सम्राट चौधरी हे बिहार मध्ये bjp पक्षाचे पहिले मुख्यमंत्री बनले. बिहार मध्ये पहिल्यांदा bjp ला मुख्यमंत्री पद मिळाले. कोण आहेत सम्राट चौधरी कसे बनले ते बिहारचे मुख्यमंत्री? जाणून घेऊया ह्या बातमी मधून
5 मार्चला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीए कडन राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अशाप्रकारे मागच्या 20 वर्षांपासून बिहारच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असणाऱ्या नितीश कुमारांनी राज्याच्या राजकारणातन एक्झिट घेतली ते आता राष्ट्रीय राजकारणात आलेले आहेत. खरंतर मागच्या नोव्हेंबर महिन्यातच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुका एनडीएने नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरती लढवलेल्या त्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
अवघ्या तीनच महिन्यात त्यांनी राज्याच मुख्यमंत्री पद सोडले. आता 14 एप्रिलला बिहारमध्ये नवे मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. भाजपचे सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री आहेत. ही घटना मोठी आहे कारण आजवरच्या इतिहासात बिहारमध्ये एकदा सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री झालेला नाहीये. सम्राट चौधरी हे बिहारमधले भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत. पण सम्राट चौधरी नेमके आहेत कोण? नितीश कुमारांनंतर त्यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कशी निवड झाली? यामागची नेमकी कारण काय?
एकूणच राजकारण जाणून घेऊयात ह्या बातमी मधून आजच्या सम्राट चौधरी बिहारचे आधीचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातले भाजपचे सगळ्यात मोठे नेते मंगळवारी नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ज्यानंतर राज्याचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांच्या नावाची अधिकृत अशी घोषणा झाली आहे. तसं पाहिलं तर यासाठीच्या हालचाली काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या कारण भाजप हायकमांडन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे बिहारचा पुढचा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासूनच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सम्राट चौधरी यांच नाव चर्चेत होतं.
शिवराज सिंह चव्हाण यांच्यासह भाजप नेतृत्वाची पसंती चौधरी यांनाच आहे असं बोललं जात होतं. पण भाजपचा मागच्या काही वर्षातला इतिहास पाहता पक्ष पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करेल का अशा देखील चर्चा होत्या कारण भाजपन याआधी राजस्थान मध्यप्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये अशा नेत्यांना मुख्यमंत्री बनवलं ज्यांच्या नावाची कुठेही चर्चाच नव्हती पण आता बिहारमध्ये मात्र हे घडलेलं नाहीये. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुरुवातीपासूनच सम्राट चौधरी यांच नाव आघाडीवर होतं आणि त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. मंगळवारी चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे आणि 15 एप्रिलला सकाळी 11 वाजता ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. आता सम्राट चौधरी नेमके आहेत कोण आणि भाजपन त्यांची बिहारचे मुख्यमंत्री म्हणून निवड का केली आहे ते समजून घेऊयात. सम्राट चौधरी त्यांना राकेश कुमार या नावानेही ओळखलं जातं चौधरी मूळचे मुंगेर जिल्ह्यातल्या लखनपूर गावचे त्यांचे वडील शकुनी चौधरी हे तारापूर मतदारसंघातन सहा वेळा आमदार राहिलेले आहेत आता सम्राट चौधरी सुद्धा याच मतदारसंघातन आमदार म्हणून निवडून आलेले आहेत सम्राट चौधरी यांनी 1990 च्या दशकात राजकारणात प्रवेश केलेला जाणून
धक्का बसेल पण त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी मधन आपल्या कारकर्दीची सुरुवात केली होती. चौधरी 1999 ला आरजेडी सरकारमध्ये कृषिमंत्री सुद्धा झालेले पुढे 2010 मध्ये त्यांना आरजेडी कडन विधानसभेची उमेदवारी देखील मिळाली होती पण सम्राट चौधरी यांनी 2014 आरजेडीत बंडखोरी केली. त्यांचा आरोप होता की लालूप्रसाद यादव हे आरजेडीला काँग्रेसची बी टीम बनवायला लागलेत. त्यावेळी चौधरी यांच्यासोबत आरजेडीच्या 13 आमदारांनी सुद्धा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्यापैकी काही जण आरजेडीत परतले पण सम्राट चौधरी माघारी गेले नाही त्यावेळी
त्यांच्या या निर्णयाचा मोठा फटका आरजेडीला बसला होता. 14 सम्राट चौधरी यांनी नितीश कुमारांच्या जेडीयू मध्ये प्रवेश केला त्यावेळी जीतनराम मांझी काही काळ बिहारचे मुख्यमंत्री होते. चौधरी यांना त्यांच्या सरकारमध्ये नगर विकास खात मिळालेलं पण 2017 पासून त्यांनी जेडीयू पासून सुद्धा अंतर राखायला सुरुवात केली. 2018 मध्ये चौधरी यांनी जेडीयूला राम राम ठोकला आणि भाजपात प्रवेश केला. महत्त्वाचं म्हणजे भाजपमध्ये सामील झाल्यावर त्यांना लगेचच बिहार भाजपचे उपाध्यक्ष बनवण्यात आलं. भाजप मध्ये प्रवेश केल्यावर सम्राट चौधरी यांचं राजकीय वजन चांगलच वाढलं.
