खान सरांच्या कोचिंग क्लास वर हल्ला व गोळीबार, पण खान सरानाच अटक.. #khan sir coaching class on attack

   

       खान सर म्हणून प्रसिद्ध असलेले स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे शिक्षक फैजल खान देशभरात त्यांची ओळख आहे खान सर सोशल मीडियावर खान सरांचे फॅन फॉलोंग प्रचंड आहे देशभरात त्यांना मानणारे लाखो विद्यार्थी आहेत अलीकडेच खान सर चर्चेत आले होते ते त्यांच्या कोचिंग क्लासवर झालेल्या हल्ल्यामुळे खान सर हे बिहारची राजधानी पटना येथे ग्लोबल स्टडीज नावाच कोचिंग इन्स्टिट्यूट चालवतात मंगळवारी दोन जूनच्या रात्री त्यांच्या इन्स्टिट्यूटवर काही लोकांनी हल्ला केला त्यांनी दगडफेक केली पोस्टर्स पाडले ड्युटीवर तैनात असलेल्या असलेल्या गार्डला मारहाणही झाली


सुरुवातीला गोळीबाराचा आरोपही झाला खान सरांनी आरोप केला की पटणातल्याच एका कोचिंग इन्स्टिट्यूटने त्यांच्यावर हल्ला केलाय त्यांनी या हल्ल्यासाठी ज्ञानबिंदू कोचिंगला जबाबदार धरलं खान सरांनी त्या कोचिंग इन्स्टिट्यूट विरुद्ध एफआयआरही दाखल केला पण आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आलाय पोलिसांनी खान सरांवरच एफआयआर दाखल केला असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे यामुळे ही घटना देशभरात चर्चेत आली आहे पण हे कस कसं शक्य आहे? पोलिसांनी खान सरांवरच एफआयआर का दाखल केला? त्यांना अटक होण्याची शक्यता नेमकी आहे का? खान सरांच्या क्लासेसवर




हल्ला केला कोणी सगळं प्रकरण जाणून घेऊया या  बातमी मधून  दोन जूनच्या रात्री नेमकं काय घडलं ते थोडक्यात सांगतो. पटणाच्या मुसल्लापूर हाड जवळ खान सर यांची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. मंगळवारी रात्री त्या भागात मोठा झाला. समोर आलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी तरुणांचा एक गट खान सरांच्या कोचिंग सेंटरवर आला आणि त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. विटा फेकल्या दगड फेक केली पोस्टर सही पाडले. जेव्हा कोचिंग सेंटरचा सिक्युरिटी गार्ड त्यांना आढवण्यासाठी पुढे आला तेव्हा




त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सिक्युरिटी गार्ड जबर जखमी झाला. या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेत. ज्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. सुरुवातीला खान सरांनी दावा केला होता की हल्लेखोरांनी आठ ते दहा गोळ्या झाडल्यात पण नंतर त्यांनी गोळीबाराचा उल्लेख करणं टाळलं पोलिसांनी सांगितलं खान सरांनी जे एफआयआर दाखल केली त्यात गोळीबाराचा कोणताही उल्लेख नाही या प्रकरणात पहिला ट्विस्ट आला तो इथेच त्यानंतर खान सरांनी या हल्ल्यासाठी पटणातल्याच ज्ञानबिंदू कोचिंग इन्स्टिट्यूटला जबाबदार धरलं हे



इन्स्टिट्यूट खान सरांच्या इन्स्टिट्यूटच्या शेजारीचा आहे खान सरांचा आरोप होता की ते कमीत कमी फी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीसाठी निवड होते. हे अन्य कोचिंग क्लासेसना बघवत नाही हा हल्ला त्याचाच परिणाम आहे असा थेट आरोप खान सरांनी केला. या हल्ल्यानंतर खान सरांनी ज्ञानबिंदू कोचिंगच्या संचालकांविरुद्ध एफआयआर दाखल केली त्यांच्या आरोपांनंतर पोलिसांनी ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद आणि त्यांचे दोन सहकारी अभिषेक आणि गौरव यांना ताब्यात घेतलं त्या तिघांची चौकशी करण्यात



आली. पोलीस तपासात समोर आलं ही तोडफोड ज्ञानबिंदू कोचिंग इन्स्टिट्यूटशी संबंध असलेल्या 15 ते 20 लोकांनी केली. इकडे खान सरांच्या आरोपांनंतर ज्ञानबिंदू कोचिंग कडूनही प्रतिक्रिया आली. इन्स्टिट्यूटचे संचालक रोशन आनंद यांनी खान सरांवर आरोप केला की ते बिहार पोलिसांसोबत मिळून सगळी सूत्र हलवतायत हा सगळा खान सरांनी रचलेला कट आहे मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आणि ज्ञानबिंदू कोचिंगला उध्वस्त करण्यासाठी हा कट रचण्यात आलाय असा दावा रोशन आनंद यांनी केला पण या प्रकरणात आता सगळ्यात मोठा ट्विस्ट आला असून पोलिसांनी



