![]() |
| Attack on Donald Trump |
व्हाईट हाऊस अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे घर जागतिक महासत्तेचे सत्ता केंद्र व्हाईट हाऊसच्या बातम्या करणाऱ्या भारतीय पत्रकारांच्या भाषेत सांगायचं तर व्हाईट हाऊस बीट कव्र करणाऱ्या पत्रकारांसाठी शनिवारी रात्री एकाल डिनरच आयोजन करण्यात आलं होतं हा डिनर होता वॉशिंगटन हिल्टन हॉटेलमध्ये डिनरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प होत्या उपराष्ट्रपती जे डी व्ॅन्स होते अमेरिकेच्या मंत्रिमंडळातले सदस्य होते आणि अशातच या हॉटेलच्या बॉलरूममध्ये गोळीबार झाला सुरक्षा रक्षकांनी लागलेस
ट्रंप यांना घेरलं सुरक्षित ठिकाणी नेलं त्यानंतर काहीच मिनिटात या हल्लेखोराला पकडण्यात आलं आणि एकच गोष्ट समोर आली डोनाल्ड ट्रंप थोडक्यात बचावल्याची पण नेमकं घडलं काय ट्रंप यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर नेमका होता कोण पाहूयात या बातमी मधून एका बाजूला इरान आणि अमेरिका युद्ध अजूनही संपलेला नाही त्यात चर्चेची दुसरी फेरी रविवारपासून सुरू होण अपेक्षित असताना ट्रंप माघार घेत नसताना त्यांच्या प्रत्येक हालचालीवर सगळ्या जगाच लक्ष आहे. दुसऱ्या बाजूला शनिवारी रात्री अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊस
करस्पॉडंट साठी डिनरच आयोजन करण्यात आलं होतं वॉशिंगटन हिल्टन मध्ये होत असलेल्या कार्यक्रमासाठी ट्रंप सहपत्निक उपस्थित होते जेडी व्ॅन्स होते आणि अमेरिकेच्या मंत्रिमंडळातले अनेक जण होते साहजिकच कार्यक्रमाच्या जागी तगडी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. साधारण 2डी हज आसन क्षमता असलेल्या या हॉलमध्ये सगळे पत्रकार आल्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले. सव्वा च्या सुमारास डोनाल्ड ट्रंप आले आणि सगळ्या पत्रकारांच्या समोर बसले. 8डेठ च्या आसपास डिनरला सुरुवात झालीच होती तेवढ्यात काचा फुटल्यासारखा आवाज झाला. सुरुवातीला पत्रकारांना काचेचा ट्रे किंवा
ग्लासेस फुटले असतील असं वाटलं पण त्याच्या पुढच्याच क्षणी गोळीबाराचा आवाज झाला. साधारणपणे पाच ते सात गोळ्या झाडण्यात आल्या आवाज ऐकून पत्रकार एकमेकांच्या मदतीने टेबलाच्या खाली बसले साधारण पाच मिनिट ते तशाच अवस्थेत बसलेले हे सगळं घडत असताना जिथे ट्रंप बसले होते तिथे मात्र बऱ्याच हालचाली सुरू होत्या ट्रंप एका स्टेजवजा जागेत खुर्चीत बसले होते. गोळीबाराचा आवाज आल्यावर गेट डाऊन गेट डाऊन असं म्हणत ट्रम्प मेलेनिया ट्रम्प आणि इतर सगळ्यांच्या भोवती सुरक्षारक्षक धावले आणि त्यांनी ट्रंप आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना कड करत बाहेर
काढलं. सिक्रेट सर्विस एजंट्सने डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांना वॉशिंगटन हिल्टन हॉटेलच्या बाहेर नेलं. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार ट्रम्प यांना हॉटेलच्याच परिसरात असलेल्या सुरक्षित स्थळी नेण्यात आलं होतं. जिथे हा डिनर सुरू होता त्या बॉलरूममध्ये ट्रंप सगळ्या पत्रकारांसमोर भाषण करणार होते पण त्याच ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने सगळा हॉल रिकामा केला. सगळ्या हॉटेलमध्ये नॅशनल गार्ड्सला तैनात करण्यात आलं एखाद्या क्राईम सीन प्रमाणे सगळा एरिया बंदिस्त करण्यात आला. एका बाजूला हे सगळं घडत होतं
आणि दुसऱ्या बाजूला ट्रंप यांच्यासमोर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला सुद्धा पकडण्यात आलं स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनी ट्रुथ सोशलवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर सुरक्षा रक्षकांना चकवत पळताना दिसतोय. पण पुढच्या काहीच मिनिटात या हल्लेखोराला पकडण्यात आलं त्याला जमिनीवर लोळवण्यात आलं आणि हातपाय बांधण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना या हल्लेखोराचा उल्लेख लोन वुल्फ असा केला. त्यांचं म्हणणं होतं की कुठल्या ग्रुपने एकत्र येऊन नाही तर याच हल्लेखोराने एकट्याने हा हल्ला केला. व्हाईट हाऊस मध्ये ट्रम्प
माध्यमांशी बोलले तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की हल्लेखोराचा उद्देश तुम्हाला मारण्याचा होता का? ज्यावर त्यांनी आय गेस म्हणजे मला असं वाटतं असं उत्तर दिलं युद्ध युद्धविरामासाठी सुरू असलेल्या चर्चा आणि ट्रम्प यांची भूमिका या सगळ्या पार्श्वभूमीवर इराणने हा हल्ला घडवून आणला का या प्रश्नावर ट्रम्प यांनी इराणशी संबंध नसल्याचे संकेत दिले त्यांनी या हल्लेखोराचा उल्लेख सीख असा केला पण या हल्लेखोराबद्दल त्यांनी महत्त्वाची माहिती सुद्धा दिली. ट्रंप यांच्या म्हणण्यानुसार या हल्लेखोराकडे अनेक गन्स होत्या एवढंच
