अमेरिका-ड्राण यांच्यात १९ जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता करार, जगाने टाकला निःश्वास, इंधनटंचाई टळली, कच्च्या तेलाचे दर घसरले


  वॉशिंग्टन / इस्लामाबाद: 


संपूर्ण अगाला वेठीस धरणारे इराण विरुद्ध   १०७ दिवस अमेरिका-इस्रायलचे चाललेले युद्ध अखेर संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली. हे युद्ध संपविण्यासाठीचा करार अंतिम झाला असून त्याबद्दल 'सर्वांचे अभिनंदन', असे ट्रम्प यांनी आपल्या 'टूथ सोशल या वेबसाइटवर म्हटले आहे.


ट्रम्प यांच्या घोषणेमुळे गेले पावणे चार महिने आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर आलेला मोठा दबाव कमी झाला आहे. या करारावर येत्या १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षऱ्या होतील आणि याचे संपूर्ण आयोजन पाकिस्तानचे असेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान संसदेत सोमवारी सांगितले. या कराराचे चीननेही स्वागत करत होर्मुझ सामुद्रधुनी शक्य तितक्या खुली व्हावी असे चीनने म्हटले.


इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझीम घारीबाबदी यांनी कराराची पुष्टी केली. मात्र, करारावर अधिकृत स्वाक्षरी होईपर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इस्रायलने मात्र या करारावर कठोर भूमिका घेत लेबनॉन, सीरिया आणि गाझा पट्टीतील ताब्यात घेतलेल्या भागातून आपले सैन्य माघारी घेणार नाही, असे स्पष्ट केले. 'येदिओत आखरोनोत' या सर्वाधिक खपाच्या दैनिकाने हा संघर्ष अमेरिका-इराण असा राहिलेला नसून ट्रम्प विरुद्ध इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात असल्याचे म्हटले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटविणार


ट्रम्प यांनी करारामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल आणि इराणच्या बंदरांवरील अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी हटविण्यात येईल, असे जाहीर केले.
हौर्मुझ सामुद्रधुनी टोलमुक्त खुली करण्यास आणि अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी तात्काळ हटवण्यास मी अधिकृत मंजुरी देत आहे. जगभरातील व्यापारी व अन्य जहाजांनी पुन्हा प्रवास सुरू करावा; तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू होऊ द्या, असे ट्रम्प म्हणाले.
सोमवारी ट्रम्प यांनी अन्य एका पोस्टमध्ये होर्मुझमधून अनेक मालवाहतूक जहाजे मार्गक्रमण करत असल्याचे सांगत हा मार्ग सुरक्षित झाला असे म्हटले.

ट्रम्प यांचा राजनैतिक विजय


रविवारी ८० वर्षांचे झालेल्या ट्राप यांच्यासाठी हा करार मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणवर हल्ले केले होते, तसेच इराणच्या प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर नियंत्रण मिळवण्यासाठी संहारक हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली, पण नंतर त्यांनी अखेर माधार घेतली होती. आता ट्रम्प यांनी हा ऐतिहासिक करार संपूर्ण प्रदेशात शांतता आणि सुरक्षितता आणेल. माझ्यापूर्वी अनेक राष्ट्राध्यक्षांनी इराणसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही, असे म्हटले.

पाकची मध्यस्थी निर्णायक


अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत पाकिस्तानने महत्त्वाची मध्यस्थी भूमिका बजावली. दोन्ही देशांमधील संपर्क प्रस्थापित करणे, चर्चाचे आयोजन करणे आणि संघर्ष समाप्तीसाठी राजनैतिक प्रयत्न करणे यात पाकिस्तान सक्रिय होता. या करारावर शाहबाज शरीफ म्हणाले की, सखोल चर्चेनंतर हा शांतता करार झाला आहे. दोन्ही बाजूंनी लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तात्काळ आणि कायमस्वरूपी थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. शरीफ यांनी कतार, सौदी अरेबिया, तुर्कीये यांचेही मध्यस्थीतील योगदानाबद्दल आभार मानले.
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध समाप्त करण्यासाठी आणि होर्मुडाची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी अंतरिम करार झाला आहे. या करारावर शुक्रवारी स्विझरलँड येथे स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. मात्र, करारातील अनेक बाबी अद्याप अस्पष्ट असून काही मुद्दघांवर दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम आहेत.

