लोणावळा पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रोपेलिन वायूची वाहतूक करणारा टैंकर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पलटी झाला. ही घटना होऊन २४ तास उलटले अजूनही पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सुरळीत झाली नाही. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि एसटीने प्रवास करणाऱ्या चिंचवड भागातील एसटी स्थानकांत प्रवाशांचेही हाल झाले. पुणे आणि पिंपरी प्रवासी अडकून पडले होते.
खोपोली जवळील आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील गॅस (प्रोपेलिन) वाहतूक करण्याऱ्या टँकरचा अपघात झाला होता. त्यामुळे चोवीस तास वाहतूककोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पुण्यातील वाकडे वाडी, स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड भागातील वल्लभनगर आगार, तळेगाव, लोणावळा, चाकण एसटी स्थानकात बस थांबवून ठेवल्या होत्या. त्यात प्रवासी अडकून पडले होते, तर काहीनी लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यानी प्रवास केला. तसेच काहीही मुळशी मार्गे ताम्हिणी घाट मार्गे मुंबईला जात होते.
जवळपास २४ तास देशातील सर्वांत महत्त्वाचा महामार्ग बंद आहे. हजारो लोक अडकून पडले आहेत. मोठे मोठे महामार्ग बांधताना आपत्कालीन परिस्थिती हाताळायला कोणतीही व्यवस्था नाही याच हे उत्तम उदाहरण आले आहे.
घटनाक्रम...
मंगळवार सायंकाळी ७:३०:
टैंकर पलटी होऊन ज्वलनशील वायू गळती सुरू, मुंबई लेनची वाहतूक ठप्प
वेळ - सायंकाळी ७ ते ७:३०:
संबंधित कंपनीची तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल होत वायू गळती थांबवण्याचा प्रयत्न
रात्री ३:३० : पथकाचे प्रयत्न निष्फळ ठरले
बुधवारी सकाळी ८:३० : दुसरे पथक घटनास्थळी दाखल होत वायू गळती थांबवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू, पोलिसांनी दोन्ही मार्गाची वाहतूक थांबवली
दुपारी १२:३० : वाहतूक कामशेत, पवनानगर मार्गे वळविण्यात आली
दुपारी ५ : २५ किमीपर्यंत उर्से टोलनाक्यापर्यंत रांगा
दुपारी ४:३० : दुसरा मोकळा टैंकर मागवित त्यात गॅस भरला
रात्री ७:३० : क्रेनच्या सहाय्याने टैंकर बाजूला करण्यात आला
रात्री ८:०० : घाटामध्ये एका बाजूने वाहतूक संथगतीने सुरू
रात्री ११:३०: वाहनांच्या रांगा
१३९ एसटी बस फेऱ्या रद्द झाल्याने गैरसोय झाली
अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या, यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे गेल्या २४ तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. हजारो प्रवासी अडकून पडल्याने त्यांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. परिणामी, चिंचवड स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये गर्दी वाढली. त्यामुळे प्रवाशांना बसण्यास जागा मिळत नसल्याचे दिसून आले. डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेससारख्या ट्रेन पूर्णपणे भरून चालल्या आहेत, त्यामुळे रेल्वे सेवेवर अतिरिक्त दबाव आला आहे.
शहरातील हजारो नोकरदार आणि व्यावसायिक दररोज मुंबईला जातात. महामार्गावरील या कोंडीमुळे त्यांनी रेल्वेकडे धाव घेतली, तसेच मुंबईकडे जाणारे एसटीचे प्रवासीही वल्लभनगर आगारात उतरविण्यात आले. त्याही प्रवाशांनी लोकल ट्रेनकडे मोर्चा वळवत लोणावळ्याच्या दिशेने प्रवास केला असल्याचे दिसून आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, नियमित ट्रेन वेळेवर धावत आहेत, पण गर्दीमुळे प्रवाशांची जास्त गैरसोय झाली नाही.
