राघव चढ्ढा यांना पदावरून तडकाफडकी का काढण्यात आले ? केजरीवाल यांनी हा निर्णय अचानक घेतल्याने चर्चेला उधाण .. राघव चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा

 


खामोश करवाया गया हु हारा नही हो मेरी खामोशी को मेरी हार मत समझना ! आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांचे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर सगळीकडे राघव चड्डा यांच्याच नावाची चर्चा आहे गुरुवारी दोन एप्रिलला आम आदमी पार्टीने एक असा निर्णय घेतला ज्यानंतर हा सगळा गदारोळ सुरू झाला राघव चड्डा हे राज्यसभेत आम आदमी पार्टीचे उपनेते पण पार्टीने अचानक त्यांना या पदावरून हटवण्याचा निर्ण निर्णय घेतला महत्त्वाचं म्हणजे आपन राघव चड्डा यांना सभागृहात बोलण्यावरही बंदी घातली आहे खरं तर राघव चड्डा यांना आम आदमी पार्टीचा चेहरा म्हणलं जात होतं ..


सभागृहात ते जे मुद्दे उपस्थित करत होते त्यामुळे त्यांची तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रियता होती पण अशा लोकप्रिय नेत्याला आम आदमी पार्टीने अचानक पदावरून काढल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय पण आम आदमी पार्टीने हा निर्णय का घेतला राघव चड्डा यांना सभागृहात बोलण्यावर त्यांच्याच पक्षाने बंदी का घातली यामागची कारणं नक्की काय आहेत पडद्यामागे घडलेलं सगळं राजकारण जाणून घेऊया या सगळ्यात आधी काय घडलं ते थोडक्यात सांगतो आम आदमी पार्टीन गुरुवारी राघव चड्डा यांना
राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवलं त्यांच्या जागी पक्षान खासदार अशोक मित्तल यांची नवे उपनेते म्हणून नियुक्ती केली आहे. 
आम आदमी पार्टीन एका लेखी पत्राद्वारे ही माहिती राज्यसभा सचिवालयाला कळवली. राघव चड्डा हे 2022 पासून पंजाब मधून आपचे राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2028 मध्ये संपणार आहे. पण त्याआधीच पक्षाने हा निर्णय घेतला. त्यातच आपन राज्यसभा सचिवालयाला पाठवलेल्या पत्रात राघव चड्डा यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जाऊ नये अशी विनंती केली आहे त्यामुळे वाद आणखी वाढलाय.


 त्यावर राघव चड्डा यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात ते म्हणाले माझा आवाज दाबला गेलाय पण मी हरलेलो नाही मी जनतेचे प्रश्न उपस्थित केले यामुळे आपचं काय नुकसान झालं व्हिडिओच्या शेवटी राघव चड्डा यांनी आम आदमी पार्टीला इशारा दिलाय की ज्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यांना तोंड देण्यासाठी मी सुनामी सारखा परतीन यावेळी राघव चड्डा यांनी पक्षातल्या कोणत्याही नेत्याच नाव घेतलं नाही किंवा पक्ष पक्ष सोडण्याबाबत कोणतही वक्तव्य केलं नाही पण आता त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू झाल्यात पण

नक्की घडलं काय आम आदमी पार्टीन राघव चड्डा यांना उपनेते पदावरून का काढलं ते समजून घेऊ आपन राघव चड्डा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून काढलं यामागचं पहिलं कारण म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा राघव चड्डांची वाढती लोकप्रियता खरं तर आम आदमी पार्टीमध्ये सुरुवातीपासूनच सबकुश केजरीवाल असं चित्र आहे अण्णा हजारे आंदोलनातून पुढे आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी 2012 या पार्टीची स्थापना केली तेव्हापासून पार्टीचा सगळा होल्ड केजरीवाल यांच्याकडेच आहे. केजरीवाल हे दिल्लीसह देशभरात आपचा चेहरा आहेत. मात्र मागच्या


काही महिन्यात हे चित्र काहीस बदलत असल्याचं दिसत होतं गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकी आधी केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक झाली होती. पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मुनीष सिसोदिया यांनाही जेलची हवा खावी लागली यामुळे केजरीवाल आणि सिसोदिया सक्रिय राजकारणातून काहीसे बाहेर फेकले गेले त्यातच दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा दारुण पराभव झाला स्वतः केजरीवाल त्यांची सीट ठरले याचा परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवरही झाला आता केजरीवाल आणि सिसोदिया अशा प्रकारे साईडलाईन झाल्यापासून राघव चड्डा हे आम आदमी

