राजस्थान : आंदोलनावेळी दिपकें च्या कानशिलात मारली, ६ जण ताब्यात, काय घडलं ? Abhijeet Dipke Slapped in Rajasthan
Unikmarathi365
राजस्थान :- अभिजीत दीपके मागच्या काही दिवसांपासून सगळ्या भारतात चर्चेत असलेल नाव आधी कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाची केलेली घोषणा या घोषणेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद त्यानंतर आधी प्रवक्त्यांची आणि नंतर आंदोलनाची घोषणा करत अभिजीत दीपके प्रचंड चर्चेत आले होते त्यानंतर 6 जूनला दीपके दिल्लीत आले आणि त्यांनी जंतरमंतरवर आंदोलन केलं या आंदोलनाला सेलिब्रिटीत सुद्धा उपस्थित होते. दिल्लीनंतर पुणे, अमृतसर, बेंगलोर आणि लखनऊ मध्ये दीपकंच्या कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केली. सोमवारी 15 जूनला सीजेपीने जयपूरमध्ये आंदोलन केलं. आंदोलन स्थळी दीपकेंना खांद्यावर घेण्यात आलं घोषणा सुरू होत्या आणि अशातच काही तरुण दीपकेंच्या दिशेने आले आणि त्यांच्या कांचलात मारत त्यांना मारहाण केली. त्यानंतर आंदोलन स्थळी मोठा झाला. पण नेमकं घडलं काय? मारहाण करणाऱ्या तरुणांबद्दल काय माहिती समोर आलीय पाहूयात या बातमी मधून.
11 जून पर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर देशभरात आंदोलन केले जातील असा इशारा अभिजीत दीपकेंनी पुण्यात झालेल्या आंदोलनावेळी दिला होता. त्यानुसार अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीने ठीक ठिकाणी आंदोलन केली. सोमवारी सीजेपीने जयपूरच्या शहीद स्मारक इथन आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती.
या आंदोलनाला मोठ्या संख्येने येण्याचा आव्हान दीपकेंनी तरुणाईला केलं होतं सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासूनच शहीद स्मारकच्या भागात गर्दी वाढायला सुरुवात झाली वेगवेगळ्या वयोगटातली लोक येत होती इथल्या गेटवर आंदोलकांनी झुरळाचे चित्र काढलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता.
मुझे देश से प्यार है भ्रष्टाचार अस्वीकार है पेपर लीक बंद करो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो असे स्लोगन्स लिहिलेले बॅनर्स आंदोलकांनी आणलेले सव्वाार च्या आसपास आंदोलन स्थळी पहिला झाला घोषणाबाजी सुरू असताना तरुणांचे दोन गट आपापसात भिडले त्यामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि काही युवकांना ताब्यात घेतलं हा सगळा सुरू असताना काही जणांचे मोबाईल चोरीला गेले त्यामुळे आपापले मोबाईल जपा असं स्टेजवरूनच वारंवार सांगण्यात येऊ लागलं पण पोलीस ंनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि घोषणाबाजी आणि आंदोलन पुन्हा सुरू झालं संध्याकाळी पावणे पाच च्या आसपास अभिजीत दिपके आंदोलन स्थळी पोहोचले तेव्हा जमलेल्या गर्दीने त्यांच जोरदार स्वागत केलं धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या अर्थाच्या घोषणा देण्यात आल्या अभिजीत दिपके यांना खांद्यावर उचलून घेण्यात आलं तशाच पद्धतीने त्यांना गर्दीत नेण्यात आलं आणि घोषणांना आणखी जोर आला.
वेगवेगळ्या गटांमधून घोषणा देणं सुरू असताना एकत्र घोषणा देणं सुरू झालं त्यावेळी जमलेले आंदोलक पुढे पुढे जात अभिजीत दीपक सोबत शेख करण्याचा प्रयत्न करत होते तशाच पद्धतीने काही तरुण पुढे गेले आणि शेख करण्यासाठी हात पुढे घेतलेल्या अभिजीत दीपकंच्या कानशिलात लगावली त्यानंतर त्यांची मान पकडत त्यांना खाली खेचण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न झाला लागलीच दीपक यांचे समर्थक सुद्धा मध्ये पडले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांना गर्दीतून बाजूला नेलं माध्यमांमध्ये असलेल्या ल्या बातम्यानुसार एवढा वाढला की दीपक यांच्या समर्थकांनी या दोघांना मारहाण केली. एका तरुणाचा शर्टही फाटला आंदोलन स्थळी धुवा सुरू झाला.
