PM मोदी यांचे देशाला आवाहन सोने खरेदी करू नये, विदेश यात्रा करू नका पेट्रोल डिझेल वाचवा! काय आहे याचे कारण?


 मोदी यांचे देशाला आवाहन सोने खरेदी करू नये, विदेश यात्रा करू नका पेट्रोल डिझेल वाचवा! काय आहे याचे कारण?

एक काळ असा होता की जेव्हा एखाद संकट किंवा युद्धाची परिस्थिती आली की लोक देशहितासाठी आपल्याकडच सोनं दान करायचे आज तशा दानाची आवश्यकता नाही पण तरी आपण पुढच्या वर्षभरात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणं टाळलं पाहिजे आपण कोणताही समारंभ किंवा कार्यक्रम असला तरी सोन्याची खरेदी करायची नाही असं ठरवलं पाहिजे. हे विधान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रविवारी 10 मे च्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून एक मोठं आवाहन केलय. पुढच्या वर्षभरात सोन्याची खरेदी करू नका असं मोदी थेटपणे म्हणालेत. तसच लोकांनी पेट्रोल आणि

डिझेलचा वापर कमी करावा खाण्याच तेल कमी प्रमाणात वापरावं वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावं अस आवाहन सुद्धा मोदींनी केलय. मोदींच हे वक्तव्य अशा वेळी आलय जेव्हा सध्या जगभरात युद्धाची परिस्थिती आहे. इराण अमेरिकेत सीज फायर झालं असलं तरी युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाहीये. मोदींनी अशा परिस्थितीत भारतीयांना सोन्याची खरेदी वर्षभर करू नका असं म्हटल्यान अनेकांची चिंता वाढलेली दिसतेय पण मोदींच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात देश मोठ्या आर्थिक संकटाकडे जातोय का? देशामध्ये लॉकडाऊन लागणार आहे का असे प्रश्न सुद्धा उपस्थित होतायत पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं म्हणालेत काय? त्यांनी भारतीयांना सोन्याची खरेदी वर्षभर करू नका असं आवाहन का केलय? मोदींनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा असं का म्हटलंय? याचा अर्थ भारत मोठ्या आर्थिक संकटाकडे जातोय का? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या  बातमी मधून सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना काय आवाहन केले ते पाहूया. पंतप्रधान मोदी रविवारी हैदराबाद इथे एका सभेला संबोधित करत होते. त्यामुळे बोलताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी


करण्याचा आवाहन केलय. मोदी म्हणाले की भारत सध्या अनेक आव्हानांचा सामना करतोय. मागच्या दोन महिन्यांपासून आपल्या शेजारच्या प्रदेशात मोठे युद्ध चालू आहे त्याचे परिणाम संपूर्ण जगाला जाणवतायत भारताला सुद्धा याचा फटका बसलेला आहे भारताकडे तेलाचे मोठे साठे नाहीयेत भारताला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल पेट्रोल डिझेल आणि गॅस इतर देशांकडन आयात कराव लागतं युद्धामुळे जगभरात इंधनाच्या किमती वाढलेल्या आहेत सरकार गेल्या दोन महिन्यांपासून देशाला संकटापासून वाचवण्याचा प्रयत्न करतय तरी जेव्हा सप्लाय चेनवर परिणाम होतो तेव्हा

कितीही उपाय केले तरी अडचणी या वाढत त जातात त्यामुळे आपण या अडचणींचा एकत्रितपणे सामना केला पाहिजे या संकट काळामध्ये आपण पेट्रोल आणि डिझेलचा वापर हा कमी केला पाहिजे ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे तिथे फक्त मेट्रोचाच वापर केला पाहिजे जर कारन प्रवास करणं अत्यंत आवश्यक असेल तर कार पोलिंग केलं पाहिजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहन आहेत त्यांनी त्यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असं देखील आवाहन मोदींनी केलय. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या खरेदीबाबत एक मोठं वक्तव्य केलय ज्याची चर्चा आता देशभरात होतीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना एक वर्ष सोन्याची खरेदी न करण्याच आवाहन केलय. मोदी म्हणालेत की भारतीयांनी देशहितासाठी वर्षभर सोन्याची खरेदी करणं टाळावं. वर्षभरात कोणताही समारंभ किंवा कार्यक्रम असला तरी सोन्याची खरेदी करायची नाही हे आपण ठरवलं पाहिजे असं देखील मोदी म्हणाले. सोबतच मोदींनी भारतीयांना स्वयंपाकाच्या तेलाचा वापर कमी करण्याचे देखील आवाहन केलय. देशातल्या प्रत्येक कुटुंबाने तेलाचा वापर कमी करावा असं मोदी म्हणालेत. याशिवाय सध्याच्या परिस्थितीत परदेशाचा प्रवास हा टाळायला पाहिजे आपण कोरोना महामारीच्या काळात ज्याप्रमाणे

