अहमदाबाद विमान दुर्घटना अहवाल विमानाचे स्विच बंद केल्याने भीषण दुर्घटना झाल्याचे दावा...


सध्या विमानाचं प्रवास करणे सोपे राहिले नाही अनेक सधन लोक आपला वेळ वाचवण्यासाठी जलद आणि सुरक्षित सुखकर प्रवास म्हणून हवाई प्रवासाची निवड करतात पण गेल्या काही वर्षांपासून विमानाचे अपघातात बरीच वाढ झाली आहे त्यामुळे विमान प्रवास हा सुरक्षित आहे का नाही हा प्रश्नच उपस्थित झाला आहे.    

   
  12 जून 2025 अहमदाबादून लंडनच्या दिशेने जाणार एअर इंडियाच विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात क्रॅश झालं हे विमान जवळच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं या अपघातात विमानातले 242 आणि ग्राउंडवरचे 19 अशा एकूण 261 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना जगातल्या सर्वात मोठ्या विमान अपघातांपैकी एक मानली जाते. या अपघातानंतर चौकशी सुरू झाली विमान नेमक क्रॅश कसं झालं यामागे काही घातपात होता का या शंका विचारल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला हा अपघात टेक्निकल फॉल्ट मुळे झाला असं बोललं जात होतं पण आता तपासानंतर एक धक्कादायक दावा समोर आलाआहे.   


     हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाड्यामुळे झाला नव्हता तर विमानाच्या इंजिनच स्विच जाणूनबुजून बंद केल्यामुळे झाला होता असा दावा केला जातोय. यामुळे या विमान अपघाताला एक वेगळच वळण मिळालय. पण हा दावा नेमका कोणी केलाय विमानाच्या इंजिनच स्विच जाणूनबुजून कोणी बंद केलं होतं आतापर्यंतच्या तपासात काय काय समोर आलय जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून सगळ्यात आधी विमान अपघाताबाबत नवे दावे काय केले जात आहेत ते पाहूया अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी सध्या डीजीसीए करत आहे डीजीसीएचा अहवाल       अजून आलेला नाही पण त्याआधी इटालियन मीडियाकडून अपघाताबाबत धक्कादायक दावा करण्यात आलाय कोरियर डेलासेरा नावाचं इटलीतल एक अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वात जुन वर्तमानपत्र आहे.


 हे वर्तमानपत्र आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवतं या न्यूज पेपरन दावा केला आहे की हा अपघात टेक्निकल फेलियर मुळे झाला नव्हता तर तो पायलटन जाणूनबुजून घडवून आणला होता. तपास यंत्रणा हाच अंतिम अहवाल तयार करत असल्याचं या न्यूजपेपरन म्हटलय. आता हा दावा कशाच्या आधारे केला जातोय ते पाहूया. हे अपघातग्रस्त विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीच होतं त्यामुळे डीजीसीला तपासात एनटीएसबी ही अमेरिकन सरकारची तपास यंत्रणा मदत करतीय. इटालियन मीडियान भारत आणि अमेरिकेच्या तपास अधिकाऱ्यांमध्ये जे बोलणं झालं ते सूत्रांच्या हवाल्याने सांगून हा दावा केलाय.


 रिपोर्ट मध्ये म्हटलय की इंजिनमध्ये फ्यूल सप्लाय बंद झाल्यामुळे हा अपघात झाला पण टेक्निकल फेलुअर नव्हतं हे जाणूनबुजून करण्यात आलं होतं. भारताच्या तपास यंत्रणेन हा निष्कर्ष काढला असल्याचा दावा या न्यूजपेपरन केलाय. अधिकारी आता लवकरच त्यांचा अंतिम अहवाल देतील असही या रिपोर्टमध्ये म्हटल आहे.


  रिपोर्टनुसार या अपघातासाठी विमानाचे पायलट सुमित सबरवाल यांना जबाबदार धरण्यात आलय. रिपोर्टमध्ये म्हटल आहे की तपास करतांचा दावा आहे एका पायलटन इंजिनचा फ्युएल कंट्रोल स्विच बंद केला. ज्यामुळे विमानाची पॉवर गेली आणि ते जमिनीवर कोसळलं परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही पण मुख्य संशय कॅप्टन सुमित सबरवाल यांच्यावरती आहे. कारण अपघाताच्या एका महिन्यानंतर समजलं ते डिप्रेशन मध्ये होते असे या रिपोर्टमध्ये म्हटलय. खरं तर अपघात झाल्यानंतर सुरुवातीच्या तपासातच समोर आलं होतं की हा अपघात इंजिन मधला फ्युएल सप्लाय थांबल्यामुळे झाला होता.  पण त्यानंतर प्रश्न निर्माण झाला की फ्युएल सप्लाय तांत्रिक कारणांमुळे थांबला होता की हे जाणूनबुजून करण्यात आलं होतं आता हे पायलट द्वारा करण्यात आलं होतं असं तपासात समोर असल्याचा दावा इटालियन मीडियाने केला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात एआयबीन आपला प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्या अहवालात सुद्धा एका पायलटन फ्युएल कंट्रोल स्विच बंद केल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी कॉकपिटचा व्ॉईस रेकॉर्डिंग समोर आलं होतं. त्यात एक पायलट दुसरा पायलटला म्हणतो तुम्ही फल का बंद केलं यावर दुसरा पायलट उत्तर देतो मी हे नाही केलं रिपोर्ट मध्ये पुढे म्हटल आहे की आधी विमानाचा  डाव इंजिन बंद झालं जिथे सहसा पायलट बसतात त्यानंतर उजव इंजिन बंद झालं जिथे कोपायलट बसतात शेवटच्या क्षणी कोपायलट क्लाईव् कुंदरी यांची कंट्रोल स्टिक वरच्या दिशेने होती ज्यावरून लक्षात येतं की ते विमान वरती उचलण्याचा प्रयत्न करत होते पण कॅप्टन सुमित सबरवाल यांच कंट्रोल स्टिक सरळ होतं याचा अर्थ त्यांनी विमान उचलण्याचा प्रयत्न केला नव्हता यावरून सुमित सबरवाल यांच्यावरती शंका घेतली जात आहे. एआयबीने गेल्या वर्षी प्राथमिक तपासानंतर जो निष्कर्ष काढला होता त्याचा पायलट संघटनाने निषेध केला होता. 


 कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी सुद्धा हा अहवाल मान्य नसल्याचं म्हणत नव्यान तपासाची मागणी केली होती. सोबतच त्यांनी सुमित सबरवाल यांच्या मेंटल हेल्थ बाबत जे दावे केले जात होते ते घटस्फोटामुळे डिप्रेशनमध्ये होते किंवा त्यांना एंझायटी होती असं जे म्हटलं जात होतं ते सुद्धा नाकारलं होतं. आता इटालियन मीडियाच्या रिपोर्ट मध्ये म्हटल आहे की अंतिम तपास अहवालात पायलटच्या मेंटल हेल्थ बाबत आणखी माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.  या न्यूजपेपरने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की डिसेंबरमध्ये एआयबी च अधिकारी वॉशिंगटनला गेले होते. त्यांनी एनटीएसबीच्या लॅब मध्ये विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा डेटा पुन्हा तपासला तसच कॅबिनच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची ही सखोल तपासणी केली. ब्लॅक बॉक्सच्या डेटानुसार सुद्धा हा अपघात तांत्रिक बिघाड्यामुळे झाल्याचा दावा फेटाळून लावलाय.
 ब्लॅक बॉक्सच्या डेटाच जे टेक्निकल असेसमेंट झालं त्यात टेक्निकल बिघाड ऐवजी स्विच मॅन्युअली बंद झाल्याचा उल्लेख आहे कारण अपघाताच्या वेळी दोन्ही इंजिन बंद होते हे समोर आल्याचं या न्यूजपेपरन म्हटलय  अमेरिकन तज्ञांच म्हणणं आहे की बोईंग 787 चे दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद पडले असं याआधी कधीही घडलं नाही हे फक्त जाणूनबुजून केलं किंवा अपघात झाला तरच घडू शकतं अमेरिकन तज्ञांनी बोइंग 787 वर अनेक सिमुलेटर टेस्ट केल्या पण त्यांना असं कोणतही टेक्निकल कारण सापडलं नाही ज्यामुळे दोन्ही इंजिन आपोआप बंद होऊ शकतात आता या रिपोर्ट नंतर तपास यंत्रणांनी विमान अपघातासाठी पायलटला जबाबदार धरल्याचं दिसतय यावर इंडियन पायलट्स असोसिएशन आणि कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या कुटुंबान तीव्र आक्षेप घेतलाय. अपघातासाठी मृत पायलटला जबाबदार धरण अन्यायकारक असल्याचं त्यांच म्हणण आहे.
 त्यांनी बोइंग एअरलाईन ट्रेनिंग सिस्टीम आणि इतर कारणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान ब्रिटिश न्यूजपेपर द इंडिपेंडेंटन दावा केला आहे की एअर इंडियान पिडितांच्या कुटुंबीयांनी भविष्यात खटले चालवू नये यासाठी त्यांना अतिरिक्त भरपाईची ऑफर दिली आहे. एअर इंडिया कुटुंबीयांना सेटलमेंट मनी म्हणून एक्स्ट्रा द लाख रुपये देत आहे. काही जणांना 20 लाख रुपयांपर्यंत भरपाई दिली जाते. मात्र 130 पेक्षा जास्त कुटुंबांच्या लीगल टीमन या ऑफरला नाकारला आहे. या अपघाताचा तपास अजून पूर्ण झाला नाही असं त्यांच म्हणण आहे अजून तरी एआयबीन किंवा भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने या न्यूजपेपरच्या अहवालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे यात जे दावे करण्यात आले आहे त्यांना अजून पुष्टी मिळालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तीन आठवड्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 
तसच एआयबीच्या अहवालाच्या आधारे कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल असं न्यायालयाने म्हटलय त्यामुळे आता एआयबीचा अंतिम अहवाल कधी येतो आणि त्या अहवालातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं पायलटन जाणूनबुजून फ्यूल स्विच बंद केलं असेल का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व लेखा  साठी unikmarathi365.com चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका


#AhmedabadPlaneCrash​ #AirIndiaPlaneCrash​


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या