मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची काळीज पिळवून टाकणारे फोटो समोर आले... अखेर धनंजय मुंडे चा राजीनामा


Courestey social media sites

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची काळीज पिळवून टाकणारे फोटो समोर आले...

हत्या करणाऱ्यांनी अमानुषतेचा कळस कसा गाठला आणि देशमुख यांची कशी हालहाल करून हत्या केली याचा सर्वात मोठा पुरावा समोर आलाय... 

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्सेजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या क्रूर स्वरूपामुळे या प्रकरणाने लक्ष वेधले आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यापूर्वी तीन तास अमानुष छळ करण्यात आला. या हल्ल्याचे १५ व्हिडिओ आणि आठ फोटोंमध्ये दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे, जे आरोपींपैकी एक महेश केदार यांच्या मोबाईल फोनवरून जप्त करण्यात आले आहेत. हा हा या हत्या मध्ये खूप मोठा महत्त्वाचा पुरावा आहे जो या आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

या प्रतिमा आणि फोटो मध्ये देशमुख यांना झालेल्या गंभीर मारहाणीचे चित्रण आहे, ज्यामध्ये लोखंडी तारांनी गुंडाळलेला गॅस सिलेंडर पाईप, नकल डस्टर आणि लाकडी दंडुके वापरण्यात आले होते . पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे त्यांना किती तीव्र हिंसाचार सहन करावा लागला हे दिसून येते

या हत्येमुळे महाराष्ट्रात व्यापक संताप आणि निदर्शने झाली आहेत, न्याय आणि जबाबदारीची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण स्थानिक परळी येथील रा. काँ. ची खंडणी रॅकेटशी जोडलेले आहे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे आणि प्रमुख आरोपी वाल्मिक कराड कारागृहात आहे . सखोल आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य सीआयडी द्वारे तपास केला जात आहे. 

बातम्यांमधील या फोटोंच्या प्रदर्शनाबाबत, काही वृत्तांतांमध्ये असे नमूद केले आहे की देशमुख यांच्या मृतदेहाच्या ग्राफिक प्रतिमा सोशल मीडियावर प्रसारित झाल्या आहेत, ज्यामुळे जनतेचा रोष वाढला आहे . तथापि , मुख्य प्रवाहातील बातम्यांमधील फोटोंबद्दलची विशिष्ट माहिती मर्यादित आहे, कारण अशी सामग्री त्याच्या ग्राफिक स्वरूपामुळे अनेकदा प्रकाशित केली जात नाही.

याच बरोबर आवादा पवनचक्की चे इंजिनियर सुनील शिंदे व वाल्मीक कराड यांच्या मधले मोबाईल फोन वरील संभाषण चे रेकॉर्डिंग ही सीआयडी पोलिसांच्या हाती लागली आहे ज्यात कराड हा आवादा पवनचक्की कंपनी च्या इंजिनिअर सुनील शिंदे यांना काम बंद करण्यास सांगत आहे व त्यास धमकावत आहे 


रा. काँ. पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचा संबंध महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडला गेला आहे. तथापि, ताज्या वृत्तानुसार कराड यांच्यावर थेट हत्येचा आरोप लावण्यात आलेला नाही. त्याऐवजी, हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात सहभागी असल्याबद्दल त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (MCOCA) आरोप ठेवण्यात आला आहे. पण आता जे फोटो सापडले आहेत त्या द्वारे जो व्हिडिओ कॉल करून जे हे दृश्य पाहत होते तेच फोन कॉल सीडीआर वर तपासून यात या घटनेचा मूळ सूत्रधार असू शकतो .

देशमुख यांच्या कुटुंबाचा आरोप आहे की कराड यांचा हत्येत सहभाग होता कारण देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध असलेल्या स्थानिक बलाढ्यांकडून खंडणीच्या प्रयत्नांना विरोध केला होता . बीडमधील एका पवनचक्की कंपनीकडून २ कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कराड यांचे नाव एफआयआरमध्ये होते, जे देशमुख यांच्या हत्येच्या परिस्थितीशी जोडलेले आहे. 

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत निराशा व्यक्त केली आणि कठोर कारवाईची मागणी केली.
संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी कराड यांच्यावर मकोका अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत निषेध करण्यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून निषेध केला होता त्यांनी अधिकाऱ्यांवर या प्रकरणाची सखोल चौकशी न केल्याचा आरोप केला आणि आरोपी टोळी कडून येणाऱ्या धमक्यांमुळे स्वतःच्या सुरक्षिततेची भीती व्यक्त केली होती 

 संतोषची मुलगी वैभवी देशमुख हिने कराड आणि इतर फरार संशयितांना अटक करण्यात होणाऱ्या विलंबावर टीका केली. पोलिसांनी कराडला सक्रियपणे पकडण्याऐवजी त्याच्या आत्मसमर्पणाची वाट पाहत असल्याचे दिसून आल्याबद्दल तिने निराशा व्यक्त केली .

