दि .3 मे ला 2026 चा नीटचा पेपर झाला 22 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिला त्याच दिवशी संध्याकाळी राजस्थानच्या सिकर मध्ये एका शिक्षकाच्या मोबाईलवर एक पीडीएफ आली पीडीएफ मध्ये होती प्रश्नपत्रिका नीटच्या पेपरमध्ये येऊ शकणारे संभाव्य प्रश्न थोडक्यात गेस पेपर या शिक्षकाने हा गेस पेपर तपासला तेव्हा लक्षात आलं की नीटच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि या गेस पेपरमध्ये असलेले बहुतांश प्रश्न हे सारखेच आहेत या शिक्षकाने तक्रार केली प्रकरण राजस्थान पोलिसांकडे गेलं तपासात लिंक लागत गेल्या चौकशी सीबीआय कडे गेली एनटीएने परीक्षा रद्द झाल्याचं सांगत
पुनर्परीक्षा होणार असल्याचं सांगितलं पण सीबीआयच्या चौकशीत लिंक पोहोचली लातूर पर्यंत आणि आरसीसी क्लासेसचा संस्थापक प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला अटक झाली सीबीआय कडून चौकशीत एक एक धागा उलगडत गेला सीबीआयने न्यायालयात सांगितलं पेपर कोचिंग सेंटर मधून फुटला कोचिंग सेंटर कोणाचं तर शिवराज मोटेगावकरच लातूरच न्यायालयाने शिवराज मोटेगावकरला नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली या प्रकरणात इडीची सुद्धा एंट्री होणार असं सांगितलं जातय आणि मोटेगावकरचा सगळाच कच्चा चिठ्ठा पुढे येतोय पण सुनावणी वेळी कोर्टात काय घडलं या सगळ्यात मोटेगावकरच्या मुलाच्या
बारावीचा विषय काय आहे इडीची एन्ट्री का होऊ शकते आणि मास्टरमाइंड मोटेगावकर लंबा जायगा असं का म्हणता येतय पाहूयात या बातमी मधून सीबीआय ने 15 तारखेला सकाळी 8:30 वाजता शिवराज मोटेगावकरच्या लातूर मधल्या घरी धाट टाकली. त्याच ऑफिस आणि कोचिंग सेंटरमध्ये सुद्धा सीबीआय च पथक पोहोचलं त्यांनी बरीच कागदपत्र आणि डिजिटल डेटा आपल्या ताब्यात घेतला. त्या दिवशी एकूण नऊ तास चौकशी झाल्यावर सीबीआय च पथक मोटेगावकरच्या घरातून निघून गेलं पण त्याला पुण्याच्या सीबीआय कार्यालयात हजर राहण्यासाठी समंस पाठवण्यात आलं त्यानुसार मोटेगावकर रविवारी संध्याकाळी हजर राहिला.
रात्रभर त्याची चौकशी झाली त्यानंतर 17 मेला संध्याकाळी सव्वा वाजता त्याला अटक झाल्याचं कागदोपत्रे दाखवण्यात आलं पण अटक झाल्याची बातमी आली ती 18 तारखेला सोमवारी दुपारी अटक झाल्यानंतर मोटेगावकरला दिल्लीला नेऊन दिल्ली सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा सीबीआयने कोर्टात मोटेगावकरला अटक का करण्यात आली हे सांगितलं शिवराज मोटेगावकरचा संबंध प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी सोबत आहे पीव्ही कुलकर्णीच्या माध्यमातून त्याला केमिस्ट आणि
बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या मोटेगावकर एनटीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होता मोटेगावकरच्या घरी आणि कोचिंग सेंटरवर जी छापेमारी झाली त्यात लॅपटॉप मोबाईल आणि काही प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या त्यातले प्रश्न हे तीन मेच्या परीक्षेतल्या प्रश्नांशी जुळले. शिवराज मोटेगावकर हा पेपर फोडणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे असेही सीबीआयने न्यायालयात सांगितलं तीन मेला नीटचा जो पेपर झाला त्याची प्रश्नपत्रिका मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये 23 एप्रिलला आली होती प्रश्नपत्रिका त्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिली अनेक
लोकांना पाठवली आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मधून डिलीट केली एका अर्थाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला मोटेगावकर आणखी पुरावे नष्ट करू शकतो मोटेगावकर साक्षीदारांना इन्फ्लुएन्स करू शकतो त्याचे चे आणखी कोणाशी संबंध आहेत त्याने प्रश्नपत्रिका कोणाकोणाला पाठवली आहे याची माहिती तो देत नाहीये असं म्हणत त्याला 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने कोर्टाकडे केली. 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीवर मोटेगावकरने मात्र आक्षेप घेतला पण न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली हे सगळं
