अमेरिका व युरोप मधील 80 लाख जनता डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर..No king's protests.. काय आहे हे आंदोलन





अमेरिका आणि इजराईलने यांनी संघनमतानी इराण वरती हल्ला का केला तशी यामागची कारण अनेक आहेत. पहिलं कारण म्हणजे इराण हा न्यूक्लिअर वेपन्स बनवत होता याचा धोका इजराईलला वाटत होता त्यामुळे अमेरिकेने इराण वरती हल्ला केला. दुसरं कारण म्हणजे इराणमध्ये कच्च्या तेलाचे साठे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. अमेरिकेला त्यावरती होल्ड हवा होता म्हणून अमेरिकेने इराणवरती हल्ला केला. याशिवाय या हल्ल्याच आणखी एक कारण होतं ते म्हणजे अमेरिका आणि इजराईलला इराणमध्ये सत्ताबदल घडवायचा होता इराणमध्ये मागच्या 47 वर्षांपासून इस्लामिक राजवट ही सत्तेतआहे  तिला घालवण्याच ध्येय अमेरिका आणि इजराईलच होतं आणि त्यामुळेच या दोन्ही देशांनी इराणवरती हल्ला केला.




 या युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर खामेनी हे ठार झाले त्यानंतर इराणमध्ये सहजपणे सत्ताबदल घडून येईल अस अमेरिकेला वाटत होतं पण आता एका महिन्यानंतर याच्या अगदी उलट चित्र निर्माण झाले युद्धानंतर इराण मधली इस्लामिक सत्ता जाण्याऐवजी डोनाल्ड ट्रंप यांची अमेरिकेतली सत्ताच धोक्यात आलेली आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या ट्रंप विरोधात प्रचंड मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.



 न्यूयॉर्क, वॉशिंगटन, लॉस एंजेल्स, लंडन, पॅरिस प्रत्येक मोठ्या शहरात लाखो लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. या आंदोलनांना नाव देण्यात आलय नो किंग्स प्रोटेस्ट म्हणून. या आंदोलनामुळे आता ट्रम्प यांची सत्ता धोक्यात आल्याच चित्र निर्माण झालय. पण नक्की घडतंय काय? अमेरिका आणि युरोपमध्ये डोनाल्ड ट्रम्प विरोधात इतकी मोठी आंदोलन का सुरू झाली आहेत. या आंदोलकांची मागणी नेमकी आहे काय? आणि या आंदोलनाचे युद्धावरती काय परिणाम होऊ शकतात? समजून घेऊयात आजच्या या लेखामधून सगळ्यात आधी ट्रंप विरोधात जे आंदोलन सुरू झाली आहेत त्याबद्दल समजून घेऊयात. 


 शनिवारी 28 मार्चला दिवसभर अमेरिकेतल्या जवळपास प्रत्येक प्रमुख शहरात आंदोलन झाली आहेत. राजधानी वॉशिंगटन डीसीच्या मध्यवर्ती भागामध्ये दुपारभर आंदोलक रस्त्यावरती होते. आंदोलकांनी लिंकन मेमोरियलच्या पायऱ्यांवरती गर्दी केलेली. नॅशनल मॉल खचाखच भरून टाकलेला होता. आंदोलक हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, उपाध्यक्ष जेडीवंस आणि ट्रंप प्रशासनातल्या इतर अधिकाऱ्यांचे पोस्टर्स हे घेऊन आलेले होते. या सगळ्यांना पदावरन हटवण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध



टाईम स्क्वेअर वर सुद्धा हीच स्थिती होती. इथल्या मिडटाऊन परिसरात हजारो लोकांनी मोर्चा काढलेला एरवी अत्यंत गजबजलेला टाईम स्क्वेअर शनिवारी ट्रम्प विरोधी आंदोलकांनी भरून गेला होता. अमेरिकेतली सगळ्यात मोठी रॅली ही मिनेसोटा राज्यामध्ये पार पडली. राजधानी सेंट पॉल इथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आणि या रॅलीला तब्बल 50 हज लोक जमल्याची माहिती ही समोर आलेली आहे. शिकागो असेल, लॉस एंजेल्स, डॅलस, फिलालडेल्फिया अमेरिकेतल्या अन्य मोठ्या शहरांमध्ये सुद्धा एकाच वेळी हजारो आंदोलक रस्त्यावरती उतरलेले. 