त्यांना पक्षामध्ये एका पाठोपाठ एक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या ते बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. 2022 मध्ये त्यांनी राज्यामध्ये विरोधी पक्षनेता म्हणूनही काम पाहिलं. त्या काळातला चौधरी यांचा एक किस्सा सर्वात प्रसिद्ध आहे. नितीश कुमार यांनी 2022 मध्ये भाजपशी संबंध तोडून आरजेडी सोबत सरकार स्थापन केलेलं. त्यानंतर सम्राट चौधरी यांनी भगवी पगडी घालायला सुरुवात केलेली चौधरी यांनी शपथ घेतली होती की ते जोपर्यंत नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदावरून हटवत नाहीत तोपर्यंत ते ही पगडी काढणार नाहीत पण 2024 च्या लोकसभा
निवडणुकी आधी नितीश कुमार पुन्हा एनडीएत आले आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये सम्राट चौधरी पहिल्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी चौधरी यांनी जी शपथ घेतली होती त्यावरन त्यांची चांगलीच पंचायत झाली होती. ज्यांना सत्तेतन बाजूला करण्याची शपथ त्यांनी घेतलेली त्यांच्या सरकारमध्ये काम करण्याची वेळ चौधरी यांच्यावरती आली होती. पण यानंतर सम्राट चौधरी यांनी आपली भूमिका बदलली. त्यांनी युक्तिवाद केला की नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून एनडीए मध्ये परत आले आणि अशाप्रकारे त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली आहे. त्यानंतर चौधरी हे अयोध्येला गेले तिथे त्यांनी सरयू नदीत स्नान करून मुंडन केलं आणि अयोध्येच्या राम मंदिरात आपली पगडी अर्पण केली आणि वाद मिटवला. 2024 मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यापासून बिहार भाजपचा सगळ्यात मोठा नेता म्हणून चौधरी यांचा उदय झाला. पुढे जेव्हा 25 च्या निवडणुकीनंतर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले त्या सरकारमध्ये सुद्धा सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री झाले. महत्त्वाचं म्हणजे त्यांना गृह खात्याची ही जबाबदारी देण्यात आली. नितीश कुमारांनी आपल्या 20 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच
बिहारच गृहमंत्रीपद सोडलं होतं. आता नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी बिहारमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री झालेलेत पण त्यांची निवड भाजपने का केली आहे यामागच राजकारण नेमकं काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे यामागचं पहिलं कारण म्हणजे राज्यातली जातीय समीकरण सम्राट चौधरी हे कोयरी समाजाचे आहेत तर नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे आहेत बिहारच्या राजकारणात या दोन समाजांचा उल्लेख लवकुश असा केला जातो बिहारमध्ये कोयरी आणि कुर्मी या दोन समाजांची एकूण लोकसंख्या 7%्यांच्या आसपास
आहे. नितीश कुमार यांनी त्यांच्या जोरावरतीच इतकी वर्ष बिहारमध्ये राजकारण केलेल आहे. हा समाज नितीश कुमारांना मोठ्या प्रमाणात मानतो. आता सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री बनवून भाजपला ही वोट बँक आपल्याकडे शिफ्ट करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे सम्राट चौधरी हे ओबीसी आहेत. ओबीसीमध्ये यादव समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. पण यादव समाज आजही आरजेडीचा प्रमुख मतदार मानला जातो. त्यामुळे भाजपला राज्यातले गैरदव ओबीसी आपल्याकडे वळवायचेत आणि हे करण्यासाठीच सम्राट चौधरी सगळ्यात योग्य नेते आहेत. कारण ते ज्या कोयरे समाजात नेतात तो समाज यादवांच्या विपरीत
भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो आणि अशाप्रकारे चौधरी यांना मुख्यमंत्री करून भाजपन यादव विरोधी मतांना आपल्या बाजूने करून घेतल्याचं म्हटलं जातय. खरे तर मागच्या काही वर्षात भाजपला देशभरात ओबीसी मतदारांनी चांगली साथ दिली आहे. ओबीसी मतदारच भाजपची प्रमुख वोट बँक म्हणून समोर आलेले आहे. या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवलं त्याच ओबीसी मतदारांची भूमिका महत्त्वाची होती. भाजपन बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना ओबीसी नेता म्हणूनच पुढे आणले आणि अशाप्रकारे आता त्यांना मुख्यमंत्री बनवत भाजपन बिहार मधली जातीय समीकरणं अगदी