व्हर्चुअल मीटिंग्स वर्क फ्रॉम होम करत होतो त्याला आता पुन्हा प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं देखील मोदी यावेळी म्हणालेत. पण या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना सोन्याची खरेदी वर्षभर करू नका. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा अस आवाहन का केलंय ते समजून घेऊया. तर या सगळ्याचा संबंध आहे भारताच फॉरेस्ट रिझर्व म्हणजेच परकीय चलन साठ्याशी खरं तर भारत हा जगामध्ये सगळ्यात जास्त सोन्याची आयात करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. ताज्या आकडेवारीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षात भारताने सोन्याची रेकॉर्ड ब्रेक आयात केली

होती. भारतान एका वर्षात तब्बल 72 अब्ज डॉलर च सोन आयात केलं जे मागच्या वर्षीच्या तुलनेत 24% जास्त आहे. भारताच्या एकूण आयातीमध्ये फक्त सोन्याचा वाटा पाच टक्क्यापेक्षा जास्त आहे. भारत हे सोनं स्वित्झर्लंड, युएई, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांकडन आयात करतो. सोन्याचा हा सगळा व्यापार अमेरिकन डॉलर्स मध्ये होत असतो आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो हाच भारताकडे सध्या 700 बिलियन डॉलर च्या आसपास परकीय चलन साठा आहे. यामध्ये 115 बिलियन डॉलर्स च सोनं म्हणजेच गोल्ड रिझर्व्ह आहे. तर तब्बल 550 बिलियन डॉलर च्या आसपास फॉरेन

करन्सी म्हणजेच अमेरिकन डॉलर्स, युरो आणि ब्रिटिश माउंट्स आहेत. पण मागच्या दोन महिन्यांपासून मिडल ईस्ट मध्ये भयंकर अस युद्ध चालू आहे. या युद्धाचा स्टेट ऑफ हर्मज मधन होणाऱ्या तेलाच्या वाहतुकीवरती मोठा असा परिणाम झालाय. युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्यात. युद्ध सुरू होण्याआधी एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत 65 डॉलर च्या आसपास होती. सध्या हीच किंमत 95 ते 100 डॉलर पर्यंत पोहोचली आहे. मार्च महिन्यात एक वेळ कच्च्या तेलाच्या किंमती तब्बल 120 डॉलर पर्यंत गेल्या होत्या. भारत हा कच्च्या

तेलासाठी दुसऱ्या देशांवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आपण आपल्या गरजेच्या तब्बल 80% कच्च तेल इतर देशांकडन आयात करतो आणि हा व्यापार सुद्धा अमेरिकन डॉलर्स मध्येच होत असतो. आता या सगळ्यांमध्ये होतय काय? तर मागच्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती ज्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यामुळे भारताचा तेलाच्या आयात करण्यासाठी लागणारा खर्च हा प्रचंड वाढलाय. एका अंदाजानुसार यावर्षी भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च तब्बल 120 बिलियन डॉलर पेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकड भारत सोन्याच्या आयातीसाठी

वर्षाला 70 बिलियन डॉलर च आसपास खर्च करतो. आता जर भारतानं अशाच प्रकारे सोनाच्या आयातीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले तर भारताकडे कच्च्या तेलाची आयात करण्यासाठी पुरेसे डॉलर्स उरणार नाहीत आणि अशा परिस्थितीत भारत दुसऱ्या देशांकडून कच्च तेल घेऊ शकणार नाही. यामुळे देशापुढे मोठं संकट उभं राहू शकतं. हेच असं कारण आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना वर्षभर सोन्याची खरेदी करू नका तसच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा असं आवाहन केलय. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मागच्या वर्षभरापासून भारतीय रुपयाची व्हॅल्यू

