Cockroach Janta Party Protest : Abhijeet Dipke दिल्लीत,Jantar Mantar वर आंदोलनाला सुरूवात,


     Cockroach Janta Party Protest : Abhijeet Dipke दिल्लीत,Jantar Mantar वर आंदोलनाला सुरूवात, काय घडतंय


कॉक्रोच जनता पार्टी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर स्थापन झालेली देशव्यापी चळवळ बघता बघता ही चळवळ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली कॉक्रोच जनता पार्टीच्या अकाउंट्सला अवघ्या काही दिवसात कोट्यावधी फॉलोवर्स मिळाले या चळवळीचे फाउंडर आहेत महाराष्ट्राचे अभिजीत दिपके जे अमेरिकेतल्या बोस्टन इथं उच्च शिक्षण घेत आहेत ते इतक्या दिवसांपासून ही चळवळ अमेरिकेतून चालवत होते पण आता कॉक्रोच जनता पार्टी ही फक्त इंटरनेटवर वर न राहता ती रस्त्यावर उतरली आहे. अभिजीत दीपके भारतात परत आले असून त्यांनी देशाची राजधानी दिल्लीत आंदोलनाला सुरुवात केली आहे. 



शनिवार 6 जूनच्या दिवशी हे आंदोलन सुरू झालं. आंदोलकांची सगळ्यात मोठी मागणी आहे ती म्हणजे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या मागणीसाठी शनिवारी सकाळपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक जमायला सुरुवात झाली आहे अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सध्या नेमकं काय घडतंय? कॉक्रोच जनता पार्टी कशाप्रकारे आंदोलन करते हे आंदोलन किती मोठं होऊ शकतं पाहूयात या बातमी मधून कॉक्रोच जनता पार्टीने देशाच्या परीक्षांमधील गैरव्यवहार आणि घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलनाची हाक कॉक्रोच जनता पार्टी कडून देण्यात आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक संभाजीनगरचे अभिजीत डिपके यांनी एज्युकेशन मिनिस्टर मस्ट रिझाईन म्हणत या मोहिमेला सुरुवात केली. त्यासाठी 6 जूनला दिल्लीतल्या जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला देशभरातून तरुण आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक्स वर याबाबत पोस्ट केली आहे याबरोबर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले शनिवारी मी तुम्हाला सर्वांना भेटायला लढाखून दिल्लीला येतोय जंतरमंतरवर तुमची भेट घेईन पण जर उद्या कोणत्याही कारणासव तुम्हाला अटक झाली तर मला एक असं पाऊल उचलण्यास भाग पडेल जे उचलण्याची माझी इच्छा नाही. 




जर कोणाचीही अटक झाली तर मी यावेळी सहा आठवड्यांसाठी म्हणजेच 42 दिवसांसाठी उपोषणावर जाईन त्यामुळे अभिजीत दीपके किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या कोणत्याही सदस्याला पोलिसांनी अटक केली तर थेट उपोषणाचा इशारा सोनम वांगचुक यांनी दिलाय यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्या जंतरमंतरवर दाखल झाल्यात. मुख्य म्हणजे 6 जूनच्या या आंदोलनासाठी स्वतः अभिजीत दीपके हे सुद्धा अमेरिकेतून भारतात येणार असल्यानं हे आंदोलन मोठं होणार अशी चर्चा व्हायला लागली होती. दीपके यांनी 5 जूनला ट्वीट करून आपण भारतात येत असल्याचं जाहीर केलं. माझं भविष्य संविधानाच्या हाती सोपवतय जय भीम असं ट्वीट सुद्धा त्यांनी केलं. ठरल्याप्रमाणे अभिजीत दीपके 6 जूनच्या सकाळी साडेत वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मचरित्र दाखवत दीपके विमानतळामधून बाहेर आले. मुख्य म्हणजे दीपके भारतात येईपर्यंत जंतरमंतरवरच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे आधी कॉक्रोच जनता पार्टी कडून आंदोलकांना पार्लमेंटरी स्ट्रीट पोलीस स्टेशनवर जमण्याच आवाहन करण्यात आलं होतं. 




