![]() |
| Neet, परीक्षा रद्द ,Neet exam cancelled |
" Neet ' देशभरात घेतली जाणारी सर्वात प्रतिष्ठित मेडिकल एंट्रन्स एक्झाम एखाद्या विद्यार्थ्याला देशातल्या कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नीट च परीक्षा देणं अनिवार्य असतं यावर्षी ही परी तीन मे रोजी पार पडली होती. देशभरातल्या जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती पण आता परीक्षा झाल्यानंतर दहा दिवसांनी एक असा निर्णय समोर आला ज्यामुळे सगळा देश हादरून गेलाय. नीटची परीक्षा घेणाऱ्या एनटीएन मंगळवारी 12 मेच्या दिवशी ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. परीक्षे आधीच पेपर फुटल्यामुळे एनटीएन हा निर्णय घेतलाय.
ही घटना फार मोठी आहे कारण याचा परिणाम परीक्षा देणाऱ्या देशातल्या लाखो विद्यार्थ्यांवरती होणार आहे. या घटनेच गांभीर्य लक्षात घेत याच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून पेपर फुटीच नाशिक कनेक्शनही समोर आलय. नक्की काय घडलंय? नीट परीक्षेत पेपरफुटी कशापकारे झाली या घटनेच नाशिक कनेक्शन काय परीक्षा रद्द झाल्यानंतर आता 23 लाख विद्यार्थ्यांच पुढे काय होणार यावरती सरकारकडून काय ऍक्शन घेतली जातेय सगळं प्रकरण जाणून घेऊया या बातमी च्या माध्यमातून
मेडिकल एंट्रन्स साठी आवश्यक असलेली नीट च परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए कडून घेतली जाते. एनटीएनतीन मेला जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेत पेपर लीकच प्रकरण समोर आल्यानंतर आज 12 मेला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. एनटीएन एक नोटिफिकेशन जाहीर करून या निर्णयाची माहिती दिली आहे. या नोटिफिकेशन मध्ये म्हटल आहे की एनटीएन सगळे विद्यार्थी पालक आणि सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. एनटीएन 8 मे रोजी हे प्रकरण केंद्रीय संस्थांकडे चौकशीसाठी सोपवलं
होतं अशा राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा निष्पक्षपणे घेण्याचा आमचा उद्देश आहे.
त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल. परीक्षेच्या नव्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील असं एनटीएन नोटिफिकेशन मध्ये म्हटलय. आता नीटचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली पण हे घडलं कसं? पेपर नेमका फुटला कसा आणि याचं नाशिक कनेक्शन काय आहे? ते सविस्तर समजून घेऊ. तर या सगळ्याची सुरुवात झाली राजस्थान मधून झालं असं की राजस्थानच्या सीकर आणि झुंझुनू या जिल्ह्यांमधल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवसा आधीच अंदाजेत प्रश्नपत्रिका म्हणजे गेस
पेपर मिळाला होता. या गेस पेपर मधले 120 पेक्षा जास्त प्रश्न 3 मे रोजी झालेल्या नीटच्या मुख्य परीक्षेत जशास तसे विचारण्यात आले होते. नीटच्या मुख्य परीक्षेत एकूण 720 मार्क्स असतात.
मिळालेल्या माहितीनुसार यापैकी तब्बल 600 मार्क्सचे प्रश्न या गेस पेपर मध्ये होते. गेस पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांच्या 300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश होता. काही रिपोर्ट्स नुसार राजस्थानातल्या चुरू जिल्ह्यातल्या एका एमबीबीएस च्या विद्यार्थ्याने हा पेपर सीकर इथल्या आपल्या मित्राकडे पाठवला होता त्यानंतर तो पेपर सीकर मध्येच पीजी चालवणाऱ्या एका व्यक्तीच्या हाती लागला. त्या व्यक्तीने तो पेपर त्याच्या पीजी मध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला दिला तिथून तो पेपर राजस्थानच्या झुनझुनू आणि चुरू जिल्ह्यापर्यंत पोहोचला.
मागच्या काही वर्षात राजस्थानच्या पोटानंतर सीकर हे शहर देशातल एक प्रमुख कोचिंग हब म्हणून समोर आलाय. इथे मेडिकल आणि इंजिनियरिंगच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी येतात. त्यामुळेच इथे सगळ्यात आधी हा गेस पेपर सर्क्युलेट करण्यात आला. सूत्रांच्या दाव्यानुसार या गेस पेपर मधले जवळपास 140 प्रश्न मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांशी थेट मॅच झाले आहेत.
याबाबत तज्ञांच म्हणण आहे की गेस पेपर मधले काही प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतल्या प्रश्नांशी जुळू शकतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न तंतोतंत मॅच होणं ही घटना असामान्य आहे हा फक्त योगायोग असू शकत नाही असं तज्ञांच म्हणण आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी अनेक खुलासे झाले आहेत. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार परीक्षेच्या आधी काही विद्यार्थ्यांना फोन आले होते. ज्यामध्ये त्यांना पेपर आला आहे अशी माहिती देण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार हे फोन दिल्लीहून आले होते. या फोन नंतर हा पेपर सीकर शहरामध्ये वेगाने लीक झाला.
काही रिपोर्ट्स नुसार जशी परीक्षा जवळ आली तस अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच हा पेपर 5000 ते 30 हजपर्यंत विकायला सुरुवात केली. या सगळ्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार परीक्षेच्या दोन दिवसा आधी हा गेस पेपर प्रत्येकी पाच लाख रुपयांना विकला गेला होता. तर परीक्षेच्या आदल्या रात्री तो प्रत्येकी 30 हज रुपयांना विकला गेला. तपास यंत्रणांना संशय आहे की हे प्रकरण फक्त विद्यार्थ्यांपुरतच मर्यादित नव्हतं यामध्ये अनेक कोचिंग संस्था एमबीबीएस कान्सिलिंगशी संबंधित लोक तसच हॉस्टेलच्या नेटवर्कचाही सहभाग होता.
