एफ 15 स्ट्राईक ईगल आणि एटे थंडरबोल्ड अमेरिकेची दोन लढाऊ विमान इरानने केलेल्या हल्ल्यामध्ये ही दोन्ही विमान एकाच दिवशी क्रॅश झाली एटे थंडरबोल्ट हे पर्शियन आखाता स्टेट ऑफ हर्म जवळ कोसळलं या विमानात एक पायलट होता ज्यान कुवेतच्या एअरस्पेसची मदत घेऊन आपला जीव वाचवला पण एफ15ई विमान थेट इराणमध्ये जाऊन कोसळलं आणि या विमानात दोन अमेरिकन सैनिक होते. ते दोघं सुद्धा इराणच्या हद्दीत कोसळलेले. आता ही घटना खूप मोठी होती. कारण अमेरिकेच हे लढाव विमान अत्यंत प्रगत मानलं जातं. इराणन फक्त त्या विमानालाच पाडलं नव्हतं
तर सोबतच अमेरिकेचे दोन सैनिक सुद्धा इराणच्या हद्दीत कोसळले होते. आता पुढे काय होणार? हे सैनिक जर इराणला सापडले तर त्यांचं नेमकं इराण काय करणार याची जगभरात चर्चा ही सुरू झाली होती. इराणन सुद्धा त्या सैनिकांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केलेली पण आता अमेरिकेने आपल्या या दोन्ही सैनिकांना इराण मधन सुखरूप बाहेर काढलेले आहे तब्बल 48 तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर अमेरिकेचे हे दोन्ही सैनिक इराण मधन बाहेर आलेले आहेत स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे हे
अमेरिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातल सगळ्यात थरारक आणि जोखमीच ऑपरेशन होतं असं ट्रम्प यांनी म्हटलय पण अमेरिकेचं हे रिस्क ऑपरेशन नक्की कसं पार पडलं अमेरिकेने इरानमध्ये घुसून आपल्या दोन सैनिकांना कसं वाचवलं अमेरिकेच्या आजवरच्या सगळ्यात थरारक रेस्क्यू ऑपरेशनची सगळी स्टोरी सांगणारा आजचा हा लेख सगळ्यात आधी इराणन अमेरिकेचे लढाऊ विमान कसं पाडलं ते पाहूयात तारीख होती 3 एप्रिल अमेरिकेचे 15 हे लढाऊ विमान दक्षिण इराणच्या खुजे प्रांतावरन नेहमीपेक्षा कमी उंचीवर उड्डान करत होतं हे विमा विमान
अमेरिकेच्या हवाई दलाला क्लोज एअर सपोर्ट पुरवण्याचं काम करत होतं. सोबतच ते मोबाईल मिसाईल लॉन्चेसचा शोधही घेत होतं. विमानामध्ये दोन क्रू मेंबर्स होते. एक पायलट आणि दुसरा वेपन सिस्टीम ऑफिसर. हा ऑफिसर कर्नल रँकचा अमेरिकन अधिकारी होता. खरं तर अमेरिकेन काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की त्यांनी इराणच्या संपूर्ण एअरस्पेस वरती आपलं नियंत्रण मिळवलय. पण इराणन अमेरिकेच विमान पाडून हा दावा खोटा असल्याचं सिद्ध केलं. इराणच्या आयआरजीसीन अमेरिकेचे हे लढाव विमान पाडण्यासाठी त्यांच्या शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला. मजीद असे डिफेन्स सिस्टीमच नाव. ही डिफेन्स सिस्टीम पारंपरिक रडार यंत्रणा वापरत नाही तर ती इन्फ्रारेड सेन्सरचा वापर करते त्यामुळे अमेरिकन जेट्स तिला डिटेक्ट करू शकत नाहीत आयआरजीसीन त्यांच्या एडीझरो8 या मिसाईलचा वापर करून अमेरिकेच लढाऊ विमान पाडलं हे एक लहान आणि अत्यंत चपळ अस मिसाईल आहे जे हेलिकॉप्टर्स आणि कमी उंचीवरन उडणाऱ्या लढाऊ विमानांना टार्गेट करू शकतं या मिसाईलन विमानाला हिट