पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी पण फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला वादळी पैलवान पहाडासारखं धिपाड शरीर प्रचंड चपळता आणि मैदान मारण्याची मोठी जिद्द माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी रुंद छातीचा तगडा आणि शेवटच्या क्षणी डाव फिरवण्याची ताकद असलेला पैलवान सिकंदरच नाव मोठं पण माऊली सुद्धा तोडीसतोड या दोन पैलवानांची इनामी कुस्ती मुळशीच्या पौडमध्ये लावण्यात आली निकाल लागेल तेव्हाच कुस्ती थांबेल असं सांगण्यात आलं कुस्ती कुस्ती जवळपास दीड तास चालली पण ती डावनमुळे नाही तर राड्यामुळे गाजली कुस्ती सुरू असताना काही प्रेक्षक मैदानात घुसले आणि त्यातल्या एकान सिकंदर शेखला मारहाण केली त्यानंतर मुळशीच्या आखाड्यात सिकंदर शेखवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या आल्या सोबतच सिकंदर शेख पुन्हा टार्गेटवर असल्याची चर्चा सुरू झाली पण नेमकं काय घडलं सिकंदरवर खरंच हल्ल्याचा प्रयत्न झाला का? महाराष्ट्राच्या कुस्तीत सिकंदरच टार्गेटवर का येतो सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या लेखातून महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुळशी तालुक्याच्या पौड विठ्ठलवाडी गावात कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली होती. यात मल्लिकार्जुन किताबासाठी सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे या दोघांमध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीसाठीच बक्षीस होतं तब्बल 11 लाख रुपये साहजिकच 11 लाखांच मैदान एक नंबरची कुस्ती यामुळे कुस्ती शौकीन आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी जमा झाली. मागच्या 12 वर्षांपासून पौड विठ्ठलवाडी गावात महाशिवरात्रीला कुस्तीच मैदान होतं ज्यात मागच्या तीन ते चार वर्षांपासून सिकंदर खेळतोय. पहिलं बक्षीस सुद्धा जिंकतोय. इथल्या आयोजकांनी जोवर सिकंदर कुस्ती खेळतोय तोवर इथं पहिल्या क्रमांकाची कुस्ती त्याचीच खेळवण्यात येईल असा आदेश जाहीर केलाय. पण यावेळची कुस्ती जास्त चर्चेत होती. 11 लाखांच बक्षीस हा विषय होताच पण त्यापेक्षा महत्त्वाची होती लढत. माऊली आणि सिकंदर हे सध्याचे महाराष्ट्रातले टॉपचे पैलवान. मैदानी कुस्तीत दोघांचा हात कोणी धरत नाही. असे दोन पैलवान पहिल्यांदाच समोरासमोर येत असल्यानं होड मधलं हे मैदान प्रचंड चर्चेत होतं. 17 तारखेच्या संध्याकाळी ही कुस्ती नियोजित वेळेपेक्षा काहीशी उशिरा सुरू झाली कारण बाकीच्या कुस्त्यांना वेळ लागला. कुस्ती सुरू झाल्यावर आयोजकांनी दोन्ही पैलवानांना कुस्ती निकालीच होईल असं सांगितलं त्यामुळे सुरस आणखी वाढली. दोन्ही पैलवान टॉपचे मैदान मोठं आणि दोघांमधली ही पहिलीच लढत असल्यानं सिकंदर आणि माऊली दोघेही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत होते. कुस्ती सुरू होऊन जवळपास तासभर झाला तरी दोघही आक्रमक होत नव्हते पंचांकडून समालोचकांकडून पैलवान कुस्ती करा असं वारंवार सांगण्यात येत होतं पण जो कोणी खाली जाईल त्याला हमखास चित करण्याचा प्रयत्न होणार याचा अंदाज असल्यानं दोघेही रिस्क घेत नव्हते. दोघांकडून कुस्ती चालवली जात होती. कुस्ती सुरू होऊन साधारण एक तास 20 मिनिट झाली होती आणि दोन्ही पैलवान आक्रमक झाले. कुस्ती करता करता माऊलीने सिकंदरच्या मानेवर कसोटा मारला म्हणजेच फटका मारला. गर्दन खेच करताना मारलेला कसोटा काहीसा जोरात होता त्यानंतर सिकंदर कडून सुद्धा त्याला अशाच पद्धतीने उत्तर दिलं दोघांनी जोर लावला कसोट्याचा आवाज मैदानात घुमला पण माऊलीकडून जास्तीचा जोर लागला गेल्यानंतर सिकंदरने त्याला पकडायचा प्रयत्न केला आणि दोघांमध्ये वाद झाल्याची परिस्थिती तयार झाली घडलं फक्त काही सेकंदांमध्ये पण खरा झाला त्यानंतर या दोन पैलवानांमध्ये