महागाईचा नवा झटका! पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनता हैराण इंधन दरवाढीचा परिणाम: दूधापासून प्रवासापर्यंत सर्व महाग


महागाईचा नवा झटका! पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनता हैराण इंधन दरवाढीचा परिणाम: दूधापासून प्रवासापर्यंत सर्व महाग

10 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला काटकसरीचे उपाय सांगितले पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याच मोदींनी आवाहन केल्यानंतर नेते मुख्यमंत्री गाड्यांचा ताफा कमी करताना चार चाकीच्या जागी दुचाकीवर जाताना तर काही नेते चालत जाताना दिसले त्याचे रील्स व्हायरल झाले आणि चर्चा झाली पण महागाईच्या झळा या सर्वसामान्यांनाच बसतायत ज्यांच्याकडे एकही गाडी नाही त्यांच्याच खिशावर आता ताण पडणार आहे. पेट्रोल डिझेलचे भाव आता तीन रुपयांनी वाढलेत. ही दरवाढ धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जातय. घाऊक आणि किरकोळ महागाईने सुद्धा गेल्या काही महिन्यातला


उच्चांक गाठलाय. यामुळं अर्थतंपासून सगळेच जण ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात यापेक्षा मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा शक्यता वर्तवतात. पंतप्रधान संकट टाळण्यासाठी उपाय सांगतायत. पण जगणंच महाग झालं तर ते सुद्धा सोडून द्यायचं का? असा प्रश्न आता देशातल्या सामान्य माणसाला पडलाय. महागाईचा मोठा बॉम्ब फुटण्याची भीती का व्यक्त केली जाते या महागाईची कोणती कारणं अर्थतज्ञांनी सांगितली आहेत आणि याचे परिणाम काय होऊ शकतात पाहूयात या बातमी मधून गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर वाढणार


याचे अंदाज वर्तवले जात होते. अखेर शुक्रवारी केंद्र सरकारन ही दरवाढ केली. शुक्रवारपासून पेट्रोल तीन रुपयांनी तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग झालय. सीएनजी सुद्धा दोन रुपयांनी महाग झालय. गेले चार वर्ष स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात आता ही वाढ झाली आहे एप्रिल 2022 पासून इंधन दरवाढ झाली नव्हती पण आता दर वाढवण्यात आलेत काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या दरवाढीचे संकेत दिले होते. गेल्या चार वर्षात देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. पण पश्चिम आशियात सुरू




असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे आता तेवढ्याच दरात पेट्रोल डिझेल विकणं कंपन्यांना कठीण जातय. यामुळेच कंपन्यांचा मोठा तोटा होत असून हा तोटा कंपन्या किती काळ सहन करू शकतील हा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागेल असं पुरी यांनी सांगितलं होतं. त्यामुळे पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ होणार हे अपेक्षितच होतं. काही रिपोर्ट्स नुसार इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या देशातल्या तिन्ही तेल कंपन्यांना आता जास्त दरात कच्च तेल खरेदी करावं लागतय. सध्या 100 ते 102 डॉलर प्रति


बॅरल पर्यंत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यात. पण पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे या कंपन्यांना दररोज 1600 कोटींच्या नुकसानाचा फटका सहन करावा लागतोय. ही परिस्थिती कायम राहिली तर या कंपन्यांना सर्वाईव्ह करणं कठीण होईल म्हणून पेट्रोल डिझेलचे दर वाढवल्याचं सांगितलं जातय. आता चार वर्षांनी तीन रुपयांची दरवाढ ही किरकोळ वाटत असली तरी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आता या कंपन्यांना तोटा होत असला तरी ज्यावेळी कच्च्या तेलाचे भाव हे 60 ते 65 डॉलर प्रति बॅरल पर्यंत कमी झाले होते तेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव हे कमी झाले नाहीत


त्यामुळे त्या काळात या कंपन्यांचा नफा झाला. आता मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या आधी सरकारन पेट्रोल डिझेलचे भाव दोन रुपयांनी कमी केले होते मग निवडणुकीच्या आधी जर भाव कमी करणं शक्य होतं मग इतर वेळी ते का केलं नाही असाही सवाल केला जातोय तर आगामी काळात पेट्रोल 18 तर डिझेल 25 रुपयांनी महागणार असल्याची भीती सुद्धा काही संस्था आणि अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे आता पेट्रोल डिझेल मध्ये दरवाढ झाल्यामुळे त्याचा कसा परिणाम होऊ शकतो ते बघूयात याचा ताबडतोप इम्पॅक्ट हा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढण्यावर होणार