केल्यानंतर विमान इराणच्या हद्दीत कोसळलं सोबतच अमेरिकेचे दोन सैनिक सुद्धा इराणमध्ये उतरले आणि त्यानंतर सुरू झालं या दोन सैनिकांचं रेस्क्यू ऑपरेशन. विमान कोसळताच युएस सेंट्रल कमांडन आपली कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू टीम इराणच्या दिशेन रवाना केली. टाईम मॅगझीनच्या रिपोर्टनुसार या टीममध्ये 10 ते 12 मेंबर्स होते ज्यांना एका हेलिकॉप्टर मध्ये पाठवण्यात आलं हे एचएस 60जी पेवॉक हेलिकॉप्टर होतं अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर स्पेशल रेस्क्यू मिशन साठी वापरलं जातं. त्यांच्यासोबत एक इलेक्ट्रॉनिक जॅमिंग विमान आणि जमिनीवरती हल्ला करण्यासाठी वापरल जाणारं हेवी ए10 विमान सुद्धा पाठवण्यात आलं. लढाऊ विमानातले दोन्ही अमेरिकन सैनिक इराणच्या हद्दीत कोसळलेले पण दोघं सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी कोसळले.
त्यांना वाचवण्यासाठी दोन वेगळी ऑपरेशन्स राबवावी लागली आधी विमानाच्या पायलटला रेस्क्यू करण्यात आलं पण हे ऑपरेशन काही सोपं नव्हतं कारण अमेरिकेची टीम खुजे प्रांतामध्ये रेस्क्यू ऑपरेशन साठी आली आहे याची माहिती इराणला मिळाली होती. रेस्क्यू मिशन दरम्यान इराणन अमेरिकेच्या हेलिकॉप्टर वरती तुफान गोळीबारही केला होता. यात काही गोळ्या प्रत्यक्ष हेलिकॉप्टरला लागल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे पण अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा रेस्क्यू टीमन विमानाच्या पायलटला वाचवण्यात यश मिळवलं शुक्रवारी 3 एप्रिलला विमान क्रॅश झाल्यानंतर काही तासांच्या
आतच पायलटची इराण मधन सुटका करण्यात आली आहे पण विमानातला दुसरा क्रू मेंबर अजून सुद्धा इराणच्या हद्दीत अडकूनच होता. आता त्याची सुटका नेमकी कशी करण्यात आली ते देखील पाहूयात. विमानातन खाली पडल्यानंतर हा कर्नल रँकचा अधिकारी जवळपास 48 तास इराणमध्ये लपला होता. हा सैनिक इराणच्या कोहगिलुये आणि बोयर अहमद प्रांतात कोसळला होता. हा इराणचा अत्यंत दुर्गम आणि पर्वतीय असा भाग आहे. अमेरिकन सैनिक इथे कोसळल्याची माहिती मिळताच इराणचे अधिकारी त्याच्या मागावर लागले. त्याला पकडून देण्यासाठी चक्क 66,000 डॉलर च बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे इरानच्या स्थानिक भटक्या जमातीचे लोक सुद्धा रायफली घेऊन त्याचा शोध घेत होते या सैनिकाकडे फक्त त्याची एक सर्विस हँड गन आणि सर्वायव्ल किट होती. इरानच सैन्य आणि स्थानिक लोक त्याचा शोध घेत असताना तो खोल दऱ्यांमध्ये आणि डोंगरांमध्ये लपून राहिला. इकड या सैनिकाला रेस्क्यू करण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडन सीआयए ची मदत घेतली. हा सैनिक जरी इराणमध्ये लपला असला तरी अमेरिकन अधिकारी जीपीएस च्या मदतीने 24 तास त्याला मॉनिटर करत होते. तो नेमका कुठे चाललेला आहे तो कुठे लपतोय याची खडानखडा माहिती अमेरिकन अधिकारी घेत होते