पोलिसांनी सांगितले की, टैंकर उचलण्याचे काम सुरू आहे. शक्यतो महामार्ग टाळावा आणि रेल्वे वापरताना गर्दी लक्षात घ्यावी. या घटनेने शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेच्या कमकुवत पणावर प्रकाश टाकला आहे. या घटनेमुळे मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका
अनेक प्रवासी वाहनांमध्ये ताटकळत बसले होते. या वाहतूककोंडीमुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास झाला. जे लोक कामासाठी लोणावळाकडे जाणारे व लोणावळा पुणे तळेगावकडे जाणारे प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांना या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले
रस्ते मार्गावर झालेल्या कोंडीमुळे अनेक प्रवासी रेल्वेकडे वळाले. प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. यासाठी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी योग्य त्या उपाययोजना करीत आहेत.
अशी प्रतिक्रिया हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे प्रशासन यांनी समाजमाध्यमांना दिली.
प्रवासी वाहतूक वळवली
कामशेत : खंडाळा घाटात गॅस टँकर उलटला व त्यातून वायुगळती झाल्यामुळे खंडाळा घाटातील वाहतूक थांबवली. त्यामुळे पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कामशेत पवनानगर मार्गे ताम्हिणी घाटातून वाहतूक वळविली. त्यामुळे पुणे मार्गे येणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कामशेत येथे दुपारपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. त्यात बेशिस्त वाहनचालकांनी विरुद्ध मार्गे गाड्या घातल्यामुळे कोंडी मध्ये वाढ संध्याकाळपर्यंत होती. झाली. वाहतूककोंडी कोंडी मध्ये अडकलेल्या प्रवाशांना पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्नपदार्थ वाटप केले.
खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील गॅस (प्रोपिलिन) वाहतूक करण्याऱ्या टँकरचा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या एका बाजूला सरकावले आहे. गॅसगळतीचे प्रमाण वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी मार्गिका (लेन) पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन केले होते.
या प्रकरणी तानाजी चिखले,पोलिस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग वाहतूक यांनी माहिती दिली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर
बुधवारी प्रोपिलीन वायू वाहणारा टैंकर उलटला आणि काही मिनिटांत संपूर्ण महामार्गावर भीतीचे सावट पसरले. प्रोपिलीन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्याने हा केवळ वाहतूक अपघात नव्हता, तर संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा इशाराच होता. या अपघातापेक्षा त्या टैंकरमध्ये असणाऱ्या प्रोपिलीन या वायूविषयी जास्त चर्चा झाली. तो प्रोपिलीन वायू नेमका काय आहे, याविषयी माहिती घेऊयात...
प्रोपिलीन हा पेट्रोकेमिकल उद्योगातील अत्यंत महत्त्वाचा, मात्र तितकाच धोकादायक वायू आहे. रंगहीन, तीव्र ज्वलनशील आणि दाबाखाली साठवला जाणारा हा वायू आधुनिक औद्योगिक जगताचा कणा मानला जातो. प्लास्टिकपासून औषधांपर्यंत, रसायनांपासून रस्तेबांधणीपर्यंत प्रोपिलीनचा वापर सर्वत्र आहे. मात्र या उपयुक्ततेसोबतच त्याची जोखीमही तितकीच गंभीर आहे.
प्रोपिलीनचा सर्वाधिक वापर पॉलीप्रॉपलीन प्लास्टिक निर्मितीसाठी होतो.
सुरक्षितता महत्त्वाची....
धोकादायक रसायनांची वाहतूक करताना वाहनांची तांत्रिक स्थिती,
चालकांचे प्रशिक्षण, आपत्कालीन यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाची तत्परता या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. केवळ उद्योगाच्या गरजा भागवणे पुरेसे नाही; तर नागरिकांच्या सुरक्षितते लाही तेवढेच प्राधान्य देणे आवश्यक आहे.