होणार आहे रिक्षा टॅक्सीचा प्रवास आता महाग होऊ शकतो असंच सांगितलं जातय तर डिझेलच्या दरवाढीमुळे प्रायव्हेट बसेस कॅप्स यांचेही दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तर या महागाईच्या झळा स्वयंपाक घरापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रान्सपोर्टेशनवर होणारा खर्च सुद्धा वाढणार आहे यामुळे भाज्या फळ दूध इतर किराणा सामान महागण्याची शक्यता आहे. अमूल आणि मदर डेअरी कडून दुधाच्या दरांमध्ये प्रति लिटर दोन रुपयांची वाढ आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे आता इतर कंपन्या सुद्धा दर वाढवू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. याशिवाय


ऑनलाईन फूड डिलिव्हरी ईकॉमर्स सर्विसेस डिलिव्हरी चार्जेस वाढवण्याची किंवा डिस्काऊंट कमी करण्याची शक्यता आहे हे झाले पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे होणारे परिणाम पण आता घाऊक आणि किरकोळ बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणावर महागाई झाली आहे. घाऊक म्हणजेच होलसेल प्राई इंडेक्स 8.3 टक्क्यानी वाढलाय. ही महागाई गेल्या 42 महिन्यातली सगळ्यात मोठी महागाई आहे. मार्चमध्ये या महागाईचा दर हा 3.88 टक्के इतका होता तो एप्रिलमध्ये तब्बल चार टक्क्यानी वाढलाय. जेव्हा कच्च तेल, पेट्रोल, डिझेल, वीज यांच्या किंमती वाढतात तेव्हा घाऊक महागाई वाढतेच


त्यामुळे घाऊक बाजारातल्या वस्तू सुद्धा महाग होण्याची शक्यता आहे. फक्त घाऊक बाजारच नाही तर रिटेल मार्केटचा सीपीआय म्हणजेच कंज्युमर प्राई इंडेक्स मध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मार्चमध्ये सीपीआय 3.40% 40 टक्के इतका होता तो वाढून एप्रिल मध्ये 3.48 48 टक्के इतका झालाय ही 13 महिन्यातली मोठी महागाई आहे आता या महागाईचा दर हा पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीच्या आधीच आहे त्यामुळे आता मे महिन्यात हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे यामुळेच अगदी रोजच्या व्यापारातल्या वस्तू सुद्धा महाग होण्याची भीती व्यक्त केली


जाते मोदींनी सोना चांदी खरेदी करू नका असं सांगितलं पण आता लगेचच सोन्या चांदीवरच आयात शुल्क वाढून सहा टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आलं त्यामुळे आधीच गगनाला भिडलेले सोन्या चांदीचे भाव आता आणखीनच वाढणार त्यामुळे सोना चांदी खरेदी न करण्यासाठी काटकसरीची सोय सरकारनेच हे दर वाढवून केल्यासं म्हटलं जातय पण सोनाचांदी खरेदी केल्याशिवाय आपण जगू शकत नाही असं नाही पण दूध रोजच्या वस्तू जर महाग झाल्या तर करायचं काय आता रोज जेवण बनवण्यासाठी लागणारा पदार्थ म्हणजे खाद्य तेल खाद्य तेलांचे दर सुद्धा वाढण्याची भीती व्यक्त


केली जाते काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार खाद्य तेलाचा भडका उडण्याचे संकेत देण्यात आलेत पाम तेल उत्पादक देशांच्या बायोडिझेल धोरणामुळे जागतिक पातळीवर खाद्य तेलाची उपलब्धता कमी झाली आहे द सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार स्टेट ऑफ होरमूज मधून होणारी सागरी वाहतूक विस्कळित झाल्यामुळे खाद्य तेल वाहतुकीला जहाजे मिळत नाहीयेत त्यामुळेच युद्धानंतर आजपर्यंत किरकोळ बाजारात खाद्य तेलाचे दर सरासरी 10 ते 15 रुपये प्रति किलोने वाढलेत केंद्र सरकारने सकारात्मक हस्तक्षेप न केल्यास आणखी प्रति किलो 10


ते 15 रुपयांनी दरवाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते आखाती युद्ध सुरू होण्याआधी म्हणजेच 27 फेब्रुवारीच्या तुलनेत आजची स्थिती बघता रिफाईड पामतेल आयात खर्च प्रति टन 120 डॉलर प्रति टनान वाढून123 डॉलर इतका झालाय कच्च्या पामतेलाचा आयात खर्च 105 डॉलर न वाढून 1255 डॉलर झालाय कच्च्या सोयाबीन तेलाचा आयात खर्च 80 डॉलर न वाढून 1310 डॉलर झालाय कच्च्या सूर्यफूल तेलाचा आयात खर्च च00 डॉलर वर स्थिर आहे युद्ध सुरू झाल्यानंतर आयात खर्चात प्रति टन सरासरी 100 डॉ डॉलरने वाढ झाली आहे खाद्य तेल वाहतुकीवरील विमा खर्चातही वाढ