नाही तर चाकू सुद्धा होते. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला सुरक्षा रक्षकांनी अडवलं पण त्याने त्याच्याजवळच्या पावरफुल गनने एका सिक्रेट सर्विस एजंटवर गोळीबार केला पण बुलेटप्रूफ वेस्टने आपलं काम केलं त्यामुळे हा सिक्रेट सर्विस एजंट बचावला. ट्रंप यांनी जिथे कार्यक्रम झाला त्या जागेला असुरक्षित घोषित केलं आणि वॉर रूम अपग्रेड ची गरज असल्याचं कुणीही याआधी बघितली नसेल अशी सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज असल्याचही सांगितलं पण डोनाल्ड ट्रंप यांच्यासमोर गोळीबार करणारा ट्रंप ज्याच्या टार्गेटवर होते असा दावा करण्यात
येतोय तो हल्लेखोर आहे कोण तर स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनीच त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडलेला फोटो शेअर केला तो कॅलिफोर्नियाचा असल्याचं सांगितलं पण त्याच वेळी या हल्लेखोराबद्दल वेगवेगळी माहिती सुद्धा समोर यायला लागली कोल थॉमस अलन अस या शूटरच नाव सांगण्यात येत तो 31 वर्षांचा आहे कॅलिफोर्नियाच्या टोरन्स भागात तो राहिला आहे काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने तो शिक्षक असल्याचाही दावा केलाय काही पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या हल्लेखोराकडे एक हंटिंग रायफल एक शॉर्टगन आणि काही चाकू होते
त्याच्यासोबत कोणी असावं असं प्रथम दर्शनीतरी वाटत नाही पण हा गोळीबार करण्यामागे त्याचा उद्देश काय होता त्याला कोणी चिथावणी दिली होती का हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही अशी माहिती सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कोल थॉमस अलनवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फायर आर्म म्हणजेच अग्निशस्त्राचा वापर करणे आणि धोकादायक शस्त्राने सुरक्षा अधिकाऱ्यावर हल्ला करणे ट्रंप यांच्यासमोर गोळीबार करून झाल्यानंतर पळताना या हल्लेखोराला सुरक्षा अधिकाऱ्यांनी रोखलं पण त्याच्यावर गोळीबार केला नाही त्याला पकडण्यात आलं आणि मेडिकल चेकअप साठी
हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासात ज्या गोष्टी समोर येतील त्यानुसार आणखी गुन्हे दाखल होतील असं सांगण्यात येतय पण हा हल्ला म्हणजे बनाव आहे असा आरोप सुद्धा होतोय कारण हा डिनर अमेरिकेत दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला फक्त राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच नाही तर एफबीआय डायरेक्टर पासून अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित असतात. प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते अशात हल्लेखोर आत घुसलाच कसा? त्याने गोळीबार कसा काय केला? आणि जर त्याचं टार्गेट ट्रम्प होते तर त्याने ट्रम्प यांच्यावर
निशाणा न साधता बाजूला गोळीबार का केला? असे प्रश्न विचारले जात आहेत. ज्यावर हा हल्लेखोर आधीपासूनच वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये थांबला होता. तात्पुरत्या सुरक्षा नसलेल्या खोलीतून तो कार्यक्रमाच्या ठिकाणी आला असं सांगण्यात येतय पण हा हल्लेखोर हॉटेलमध्ये कसा घुसला त्याच्याकडे हत्यारोप कुठून आली आणि त्याने हा सगळा प्रकार का केला याची पुष्टी अजून तरी झालेली नाही या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंगटन डीसी भागातल्या हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप
फर्स्ट लेडी आणि उपाध्यक्ष सुरक्षित आहेत हे समजून दिलासा वाटला त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगले आरोग्य आरोग्यासाठी माझ्या शुभेच्छा लोकशाहीमध्ये हिंसेला कोणतीही जागा नाही आणि तिचा ठामपणे निषेध केला पाहिजे असे ट्वीट केलय पण अमेरिकेत सध्या ट्रंप यांच्या समोर झालेल्या गोळीबाराची आणि त्यातून ते बचावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे सोबतच हा हल्ला होता की बनाव याबद्दलच्या थेरीजने सुद्धा जोर पकडलाय अमेरिकेत घडलेल्या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण
बातम्या वाचण्यासाठी आमच्या unikmarathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#BreakingNews #DonaldTrump #WhiteHouse #USNews #TrumpAttack #WashingtonDC #WorldNews #PoliticalNews #NewsUpdate #InternationalNews #MarathiNews #IndiaNews #TrendingNow #LatestNews #GlobalPolitics

0 टिप्पण्या