अब नही आऊंगा दोस्त अब नही आऊंगा हातात आणि पाठीवर बॅग घेतलेला तरुण रडवेला चेहरा करून हे बोलतो आणि रेल्वेच्या दिशेने धावत सुटतो ही अवस्था फक्त त्या एकट्याची नव्हती तर तब्बल 23 हज लोकांची होती रखरखीत उन्हात डोक्यावर बॅगा घेऊन हे लोक बाराबारा तास उभे होते चेंगरा चेंगरीची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठी चार्जही करावा लागला त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ही सगळी दृश्य आहेत सुरतच्या उन्हा रेल्वे स्टेशनवरची उत्तर प्रदेश बिहार आणि मध्यप्रदेशात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी या मजूरांनी रविवारी सकाळपासून स्टेशनवर गर्दी केली.
कोविड काळात आपापल्या घरी जाण्यासाठी जसे लोक झुंडीच्या झुंडी करून बाहेर आले होते त्याचीच आठवण करून देणारा हा प्रकार होता. पण हजारोंच्या संख्येने हे सगळे लोक स्टेशनवर का आले? त्यांच्यावर अचानक आपल्या मूळगावी जायची वेळ का आली? तर त्याचं कारण आहे सुरत मधली सध्याची परिस्थिती जगणं महाग झाल्यानं आणि हाताला कान नसल्यानं मजुरांनी आपल्या घरची वाट धरल्याचं सांगितलं जातय. सुरतमध्ये असं घडतय काय एवढ्या मोठ्या प्रमाणात हे स्थलांतरित मजूर बेरोजगार कसे झाले त्यांच्यावर ही वेळ का आली जाणून घेऊया
सगळ्यात आधी उधना रेल्वे स्टेशनवर नक्की घडलं काय ते बघूयात रविवार 19 एप्रिलच्या सकाळपासून सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर लोक रेल्वेची वाट बघत थांबले होते. या सगळ्यांना उत्तर भारतात आपल्या मूळ गावी जायचं होतं पण तिथे जाणाऱ्या रेल्वे कमी असल्यानं तिथे लोकांची मोठी गर्दी झाली. या सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या घरी जायचंच होतं बघता बघता उन्हा रेल्वे स्टेशनवर 23 हजारापेक्षा जास्त लोकांचा जमाव जमला भर उन्हात डोक्यावर बॅगा आणि गोण्या घेऊन हे लोक उभे होते.
या उत्तर भारतीय मजुरांसोबत महिला आणि लहान लहान मुलं सुद्धा होती. ही गर्दी इतकी वाढली की स्टेशनवर थांबण्यासाठी जागा सुद्धा उरली नाही तरीही या लोकांनी स्टेशनच्या बाहेर तीन किलोमीटर पर्यंत रांगा लावल्या जो तो स्टेशनमध्ये शिरण्यासाठी प्रयत्न करत होता त्यामुळे चेहरा चेंगरी सारखी परिस्थिती सुद्धा तयार झाली स्त्रिया आणि लहान मुलं यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. गर्दीच्या प्रचंड रेट्यामुळे काही प्रवाशांना गुदमरल्यासारखं झालं तर वाढत्या तापमानामुळे काही जणांना डीहायड्रेशन सारखी लक्षण दिसून आली परिस्थिती
हाताबाहेर जाऊन मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी जमावाला आढवण्याचे प्रयत्न केले स्टेशनच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात आली पण तरीही काहीनी ती तोडून टाकत त्यावरून उड्या मारत आत शिरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार सुद्धा करावा लागला. प्रशासनाकडून सगळ्यांना शांत राहण्यासाठी आवाहन करण्यात येत होतं पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं एखादी ट्रेन आली की त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात होते यामुळे सगळीकडेच एक तणावाचं वातावरण तयार झालं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रवाशांना रांगेन आत सोडायला