कुटुंबाचा असंतोष न्याय मिळण्यास विलंब होत असल्याबद्दलच्या त्यांच्या चिंता आणि तपासात राजकीय हस्तक्षेपाची भीती अधोरेखित करतो. त्या करीता मससाजोग जोग चे ग्रामस्थ यांनी आमरण उपोषण केले पण सरकार च्या हस्तक्षेप नंतर या केसच्या बाजूने सरकारनं सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली व ही केस फास्ट ट्रॅक वर चालवण्याचा आश्वासन देण्यात आले त्यानंतर देशमुख कुटुंबीय व मसाजोग ग्रामस्थ यांनी आमरण उपोषण सोडले.

काल प्रसार मध्यमा मध्ये संतोष देशमुख यांना मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सुप्रिया सुळे यांनी हे फोटो पाहिल्यानंतर अतिशय भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली की ह्या महाराष्ट्रात असले निंदनीय कृत्य घडणे खूप अघोरी पणाचे कृत्य आहे असल्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे अश्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

समाजसुधारक अंजली दमानिया यांनी त्या फोटो बद्द्ल प्रतिक्रिया देताना त्यांचा कंठ दाटून आला त्या ते मन सुन्न करणारे घटना पाहून धाय मोकलून रडल्या त्या म्हणल्या इतक्या क्रूर पणे कोणी एका व्यक्तीला कोण हैवाणी पणे कोणी मारते का या प्रकरणात जे दोषी आहे त त्यांना ठेचून मारले पाहिजे.

याच प्रकरणात छ. संभाजी राजे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या प्रकरणात मी तीन महिन्या अगोदरच ह्या आरोपी व या प्रकरणाचे मूळ सूत्रधार अका व त्याचा अका यांना ही शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणात राजकीय वरदहस्त अभय देणारे धनंजय मुंडे व त्यांचा हस्तक वाल्मीक कराड यांना ही कठोर शिक्षा झाली पाहिजे या सर्व राक्षसी प्रवृत्तींना हाल हाल केले पाहिजे व यातला मूळ सूत्रधार धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे असे अनेक प्रसिद्धी मंत्री, जनता,वृत्त पत्रे माध्यमे यांनी तगदा लावून ही त्यांनी अखेर पर्यंत निर्लज्ज पने राजीनामा दिला नाही अखेर 84 दिवसाच्या कालावधी नंतर संतोष देशमुखचे यांच्या मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यांना दिनांक 4 मार्च रोजी जबरदस्तीने राजीनामा द्यावा लागलाच जनतेचा रोष व तीव्र प्रतिक्रिया मुळे वरून जनतेला सांगतात की मी माझ्या आजार पणामुळे हा राजीनामा दिला आहे. यावर संभाजी राजे म्हणाले इतके होऊनही यांची मग्रुरी गेलेली नाही यांनी जरी आजार पणामुळे राजीनामा दिलेला असला तरी खरी गोष्ट जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया मुळे यांना हे भाग पडले आहे पण या प्रकरणी ह्यांना खूप काही भोगावे लागणार आहे .

वरील प्रकरणात मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील खूप भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली अरे एका लेकरांच्या तोंडावर लघुशंका  करायला लाज वाटत नाही अरे तुम्ही चांगली अवलादी नाही तुम्ही मराठा वंजारी समाजात तेढ निर्माण करता पण या सर्व गोष्टींचा सूत्रधार धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला आहे की तु जे गुन्हेगार पोसले आहेस ती टोळी मी नष्ट करणार.

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ही भावना अनावर झाल्याचे दिसत होते सूत्रानुसार मुंडे, व इतर मंत्री यांना 2 महिने अगोदर हे फोटो पाहूनही ही इतक्या निर्लज्ज पने सरकार मुंडे चा राजीनामा घेत नव्हते म्हणजे ही लोक किती असंवेदनशील लोक आहेत की जे मानव म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत 
अश्याच प्रकारे सुषमा अंधारे, बजरंग सोनवणे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, सुरेश धस, उध्दव ठाकरे, करुणा मुंडे,अश्या अनेक नेत्यांनी व समाजातील अनेक घटकांनी तळमळीचा प्रतिक्रया दिल्या व दोषींना जितकी कठोर शिक्षा देता येईल तितकी कठोर शिक्षा ही सरकारनं लवकरात लवकर देण्यात यावी अशी प्रतिक्रिया सर्व स्तरा तून व्यक्त होत आहे .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या