Tumbadchi Manjula थिएटरमध्ये धुराळा करतोय ! चित्रपटातील कोण आहे ही मंजुळा? थिएटर मध्ये चित्रपट गाजतोय...


Tumbadchi manjula 

 मंडळी आपली मराठी चित्रपट सृष्टी मागच्या काही वर्षात थोडी बॅकफूटवरती गेली होती. पण गेल्या वर्षी काही उत्तम सिनेमे आले आणि आता या वर्षात तर सलग तीन चार सिनेमे एकदम मस्त आलेले आहेत आणि सर्वांनी थिएटरवर चांगली कमाई सुद्धा केलेली आहे. यात मग क्रांतिज्योती विद्यालय त्यानंतर रितेश देशमुखच्या बहुप्रतीक्षित राजा शिवाजी ह्या  चित्रपटाने यंदा चांगलच मार्केट गाजवले आणि त्यानंतर प्रवीण तरडेंच्या देऊळबंदच्या दुसऱ्या भागाने सुद्धा प्रेक्षकांची चांगलीच मन जिंकलेली आहेत. तरीही अजून देऊळबंद टू चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करतोय. देऊळ बंद ह्या चित्रपटाला त्याच्या पहिल्या भागामुळे अधिक फायदा झाला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे पहिला भाग येऊन देऊळ बंद चित्रपटाला सुमारे 11 वर्षे पूर्ण झाली त्यानंतर हा चित्रपट ह्या वर्षी प्रदर्शित झाला आहे त्यात स्वामी समर्थ यांचे पात्र साकारणारे अभिनेता मोहन जोशी यांची मध्यंतरी पक्षाघाताचा अटॅक आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती त्यामुळे हा चित्रपट  बरेच दिवस बंद बस्त्यात होता पण गत वर्षी ह्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले व ह्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला चांगले असे आर्थिक यश मिळवले आहे . त्याच बरोबर ह्या आठवड्यात 
पण काल पुन्हा एक नवीन मनोरंजक सिनेमा 

चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय तो चित्रपट म्हणजे तुंबाडची मंजुळा मंडळी तुंबाड सारखा मास्टरपीस चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल यात काही शंका नाही पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या ज्यांनी तुंबाड चित्रपट पाहिला होता त्यांना तुंबाडची मंजुळा हे नाव ऐकूनच उत्सुकता निर्माण झाली होती की याचा आणि तुंबाडचा नक्कीच काहीतरी संबंध असेल पण दिग्दर्शकाच नाव बघून आणि एकूणच ट्रेलर बघूनच तुंबाडचा आणि तुंबाडच्या मंजुळाचा काही संबंध नाहीये स्पष्ट झालेलं होतं तरीपण चित्रपट नेमका कसा आहे हे लवकरात लवकर तुम्हाला


सांगता यावं म्हणून मी कालच हा चित्रपट बघून आलो काळजी करू नका मी काय चित्रपटाची स्टोरी सांगून तुमचा मूड ऑफ करणार नाहीये पण चित्रपट एकूण कसा आहे काय मस्तपैकी जमून आलय आणि काय अजून भारी करता आलं असतं असं थोडक्यात माझं चित्रपटा विषयीच मत मांडणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायच आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर घरात बसून पाहायचा आहे हे स्पष्ट सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात तुमबाडची मंजुळा मंडळी सगळ्यात आपण जाणून घेऊया ह्या नवीन प्रदर्शित चित्रपटांबद्दल 


अगोदर एक थोडी नाराज करणारी गोष्ट सांगतो आणि मग दुसरी एक चांगली आनंदाची बातमी सांगतो. नाराज करणारी गोष्ट अशी आहे की तुंबाडची मंजुळा हा ओरिजिनल मराठी चित्रपट नसून एका कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे. 2025 मध्ये आलेला कन्नड चित्रपट सु फ्रॉम सो हा हॉरर कॉमेडी चित्रपटाचा तुंबाडची मंजुळा हा रिमेक आहे. आणि आता आनंदाची गोष्ट ही आहे की जो मूळ सिनेमा आहे सु फ्रॉम सो हा अजून हिंदीत पण डब झालेला नाहीये. त्यामुळं आपल्याकडे जास्त कोणी पाहिलं असल्याची शक्यता कमी आहे. मी सुद्धा अजून तो चित्रपट पाहिलेला नाहीये. त्यामुळं आपण सु फ्रॉम सोला इथेच विसरून


जायचंय आणि मस्तपैकी आपल्या माय मराठीत तुंबाडची मंजुळा बघायचा आहे. आपण आपलं मनोरंजन कसं होईल यावर फोकस करायचा आहे. तर आता वळूया चित्रपटाच्या स्टार कास्ट कडे. मंडळी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विविध म्हणजेच त्यांचं नाव आहे विविध कोरेगावकर आणि यात इतके असंख्य आणि जबरदस्त अभिनेते आणि अभिनेत्रीज आहेत की मोजायला बोट कमी पडतील. ट्रेलर आला तेव्हाच एकेकाची एनट्री बघून मी तेव्हाच हा चित्रपट थिएटरलाच पाहायचा असं ठरवलं होतं जितेंद्र जोशी ओम भूतकर सही तामणकर मकरंद अनासपुरे आणि आपल्या लाडक्या उषा नाडकरणी असे काही प्रमुख चेहरे या


