भारतात लवकरच पॉलिमर currency येणार? RBI लवकरच प्लास्टिकच्या नोटा येणार आहे का? नोट बंदी पुन्हा होणार का?


भारतात लवकरच प्लास्टिक नोटा येणार आहे 
नोटबंदी 2. 0 होणार भारतातल्या कागदी नोटा जाऊन त्या जागी प्लास्टिकच्या नोटा येणार गेल्या काही दिवसांपासून या बातम्या मीडिया आणि सोशल मीडियात येत आहेत भारताची मध्यवर्ती बँक आरबीआयच्या मागच्या दोन्ही बोर्ड मीटिंग मध्ये प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याबद्दल चर्चा झाल्याचही सांगण्यात आलं कागदी नोटा छापण्यासाठी खर्चासोबतच खराब झालेल्या नोटा बाद करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात वाढलय त्यामुळे कमीत कमी खर्चात होणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या प्लास्टिक नोटा चलनात आणण्यासाठी साठी आरबीआय पॉलिमर करन्सी



प्लॅन अमलात आणण्याचा विचार करत असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात येते आता शुक्रवारी आरबीआय च गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना सुद्धा याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनीही सूचक उत्तर दिलं त्यामुळे देशात 2016 नंतर पुन्हा एकदा नोटबंदी होणार का अशा चर्चांना उदाहरण आलय प्लास्टिक नोटा चलनात येण्याच्या चर्चा आणि त्यामागची नेमकी कारणं काय याबाबत रिझर्वह बँकेच्या गव्हर्नरनी काय सांगितलंय आणि देशात खरच नोटबंदी 2.ओ होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या  बातमी मधून 


सगळ्यात आधी प्लास्टिक नोटांबाबत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा काय म्हणाले ते बघूयात गेल्या महिन्यात पटना आणि मुंबई इथं आरबीआयच्या दोन बोर्ड मीटिंग झाल्या या दोन्ही मीटिंग मध्ये प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं नोटांची प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी आणि प्लास्टिकच्या नोटा कागदी नोटांच्या तुलनेत दीर्घकाळ टिकत असल्यानं आरबीआय प्लास्टिकच्या नोटा चलनात आणायचा विचार करत असल्याचं माध्यमांकडून सांगण्यात येत होतं. याचबाबत शुक्रवारी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी महत्त्वाचं विधान केलं.



मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मीटिंग नंतर माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी मल्होत्रा यांना प्लास्टिक नोटांबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा पॉलीमर नोटांचा प्रस्ताव रिझर्वह बँकेच्या विचाराधीन आहे त्यामुळे ज्या बातम्या येता आहेत त्यात तथ्य आहे पण अजूनपर्यंत त्याबाबत निर्णय झालेला नाही. पॉलीमर नोटांचे फायदे आणि तोटे याचा अभ्यास आम्ही करत आहोत. जेव्हा याबाबतचा अंतिम निर्णय होईल तेव्हा त्याबद्दल सांगितल जाईल अस आरबीआय च गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं याचाच अर्थ प्लास्टिक नोटांबाबत माध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चा या अफवा



नसून सरकारची मध्यवर्ती बँक त्यावर विचार करत असल्याचं यावरून स्पष्ट होतं आता कागदी नोटांच्या जागी पॉलीमर किंवा प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा विचार आरबीआय का करतय त्याची माहिती घेऊयात. बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार गेल्या काही वर्षात कागदी चलणी नोटा छापण्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर वाढलाय. 2016 ला झालेल्या नोटबंदीच्या घोषणेनंतर 2017 मध्ये हा खर्च 7965 कोटी रुपये होता. त्यानंतर हा खर्च 4000 ते 5 ह000 कोटींच्या दरम्यान आला असला तरी 2024-25 या आर्थिक वर्षात तो एकदम 6373 कोटी रुपयांवर पोहोचला. 2025-26 या आर्थिक



