७ खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश; काय आहे हे खळबळजनक प्रकरण?
राघव चड्ढा आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार शुक्रवारी 24 एप्रिलच्या दुपारी राघव चड्डा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली त्यांच्या या घोषणेने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप आलाय राघव चड्डा यांनी जाहीर केलं की ते आपच्या सहा खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील चड्डा यांनी त्यांच्यासोबत येणाऱ्या राज्यसभा खासदारांची नाव सुद्धा जाहीर केली आहेत आम आदमी पार्टीचे राज्यसभेत एकूण दहा खासदार आहेत पण आता सात खासदारांनी सात सोडल्यान पक्षाला मोठं खिंडार पडलय आम आदमी पार्टीन दोन एप्रिलला राघव चड्डा यांना
राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवलं होतं तेव्हापासूनच ते आपला सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा झाल्या होत्या पण आता राघव चड्डा हे एकटे नाही तर आपल्यासोबत आणखी सहा खासदार घेऊन गेल्यानं हा आम आदमी पार्टीसाठी प्रचंड मोठा धक्का मानला जातोय या सगळ्यावर आपकडून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे नक्की घडलंय काय राघव चड्ढा यांच्यासोबत कोणकोणत्या खासदारांनी आम आदमी पार्टी सोडली आहे यामागचं कारण काय या घटनेचे च राजकीय परिणाम काय होऊ शकतात सगळा विषय समजून घेऊयात या बातमी मधून
राघव चड्ढा यांनी शुक्रवारी दुपारी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. माझ्यासोबत पक्षाचे दोन तृतीयांश खासदारही भाजपमध्ये सामील होतील अशी घोषणा राघव चड्ढा यांनी केली आहे यावेळी बोलताना राघव चड्ढा म्हणाले मला गेल्या वर्षापासून जाणवत होतं की मी चुकीच्या पक्षात असलेला योग्य व्यक्ती आहे म्हणून मी आज आम आदमी पार्टीपासून दूर जाऊन जनतेच्या अधिक जवळ जातोय. राघव चड्ढा पुढे बोलताना म्हणाले की मी या पक्षाचा संस्थापक सदस्य होतो आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण निष्ठेन आणि
संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांचा समावेश होता. या दोघांनीही आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपन जेव्हा राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून काढलं होतं तेव्हा त्यांच्या जागी अशोक मित्तल यांचीच नियुक्ती झाली होती. पण आता ते सुद्धा आपची साथ सोडून भाजपमध्ये गेलेत इडीन अलीकडेच म्हणजे 15 एप्रिलला अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता त्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली आहे त्यामुळे त्यांच्या या निर्णयाला इडीच्या छाप्याशी
जोडून पाहिलं जातय राघव चड्डा यांच्या सोबत माजी क्रिकेटर हरभजन सिंग विक्रमजीत सिंह सहानी स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता या खासदारांनीही आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय हे सगळे खासदार पंजाब मधून राज्यसभेत गेले आहेत चड्ढा यांनी सांगितलं की पक्षाच्या दोन तृतींश खासदारांनी हा निर्णय घेतलाय त्यामुळे आता पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेण्यात काहीच अर्थ नाही राघव चड्डा यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यावर आम आदमी पार्टी कडून लगेचच प्रतिक्रिया देण्यात आली. पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी
तातडीने पत्रकार परिषद घेऊन चड्ढा यांच्या सोबत भाजप वरती सुद्धा हल्लाबोल केला. संजय सिंग म्हणाले की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच ऑपरेशन लोटस सुरू झालय. पंजाब मधल्या आम आदमी पार्टी सरकारला तोडण्याचा प्रयत्न शहा आणि मोदी यांनी केलाय त्यांनी पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केलाय पक्षान राघव चड्डा यांना काय दिलं नाही पंजाबच्या आज जनतेन त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं तरीही ते शेवटी भाजपच्या गोटात जाऊन बसले विक्रमजीत सहानी अशोक मित्तल स्वाती मालीवाल या सर्वांना आम आदमी पार्टीने तळागाळातून वर आणलं त्यांना संसदेपर्यंत पोहोचवलं तरीही
त्यांनी पंजाबच्या जनतेच्या पाठीत खंजीर कुपसला अशी टीका संजय सिंग यांनी केली आहे या सगळ्यावर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून भाजपन पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला असं म्हटलंय आता येतो तो महत्त्वाचा प्रश्न राघव चड्ढा यांनी हा निर्णय का घेतला त्यांनी आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश का केला तर राघव चड्डा हे 2022 पासून राज्यसभा खासदार आहेत ते राज्यसभेत आपचे उपनेते सुद्धा होते पण 2 एप्रिलला आम आदमी पार्टीने मोठा निर्णय घेत त्यांना उपनेते पदावरून हट वल तसच