सातत्याने घसरते सध्या एका डॉलर ची किंमत तब्बल 94 रुपयापर्यंत गेली आहे. रुपया घसरण्या मागचं कारण म्हणजे सध्या अमेरिकन डॉलर ची मागणी फार वाढलेली आहे. त्या तुलनेत रुपयाची डिमांड कमी झालेली आहे. जगभरात जेव्हाही कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा प्रत्येक जण रुपया विकून डॉलर खरेदी करायला लागतो. त्यामुळे डॉलर हा मजबूत होत जातो आणि सध्या हेच घडताना दिसतय. सध्या भारतात अमेरिकन डॉलरला प्रचंड मागणी आहे पण डॉलरचा पुरवठा कमी असल्यामुळे डॉलरची व्हॅल्यू वाढताना दिसतेय अशा परिस्थितीत डॉलरचा पुरवठा वाढवण्यासाठी आरबीआयला हस्तक्षेप हा करावा


लागतोय आरबीआय सध्या आपल्याकडे असलेल्या परकीय चलनाच्या साठ्यातन डॉलरची विक्री करतय आणि बाजारात डॉलरचा पुरवठा वाढवतोय अशाप्रकारे आरबीआय कडे असलेल परकीय चलन रुपयाच्या घसरत्या व्हॅल्यूला सावरण्यासाठी खर्च होताना दिसतय त्यामुळेच आता सरकारन सोन्याच्या आयातीसाठी जे परकीय चलन खर्च खर्च होतं ते कमी करण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना वर्षभर सोन्याची खरेदी करू नका असं आवाहन केलेल आहे आता मोदींच्या या आवाहनाचा अर्थ देशामध्ये लॉकडाऊन लागणार असा होतो का तर सध्या तरी तशी परिस्थिती नाहीये कारण

भारतात सध्या इंधनाचा तुटवडा नाहीये भारताकडे आपत्कालीन परिस्थितीत दोन ते तीन महिने पुरेल इतका इंधनाचा साठा उपलब्ध आहे पण सध्या कच्च्या तेलाच्या किंमती ज्या प्रमाणात वाढतायत सोबतच भारतीय रुपया ज्या वेगाने घसरतोय त्यामुळे भारताला आपला परकीय चलन साठा सोन्याच्या आयातीवरती खर्च करायचा नाहीये रिपोर्ट्स नुसार भारतीयांकडे आधीच मोठ्या प्रमाणात सोनं साठवलेल आहे भारतीय कुटुंब आणि मंदिरांकडे तब्बल 50 हज टन सोन्याचा साठा आहे याची किंमत अंदाजे 10 ट्रिलियन डॉलर च्या आसपास आहे अमेरिका आणि चीन हे दोन देश वगळले तर

जगातल्या प्रत्येक देशाच्या जीडीपी पेक्षा भारतीयांकडे असलेल्या सोन्याच मूल्य हे जास्त आहे पण याचा उपयोग सरकारला होत नाही कारण आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणूक म्हणून सोन्याचा फारसा उपयोग होत नाही असं तज्ञ सांगतात. म्हणूनच देशाचा परकीय चलन साठा वाचवण्यासाठी सोन्याची आयात कमी करण्याचा प्रयत्न भारत सरकारचा आहे. सरकार हा वाचवलेला पैसा कच्च तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी वापरणार आहे पण हे तेव्हाच होईल जेव्हा भारतीयांकडन सोन्याची मागणी ही कमी होईल. त्यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा काही परिणाम हा

भारतीयांवरती होतो का? भारतीयांकडन वर्षभर खरच सोन्याची खरेदी थांबवली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोन्याची खरेदी न करण्याचा आवाहन का केलेल असेल या सगळ्याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यासारख्या माहितीपूर्ण  बातम्या साठी unik marathi चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 



#PMModi #MarathiPoster #AtmanirbharBharat #SaveFuel #SaveOil #WorkFromHome #IndianEconomy #DeshHit #IndiaFirst #Marathi #AwarenessPost #DigitalIndia #ResponsibleCitizen #VocalForLocal #FuelSaving


PM Modi, Marathi Poster, देशहित, आत्मनिर्भर भारत, Save Fuel, Save Oil, Work From Home, Gold Purchase Ban, Indian Economy, Marathi Awareness Post, Public Awareness, India First



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या