सुरुवात केली. गर्दी लक्षात घेता ज्यादा ट्रेन सुद्धा सोडण्यात आला. नंतर परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अजूनही स्टेशनवर मजुरांच्या रांगा दिसतायत. पण हे सगळं अचानक झालं कसं कामधंद्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या या उत्तर भारतीय मजूरांवर ही वेळ कशामुळे आली त्याची कारणं समजून घेऊयात. इराण अमेरिका इजराईल युद्धाच्या झळा भारतालाही सोसाव्या लागला. देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत राहावा म्हणून सरकारन कमर्शियल गॅसचा पुरवठा कमी केला. कमर्शियल गॅसची किंमत 200 रुपयांनी वाढवली. यामुळे देशभरात अनेक ठिकाणी
हॉटेल्स आणि इतर उद्योग ठप्प झाल्याचं आपण पाहिलं होतं. याचा थेट परिणाम देशातल्या फॅब्रिकेशन, ऑटोमोबाईल्स, काच आणि सिरॅमिक निर्मिती अशा उद्योगांवर झाला ज्यात प्रामुख्याने कापड उद्योगाचा समावेश होता. कपड्यांना रंग देण्यासाठी मोठ्या भांड्यांमध्ये रंग उकळवला जातो नंतर कापडावर डिझाईन छापल्यानंतर तो वाळवून स्ट्रेट केला जातो आणि पुन्हा ड्राय करण्यासाठी गरम केला जातो. कापड बनवण्याच्या या सगळ्या प्रक्रियेत गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. एकट्या सुरत मधल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये दररोज 8 ते 10 लाख kg एलपीजी गॅस लागतो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागत असणारा हा गॅस ₹200ंनी महाग झाल्यानं पांडेसरा सचिन जीआयडीसी उधना आणि कडोदरा या औद्योगिक क्षेत्रातल्या कापड गिरण्यांना हा खर्च परवडत नव्हता. म्हणून गिरणी मालकांनी एकत्र येत 28 मार्चला उत्पादन 50 टक्क्यानी घटवण्याचा निर्णय घेतला आणि कामाचे तास 12 वरून कमी केले साहजिकच या सगळ्याचा परिणाम थेट कामगारांच्या उत्पन्नावर झाला कापडांवर छपाई रंगकाम विणकाम जरी काम नक्षीकाम पॅकेजिंग अशी काम करणारे अनेक मजूर बेरोजगार झाले सिलेंडरच्या तुटवड्यामुळे टेम्पो चालवणारे हिरे उद्योगात पॉलिशिंग कटिंग सॉर्टिंग
करणाऱ्या कामगारांना जेवण बनवण्यासाठी गॅस मिळणं अवघड झालं अनेक छोटे उद्योग बंद पडले. ज्यामुळे कित्येक महिलांच काम गेलं शिवाय बाहेरून आलेल्या मजूरांना घरगुती व्यापारासाठी गॅस सिलेंडर मिळणं अवघड झालं. जे लोक शहरामध्ये किंवा कंपन्यांच्या बाहेर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स आणि मेस चालवायचे त्यांना कमर्शियल सिलेंडर मिळणं अवघड झालं. म्हणून त्यांचाही धंदा मार्चच्या शेवटी शेवटी बंद पडला. एकीकडे हातात पैसा नसल्यान आणि दुसरीकडे जेवणापासून सगळ्याच गोष्टी महाग झाल्यान या मजुरांना सुरत मध्ये राहणं अवघड व्हायला लागलं.