त्यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जाऊ नये अशी विनंती राज्यसभा सचिवालयाला पाठवलेल्या पत्रात केली आम आदमी पक्षाच म्हणणं होतं की राघव चड्ढा हे राज्यसभेत पक्षाची बाजू मांडत नाहीत ते भाजपवर टीका करत नाहीत तेव्हापासूनच राघव चड्ढा हे पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आता त्यांनी स्वतःच ही घोषणा करून भाजपमध्ये प्रवेश सुद्धा केलाय पण भाजपच का तर यामागचं कारण आहे पंजाबच्या आगामी निवडणुका पंजाब मध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत राघव चड्डा हे मूळचे पंजाबचेच 2022 मध्ये जेव्हा आपन राज्यात सत्ता मिळवली त्यावेळी राघव चड्डा
यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. पंजाबमध्ये राघव चड्डा हेच आम आदमी पार्टीचा मुख्य चेहरा होते. राज्यातल आपच संपूर्ण कॅम्पेन चड्डा यांनी सांभाळलं होतं तिकीट वाटपामध्ये सुद्धा त्यांची भूमिका महत्त्वाची होती. आपन निवडणूक जिंकल्यानंतर भगवंत मान मुख्यमंत्री बनले पण खरी ताकद राघव चड्डा यांच्याकडेच आहे असं म्हटलं जायचं पण पुढे 2024 पासून राघव चड्डा यांचे आपच्या नेत्यांशी संबंध भिडायला लागले 2024 मध्ये अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली दारू घोटाळ्यात अटक झाली तेव्हापासून राघव चड्डा केजरीवाल यांच्यापासून दूर होत गेल्याचं सांगितलं
जातं पण राघव चड्डा हे अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत त्यांना पंजाब मध्ये मोठा रोल हवाय त्यांचा पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर डोळा असल्याचही अनेकांकडून सांगितलं जातं पण यासाठी त्यांना आम आदमी पार्टीत अनेक स्पर्धक आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांची पंजाबमध्ये चांगलीच पकड आहे. त्यामुळं त्यांच्या जागी पक्ष राघव चड्ढा यांना संधी देईल हे अवघड होतं शिवाय गेल्या वर्षी दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाला होता. त्यान सत्ता समीकरण पूर्णपणे बदलली. दिल्लीतल्या पराभवामुळे केजरीवाल
तिथल्या राजकारणातून बाहेर फेकले गेले. आता फक्त पंजाब हे एकमेव राज्य उरलय जिथे आम आदमी पार्टीची ताकद आहे त्यामुळे आता दिल्लीतल मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर केजरीवाल हे पंजाबमध्ये स्वतःला आपचा चेहरा म्हणून पुढे आणू शकतात असं म्हटलं जातय यामुळे साहजिकच राघव चड्ढा यांना पंजाबमध्ये संधी मिळाली नसती केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या पराभवामुळे राघव चड्ढा यांच्या पंजाब मधल्या महत्त्वाकांक्षेला ब्रेक लागला आता इथेच एंट्री होते ती भाजपची खरं तर पंजाब हे उत्तर भारतातल असं एकमेव राज्य आहे जिथे भाजप ला अजूनही आपले पायर होता आलेले
नाहीत भाजप इथे अनेक वर्ष शिरोमणी अकाली दलासोबत युती करून राहिला या युतीची पंजाब मध्ये सत्ताही राहिली पण भाजप युतीत नेहमीच छोटा भाऊ होता आता अकाली दलान भाजपची साथ सोडली आहे तो पक्ष पंजाब मध्ये स्वबळावर लढतोय इकडे भाजपमध्ये असा कोणताही मोठा नेता नाहीये जो राज्यात काँग्रेस आम आदमी पार्टी आणि अकाली दल या तीन पक्षांना टक्कर देईल पण राघव चड्ढा भाजपची ही उणीव नक्कीच भरून काढू शकतात राघव चड्ढा यांना पंजाबमध्ये राजकीय स्पेस हवी आहे. आम आदमी पार्टीमध्ये ती मिळेल अशी शक्यता नाहीये. भाजपमध्ये मात्र त्यांना ही स्पेस नक्कीच मिळू शकते. इकडे
भाजपलाही पंजाबमध्ये मोठ्या चेहऱ्याची आवश्यकता होती. पंजाबमध्ये जर ताकद वाढवायची असेल तर भाजपला राघव चड्ढा यांच्यासारख्याच नेत्याची गरज होती. त्यामुळेच राघव चड्डा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं जातय. आता पंजाबच्या निवडणुकी आधी भाजपकडून राघव चड्ढा यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं जाईल अशी ही शक्यता वर्तवली जाते थोडक्यात काय तर राघव चड्ढा यांनी भाजप प्रवेश करून आपलं भविष्यातलं राजकारण सेट करण्याचा प्रयत्न केलाय चड्ढा यांना जे हवं होतं ते त्यांना भाजपमध्ये मिळू शकतं आणि भाजपला जे हवय ते चड्ढा
त्यांना मिळवून देऊ शकतात अशाप्रकारे राघव चड्ढा यांनी मोठी राजकीय संधी साधल्याचं बोललं जातय तुम्हाला काय वाटतं राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी सोडून भाजप मध्ये प्रवेश का केला असावा याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
0 टिप्पण्या