केला जातो. घरगुती साहित्य, पॅकेजिंग, वाहन उद्योग, वैद्यकीय उपकरणे अशा अनेक क्षेत्रांत हे प्लास्टिक वापरले जाते. याशिवाय खते, औषधे, डिटर्जंट्स, रंग, रबर, रंगद्रव्ये तसेच काही ठिकाणी औद्योगिक इंधन म्हणूनही प्रोपिलीनचा वापर होतो. त्यामुळे देशातील रिफायनऱ्या आणि औद्योगिक पट्ट्यांमध्ये या वायूची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र प्रोपिलीन अत्यंत ज्वलनशील असल्याने हाताळणी करताना सुरक्षेची आवश्यकता असते.
प्रवाशाचे प्रचंड हाल
स्वारगेट, पुणे स्टेशनवरून ठाणे, बोरिवली आणि दादरला जाणाऱ्या ई-शिवनेरी बसची संख्या जास्त आहे. शिवाय चाकरमानी दररोज अपडाऊन करतात; परंतु बुधवारी मुंबईकडे लेन बंद पडल्याने सकाळी स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून सुटलेल्या बस या मधेच अडकून पडले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ९ नंतर स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बस रद्द झाल्या.
२५ किमी वाहतूक कोंडी, मुले-रुग्ण रस्त्यावर अडकले
लोणावळा : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटला. टँकरमधून. सुरू असलेल्या वायूगळतीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने तब्बल २४ तासांहून अधिक काळ महामार्ग ठप्प राहिला. परिणामी, द्रुतगती महामार्गासह जुना मुंबई-पुणे महामार्गही प्रभावित होऊन २२ ते २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बुधवारी दुपारी ४:३० वाजता दुसऱ्या टँकरमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील वायू भरण्याचे काम सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत टैंक र बाजूला करून काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आली.
आडोशी बोगद्या पासून गावाच्या हद्दीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. हजारो वाहनचालक, प्रवासी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि काही रुग्ण तासन्तास रस्त्यावर अडकून पडले. कोणी पहाटे ४ वाजल्यापासून तर कोणी रात्री तीन-पाच वाजल्यापासून काँडीत अडकले होते. अनेक प्रवाशांच्या फ्लाइट चुकल्या, तर मुंबईकडे जाणारा भाजीपाला व शेतमाल घेऊन आणाऱ्या वाहनांना खोळंबा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पाणी, अन्न व स्वच्छतागृहाची व्यवस्था अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल झाले. काही ठिकाणी तर चालकांनी रस्त्याच्या कडेला चूल पेटवून केले. मंगळवारी जेवण तयार सायंकाळी सुमारे ५ वाजता हा अपघात झाल्यानंतर वायूगळती रोखण्यासाठी रात्री तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र गळती थांबवण्यात अपयश आल्याने सकाळी पुन्हा नव्या पथकाद्वारे प्रयत्न सुरू करण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवल्याने कॉडी अधिकच वाढली.
गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरू
अपघातग्रस्त टँकरमधून दुसन्या टँकरमध्ये गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या अपघातग्रस्त टँकरमधील प्रोपिलीन गॅस हळूहळू आणि अत्यंत काळजीपूर्वक दुसऱ्या टँकरमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टैंकर हलवणे धोकादायक असल्याने खबरदारी घेतली जात आहे.
खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन
या भीषण कोंडीत अडकलेल्या नागरिकांसाठी लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश रामाधरे यांच्यासह पोलिस कर्मचा-यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अडकलेल्या नागरिकांसाठी पाणी, अल्पोपहार व फळांची व्यवस्था केली. तासन्तास दिलासा मिळाला. अडकलेल्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला
यासोबतच लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांनीही मदतीचा हात पुढे करत पाणी व फळांचे वाटप केले. संकटाच्या क्षणी मदतीला धावून आलेल्या पोलिस बांधवांचे आणि लोणावळेकरांचे कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी मनौमन आभार मानले.
या दरम्यान कोणतीही ठिणगी निर्माण होऊ नये, म्हणून विद्युत पुरवठा, वाहनांची हालचाल व मानवी वर्दळ पूर्णतः नियंत्रित ठेवली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक तत्काळ पूर्णतः बंद करण्यात आली, तर पुण्याकडील वाहतूक मर्यादित स्वरूपात सुरू ठेवण्यात आली.

0 टिप्पण्या