त्यामुळेच बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातून आलेल्या मजुरांना आपल्या गावी जाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय दिसत नव्हता. त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मजुरांनी कुटुंबाला सोबत घेऊन आपलं गाव गाठायला सुरुवात केली. हळूहळू ही संख्या वाढत गेली ज्याचा 19 एप्रिलला उद्रेक झाला. बायका पोरांना उन्हातानात उभं करून हा मजूर वर्ग रेल्वेत जागा मिळवण्यासाठी आपला नंबर येण्याची वाट बघतोय. स्थलांतरित मजुरांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप सुद्धा केले जात आहेत. हिरे आणि वस्त्रोद्योगांसाठी ओळखलं जाणार सुरत
शहर स्थलांतरित कामगारांचा शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. एका अंदाजानुसार या ठिकाणी 42 लाखांहून अधिक स्थलांतरित कामगार राहतात. शहराच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा 58% इतका आहे. पण या मजूरांना अनेक वर्षांपासून योग्यत्या सोयी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. रेल्वे मंत्रालय ज्या गतीने वंदे भारत सारख्या प्रीमियम गाड्यांची संख्या वाढवतय त्या गतीने सामान्य तिकीट असलेल्या गाड्यांमधील सुविधा वाढवल्या जात नसल्याचाही आरोप केला जातो पण हे सगळं फक्त सुरतच्या बाबतीतच घडतय का तर नाही आखाती युद्धामुळे झालेल्या गॅसच्या
तुटवड्याचा परिणाम देशभरातल्या अनेक राज्यांवर झालाय मुंबई पुणे दिल्ली तामिळनाडू सह तिरुवनंतपुरम कोयंबतूर हरियाणाच गुडगाव मानेसर पंजाबच लुधियाना अशा अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणा माणावर कापड गिरण्या चालतात तिथेही काम करणारे कामगार हे मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयच आहेत त्यांनीही आपल्या घरची वाट धरली आहे येण्या जाण्याचा परवडणारा मार्ग म्हणून हे कामगार रेल्वेनच प्रवास करतायत काही दिवसांपूर्वी कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या एका चाकरमाण्यान रेल्वेतली गर्दी दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता त्या व्हिडिओमध्ये रिझर्वेशनच्या डब्यात गर्दी
करणारे लोक तामिळनाडू मधून येणारे उत्तर भारतीय असल्याचं दाखवण्यात आलं होतं मुंबई ठाणे डोंबिवली भिवंडी पुणे भोसरी पिंपरी चिंचवड, चाकण, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक शहरांमधून हे स्थलांतरित मजूर आपापल्या घरी जाता आहेत. एलपीजीच्या टंचाईमुळे महाराष्ट्रात बाहेरून आलेल्यांना स्वयंपाकासाठी गॅस मिळणं कठीण झालय. शिवाय मेसच जेवण 30 ते 40 रुपयांनी महागल्यान घरी गेलो नाही तर जगणं कठीण आहे अशी या सगळ्यांची भावना आहे. फक्त उत्तर भारतीयच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नोकरी आणि शिक्षणासाठी मोठ्या शहरात आलेल्यांची परिस्थिती सुद्धा काहीशी अशीच
आहे. संभाजीनगरच्या वाळूजमध्ये सिलेंडर मिळत नसल्यानं रांगेत थांबलेल्या एका व्यक्तीन थेट स्वतःच डोकच फोडून घेतलं होतं. अकोल्यात सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाचा मृत्यू झाला होता. उशिरा दिलेल्या तारखेलाही सिलेंडर मिळत नसल्यान भंडारा धुळे आणि जळगाव मध्ये लोकांनी रास्ता रोको आंदोलन केली. मुंबई पुणे संभाजीनगर अशा शहरांमध्ये शिक्षणासाठी आलेली मुलं मेसचा खर्च वाढत असल्यान गावची वाट धरतायत. आता स्थानिक लोकांनाच गॅस मिळत नसल्यानं छोटे उद्योग करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आलेले लोक मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी जाता आहेत.
भारतात पुढील 45 दिवस पुरेल एवढ्या एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध असल्याचं आणि उत्पादन वाढवल्याचं सरकार नेहमी सांगतय. पण जमिनीवरची परिस्थिती फार वेगळी असल्याचं लोक सांगतायत दिवसेंदिवस लोकांमध्ये असुरक्षितता वाढते त्यामुळे हे सगळं कधी थांबणार मध्यपूर्वेतल्या युद्धाच्या झळा भारताला अजून किती सोसाव्या लागणार हाच प्रश्न सध्या सगळ्यांना पडलाय तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
0 टिप्पण्या