तपास यंत्रणांनी सीकर इथल्या एका कोचिंग संस्थेच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय. तसच राकेश नावाच्या व्यक्तीवरही संशय आहे त्याने हा गेस पेपर 30 हज रुपयांना विकल्याचा आरोप आहे. तपासात हे पेपर राजस्थान मधल्या एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनी पर्यंतही पोहोचल्याच समोर आलय. याप्रकरणी 8 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपन सीकर इथे येऊन ही सगळी कारवाई केली हे नेटवर्क फक्त राजस्थानच नाही तर देशातल्या अन्य राज्यांमध्ये पसरला असल्याचा अंदाज आहे.
एसओजीन सीकर आणि झुनझुनू सोबतच उत्तराखंडच्या देहरादून इथून 15 संशितांना ताब्यात घेतलय. तर मनीष नावाच्या एका व्यक्तीला जयपूर इथून अटक करण्यात आली आहे. हा सगळ्याचा मुख्य सूत्रधार हीच व्यक्ती असल्याचं मानलं जातय. तपासात समोर आलय की हा पेपर WhatsApp आणि टेलिग्राम वरून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. काही मोबाईल फोन्सवर तर फॉरवर्डेड मेनी टाइम्स असा टॅग आढळून आलाय. याचा अर्थ हा पेपर अनेक जणांपर्यंत पोहोचला होता हे स्पष्ट आहे त्यामुळे आता विशेष तपास पथक सोशल मीडियावरचे चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, बँक व्यवहार आणि डिजिटल ट्रेल्सची कसून तपासणी करत आहे.
आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे हा गेस पेपर सगळ्यात आधी लीक कुठून झाला? तर इथे याच नाशिक कनेक्शन समोर आलय. तपास यंत्रणांना संशय आहे की हा पेपर थेट प्रिंटिंग प्रेस किंवा पेपर छापणाऱ्या मूळ सोर्स कडून लीक झाला असावा. दैनिक भास्करन सूत्रांच्या हवाल्याने म्हटलय की नीटचा हा पेपर सगळ्यात आधी नाशिकमध्ये फुटला. तिथून तो हरियाणामध्ये पोहोचला तिथे या फुटलेल्या पेपरचे 10 सेट बनवण्यात आले. त्यानंतर ते राजस्थान, बिहार, आंध्रप्रदेश आणि जम्मू काश्मीर पर्यंत पोहोचवण्यात
आले.
आणखी काही रिपोर्ट्स मध्येही नाशिकच नाव समोर आलय. सूत्रांच्या माहितीनुसार या पेपरफुटीची सुरुवात जयपूर इथल्या प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेकडून झाली. मात्र देशात सगळ्यात आधी नाशिक इथे प्रश्नपत्रिका फुटली. तिथून ती राजस्थानसह देशभरात पोहोचवण्यात आली. त्यामुळे आता हे देशभरात पसरलेलं एक मोठं नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आता तीन मे रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर ही परीक्षा देणाऱ्या 23 लाख विद्यार्थ्यांच काय होणार हा मोठा प्रश्न आहे. तर एनटीएन याबाबत दिलेल्या माहितीनुसार
विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल.
त्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तसच विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांमध्येही कोणताही बदल केला जाणार नाही. पुन्हा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी नव्यान ऍडमिट कार्ड जारी केले जातील. तसच परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेल शुल्क सुद्धा परत केल जाईल अस एनटीएने म्हटलय. पुन्हा घेतल्या जाणाऱ्या नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अस एनटीए कडून स्पष्ट करण्यात आलय. या पेपर फुटीच्या प्रकरणावरून मोठं राजकारणही सुरू झालय.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की नीटचा पेपर फुटणं हे फक्त सरकारचा अपयश नाही तर तो तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया देत हा खूप मोठा स्कॅम आहे परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर गैरप्रकार झाला आहे असं म्हटलय. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवलाय. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती
एनटीएन दिलेली आहे. या घटनेबाबत जेव्हा मीडियान राजधानी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं धर्मेंद्र प्रधान यावरती कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले. एकूणच काय तर नीटच्या परीक्षे आधी पेपर फुटणं आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षाच रद्द होणं ही घटना फार गंभीर आहे. याआधी 2024 मध्येही पेपर लीक मुळे नीटची परीक्षा काही सेंटर्स वरती रद्द करण्यात आली होती पण त्यावेळी सुप्रीम कोर्टान संपूर्ण परीक्षा रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही
सेंटर्स वरती पुन्हा परीक्षा झाली होती पण यावेळी संपूर्ण देशभरातील परीक्षा रद्द करण्यात आली.
पेपरफुटीच हे रॅकेट देशातल्या अनेक राज्यांमध्ये पसरल्याचं समोर आलं त्यामुळे याचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आलाय. आता तपासात काय समोर येतं या सगळ्याच मूळ कुठे आहे आणि त्यावर सरकारकडून काय ॲक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं? पेपर फुटीच मूळ नक्की कुठे असेल याबाबतचे तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
NEET परीक्षा रद्द, NEET paper leak, NTA controversy, NEET UG scam, छात्रों का विरोध, परीक्षा में धांधली, NEET re-exam, education justice, student protest
Hashtags:
#NEET_परीक्षा_रद्द
#NEETUG
#NEET2026
#NEETPaperLeak
#NTA
#StudentJustice
#ReNEET
#SaveStudents
#EducationSystem
#JusticeForStudents

0 टिप्पण्या