पार्टीचा चेहरा म्हणून पुढे आले होते. मागच्या काही महिन्यांपासून राघव चड्डा हे संसदेत तरुणांचे मध्यम वर्गाचे मुद्दे उपस्थित करत होते. यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत होती. अनेक जण त्यांच्याकडे आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पातळीवरचा चेहरा म्हणून पाहत होते. राघव चड्डा हे दिल्लीचे असले तरी ते मुळचे पंजाबी आहेत. ते पंजाब मधूनच राज्यसभा खासदार आहेत. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. जिथे सध्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आपला पंजाबमध्ये आपली सत्ता कायम ठेवायची आहे. अशावेळी साहजिकच पक्षातून मुख्यमंत्री पदासाठी

राघव चड्डा यांचं नाव पुढे आलं असतं यामुळे आपच्याच अनेक नेत्यांची अडचण झाली असते. अनेकांचं असं म्हणणं आहे की दिल्लीतून सत्ता गेल्यानंतर आता केजरीवाल यांचा पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरती डोळा आहे पण राघव चड्डा यांच्या लोकप्रियतेमुळे केजरीवाल यांना पक्षातूनच आव्हान मिळाला असतं खरं तर एवढ्या वर्षात आम आदमी पार्टीतून असा कोणताही नेता पुढे आला नव्हता जो केजरीवाल यांच्या लोकप्रियतेला चॅलेंज देईल पण राघव चड्डा हे करायला लागले होते यामुळे साहजिकच केजरीवालांची असुरक्षितता वाढली होती यामुळे टीम केजरीवालने वेळीच चड्डा यांचे पंख

छाटल्याचं म्हणलं जातय. आपन राघव चड्डा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून काढलं यामागचं दुसरं कारण म्हणजे राघव चड्डा भाजपच्या विरोधात बोलत नव्हते. खरं तर मागच्या दोन वर्षांमध्ये दिल्लीत भाजप विरुद्ध आम आदमी पार्टी असा मोठा संघर्ष पाहायला मिळाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली दारू घोटाळ्यात अटक झाली. त्यावेळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्याआधी 2023 मध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही याच प्रकरणात अटक झाली होती. ईडी सीबीआय यांच्यासारख्या तपास यंत्रणा जवळपास दोन वर्ष या दोन

नेत्यांच्या मागावर होत्या पण अलीकडेच म्हणजे 27 फेब्रुवारीला या दोघांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली त्यामुळे निवडणुकीच्या आधी भाजपनच हे सगळं ठरवून केल्याचं बोललं गेलं केजरीवाल आणि सिसोदिया यांना अडकवण्यात भाजपचा हात होता असे आरोप अनेक वेळा झाले आहेत तेव्हापासून आपचे नेते भाजपवर अत्यंत आक्रमक झालेत या मुद्द्यावरून स्वतः केजरीवाल यांनी अनेक वेळा थेट भाजपवर आरोप केलेत पण या सगळ्यामध्ये राघव चड्डा कुठेच नव्हते केजरीवाल सिसोदिया यांच्या सोबत एवढं सगळं घडूही राघव चड्डा यांनी एकदाही भाजपवर टीका केली नाही 27 फेब्रुवारीला जेव्हा

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला त्यावर आपच्या अनेक नेत्यांनी मत व्यक्त केली पण सोशल मीडियावर एवढे ऍक्टिव्ह असलेल्या राघव चड्डा यांनी याबाबत एकही पोस्ट केली नाही यानंतर केजरीवाल यांनी जेव्हा पक्षाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घेत भाजपवरती आरोप केले त्यावेळीही राघव चड्डा तिथे उपस्थित नव्हते याआधी 2024 मध्ये जेव्हा केजरीवाल यांना अटक झाली होती त्यावरही राघव चड्डा यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती नंतर त्यांनी असा दावा केला की ते त्यावेळी लंडनमध्ये डोळ्यांच्या उपचारांसाठी गेले होते. संसदेतही आम आदमी