अणुकार्यक्रमावर ६० दिवसांत निर्णय


इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरायाची यांनी, करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील ६० दिवसांत इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अंतिम अटी निश्चित केल्या जातील आवश्यक वाटल्यास ही मुदत वाढवली जाऊ शकते, असे म्हटले आहे. अमेरिका आणि इस्रायलचा दावा आहे की, इराणचा अणुकार्यक्रम अण्वस्त्रनिर्मितीकडे जाऊ शकतो. मात्र, तेहरानने नेहमीच आपला अणुकार्यक्रम शांततापूर्ण असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकान्याच्या मते, प्रस्तावित करारानुसार इराणकडे असलेले उच्च युरेनियम नष्ट करणे किंवा ते देशाबाहेर हलविण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, इराणने हा दावा फेटाळून आपला युरेनियम साठा कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
होण्याची शक्यता


होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली प्रस्तावित करारात होर्मुझ सामुद्रधुनी
पुन्हा खुली करण्याचाही समावेश असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अराघची यांच्या मते, सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून सेवा शुल्क आकारण्याची मुभा इराणला हवी आहे. युद्धकाळात इराणने जहाजांकडून शुल्क आकारले होते, ज्याला अमेरिका आणि इतर देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले होते.
जागतिक तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी होर्मुझ सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ती बंद झाल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला होता आणि इंधनाच्या किमती वाढल्या होत्या.



इराणवरील निर्बंधांमध्ये शिथिलता


काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रस्तावित करारात इराणवरील आर्थिक निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविणे आणि गोठवलेली इराणी मालमत्ता मुक्त करणे यांचाही समावेश असू शकतो. विविध देशांतील इराणची अब्जावधी डॉलरची गुंतवणूक अमेरिकेने गोठवलेली आहे


इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले थांबवावेत ही एक अट


पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी करारानंतर सर्व आघाड्यांवरील, त्यात लेबनॉनचाही समावेश आहे, लष्करी कारवाया तातडीने आणि कायमस्वरूपी थांबवल्या जातील, असे म्हटले आहे. मात्र, इस्रायलने या अटीला मान्यता दिली आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
२ इराणची भूमिका अशी आहे की, कोणत्याही शांतता करारात लेबनॉनमधील युद्धविरामाचा समावेश असायलाच हवा. दुसरीकडे, इसायलचे संरक्षणमंत्री इसायेल काट्झ यांनी इसायल इराणविरोधात स्वतंत्र कारवाई करण्याचा हक्क राखून ठेवेल, असे स्पष्ट केले आहे.

'जी-७' मध्ये ट्रम्प काय म्हणणार?


होणाऱ्या जी-७ देशांच्या बैठकीला उपस्थित राहणार ट्रम्प सोमवारी जिनिव्हात पोहोचले असून ते तेथे आहेत. या बैठकीत ज्या युरोपीय देशांनी अमेरिकेला इराणविरुद्धच्या युद्धात थेटपणे मदत नाकारली होती, त्या नेत्यांशी ट्रम्प पहिल्यांदा प्रत्यक्ष संवाद साधतील. ट्रम्प या बैठकीत अमेरिकेची इराण युद्धामागील भूमिका पुन्हा मांडतील अशी अपेक्षा आहे. त्यांची पत्रकार परिषद ही औत्सुक्याची ठरणार आहे.