चित्रपटात असले तरी इतरही अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची मोठी फौजच या चित्रपटात आहे ही सर्व कलाकार मंडळी दोन तास आपलं पोटभर मनोरंजन करतात. कोकणातल्या एका सुंदर गावात या चित्रपटाचे शूटिंग झालेल आहे त्यामुळे खुर्चीवर बसून आरामात कोकणाच्या सौंदर्याचा नेत्र सुखद अनुभव आपल्याला घेता येतो. चित्रपटातील सर्वच कलाकारांचा सहज सुंदर अभिनय, विनोदाचे अचूक टाइमिंग आणि संवाद सगळच उत्कृष्ट आहे. विशेषतः उषा नाडकरनि आणि मकरंद अनासपुरे यांची पात्र नेहमीप्रमाणे अतिशय नैसर्गिक आणि बोलके आहेत. तसच चित्रपटातील गाणी वातावरणाला एक रहस्यमयी असा गूढ 


वेगळा फील देतात. विनोदी फर्स्ट हाफ त्यानंतर सई ताम्हणकर ची  रहस्यमय एन्ट्री आणि कथेचा हॉरर उत्तरार्ध प्रेक्षकांमध्ये कुतुहल निर्माण करतो. चित्रपट तांत्रिक बाजूनेही उत्तम जमून आलेला आहे आणि रात्रीचे सीन्स असो की हॉरर सीन सगळं एकदम मस्त शूट झालेल आहे. त्याबद्दल दिग्दर्शक विविध कोरेगावकर यांच आणि लेखकाचही कौतुक कराव लागेल सोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांचही कौतुक कराव लागेल कारण चित्रपटावर मोकळ्या हाताने खर्च केलेला आहे हे पूर्ण चित्रपटात वारंवार लक्षात येतं नाहीतर आपले बरेच मराठी चित्रपट योग्य निर्माते न मिळाल्याने अपेक्षित

दर्जाचे बनत नाहीत असो यानंतर विशेष कौतुक कराव लागेल ते ओम भुत्करच ओम भुतकरन नेहमीप्रमाणे त्याच्या दर्जेदार अभिनयान त्याची वजनदार उपस्थिती दाखवून दिली आहे. त्याच्या प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न ह्या चित्रपटात त्याने जे काम केलं होते त्या कामाचे लोकांकडून भरभरून कौतुक झाले होते चित्रपटाच्या शेवटपर्यंत ओम भुतकर वरून आपली नजर हटत नाही आणि सई ताम्हणकरचा तर विषयच नाही. तिच्या अभिनय प्रतिभेला तर तोडच नाही हया चित्रपटात ही तिने असा भन्नाट अभिनय केला आहे की त्या अभिनयासाठी तरी तुम्ही चित्रपट थिएटर मध्ये जाऊ न पहिला च पाहिजे तिने भले ह्या चित्रपटात एन्ट्री लेट घेतली आहे पण थेटच घेतलेली आहे त्यामुळे ती सुद्धा आपलं मन जिंकून जाते अर्थात नेहमीप्रमाणे तर मंडळी या झाल्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आता वळूयात थोडं डावीकडे म्हणजेच मला या चित्रपटात काय कमी पडल्यासारखं वाटतंय ते सांगतो अर्थात हे सगळं माझं वैयक्तिक


मत आहे म्हणजे मंडळी मला असं वाटतंय की या चित्रपटाला हॉरर कॉमेडी असं म्हणण्यापेक्षा फक्त कॉमेडी सुद्धा म्हणू शकतो. कारण यातल्या हॉरर सीन्सचा प्लॉट बिल्ड अप करायला जेवढा वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा वेळ दिला गेलेला नाहीये. म्हणजे म्हणावी तशी वातावरण निर्मिती होत नाही म्हणजे कॉमेडीला जेवढा वेळ दिला किंवा काही अनावश्यक सीन्स टाळले ते कमी करून हॉरर सीन्स वाढवले पाहिजे होतं असं माझं वैयक्तिक मत आहे कारण मराठी कॉमेडीतला तोच तोचपणा या चित्रपटात जाणवतो बाकी काही विशेष नाव ठेवण्यासारखं काही नाहीये पण म्हणून चित्रपट बघू नका असं मी



म्हणणार नाही मस्त फॅमिली चित्रपट आहे लाईट वेट आहे वीकेंड साठी टाईमपास शोधत असाल तर हा चित्रपट एक चांगलाच पर्याय आहे आणि विशेष सांगायचं तर हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यात वेगळा फील आहे कारण एक तर कोकणातला शूट आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या स्क्रीनवर कोकण खूप सुंदर दिसतं तुम्ही ट्रेलर पाहूनच याचा अंदाज लावू शकता आणि दुसरं म्हणजे हॉरर असल्यामुळे पण थिटरमध्ये अजूनच जास्त मजा आली त्यामुळे मी तर म्हणेल की हा चित्रपट थिएटर मध्येच बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा अभिप्राय आवडला असेल तर जाता


जाता आमच्या unikmarathi चॅनलला  सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
आणि आम्हला तुमचे मत नक्की कमेंट मध्ये कळवा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या