घोषणांची जागा मारहाणीने घेतली लागलीच पोलिसांनी ऍक्शन घेतली त्यांनी सीजेपीच्या आंदोलकांना बाजूला केलं आणि मारहाण करणाऱ्या तरुणांना पकडलं त्यांची चौकशी सुरू केली महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी पकडलेला असताना मारहाण करणाऱ्या तरुणांने माध्यमांना प्रतिक्रिया दिली ज्यात तो म्हणाला हे मच्छर जिहादी मानसिकतेचे आहेत हा अभिजीत जो आहे तो विनाकारण देशात असंतोष पसरवतोय पेपर लीक हा फक्त बहाणा आहे असं म्हणत असतानाच त्याने मी जयपूरचाच आहे मी राष्ट्रवादी आहे माझा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही असा दावा केला. पोलिसांच्या ताब्यात असताना माध्यमांच्या समोरच तो सीजेपीच्या आंदोलकांना तू इकडे मच्छर तुला दाखवतो मी कोण आहे अस आव्हान देत होता आता या तरुणाच्या चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर अभिजीत दीपकेंनी ही घटना झाल्यानंतर आंदोलन स्थळावरूनच कुणीही मारामारी करू नका ज्यांनी मला मारहाण केली आहे त्यांना सोडून द्या त्यांच्यावर हात उचलू नका आपल्याला कुणालाही मारायचं नाहीये मी एकदा काय दहा वेळा मार खायला तयार आहे त्यांना जाऊ द्या
अस आवाहन केलं या सगळ्यात पोलिसांनी दीपक्यांना मारहाण करणाऱ्या राकेश गुज्जर रोहित वैष्णव अर्जुन पंडित अजय यांच्यासह एकूण सहा तरुणांना ताब्यात घेतलय सगळ्यांना विधायक पुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं मुळात अभिजीत दीपकंच्या आंदोलनात होण्याची पहिलीच वेळ नाहीये पुण्यात झालेल्या आंदोलनावेळी फैजार अंसारी या मुंबईच्या तरुणाने आंदोलनाला विरोध करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला अभिजीत दीपके समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांची निष्पक्ष क्ष चौकशी करण्यात यावी त्यांच्या विरोधात एफआयआर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन फैजालने दिलं होतं तेव्हा या आंदोलन स्थळी तणावाच वातावरण तयार झालं होतं पण पुणे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती पण जयपूरमध्ये मात्र तसं घडलं नाही पोलिसांनी दोन गटांमध्ये वाद झाला तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणली खरी पण थेट अभिजीत दीपके यांना मारहाण झाल्याने वाद वाढला आणि त्यांना मारहाण करणाऱ्यांना सुद्धा बेदम मारहाण झाली घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि आंदोलन पुन्हा सुरू झालं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा घोषणा देत करण्यात आली.
तर अभिजीत दीपके यांनी 20 जूनला आपण पुन्हा दिल्लीला जाऊ मोठा आंदोलन उभारू आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊनच परत येऊ अशी घोषणा दिली.
त्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि आंदोलन संपलं त्यानंतर सीजेपीच्या समर्थकांनी अभिजीत दीपकेंना गराडा घातला. त्यांच्या भोवती कड करून त्यांना गाडीपर्यंत नेण्यात आलं. त्यावेळी आंदोलकांकडून वंदे मातरम आणि भारत माता की जय या घोषणा सुद्धा देण्यात आल्या. या सगळ्यानंतर अभिजीत दीपके यांनी एक ट्वीट केलं आणि शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण आहे आम्ही शांतपणे आवाज उठवणं सुरूच ठेवू मी गांधी आणि आंबेडकर यांचा अनुयायी आहे मी ही लढाई शांततेन आणि प्रेमान लढणं सुरूच ठेवेल पण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं ट्वीट मध्ये सांगितलं त्यामुळे आता मारहाण कोणाच्या सांगण्यावरून झाली का इथून पुढच्या आंदोलनांना परवानगी मिळते का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत सोबतच या घटनेची तुलना अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनात घडलेल्या घटनांशी केली जात आहे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत दीपके किंवा सीजेपीच्या वतीने कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बातम्या वाचण्यासाठी आमच्या unikmarathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह
अभिजीत दिपके
कानशिलात मारली
६ जण ताब्यात
राजकीय आंदोलन
लोकशाही
राजकीय वाद
ताजी बातमी
जनआंदोलन
महाराष्ट्र राजकारण
KEYWORDS (English): Rajasthan Protest
Abhijeet Dipke
Slapped During Protest
6 Detained
Political News
Breaking Update
Public Reaction
Democracy Debate
Political Movement
Trending News
HASHTAGS: #राजस्थान
#अभिजीतदिपके
#आंदोलन
#ताजीबातमी
#राजकारण
#लोकशाही
#Rajasthan
#AbhijeetDipke
#BreakingNews
#PoliticalNews
#Protest
#TrendingNow
#NewsUpdate
#MarathiNews
#CockrochJanataParty

0 टिप्पण्या