परफेक्ट साधली आहेत असं म्हटलं जातय. सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड होण्याचे दुसरं कारण म्हणजे अमित शहा यांचा विश्वास सम्राट चौधरी हे बिहारमध्ये भाजपचे असे नेते आहेत जे शहांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहा यांनी सम्राट चौधरी यांच्या बाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केलेलं. चौधरी यांच्यासाठी प्रचार करताना अमित शहा एका रॅलीत मतदारांना उद्देशून म्हणालेले, तुम्ही सम्राट चौधरी यांना जिंकून द्या. मोदीजी त्यांना मोठा माणूस बनवतील इथं मोठा माणूस म्हणजे
बिहारचे मुख्यमंत्री हे क्लियर होतं सम्राट चौधरी यांच्या डोक्यावरती अमित शहांचाच हात असल्याचं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं आता त्यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड होण्यासाठी हा फॅक्टर महत्त्वाचा ठरलाय मुळात 2025 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच अमित शहा हे नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते एनडीएन निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणाही केली नव्हती होती. निकालानंतर जेव्हा भाजपला जेडीयू पेक्षा जास्तीच्या जागा मिळाल्या त्यानंतर दबक्या आवाजात भाजपचाच मुख्यमंत्री होणार
अशा चर्चाही सुरू होत्या. हा मुख्यमंत्री सम्राट चौधरी असू शकतात असही बोललं जात होतं पण पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपामुळे मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा नितीश कुमारांना मिळालं पण त्यावेळी नितीश कुमारांना गृहमंत्रीपद मात्र सोडाव लागलं जे सम्राट चौधरींना मिळालं त्यासाठी अमित शहानी जोर लावलेला असं म्हटलं जातं आता नितीश कुमार यांच्यानंतर बिहारमध्ये जेव्हा भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची वेळ आली आहे तेव्हा देखील अमित शहा हेच दबावतंत्र त्यांच्या कामी आलय त्यांच्या पाठिंब्यामुळेच सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असं
बोललं जातय सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे यामागच तिसरं कारण आहे ते म्हणजे पक्षातला त्यांचा परफॉर्मन्स खरं तर बिहारमध्ये भाजपला अनेक दशकांपासून जेडीयूचा छोटा भाऊ म्हणूनच पाहिलं जायचं सुशील मोदी हे अनेक वर्ष बिहार भाजपचा चेहरा होते पण ते राज्यातल्या भाजपच्या नेत्यांपेक्षा नितीश कुमार यांच्यात जास्त जवळचे मानले जायचे सुशील मोदींच्या काळात भाजप बिहारमध्ये सत्तेत होता पण सरकारवरती पूर्ण नियंत्रण नितीश कुमार आणि त्यांच्याच पक्षाच राहायचं पण सम्राट चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून हे चित्र कुठेतरी
बदलायला लागलं सम्राट चौधरी हे सुशील मोदींच्या तुलनेत अत्यंत आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात 2022- 23 च्या काळात ते जेव्हा भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते होते त्यावेळी ते नितीश कुमारांवर थेट हल्ला चढवायचे त्यावेळी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरन त्यांनी नितीश कुमारांना चांगलंच घेरलं होतं भाजपमध्ये असं करू शकणारा दुसरा कोणताच नेता नाही अशा प्रकारे सम्राट चौधरी यांनी फार कमी काळात बिहार भाजपवर आपली पकड मजबूत केली. पुढे सम्राट चौधरी जेव्हा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी सरकारमध्ये स्वतःची इमेज
कठोर प्रशासक म्हणून स्थापित केली आहे. मागच्या वर्षी गृहमंत्री झाल्यावर गुन्हेगारांविरुद्ध पावलं उचलायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ ज्या प्रकारे बुलडोझर ऍक्शन राबवतात तेच सम्राट चौधरींनी बिहारमध्ये राबवायला सुरुवात केली. त्यामुळे राज्यात त्यांची लोकप्रियता वाढत होती. ही लोकप्रियता पाहून भाजपन पश्चिम बंगाल सारख्या राज्यात त्यांची स्टार प्रचारक म्हणूनही नेमणूक केली होती आणि अशाप्रकारे भाजपला बिहारमध्ये मोठा भाऊ बनवण्यात सम्राट चौधरी यांचा रोल सगळ्यात महत्त्वाचा राहिलाय त्यामुळेच बक्षीस
म्हणून पक्षान त्यांना बिहारच मुख्यमंत्रीपद दिलय असं म्हटलं जातय एकूणच काय तर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणं ही घटना फार महत्त्वाची आहे त्यातच ही जबाबदारी अशा नेत्याला मिळाली आहे जो मुळचा भाजपचा नाहीये आरजेडी जेडी असा प्रवास करून फक्त आठच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या सम्राट चौधरी यांना पक्षान बिहारच मुख्यमंत्रीपद दिले याची चर्चा देशभरात होतीय तुम्हाला काय वाटतं सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड भाजपने का केली असावी याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय
घडामोडी पाहण्यासाठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करा
0 टिप्पण्या