एकाच वेळी 9 पोलिसांना न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा.. कोणत्या गंभीर गुन्ह्यामुळे सुनावली शिक्षा. काय आहे हे प्रकरण....?

 

           काही वर्षांपूर्वी च साऊथ सुपर स्टार अभिनेता सूर्या ह्यांचा "जयभीम , हा सिनेमा आला होता त्या चित्रपटात 

कश्या प्रकारे एका मागास आदिवासी जमातीतील युवकां वर पोलिसा मार्फत छळ करून त्याची पोलिस कोठडी त हत्या करण्यात येते ते ह्या चित्रपटात दर्शवली होते ही एक सत्य घटना होती तशीच एक मन सुन्न करणारी घटना 2020 साली घडली..
19 जून 2020 ची ती संध्याकाळ तमिळनाडू राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू होता तुकडी जिल्ह्यातल्या सातानकुलम या छोट्याशा बाजारपेठेत पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स यांच मोबाईल दुरुस्तीच दुकान होत त्या दिवशी दुकान नियोजित वेळेपेक्षा फक्त 10-15 मिनिटात जास्त वेळ उघडं राहिलं गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दुकान बंद करण्यास सांगितलं दरम्यान पोलीस आणि पी जयराज यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला काही क्षणातच हा वाद जास्त चिघळला शाब्दिक वाद वाढत गेला आणि पोलिसांनी जयराजांना ताब्यात घेतलं ...

ही बातमी समजताच त्यांचा मुलगा बेनिक्स पोलीस
ठाण्यात गेला पण तिथे परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखी बिघडली वाद पुन्हा पेटला आणि रागाच्या भरात पोलिसांनी दोघांनाही लॉकअप मध्ये टाकलं पण पुढे जे घडलं ते फक्त एक घटना नव्हती ती संपूर्ण देशाला हादरवणारी क्रूरता होती. पोलिस ठाण्याच्या चार भिंतीनाड जयराज आणि बेनिक्स यांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि दुर्दैवाने या मारहाणीमुळे या पिता पुत्राला आपला जीव गमवावा लागला अखेर न्यायालयाने या प्रकरणात सहभागी असलेल्या नऊ पोलिसांना आरोपी ठरवत चक्क फाशीची शिक्षा सुनावल्या म्हणूनच नेमक हे प्रकरण काय आहे न्यायालयाने निकालात नेमकं काय सांगितलंय
आणि आरोपी पोलिसांनी या पितापुत्रांसोबत नेमकं काय केलं होतं सगळा घटनाक्रम समजून घेऊयात या लेखाच्या माध्यमातून  2020 मध्ये देशभरात कोरोनामळे लॉकडाऊन सुरू होत सगळीकडे भीतीच वातावरण होतं नियमांची अंमल बजावणी केली जात होती आणि अशाच वेळी तमिळनाडूच्या थुतुकडी जिल्ह्यातील सततान कुलम या छोट्याशा बाजारपेठेत एक घटना घडली ज्या घटनेने संपूर्ण देशदरला विजयराज आणि त्यांचा मुलगा जेबेनिक्स दोघेही साधे व्यापारी त्यांच मोबाईल दुरुस्तीच दुकान होतं त्या दिवशी दुकान ठरलेल्या

वेळेपेक्षा अवघ्या 10-15 मिनिटांनी जास्त उघड राहिलं दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नी दुकान बंद करण्यास सांगितलं त्यावरून जयराज आणि पोलिसांमध्ये किरकोळ वाद झाला आणि पुढे हळूहळू हा वाद चिघळत गेला. शब्दांनी पेटलेला आवाज इतका वाढला की पोलिसांनी जयराजांना ताब्यात घेतलं आणि त्यांना सादानुकम पोलीस स्टेशन इथे नेलं ही बातमी कळताच त्यांचा मुलगा बेनिक्स दावत पोलिस ठाण्यात पोहोचला पण तिथे परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीच जास्त बिघडली पुन्हा वास झाला आणि रागाच्या भरात पोलिसांनी दोघांनाही लॉकअप मध्ये टाकलं

आणि त्यांनी दुकान ठरलेल्या वेळेपेक्षा थोड उशिरा उघड ठेवलं ही एक चूक त्याच्या जीवावर बेतली तसं तर ही चूक नव्हती पण एक नियमभंग होता पण त्याची शिक्षा काय असावी साधारणत दंड इशारा किंवा काही तासांची कारवाई पण इथ गोष्ट वेगळ्याच वळणावर गेली पुढे जे घडलं ते केवळ कायद्याच्या चौकटी बाहेर नव्हतं तर माणुसकीच्या मर्यादांच्याही पलीकडे होतं त्या रात्री पोलीस ठाण्याच्या चार भिंतीन आड या दोघा पितापुत्रांवर अमानुष अत्याचार करण्यात आले निर्दयी मारहाण टॉर्चर इतकं की त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहून सगळ्यांनाच धक्का बसला महत्त्वाचं म्हणजे

त्यांना गंभीर दुखापत झाली असतानाही योग्य वैद्यकीय उपचार त्वरीत मिळाले नाही उलट त्यांना पुढे कोविलपट्टी उपकारागृहात हलवण्यात आलं त्यांच्या प्रकृतीची स्थिती दिवसेंदिवस खालावत होती आणि या गंभीर मारहाणीमुळे 22 जून 2020 रोजी बेनिक्सचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अवघ्या एका दिवसातच म्हणजेच 23 जूनला त्यांचे वडील जयराज यांचाही मृत्यू झाला. एका कुटुंबातील दोन जीवांचा असा अंत तोही पोलीस कोठडीत ही बातमी बाहेर आली आणि संपूर्ण तमिळनाडू पेटून उठला. लोकांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर रस्त्यावर सगळीकडे एकच प्रश्न विचारला जाऊ  लागला हा न्याय आहे का ?