दिल्ली विमानतळाहून अभिजीत दीपके सुद्धा आंदोलनाच्या परवानगीसाठी संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले पण दीपके भारतात आल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली हे कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजीत दीपके यांच सगळ्यात मोठं यश असल्याचं सांगितलं जाऊ लागलं सकाळी 10 ते संध्याकाळी पाच यावेळेत सीजेपीच्या आंदोलकांना जंतरमंतरवर आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे याबद्दलची माहिती स्वतः दीपके यांनी ट्वीट करून दिली आणि सगळ्या आंदोलकांना जंतरमंतरवर जमण्याचं आवाहन केलं तसच सोबत येताना एखादं पुस्तक आणि आपला तिरंगा घ्यायला विसरू नका. पोलिसांसाठी सहानुभूती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना फुलं द्या. आपल्याला ही चळवळ प्रेम आणि शांततेच्या मार्गाने पुढे न्यायचे असं आवाहन सुद्धा दीपके यांनी आंदोलकांना केलं. कॉक्रोच जनता पार्टी कडून करण्यात येणारे हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने असेल. यात कुठलही देशविघातक कृत्य होणार नाही याची काळजी घेण्याच आवाहन सुद्धा दीपके तसच सीजेपीच्या प्रवक्त्यांनी केलय ट्रोल करणाऱ्या वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसोबत भांडण करू नका उपाशीपोटी आंदोलनाला येऊ नका अशा सूचना कॉक्रोच जनता पार्टी कडून आंदोलकांना करण्यात आल्यात. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळपासूनच हजारो तरुण जंतरमंतरवर दाखल व्हायला सुरुवात झाली. काही वेळातच इथे हजारो तरुणांनी मोठी गर्दी केली. 





धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणारे पोस्टर्स यावेळी आंदोलकांकडून दाखवण्यात आले. कॉक्रोच आ रहे है धर्मेंद्र प्रधान जा रहे है अशा घोषणा सुद्धा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या. शिक्षण मंत्र्यांना आम्ही निवडून पाठवलय. आमच्या टॅक्स मधून त्यांना पगार मिळतोय पण त्यांच्याच शासनकाळात आज करोडो तरुणांच भविष्य अंधारात आहे असही कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आलं जंतरमंतरवर आयोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या डिजिटल आघाडीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी हा भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक दिवस ठरेल अशी आशा या संघटनेला असल्याचं सांगितलं तसच सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी हे राजकीय आंदोलन नाही ही विद्यार्थी ंची चळवळ आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा एवढीच आमची मागणी असल्याचं स्पष्ट केलं आंदोलनात कोणताही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून दिल्ली पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय 1000 पेक्षा जास्त पोलिसांची फौज सध्या जंतरमंतर आणि आसपासच्या परिसरात तैनात करण्यात आली आहे खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानां बाहेर सुरक्षा व्यवस्था अत्यंत करण्यात आली जंतरमंतरवर जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेटिंग केलं असून वाहनांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना पुढे सोडलं जातय. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे मूळचे संभाजीनगरचे आहेत. 





त्यांच्या कुटुंबीयांनी संभाजीनगरच आपलं घर सोडल्याची माहिती सुद्धा माध्यमांकडून देण्यात आली आहे. अभिजीत यांचे वडील भगवानराव दिपके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की हे स्थलांतर कोणत्याही थेट धमकीमुळे करण्यात आलं नसून फक्त वाढत्या जनकशोभाचा आणि प्रसिद्धीचा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा एक कौटुंबिक निर्णय आहे. सुरुवातीला आपण मुलाला या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या दृढ निर्णयापुढे शेवटी आपल्याला माघार घ्यावी लागली असही भगवानराव दीपके यांनी माध्यमांना सांगितलं दुसरीकडं अभिजीत यांच्या वाढत्या राजकीय आणि सामाजिक सक्रियतेमुळे त्यांच्या आई अनिता दीपके यांनी माध्यमांशी बोलताना आपली भीती व्यक्त केली. आपल्या मुलान राजकारणाच्या आणि आंदोलनाच्या या चक्रवात न पडता अमेरिकेतील त्याच्या उज्जवल व्यावसायिक कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करावं अशी इच्छा त्यांच्या आईने व्यक्त केली आहे. संभाजीनगर मधल्या दीपके यांच्या घराबाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 




दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सुद्धा जंतरमंतरवर आंदोलन स्थळी पोहोचले असून मोठ्या उत्साहात घोषणा देत आंदोलन करत्या तरुणांनी त्यांच स्वागत केलं. यावेळी मोठ्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या. आता या आंदोलनात आणखी काय होणार अभिजीत दीपके कोणती भूमिका घेणार याच्या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवल्या जातील त्यामुळे या आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या