पार्टीची भूमिका भाजप विरोधी राहिली आहे पण राघव चड्डा यांनी कधीच यात पक्षाची साथ दिली नाही विरोधी खासदार अनेक वेळा भाजपच्या विरोधात संसदेतून वॉक आऊट करतात पण राघव चड्डा यांनी कधीही याचं समर्थन केलेलं नाही एकीकडे आप आक्रमकपणे भाजप विरोधात बोलत असताना राघव चड्डा मात्र प्रो भाजप दिसर होते त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावरती ही कारवाई केली आहे अशी चर्चा सुरू आहे याच कारणामुळे आता राघव चड्डा भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असही आता बोललं जातय आपन राघव चड्डा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून काढलं यामागच तिसरं कारण म्हणजे राघव चड्डा हे

राज्यसभेत पक्षाच नाही तर स्वतःच पॉलिटिक्स करत होते हा आरोप खरं तर राघव चड्डा हे राज्यसभेत मोबाईल रिचार्ज विमान तिकिटांचा रिफंड यांसारखे मुद्दे उपस्थित करत होते हे असे मुद्दे आहेत जे ते तरुणाई आणि मध्यम वर्गाला अपील करतात या मुद्द्यांवर सध्या देशातला एकही नेता नेता बोलत नाहीये पण आम आदमी पार्टीला हे अपेक्षित नाहीये आम आदमी पार्टीच म्हणण आहे की राघव चड्डा हे पक्षाने ठरवलेल्या मुद्द्यांवरती बोलण्याऐवजी दुसऱ्याच मुद्द्यांवर बोलत होते याद्वारे ते स्वतःची इमेज बिल्ड करत होते राघव चड्डा यांचा आम आदमी पार्टीला राज्यसभेत काहीही
फायदा होत नव्हता आपचं म्हणण आहे की विरोधक भाजपला पंतप्रधान मोदींना थेट प्रश्न विचारत आहेत पण राघव चड्डा यांनी असा एकही मुद्दा उपस्थित केला नाही ज्यामध्ये ते भाजप किंवा मोदींना प्रश्न विचारत असतील आपचे सौरभ भारद्वाज संजय सिंह अशा अनेक नेत्यांनी राघव चड्डांवरती हाच आरोप केलाय काही नेत्यांच असही म्हणण आहे की राघव चड्डा हे गेल्या काही काळापासून पक्षाच्या कामात इंटरेस्ट घेत नव्हते केजरीवाल सिसोदिया यांसारखे नेते कठीण टप्प्यातून जात असताना राघव चड्डा मात्र परदेश दौऱ्यावर होते त्यांचा बर हा पक्षाच्या कामापेक्षा स्वतःची इमेज तयार

करण्यावरती होता असे आरोप होतायत अमेरिकेमध्ये झुहरान ममदानी यांनी ज्या प्रकारे राजकारण करून न्यूयॉर्कच मेयर पद मिळवलं तोच प्रयोग राघव चड्डा भारतात करत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे ममदानी हे सुद्धा अमेरिकेत तरुणाईचे मध्यमवर्गीयांचे मुद्दे उपस्थित करतात असे मुद्दे आहेत जे कोणत्याही पक्षाशी किंवा विचारसरणीशी संबंधित नाही याद्वारे ममदानी यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली याचा वापर ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या मेयर पदाची निवड निवडणूक जिंकण्यासाठी केला राघव चड्डा सुद्धा अशाच प्रकारचे राजकारण करत असल्याच दिसतय


त्यांच्या राजकारणाची स्टाईल अशी आहे की ते कोणत्याही पक्षाच्या विचारसरणीशी बांधील नाहीत त्यांच्या आम आदमी पार्टीशी नाही यामुळेच आता आम आदमी पार्टीने राघव चड्डा यांच पक्षातलं महत्त्व कमी केल्याचं म्हणलं जातय एकूणच आम आदमी पार्टीन ज्या प्रकारे राघव चड्डा यांचे पंख चाटण्याचं काम केलं त्याची चर्चा सध्या देशभरात होती पक्षातल अनेक नेत्यांनी चड्डा यांच्या राजकारणाच्या स्टाईलवर प्रश्न उपस्थित केलेत याला राघव चड्डा यांनी सुद्धा उत्तर देत मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे पार्टीच काय नुकसान झालं असा प्रश्न

विचारलाय सध्या तरी राघव चड्डा हे आम आदमी पार्टीतच आहेत त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ 2028 पर्यंत असल्यामुळे ते त्याआधी पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत असं सध्या तरी दिसतय मात्र त्यांचा एकूण कल पाहता ते भाजपमध्ये जाऊ शकतात अशा चर्चाही सुरू झाल्यात तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं आम आदमी पार्टीने राघव चड्डा यांच्यावरती कारवाई नेमकी का केली असेल याबाबतची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या