वर्षात कागदी नोटा छापण्याचा खर्च पुन्हा एकदा 4875 कोटीपर्यंत कमी झाला असला तरी गेल्या काही वर्षात नोटांच्या छपाईचा खर्च जास्त असल्याचं दिसून येतय. यासोबतच दुसऱ्या बाजूला खराब झालेल्या नोटा चलनातून बाद होण्याच प्रमाण सुद्धा सातत्याने वाढताना दिसतय. 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण बा00 कोटी खराब नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक 500 च्या तब्बल 598 कोटी 30 लाख नोटा तर त्या खालोखाल 100 च्या 581 कोटी 10 लाख नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या आता एकीकड खराब नोटा चलनातून काढून टाकण्याचा दर वाढलेला असताना त्याची मागणी


कमी होते का तर तसही नाही चलनातील रोख रकमेच एकूण प्रमाणही वाढतच आहे 15 मे पर्यंत चलनातील रोख कॅशन 42 कोटी 86 लाख रुपयांचा उच्चांक काढलाय 11.5 5 टक्के ही देशातील सर्वाधिक वाढ असल्याचं सांगितलं जातय म्हणजेच देशात डिजिटल पेमेंटच प्रमाण हे वाढत असलं तरी रोक कॅश ची मागणी कमी होत नाहीये एकीकडे वाढती मागणी चलनातून बाद होणाऱ्या नोटांचा वाढलेला आकडा यामुळे देशातला कॅश फ्लो मेंटेन ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोटा छापण भाग आहे पण कागदी नोटांपेक्षा पॉलीमर किंवा प्लास्टिकच्या नोटा छापण्यासाठी सुरुवातीला येणारा खर्च हा तुलनेने जास्त


आहे पण यापेक्षा पॉलीमर नोटांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्यांचा टिकाऊपणा प्लास्टिकच्या नोटा धूळ बाष्प यामुळे खराब होत नाही तसच त्या कागदी नोटांप्रमाणे जुन्या झाल्यावर फाटत सुद्धा नाहीत प्लास्टिकच्या नोटा या कागदी नोटांपेक्षा तीन ते चार पट जास्त टिकाऊ आहे प्लास्टिकच्या नोटा वॉटरपूफ असल्यामुळे पाणी किंवा घामामुळे त्या खराब होत नाहीत त्यामुळे अशा नोटा जर चलनात आल्या तर त्या लवकर खराब होणार नाहीत यामुळेच आरबीआयचा वेळोवेळी खराब नोटा बदलण्यासाठी होणारा खर्च वाचेल यासोबतच बनावट नोटांच्या धंद्याला सुद्धा पॉलिमर नोटांमुळे आळा बसू



शकतो या नोटांमध्ये ट्रान्सपरंट विंडोज मायक्रो ऑप्टिक होलोग्राम आणि स्पेशल सिक्युरिटी इंक वापरली जाते या सगळ्या सेफ्टी फिचर्स मुळे खोट्या प्लास्टिक नोटा बनवणं हे जास्त किचकट असतं जरी पॉलीमर नोटांच्या निर्मितीचा सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी त्या कागदी नोटांपेक्षा जास्त टिकाऊ असल्याने काही वर्षांनी त्या बदलण्याचा खर्च कमी होऊ शकतो. जगभरात ज्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी पॉलिमर नोटांचा स्वीकार केलाय त्यांच्यासाठी नोटा पुन्हा छापण्याच प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याच दिसून येतं. जगातील तब्बल 60


देशांमध्ये पॉलिमर नोटा वापरल्या जाता आहेत. 1988 मध्ये ऑस्ट्रेलियान सगळ्यात आधी प्लास्टिक नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, रोमानिया आणि कॅनडा या देशांमध्ये सुद्धा पॉलीमर नोटांचा वापर होतोय. त्यामुळेच सध्या भारताची मध्यवर्ती बँक आरबीआय सुद्धा प्लास्टिकच्या नोटा तयार करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं जातय पण असं झालं तर नोटबंदी 2.0ओ होणार का असा सगळ्यांना प्रश्न पडलाय त्याचबद्दल आता जाणून घेऊयात तसं पाहायला गेलं तर भारतात पॉलीमर नोटा आणण्याचा प्रयत्न हा काही पहिल्यांदाच होत नाहीये