खान सरांविरुद्धच एफआयआर दाखल केली आहे तर यामागचं कारण काय तर पोलिसांनी जूनला ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करून जेलमध्ये पाठवलं त्याच दिवशी पोलिसांनी एक प्रेस रिलीज जाहीर करून फायरिंग झालेली नाही असं म्हणलं खान सर सुद्धा त्यांच्या गोळीबाराच्या वक्तव्यापासून मागे फिरले. त्यांनी सुद्धा फक्त दगड फेक आणि मारहाण झाली असं म्हणलं पण पुढच्याच दिवशी म्हणजे 4 जूनला ज्ञानबिंदू कोचिंग कडून एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये खान सरांचा सिक्युरिटी गार्डच गोळीवार करताना दिसतोय. ज्ञानबिंदू



कोचिंगचे आदर्श कुमार यांनी दावा केला ही सगळी घटना आधीपासूनच ठरलेली फायरिंग झाली पण ती खान सरांच्या सांगण्यावरून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली पोलीस तातडीने खान सरांच्या कोचिंग सेंटर जवळ पोहोचले थोडा वेळ चौकशी केल्यानंतर पोलिसांनी खान सरांच्या दोन सिक्युरिटी गार्ड्सना ताब्यात घेतलं धक्कादायक म्हणजे या गार्ड्सने गोळीबार केल्याचं मान्य केलय आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे या गार्ड्सने पोलिसांना सांगितलं त्यांना खान सरांनी यांनीच गोळीबार करायला सांगितलं होतं. सिक्युरिटी गार्ड्स म्हणाले गोंधळाचा आवाज



ऐकून आम्ही रात्री 10:30 वाजता कोचिंग सेंटर मधून खाली आलो. तिथे हाणामारी सुरू होती. त्यावेळी खान सरांनी आम्हाला गोळीबार करण्याचे आदेश दिले. पुढे जे काही होईल ते मी बघून घेतो असं खान सर आम्हाला म्हणाले होते. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन दोन राऊंड गोळीबार केला. अशाप्रकारे एकूण चार राऊंड फायर करण्यात आले अशी कबूली खान सरांच्या सिक्युरिटी गार्ड्सने पोलिसांसमोर दिली आहे. आता सिक्युरिटी गार्ड्सने कबूली दिल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा खान सरांकडे वळवला. या कबुलीच्या आधारे खान सरांवर फायरिंग आणि आर्म्स ऍक्टच्या अंतर्गत एफआयआर दाखल



करण्यात आली. पोलिसांनी खान सरांवर बीएनएस च कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित असून या 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे महत्त्वाचं म्हणजे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असेल तर अटकपूर्व जामीन मिळत नाही म्हणजेच आता खान सरांना अटक होणार हे निश्चित आहे या फायरिंगच्या व्हिडिओवर खान सरांची प्रतिक्रियाही आली आहे हल्ला झाला त्या दिवशी त्यांनी पोलिसांच बरच कौतुक केलं होतं पोलीस चांगल्या प्रकारे तपास करतायत असं ते म्हणाले होते पण आता त्यांनी दावा


केलाय पोलीस उशिरा पोहोचले म्हणून सिक्युरिटी गार्ड्सने स्वतःच्या रक्षणासाठी गोळीबार केला. ते म्हणाले तिथे हाणामारी सुरू होती. पोलिसांना पोहोचायला वेळ लागणार होता. पोलीस काही हवेतून उडून तिथे येऊ शकत नव्हते त्यामुळे सिक्युरिटी गार्ड्सनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केला. पोलीस जाईपर्यंत त्यांनी काय करायला हवं होतं त्यांनी प्रत्यक्षात कोणावर गोळी झाडली का? असा प्रश्न खान सरांनी विचारलाय. याबाबत खान सरांचा कोचिंग सेंटर मधला एक व्हिडिओही समोर आलाय. व्हिडिओत ते त्यांच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्याबद्दल



माहिती देतायत. खान सर हे सीसीटीव्ही फुटेज दाखवून विद्यार्थ्यांना सांगतायत. ज्या व्यक्तीने सिक्युरिटी गार्डला ओढत नेलं तिला अजून अटक झालेली नाही. जर ग्लोबल स्टडीज बंद पडलं तर पुढच्या सहा महिन्यात इतर अनेक कोचिंग क्लासेस मधली फी वाढून एक ते दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. माझा पैसा कमवण्याचा उद्देश नाही असं ते त्यांच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगतायत. सध्या तरी खान सरांच्या कोचिंग क्लासवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणान वेगळच वळण घेतलय. एफआयआर दाखल झाल्यानंतर खान सरांचे वकील त्यांच्या कोचिंग सेंटरवर




पोहोचलेत. इकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची हाय लेवल मीटिंग सुरू आहे. खान सरांच्या अटकेसाठी एका पदकाची स्थापनाही करण्यात आली आहे. त्यांना आज रात्री उशिरा अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचा आव्हान केलय. तर या प्रकरणात पुढे काय घडतं खान सारांना अटक होते का याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागलय पण एकूणच या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण  बातम्या साठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या