रायटर्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये तब्बल 3200 ठिकाणी आंदोलन झालेली आहेत. यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. बरं फक्त अमेरिकाच नाही तर युरोपमध्ये सुद्धा अशाच प्रकारची आंदोलन ही पाहायला मिळाली आहेत. लंडनमध्ये हजारो लोक बॅनर्स घेऊन रस्त्यावरती उतरले. पॅरिसमध्ये शेकडो फ्रेंच आणि अमेरिकन हे एकत्र जमले होते. इटलीच्या रोममध्ये हजारो लोकांनी मोर्चा काढला. ट्रंप सोबतच ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचाही विरोध करत होते. या सगळ्या ठिकाणी मिळून तब्बल 80 लाख लोक रस्त्यावरती आले होते असं म्हटलं जातय. 




आता अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा ट्रंप विरोधात इतकी मोठी आंदोलन का झाली आहेत आणि या आंदोलनांना नो किंग्स प्रोटेस्ट असं नाव का देण्यात आलय ते सुद्धा पाहूयात. तर या आंदोलनांच सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे अमेरिका आणि इरान यांच्यात सुरू असलेल युद्ध. अमेरिका आणि इरान यांच्यामध्ये जवळपास मागच्या महिन्याभरापासून युद्ध चालू आहे हे युद्ध आता आणखीन मोठं होईल अशी शक्यता वर्तवली जातेय हे युद्ध थांबवण्यासाठी ट्रंप विरोधात आंदोलन सुरू झाली आहेत आंदोलकांच असं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रंप यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता विनाकारण युद्धाला सुरुवात केली आहे .

या युद्धामुळे हॉर्मोजचा मार्ग हा बंद झालाय ज्यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या त्यामुळे आता अमेरिकेत महागाई वाढायला लागली आहे युद्धामुळे जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती येऊ शकते अस अनेक अर्थतज्ञ सांगतात याचाच फटका साहजिकच अमेरिकन नागरिकांना बसतोय आंदोलकांच असं म्हणणं आहे की ट्रंप हे अमेरिकेवरती हुकुमशहा प्रमाणे राज्य करतायत अमेरिकेची खरी सत्ता तिथल्या जनतेच्या हाती असते आणि अमेरिकन जनतेला हे युद्ध नको आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे म्हणूनच या आंदोलनाला नो किंग्स प्रोटेस्ट असं नाव


देण्यात आलय ते यामुळेच नो किंग्स याचा अर्थ होतो राजशाही नको आंदोलकांचा असा आरोप आहे की डोनाल्ड ट्रम्प ट्रंप हे जेव्हापासून अमेरिकेत सत्तेत आलेत तेव्हापासून त्यांनी सगळी सत्ता ही आपल्या हातात घेतली आहे. ट्रंप यांचा अमेरिकेमध्ये मनमानी असा कारभार चालू आहे. ट्रंप यांनी याआधी ज्या प्रकारे प्रत्येक देशावरती टॅरिफ लावले होते त्यावेळेस सुद्धा त्यांचा मोठा विरोध हा पाहायला मिळाला होता. ट्रंप यांच्या टॅरिफ पॉलिसीमुळे अमेरिकेच आर्थिक नुकसान होत असल्याचं अनेकांच म्हणण आहे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा ट्रंप यांच्या



टॅरिफला रिजेक्ट केलेला आहे ट्रंप यांच निर्वासितांबाबत सुद्धा जे धोरण आहे त्याचा सुद्धा अनेकांनी विरोध केलेला आहे ट्रम्प हे अल्पसंख्याकांना टार्गेट करत असल्याचा आरोप हे केले जातात आणि त्यांच्या या सगळ्या धोरणांविरोधात अमेरिकेत लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत आता हे झालं अमेरिकेचं पण मग युरोपमध्ये हजारो लोक ट्रम्प विरोधात आंदोलन का करतायत तर युके, फ्रान्स, जर्मनी, इटली यांच्यासारखे युरोपियन देश हे नाटोचे मेंबर्स आहेत. या युद्धाचा परिणाम साहजिकच या देशांवरती सुद्धा व्हायला लागलाय. ट्रम्प यांनी युद्धामध्ये नाटो देशांची



मदत मागितलेली आहे. पण युके वगळता कोणताच नाटो देश अमेरिकेला थेटपणे मदत करायला तयार नाहीये. स्पेनन तर ट्रम्प यांना स्पष्टपणे नकार दिलाय. त्यामुळे या देशांचे अमेरिकेसोबतचे संबंध हे बिघडत चाललेले आहेत. मिडल ईस्ट मधल्या युद्धाचा असा इतिहास राहिलेला आहे की त्या भागात जेव्हाही युद्ध होतं तर त्याचा परिणाम अमेरिकेपेक्षा युरोपवरती जास्त प्रमाणात होतो. इराक युद्धानंतर तिथल्या लाखो निर्वासितांनी युरोपमध्येच आश्रय घेतला होता. त्यामुळे युरोपियन देशांवरचा ताण हा साहजिकच वाढलेला. मिडल ईस्ट रिजन हा सततचा युद्ध आणि दहशतवादाने ग्रस्त झालेला आहे