2012 मध्ये तत्कालीन मनमोहन सिंग सरकारन पहिल्यांदा पॉलिमर नोटा आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती त्यानुसार कोची मैसूर जयपूर भुवनेश्वर आणि शिमला अशा विविध भौगोलिक आणि हवामान विषयक परिस्थिती असलेल्या निवडक पाच शहरांमध्ये द रुपयांच्या 100 कोटी पॉलीमर चलनी नोटांच्या प्रत्यक्ष चाचणीला मंजूर फ्री देण्यात आली होती. पण या नोटा हाताळणं आणि त्यांच्यावर प्रक्रिया करणं अशा तांत्रिक आव्हानांमुळे हा पायलट प्रोजेक्ट स्थगित करण्यात आला होता. एटीएम मशीनमध्ये या नोटा ओळखण्यासाठी कोणतीही सिस्टम त्यावेळी नव्हती. त्यानंतर गेल्या 10 ते 12 वर्षात


अनेकदा आरबीआयच्या वेगवेगळ्या गव्हर्नर्सने पॉलीमर नोटा लवकरच चलनात येणार असल्याचं सांगितलं होतं पण ट्रायल किंवा प्रायोगिक तत्वावरच हा प्रोजेक्ट मर्यादित राहिला. त्यामुळे लोकांच्या हातात प्लास्टिकच्या नोटा आजवर कधीच आल्या नाहीत पण बिझनेस स्टॅडर्डन या आधी दिलेल्या बातमीनुसार आता प्लास्टिक नोटांसाठीच्या तांत्रिक मर्यादा मोठ्या प्रमाणात दूर झाल्यात यामध्ये एटीएम द्वारे पॉलीमर आधारित नोटा ओळखण्याची सिस्टम अपडेट झाल्याचं स्पष्ट करण्यात आलय त्यामुळे आता लवकरच प्लास्टिकच्या नोटा चलनात येतील असं सांगितलं जातय पण नोटबंदी


प्रमाणे जुन्या नोटा एका रात्री कागज के तुकडे के समान होणार नाहीत म्हणजेच एका फटक्यात जुन्या नोटा चलनातून बाद होणार नाही आधी आरबीआय कडून एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाईल द आणि 20 रुपयांच्या नोटांचा वापर जास्त होत असून द रुपयांच्या एका नोटेच लाईफ हे सहा महिन्यांपेक्षा जास्त नसतं त्यामुळे जर प्लास्टिकच्या नोटा आणायच्या झाल्याच तर सुरुवातीला द आणि 20 रुपयांच्या पॉलीमर नोटा चलनात आणल्या जातील आणि त्यानंतर या नोटांचा प्रयोग यशस्वी झाल्यावर टप्प्याटप्प्याने जास्त रकमेच्या प्लास्टिक नोटा चलनात आणल्या जातील असं सांगितलं जातय या नोटा


काहीशा गुळगुळीत असल्यामुळे त्याची सवय नसल्यामुळे त्या नेहमीच्या वापरात हातून निसटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळेच कागदी नोटांच्या जागी प्लास्टिकच्या नोटा आणणं हे पूर्णपणे पायलट प्रोजेक्टचे निष्कर्ष अंबल बजावणीची व्यवहारता आणि लोकांचा प्रतिसाद यावर अवलंबून असेल असंही सांगण्यात येतय या सगळ्याचा विचार केला तर प्लास्टिक नोटांची कल्पना गेल्या काही वर्षांपासून फक्त चर्चेत असून भारतात ती प्रत्यक्षात अमलात आलेली नाही हे स्पष्ट होतं पण आता केंद्र सरकार आणि आरबीआय करून जरी या नोटा चलनात आणण्याचा प्लन सुरू


असला तरी तो टप्प्याटप्प्यान आणि लोकांच्या सोयीन करण्यात येईल असंच सांगितलं जातय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं प्लास्टिकच्या नोटा खरच भारतात येतील का आणि आल्याच तर त्याचा किती फायदा होईल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या