झाली आहे अर्जेंटिनातून आयात होणाऱ्या तेलावर युद्धापूर्वी प्रति टन 70 ते 75 डॉलर विमा आकारला जात होता तो सध्या 140 ते 145 डॉलर वर गेलाय रशियातून होणाऱ्या आयातीवर सरासरी 55 डॉलर विमा घेतला जात होता तो आता 90 ते 95 डॉलर झालाय मलेशिया आणि इंडोनेशियातून होणाऱ्या आयातीवर 40 डॉलर विमा घेतला जात होता तो 55 डॉलर प्रति टन इतका घेतला जातोय त्यामुळे खाद्य तेलांचे भाव आधीच वाढलेत ते आता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते त्यामुळे याच सरकारन लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची मागणी होते आता या महागाई बाबत अर्थतज्ञांनी सुद्धा काही अंदाज वर्तवलेत


आरबीआय च माजी गव्हर्नर बी सुब्बाराव यांनी याबाबत केलेल वक्तव्य महत्त्वाच आहे जेव्हा महागाई वाढत जाते तेव्हा लोक याला सरावतात आणि मागड्या कमी करायला लागतात त्यामुळे आता जो सप्लाय शॉक आहे तो नंतर डिमांड शॉक मध्ये बदलू शकतो असं सुब्बाराव यांच मत आहे महागाई डिमांड आणि सप्लाय यावर अवलंबून असते सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी बिघडली तर महागाई होते किंवा मागणी जास्त झाली तरी सुद्धा महागाई होतेच सध्याची महागाई ही पुरवठ्यामुळे होणारी आहे कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे ही महागाई झाली आहे पण जर ही महागाई होत


राहिली तर सप्लाय चेन मधले तळाचे स्तर म्हणजेच घाऊक विक्रेते दुकानदार हे सतत महागाई होत असेल तर वस्तूंच्या किंमती वाढवतच राहतात त्यामुळे सप्लाय चेन जरी सुरळीत झाली तरी ही महागाई सतत वाढत राहते यामुळेच युद्ध थांबल्यावर सुद्धा परिस्थिती सामान्य होण्यासाठी जास्त वेळ लागण्याचा अंदाज अर्थतज्ञ वर्तवतायत. जेव्हा महागाई होते तेव्हा आरबीआय मागणी कमी करण्यासाठी आपल्या मॉनिटरी पॉलिसी मध्ये सुद्धा काही बदल करते रेपो रेट वाढवून कर्ज आणखी महाग करण्याचा निर्णय आरबीआय कडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळेच साहजिकच अनेकांच घर घेण्याच स्वप्न सुद्धा

आता महाग होऊ शकतं एकंदरीतच पेट्रोल डिझेल महाग होणं ही फक्त सुरुवात असून महागाईचा मोठा दणका आगामी काळात बसण्याची भीती व्यक्त केली जाते. पण यामुळे घाबरून जाण्याची किंवा पॅनिक होण्याची गरज नाही वस्तू महाग होतील म्हणून साठेबाजी करू नये असं आवाहन लोकांना केलं जातय त्यान महागाईचा मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यता असल्यानं ग्राहकांना आवाहन केलं जातय तसच दुकानदारांकडून ही साठेबाजी होणार नाही यासाठी सरकार कठोर पावलं उचलण्याची सुद्धा शक्यता आहे या वाढता महागाई बद्दल तुम्हाला काय वाटतं महागाईचा हा शॉक किती मोठा असणार आहे याबद्दलच्या तुमच्या

प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी unik मराठी चॅनलला सबस्क्राईब

 करायला विसरू नका.

पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, महागाई, Price Hike, Inflation, Fuel Price Hike, Petrol Diesel News, महाराष्ट्र न्यूज, Breaking News, दूध महागणार, तेल दरवाढ, प्रवास महाग, सामान्य जनता, आर्थिक संकट, पेट्रोल डिझेल अपडेट

#PetrolPriceHike #DieselPriceHike #महागाई #Inflation #FuelPrice #BreakingNews #PetrolDiesel #PriceHike #MaharashtraNews #FuelRates #Economy #दूधमहागणार #प्रवासमहाग #महागाईवाढली #NewsUpdate #IndiaNews #PetrolDieselRate #TrendingNews
  1. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; महागाई पुन्हा भडकली!

  2. 42 महिन्यांनंतर महागाई उच्चांकावर; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

  3. दूध, तेल, प्रवास महागणार? इंधन दरवाढीचा थेट परिणाम

  4. पेट्रोल-डिझेल Price Hike: रोजच्या खर्चात मोठी वाढ

  5. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका; सामान्य जनता चिंतेत

  6. पेट्रोल-डिझेल दर वाढले; आता प्रत्येक वस्तूच्या किमती वाढणार?

  7. महागाईचा नवा झटका! पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनता हैराण

  8. इंधन दरवाढीचा परिणाम: दूधापासून प्रवासापर्यंत सर्व महाग

  9. Price Hike Alert! पेट्रोल-डिझेल वाढले, खिशाला बसणार मोठा फटका

  10. महागाईने गाठला 42 महिन्यांचा उच्चांक; सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार?




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या