अमेरिकेच एम क्यू ना रिपर ड्रोन त्या भागामध्ये सतत घिरट्या घालत होतं जे या सैनिकाच्या मुव्मेंटची माहिती रेस्क्यू टीमला देत होतं ड्रोनच्या ऑपरेटरला आदेश देण्यात आले होते की या सैनिकाच्या भोवती तीन किलोमीटर च्या रेंजमध्ये कोणतीही व्यक्ती शस्त्र घेऊन आली तर तिच्यावरती हल्ला करण्यात यावा अशाप्रकारे जवळपास दोन दिवस या सैनिकाची सुरक्षा अमेरिकेकडनच करण्यात आली अखेर शनि शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या सैनिकाच्या रेस्क्यू साठी प्रत्यक्ष जमिनीवरती ऑपरेशन राबवण्याची परवानगी दिली. अमेरिकन कमांडो ज्यावेळी तिथे पोहोचले त्यावेळी लँडिंग झोनवर त्यांच्यामध्ये आणि आयआरजीसी मध्ये तुफान चकमक झाल्याची माहिती आहे. आयआरजीसीच्या्या तुकड्यांना तिथपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी गोळ्यांचा जोरदार मारा केला. काही रिपोर्ट्स नुसार मिशन दरम्यान अमेरिकेची दोन विमान जी एमसी130 जे कमांडो टू विमान असण्याची शक्यता आहे ती इराणच्या हद्दीतल्या एका दुर्गम फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस वरती निकामी झाली होती त्यानंतर अमेरिकेने तिथे अडकलेल्या कमांडोना आणि कर्नलला परत आणण्यासाठी आणखी तीन अतिरिक्त सी130 विमान पाठवली ही विमान आल्यानंतर
अमेरिकन सैन्यान ती दोन अडकलेली विमान नष्ट करून टाकली ही विमान इरानी सैन्याच्या हाती लागू नये म्हणून हे करण्यात आलं अखेर हे रेस्क्यू मिशन शनिवारी मध्यरात्री पूर्ण करण्यात आलं आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी स्वतः सोशल मीडियावरती पोस्ट करून याची माहिती दिली. रेस्क्यू टीमन या कर्नलला विमानान कुवेत इथल्या अमेरिकेच्या एअरबेस वरती आणलं त्याला थोडीफार दुखापस झाल्याची माहिती आहे पण तो सुखरूप असून त्याच्यावरती सध्या उपचार चालू आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी जेव्हा मिशन सक्सेसफुल झाल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांनी हे अमेरिकेच्या इतिहासातलं सगळ्यात धाडसी मिशन्स पैकी एक मिशन होतं असं म्हटलंय. अमेरिकन सैनिक जवळपास 48 तास इराणच्या डोंगर रांगामध्ये एकटाच लपला होता. इराण सैनिक आणि स्थानिक लोक त्याचा शोध घेत होते पण त्यांच्या हाती लागण्याआधीच अमेरिकेन त्याला रेस्क्यू करून इराण मधनं बाहेर काढलं. या सगळ्यामध्ये अमेरिकेच्या एकाही कमांडोला दुखापत झाली नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय. पण अमेरिकेच्या आणखी दोन विमानांचे नुकसान झाल्याची माहिती आहे महत्त्वाचं म्हणजे इरानन आपल्या मिसाईलन अमेरिकेच्या एफ 15 सारख्या लढाऊ विमानाला
पाडलं यावरन इरानची मिसाईल क्षमता किती प्रगत आहे याचं प्रमाण पुन्हा एकदा जगाला मिळाल्याचं पाहायला मिळतय बाकी तुम्हाला या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन बाबत काय वाटतं याबाबतची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ साठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करा.
0 टिप्पण्या