ओटीपी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओटीपी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाईप करून व्हेरिफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे व्हेरिफाय टॅबवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन येथे पाहू शकता की केवायसी सक्सेसफुली झालेली आहे संपूर्ण
डिटेल नाव असेल जन्मतारीख असेल कायमचा पत्ता आधार प्रमाणे आहे त्यामुळे येथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचा आहे आणि कन्फर्म अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी टाईप करायचा आहे जिल्हा या टॅब वर डिस्ट्रिक्ट या टॅब वर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका येणार यादीमधून निवडायचा आहे त्यानंतर पाहू शकता की गावाच नाव तुम्हाला यादी आल्याची पाहायला मिळेल गावाच नाव निवडायचा आहे. त्यानंतर धर्म या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म येथे निवडायचा आहे त्यानंतर कास्ट या टॅबवर
क्लिक करून तुमची जी कॅटेगरी आहे ती निवडायची सर्व ओपन कॅटेगरी मधील असणार आहेत. जर लिस्ट मध्ये तुमच्या कॅटेगरीच नाव नसेल तर अदर हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर अदर कास्ट आहे त्याच नाव टाईप करायचा आहे आणि त्यानंतर खाली पाहू शकता की स्क्रॉल डाऊन करायचा आहे आणि साईन अप या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. यानंतर तुमच्या रजिस्टर जो तुम्ही फोनमध्ये ईमेल आयडी दिलेला आहे याच्यावरती ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाईप करून व्हेरिफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. रजिस्ट्रेशन सक्सेसफुली डन अशा प्रकारची विंडो पाहायला मिळेल. तर
अशाप्रकारे सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर पुन्हा लॉगिन या पेजवरती यायचा आहे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड जनरेट केला आहात तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉगिन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. लॉगिन या पेजवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की संगणक टंकलेखन योजना जेसीसी टीबीसी एकूण चार स्टेप मध्ये फॉर्म भरायचा आहे. किती भाग कम्प्लीट झालाय तो पाहायला मिळेल. याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन, हॉल तिकीट लक्षात घ्या. बँक डिटेल आणि अपलोड डॉक्युमेंट अशा प्रकारची माहिती तुम्हाला
टाईप करावी लागणार आहे. सगळं आधार व्हेरिफिकेशन मध्ये असल्यामुळे तुम्हाला इथे बेसिक डिटेल मध्ये तुमचं पहिलं नाव त्यानंतर मधलं नाव त्यानंतर लास्ट नाव अशी संपूर्ण माहिती आल्याची पाहायला मिळेल. आईचं नाव तुम्हाला टाईप करायचा आहे. ईमेल आयडी अगोदर आल्याचा पाहायला मिळेल. मोबाईल नंबर देखील आल्याचा पाहायला मिळेल. जन्मतारीख आधारवरती जशी आहे तशी पाहायला मिळेल. कास्ट जी आहे ती तुम्हाला ऑप्शन मधून निवडायची आहे. कास्ट निवडून झाल्यानंतर करंट ऍड्रेस तुम्हाला आधारचाच पाहायला मिळेल. याच्यामध्ये बदल करायचा असेल तर करू शकता आणि दोन्ही ऍड्रेस सेम
असतील तर काही बदलायची गरज नाहीये संपूर्ण माहिती एकदा चेक करायची आहे आणि खाली नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे. याच्यानंतर हॉल तिकीट आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हॉल तिकीट या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट आहे तो तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. याच्यामध्ये इंग्रजी मराठी हिंदी जे काही टायपिंग तुम्ही उत्तीर्ण झाला ते तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. समोर तेवळच अनुदान 6500 इतक मिळणार आहे. एका वेळी दोन परीक्षा उत्तीर्ण असाल तर दोन्ही निवडू शकता आणि त्यानंतर वर्ष आहे फक्त जानेवारी 26 मध्ये उत्तीर्णचे विद्यार्थी झालेले आहेत.
टायपिंगची परीक्षा मराठी हिंदी इंग्रजी 30, 40 त्यानंतर 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असाल अशांनाच ही योजना लागू आहे. त्यामुळे त्यांनी जानेवारी 2026 निवडायचा आहे आणि संपूर्ण माहिती पाहून नेक्स्ट या पेजवरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर बँक डिटेल ऍड करण्यासाठीचा पेज ओपन होईल. बँकेच नाव तुम्हाला लक्षात घ्या ब्रांच नाव टाईप करायचा आहे अकाउंट नंबर कन्फर्म अकाउंट नंबर आयएफएससी कोड संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे अपलोड डॉक्युमेंट तुम्हाला खाली सगळे डॉक्युमेंट
अपलोड करायचे आहे ज्याच्यामध्ये फोटो अपलोड करायचा आहे तिथे पाहू शकता की पीडीएफ जेपीजीपीएनजी या फॉर्मॅट मध्ये चालणार आहे दोन एमबी पर्यंत जास्तीत जास्त फाईल चालणार आहे तर अशाप्रकारे सही अपलोड करायची आहे त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट किंवा ईडब्ल्यूएस पद त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट कंपलसरी त्यानंतर अनमार्क साधार लागणार आहे त्यानंतर पॅन नंबर सुद्धा लागणार आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट जर नावामध्ये बदल असेल तर गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट त्याचबरोबर पाहू शकता की कॅन्सल चेक देखील लागणार आहेत हॉल तिकीट
आहे संबंधित टायपिंग परीक्षेच आणि त्यांचा रिझल्ट जो पब्लिश झालेला आहे तो तुम्हाला टाईप करायचा आणि त्याच्यानंतर एक्झाम इयर 2025 असणार आहे. डिसेंबर 2025 जरी परीक्षा असेल जानेवारी मध्ये तर याचबरोबर हे स्वयघोषणापत्र पोर्टल वरून डाऊनलोड करून त्यावर तुमची माहिती आणि संस्थेचे नाव लिहून स्वाक्षरीसह पुन्हा अपलोड करा. सर्व माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर प्लिकेशन प्रीव्ू पहा. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर अंडरटेकिंग बॉक्सवर टिक करा आणि सबमिट प्लिकेशन वर क्लिक करा. अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला पेंडिंग फॉर स्क्रुटनी
असा स्टेटस दिसेल. तर मित्रांनो अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या या 6500 रुपयांच्या टायपिंग अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या टायपिंग झालेल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अर्ज करताना काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू योजनांच्या अशाच अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या unik marathi 365चॅनलशी कनेक्टेड रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
0 टिप्पण्या