 प्रकरण गंभीर होतं त्यामुळे न्यायालयाने या घटनेची दखल घेतली आणि तपास केंद्रीय अन्वेशन विभागाकडे म्हणजे सीबीआय कडे सोपवला. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला त्यांनी तांत्रिक पुरावे साक्षीदारांचे जबाब वैद्यकीय अहवाल या सगळ्यांच्या आधारे तपास पुढे नेला शेवटी सीबीआयने तब्बल 2427 पानांच सविस्तर आरोपपत्र न्यायालयात सादर केलं. या आरोप पत्रात एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली ती म्हणजे ही घटना अपघात नव्हती तर ही एक सुनियोजित मारहाण होती ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर न्यायालयीन  प्रक्रिया सुरू झाली साक्षीदार पुरावे युक्तिवाद सहा वर्ष हा खटला चालला आणि अखेर तो दिवस आला जेव्हा मधुराई न्यायालयाने त्या प्रकरणात निकाल सुनावला न्यायमूर्ती मुतू कुमारण यांनी निकाल देताना अत्यंत स्पष्ट आणि कठोर शब्द वापरले त्यांनी सांगितलं की हा गुन्हा दुर्मिळ दुर्मीळ प्रकारात मोडतो कारण ज्यांच्यावर जनतेच रक्षण करण्याची ची जबाबदारी आहे त्यांनीच आपल्या अधिकाराचा गैरवापर करून निशस्त्र नागरिकांवर अत्याचार केला. न्यायालयाने हेही नमूद केलं की केवळ जन्मठेप शिक्षा अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी पुरेशी नाही 

जर कठोर शिक्षा दिली नाही तर अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता राहते त्यामुळे समाजाला ठोस संदेश देण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून न्यायालयाने दोषी ठरलेल्या नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मांडला जातो कारण कस्टडियल डेथ च्या प्रकरणांमध्ये इतकी कठोर शिक्षा क्वचितच दिली जाते याशिवाय न्यायालयाने पीडित कुटुंबाला ला सुमारे 1.40 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले. जर दोषीनी दंड भरला नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करून ती रक्कम पिडितांच्या कुटुंबाला देण्यात यावी असेही

स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्तींनी आपल्या निरीक्षणात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की कोठडीतील मृत्यू हा समाजासाठी कलंक आहे त्यांनी हेही अधोरेखित केलं की सत्ता जिथे असते तिथे जबाबदारी तितकीच असली पाहिजे अन्यथा लोकशाही धोक्यात येते या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये तत्कालीन निरीक्षक एस श्रीधर उपनिरीक्षक बालकृष्णन आणि रघु गणेश मुख्य कॉन्स्टेबल मुरुगन आणि साम दुराई यांच्यासह इतर चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. यातील 10व्या संशयिताचा विशेष उपनिरीक्षक पाल दुरई याचा 2020 मध्ये कोविड मुुळे मृत्यू झाला होता.

न्यायाधीशांनी अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड प्रकरणाचा संदर्भ देत कोठडीतील मृत्यू हा एक सामाजिक कलंक असल्याचं सांगितलं. पोलिसांनी दिलेली वागणूक ही कुंपणाने चेत खाण्यासारखी होती असं निरीक्षण नोंदवत न्यायालयान स्पष्ट केलं की सत्ता जिथे असते तिथे जबाबदारी असायला हवी अन्यथा लोकशाहीला धोका निर्माण होतो. न्यायालयाच्या या निर्णयानंतर एक गोष्ट मात्र ठामपणे समोर आली ती म्हणजे कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी जर कायदा हातात घेतला तर त्यांना कोणतीही सूट नाही. घटना फक्त एका पितापुत्रावर झालेल्या

अत्याचाराची नाही तर ती संपूर्ण व्यवस्थेला आरसा दाखवणारी आहे. कस्टोडियल डेथ म्हणजे केवळ एक गुन्हा नाही तर लोकशाहीच्या मूल्यांवरच एक गंभीर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये दिलेला हा कठोर निकाल केवळ शिक्षा नसून एक इशाराही आहे सत्तेचा गैरवापर सहन केला जाणार नाही. कायद्याचा वापर संरक्षणासाठी व्हायला हवा. दडपशाहीसाठी नाही जयराज आणि बेनिक्स यांच्या मृत्यूने एक मोठा प्रश्न उभा केलाय की आपण सुरक्षित आहोत का त्या लोकांकडून ज्यांनी आपलं संरक्षण करायच आहे कदाचित या निकालामुळे त्या प्रश्नाचे उत्तर थोडं बदललं असेल कारण 
न्याय उशिरा का होई ना पण मिळाला 
आणि एक स्पष्ट संदेश दिला गेला की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही संपूर्ण घटनेबद्दल आणि न्यायालयाच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या unik marathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या