घडत असताना लातूरूममध्ये झाला. शिवसैनिकांनी मोटेगावकरच्या आरसीसी क्लासवर शाही फेक केली. हा क्लास अनधिकृत जागेत उभा आहे बुलडोजर लावून पाडून टाका अशी मागणी केली. तर मनसे कार्यकर्त्यांनी क्लासच्या समोर आंदोलन केलं. याच क्लासच्या बाहेरचा साधारण चार वर्ष जुना एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये क्लासच्या बाहेर डीजे लावून जल्लोष सुरू होता. कारण होतं नीटचा रिझल्ट. मोठेगावकरच्या क्लास मधल्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवल्यानं मटेगावकर जल्लोष केला होता. तो स्वतःही नाचत होता. आता त्याच क्लास बाहेर
शुकशुकाट आहे. लातूर मधला क्लास तात्पुरता बंद करण्यात आलाय. क्लासला सील लावण्यात आले पण मुळात हा मोठेगावकर अडकला कसा तर तीन मेला नीटचा पेपर झाल्यानंतर त्याच दिवशी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला ज्यात त्याच्या क्लास मधल्या मुली त्याला सांगत होत्या. तुम्ही जी मॉक टेस्ट घेतली त्यातले प्रश्न जसेच्या तसे पेपरमध्ये आले. 101 प्रश्नांपैकी बरेच प्रश्न आले. या व्हिडिओची पालकांमध्ये क्लास चालकांमध्ये बरीच चर्चा झाली त्यात जेव्हा 12 मेला नीटचा पेपर फुटल्याच स्पष्ट झालं तेव्हा एका पालकाने मोटेगावकरच्या विरोधात एफआयआर केली आणि
मोटेगावकर अडकला त्याच्या चौकशीत त्याच्या फोनमध्ये नीटची प्रश्नपत्रिकाच आढळली त्याने ते डिलीट केली होती पण सीबीआयने ती रिकव्र करण्यात यश मिळवलं आणि मोटेगावकरचा सहभाग स्पष्ट झाला याबद्दलचा संशय पोलिसांना मनीषा मांडरे मनीषा वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णी या अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या चौकशीतून सुद्धा आला होता आता विषय इथेच संपतो का? तर उत्तर आहे नाही मोटेगावकर कडे प्रश्नपत्रिका आली कुठून हा सिम्पल प्रश्न तर सीबीआयने न्यायालयात पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेने हे पेपर लीक केले असं सांगितलं
मनीषा वाघमारे कडे पेपर आले पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांडरे या प्राध्यापकांकडून हे दोघं नॅशनल टेस्टिंग एजन्सी मध्ये नीटचा पेपर सेट करण्याचं काम करायचे आता यांच्याशी मोटेगावकरची लिंक आहे तर कुलकर्णी हा मुळचा लातूरचा मोटेगावकर प्रमाणे तो सुद्धा केमिस्ट्रीचा चा शिक्षक तेही प्रतिष्ठित दयानंद कॉलेजमध्ये हा कुलकर्णी आणि मोटेगावकर जुने सहकारी कुलकर्णीने काही काळ मोटेगावकरच्या क्लासमध्ये शिकवलं पण नंतर दोघांचं बिनसलं पण काही वर्षांनी हे गणित पुन्हा जुळलं कुलकर्णी एनटीए मध्ये असल्याने त्याला साहजिकच पेपरचा एक्सेस
होता आणि त्याच्याकडून तो मोटेगावकर कडे पोहोचला असं सांगितलं जातय पण सीबीआयला संशय आहे तीन पातळ्यांवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोटेगावकर आणि कुलकर्णीचे संबंध पुन्हा जुळल्यानंतर नंतर मोटेगावकरनेच आपले कॉन्टॅक्ट वापरून कुलकर्णीला एनटीए मध्ये जबाबदारी मिळवून दिली या दृष्टीने सीबीआयचा तपास सुरू आहे तर दुसऱ्या पातळीवर कुलकर्णीला एनटीए मध्ये जबाबदारी मिळाल्यानंतर मोटेगावकरने कुलकर्णी सोबत जुळवून घेतलं का याचाही तपास सुरू आहे यात भर आहे तिसऱ्या गोष्टीची कुलकर्णी कडून मोटेगावकरला पेपर मिळाला पण त्याने ही माहिती पोलिसांना