त्यामुळे तिथून निर्वासितांचा लोंढा हा युरोपमध्येच येतो त्या विरोधातच आता युरोपियन नागरिक हे आक्रमक झालेले आहेत या युद्धामध्ये इजराईलन लेबनॉन वरती हल्ले सुरू केलेले आहेत इजराईल लेबनॉनची अवस्था गाजासारखी करेल असं अनेकांच म्हणण आहे त्यामुळे लेबनॉन मधन हजारो निर्वासितांचा लोंढा हा युरोपमध्ये येऊ शकतो कारण त्यांना तुर्कीय मार्गे युरोपचा थेटपणे एक्सेस आहे आणि या सगळ्या कारणांमुळेच युरोपियन देशांमध्ये मध्ये सुद्धा ट्रंप विरोधात आंदोलन ही सुरू झालेली आहेत. आता या सगळ्यामध्ये या आंदोलनांचा युद्धावरती काय परिणाम होऊ शकतो? खरं तर या आधी


सुद्धा अमेरिकन नागरिकांनी अनेक वेळा युद्ध हे नको आहे म्हणून आपल्या सरकार विरोधात आंदोलन केलेली आहेत. व्हिएतनाम युद्धाच्या वेळी सुद्धा हेच घडलेलं. अमेरिकेने 1960 च्या दशकात व्हिएतनाम मध्ये आपल्या फौजा पाठवल्या होत्या पण तिथे अनेक वर्ष लढा देऊन सुद्धा अमेरिकन सैन्याला यश काही येत नव्हतं. यात अमेरिकन सैनिकांचाच मृत्यू होत होता. शेवटी या विरोधामध्ये अमेरिकेत आंदोलन सुरू झाली. तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावरती उतरलेले अन्य देशांमध्ये सुद्धा अमेरिके विरोधात आंदोलन झाली होती. नागरिकांच्या वाढत्या



दबावामुळे शेवटी अमेरिकेला विएतनाम मधन माघार घ्यावी लागली. इराक आणि अफगाणणिस्तानच्या वेळी सुद्धा काहीच असच झालेलं अफगाणणिस्तानात तब्बल 20 वर्ष तालिबान विरुद्ध लढा देऊन सुद्धा अमेरिकेच्या हातात काही आलं नाही. शेवटी अमेरिकेतनच दबाव वाढल्यामुळे 2021 अमेरिकेन अफगाणणिस्तानातन आपलं सैन्य माघारी घेतलेलं. आता इराण विरोधातल्या युद्धामुळे सुद्धा ट्रम्प यांच्यापुढे हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते असं म्हटलं जातय. हे युद्ध आणखीन लांबणार अशी शक्यता सध्या आहे अमेरिका ही इराणमध्ये आपल्या फौजा उतरवण्याच्या तयारीत असल्याचही


म्हटलं जातय आणि असं घडलं तर ट्रम्प यांना आणखी विरोध हा होऊ शकतो कारण इराणमध्ये अमेरिकेची अवस्था विएतनाम सारखी होईल असं अनेकांचं म्हणणं आहे या युद्धामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता सुद्धा कमी व्हायला लागली आहे अमेरिकेत शनिवारची आंदोलन ही फक्त अशा राज्यांमध्ये झाली नाहीयेत जिथे डेमॉक्रॅटिक पार्टीची ताकद आहे तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीची ताकद सुद्धा ज्या ज्या राज्यांमध्ये आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रंप विरोधात आंदोलन झाली आहेत या युद्धामुळे ट्रंप यांच अप्रूव्ल रेटिंग 36 टक्क्यापर्यंत घसरल्याच समोर आलय याचाच अर्थ 


डोनाल्ड ट्रंप यांची अमेरिकेतली लोकप्रियता वेगाने कमी व्हायला लागली आहे पण सध्या तरी या आंदोलनाचा थेट परिणाम ट्रंप यांच्या खुर्चीवरती होणार नाही पण आंदोलन अशीच आणखीन वाढली तर मात्र ट्रंप यांना युद्धाबाबत पुन्हा एकदा विचार करावा लागेल अमेरिकेतन विरोध वाढला तर ट्रंप यांना युद्धातन माघार घ्यावी लागू शकते महत्वाच म्हणजे या सगळ्याचा या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या मिडटम इलेक्शन मध्ये रिपब्लिकन पार्टीला मोठा फटका बसू शकतो त्यामुळेच आता ही आंदोलन आणि त्यावरती युद्ध नेमकं कोणत्या दिशेने जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं


या आंदोलनांमुळे डोनाल्ड ट्रंप इराण विरुद्धचे युद्ध थांबवतील का याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi 365 ला सबस्क्राईब करा
x

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या