बदलतील समीकरणे


युद्धविरामामुळे ट्रम्प यांची 'जी-७' मधील राजकीय भूमिका अधिक मजबूत झाली आहे. त्याचा उपयोग ते नाटो राष्ट्रांवर दबाव टाकण्यासाठी करतील असा अंदाज आहे.
'जी-७'च्या २ बैठकीत होर्मुझच्या खाडीतील इराणने पेरलेले पाणसुरुंग हटवण्याबाबत सदस्य
देश चर्चा करतील अशीही
शक्यता आहे.

अमेरिकेत काही डेमोक्रॅट - रिपब्लिकन सदस्यांची टीका


अमेरिकन सेनेटर मार्क वॉर्नर यांनी पूर्वीच्या करारात आंतरराष्ट्रीय निरीक्षक होते, पण या वेळी अमेरिका एकटी किंवा केवळ इस्रायलसोबत दिसते, असा टीकात्मक मुद्दा मांडला आहे. तर रिपब्लिकन सेनेटर लिंडसे ग्रॅहम यांनीही या करारावर संशय व्यक्त करत काँग्रेसकडून या कराराची तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले. जे. डी. व्हान्स हे अमेरिकेकडून करार सादर करतील अशी शक्यता असल्याचे वृत्त आहे.

.

१०८ दिवसांचे युद्ध, शेकडो हल्ले अन् अखेर करार


वॉशिंग्टन/इस्लामाबाद : अमेरिका आणि इराण यांच्या संघर्षातील महत्त्वाच्या घटना :


२८ फेब्रुवारी: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई ठार, संघर्षाची ठिणगी पडली.


१ मार्च : इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले; आखातात तणाव वाढला.
९ मार्च : मोज्तबा खामेनेई यांनी इराणच्या सर्वोच्च सूत्रे स्वीकारली.
१७ मार्च : इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांची हत्या.
२३ मार्च: ट्रम्पकडून होर्मुझ खुली करण्याचा इराणला अल्टिमेटम.
२७ मार्च : इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचे हल्ले.
३१ मार्च : चीन-पाकिस्तानकडून पाच कलमी शांतता प्रस्ताव. ३ एप्रिल : इराणमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले गेले.
८ एप्रिल : अमेरिका- इराणमध्ये २ आठवड्यांचा युद्धविराम.
११ एप्रिल : इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण यांच्यात थेट चर्चा पण चर्चा निष्फळ
१२ एप्रिल : अमेरिकेची होर्मुझवर नौदल नाकेबंदी जाहीर केली.
२२ एप्रिल : ट्रम्प यांनी युद्धविराम अमर्यादित काळासाठी वाढवला;
१८ मे : वाटाघाटीमुळे ट्रम्प यांनी लष्करी कारवाई स्थगित ठेवली.
२४ मे : होर्मुझ खुले करण्याचा करार पूर्ण झाला; ट्रम्प यांचा दावा. १ जून : अमेरिकेने इराणमधील रडार, ड्रोन केंद्रांवर हल्ले.
६ जून : इराणने बहरिन-कुवेतच्या दिशेने क्षेपणास्त्रे व ड्रोन डागले.
८ जून : इस्रायल - इराणमध्ये पुन्हा हल्ले; युद्धाची भीती वाढली.
९ जून : अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेनंतर अमेरिका-इराणचे प्रतिहल्ले सुरू.
१५ जून: ट्रम्प आणि शहबाज शरीफ यांच्याकडून शांतता करार अंतिम झाल्याची घोषणा.







अमेरिका ड्राण शांतता करार
स्वित्झर्लंड शांतता चर्चा
युद्ध थांबले बातमी
कच्च्या तेलाचे दर घसरले
इंधनटंचाई टळली
जागतिक शांतता करार
आंतरराष्ट्रीय राजकारण
जागतिक अर्थव्यवस्था अपडेट
तेल बाजार बातम्या
peace agreement June 19
oil prices fall news
global war update
international peace talks
fuel crisis avoided
world economy news



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या