देण्याऐवजी आपल्या क्लासमधल्या मुलांना यातले प्रश्न उत्तरांसकट लिहून दिले विवेक पाटील आणि इतरां यांना ही प्रश्नपत्रिका पाठवली. त्यात याच वर्षी मोटेगावकरच्या मुलाने बारावीची परीक्षा दिली आहे. त्यामुळे आपल्या मुलासाठी मोटेगावकरने पेपर घेतला का आणि त्यानंतर तो काही ठराविक लोकांना शेअर केला का असाही प्रश्न विचारला जातोय. आता यात जर एनटीए मध्ये आपली माणसं पेरण्यापर्यंत मोटेगावकरची ताकद असल्याचा क्लू मिळाला तर साहजिकच नीटच्या पेपर लीक प्रकरणात मोटेगावकर मास्टरमाइंड ठरणार आहे पण मोटेगावकर लंबा जायेगा असं म्हणण्यामागचं कारण काय आणि या केस मध्ये ईडीची एन्ट्री का होऊ शकते तर या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची सुद्धा चौकशी होणार आहे मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसचा टर्नओवर हा वर्षाला 100 कोटींच्या पलीकडे असल्याच्या बातम्या अनेकदा एकदा येत असतात लातूरच्या ट्युशन एरियामध्ये सगळ्यात मोठा क्लास मोठेगावकरचा ट्युशन एरिया मधल्या मोक्याच्या जागांवर हॉस्टेल्स कोचिंग सेंटर्स मोठेगावकरचे मुळात ज्या जागांवर याने क्लासेस आणि हॉस्टेल्स उभारले आहेत ती जागा मूळची शासकीय जागा आहे उद्योग भवनासाठी ही जागा लीजवर देण्यात आली होती लीज संपल्यानंतर ही जागा शासनाकडे सरेंडर होणं आवश्यक असताना ती मोटेगावकरने विकत घेतल्याचं सांगितलं जातं त्यात ्या जागांसाठी लातूर मध्ये सॉलिड स्पर्धा असते पण मोटेगावकर आपल्याला हवी असलेली जागा काहीही करून मिळवतो त्यासाठी मागील ती किंमत द्यायला तयार असतो अशी चर्चा लातूरमध्ये धपक्या आवाजात सुरू असते त्यामुळे साहजिकच हे आर्थिक व्यवहार आता रडारावर आलेत आणि त्यामुळेच या प्रकरणात एडीची एंट्री होण्याची शक्यता वाढली आहे या सगळ्यात मोठेगावकरच्या क्लासेस मधली एक बॅच आणि पेपर फुटीच काही कनेक्शन आहे का याबद्दल सुद्धा शंका घेतल्या जातात मोठेगावकरच्या एका सेंटरवर सकाळी सहा
वाजल्यापासून क्लासेस सुरू होतात जे रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतात या क्लासमध्ये शिकलेले काही माझे विद्यार्थी खासगीत सांगतात एका वेळी 300 ते 400 विद्यार्थ्यांना शिकवलं जातं पण या विद्यार्थ्यांना थेट मोठेगावकरला किंवा विद्यार्थ्यांच्याच भाषेत सांगायचं तर एम सरांना भेटता येत नाही पण हे जमतं प्लॅटिनम बॅच मधल्या विद्यार्थ्यांना या विशेष बॅचमध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हे विद्यार्थी उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी पत्रकार पोलीस कर्मचारी राजकीय नेते यांच्या कुटुंबातले असतात या बॅचसाठी फीस साहजिकच
जास्त असते त्या बॅचमध्ये मोठेगावकर अशाही विद्यार्थ्यांना प्रवेश देतो ज्यांना अगदी थोडे मार्क जास्त मिळाले तरी ते नीट क्रॅक करू शकतील मग त्या विद्यार्थ्यांना तो जीव तोडून शिकवतो त्यांना हमखास मेरिट मध्ये आणतो त्यामुळे त्याच्या क्लासची हवा होते ते सुद्धा एलिट ग्रुपमध्ये प्लॅटिनम बॅचला ला गर्दी जास्त साहजिकच पैसा जास्त त्यामुळे मोटेगावकरने याच प्लॅटिनम बॅचसाठी नीटचा पेपर फोडला होता का असाही संशय आहे आणि स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मोटेगावकरचा सुमडीत कोंबडी कारभार लॉकडाऊन नंतर सुरू झाला
त्यात मोटेगावकर एका सेंटरवर 25000 विद्यार्थ्यांना शिकवतो पण कागदोपत्री दोन ते 3000 विद्यार्थी संख्या दाखवतो त्यामुळे यातही मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय थोडक्यात काय तर एका बाजूला शिवराज मोटेगावकरचा पेपर फुटी मधला संबंध पुढे येतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आर्थिक व्यवहारांवर संशय व्यक्त केला जातोय पेपर फुटीच्या प्रकरणात दाखल झालेली गंभीर कलम आणि इडीची टांगती तलवार हे दोन्ही कनेक्शन जुळून आले मोटेगावकरने एनटीए मधल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरूनच गैरव्यवहार केल्याचं समोर आलं तर शिकवताना झुकेगा
नाही साला असं म्हणणारा मॉक टेस्ट मधले प्रश्न आले की नाही असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटणाऱ्या शिवराज मोटेगावकर लंबा जायगा एवढं नक्की
0 टिप्पण्या