वातावरण काहीस गरम झालं होतं आणि त्याच वेळी मैदानाच्या बाहेर बसलेले काही प्रेक्षक थेट आखाड्यात घुसले यामध्ये माऊली कोकाटेचे समर्थक होते यातले काही जण सिकंदर शेखच्या अंगावर धावून गेले आणि माऊलीच्या एका समर्थकाने सिकंदरच्या कानावर फटका मारला त्यानंतर आणखी काही प्रेक्षक मैदानात घुसले आखाड्यात प्रचंड गर्दी झाली आयोजक प्रेक्षक सगळे जण मैदानात आले त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली सिकंदरचे वस्ताद विश्वास हरगुले हे सुद्धा मैदानात आले आयोजकांनी समालोचकांनी गर्दीला बाजूला होण्यासाठी सांगितलं पण या सगळ्यात काही जण सिकंदरच्या अंगावर गेले माऊली दुसऱ्या बाजूला गेला तर सिकंदरला त्याच्या च्या समर्थकांनी बाजूला केलं पण भर आखाड्यात येऊन सिकंदर शेख सारख्या टॉपच्या पैलवानाला मारहाण झाल्यानं या प्रकाराची जोरदार चर्चा झाली. त्यात आखाड्यात एकाच वेळी अनेक जण घुसल्याने सिकंदरवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्याही बातम्या आल्या या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. आता हा सगळा झाल्यानंतर कुस्तीचं काय झालं तर पंच आणि आयोजकांनी आखाड्यातली गर्दी बाजूला केली आणि त्यानंतर कुस्ती पुन्हा सुरू झाली. हा सगळा थांबल्यानंतर पुढची 10 मिनिटं पुन्हा कुस्ती चालली पण तरीही निकाल लागत नव्हता. त्यामुळे आयोजकांनी तब्बल दीड तास कुस्ती चालल्यानंतर दोन्ही पैलवान विजयी झाल्याची घोषणा केली. निकाल लागल्यानंतर दोन्ही पैलवानांचा एकत्र सत्कार करण्यात आला. या दोघांनी सुद्धा एकत्र फोटो काढला. एकमेकांच्या गळ्यात हात टाकले पण मैदानात जे काही घडलं त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या येत राहिल्याच पण सिकंदर शेखवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता का? तर सिकंदर विरुद्ध माऊली या कुस्तीचा समालोचन करणारे समालोचक हंगेश्वर धायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पैलवान टॉपचे आहेत. बराच वेळ दोघांनी कुस्ती चालवली होती. दोघांवरही बर्डन होतं त्यामुळे खेळ सुरू असताना कसोटा आक्रमकपणे मारला गेला. त्यानंतर दोन्ही पैलवानांमध्ये काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि आखाड्याच्या बाहेरचे लोक मैदानात आले पण सिकंदरवर हल्ल्याचा प्रयत्न झाला नाही पण त्याला एका प्रेक्षकाकडून मारहाण झाली जे निंदनीय आहे पण तो पोरगा वगळला तर इतर जण मैदानात वादावादी करू नका शांतपणे कुस्ती करा हे सांगायलाच आले होते कुस्ती झाल्यावर दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला आणि खेळातला वाद मिटवून घेतला स्वतः सिकंदरने या सगळ्या प्रकारानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आमच्यात जे झालं ते रागारागात झाल आम्ही कुस्तीत होतो आणि आमची बॉडी गरम होती त्यामुळे ते झालं मला कुणालाही बदनाम करायचं नाही कोकाटे सोबत एक पोरग होतं तो माझ्या अंगावर धावून आला त्याची मला फाईट बसली तो जो कोण होता तो कोकाटे सोबत असतो हा मोठा विषय नाही पण बाहेरून रिंगमध्ये येऊन मारणं चुकीच आहे असं सिकंदर म्हणाला थोडक्यात काय तर कुस्ती निकाली होणार होती त्यामुळे वेळेचं बंधन नव्हतं दोन्ही पैलवान एकमेकांची ताकद आजमावत होते साहजिकच वातावरणातला तणाव वाढला होता आणि यातूनच दोन्ही पैलवानांमध्ये गरमागरमी झाली पण त्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एकान सिकंदरवर हात उचलला आणि त्यातही तो माऊली कोकाट्याच्या जवळचा असल्यान तणाव आणखी वाढला पण आयोजक पंच आणि स्वतः वस्तारांनी आखाड्यात येत परिस्थिती नियंत्रणात आणली पण अर्थात व्हिडिओ व्हायरल झाल्याने सिकंदरवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या येतच राहिल्या या सगळ्यात एक स्वाभाविक प्रश्न पडतो तो म्हणजे सिकंदरवर हल्ल्याचा प्रयत्न झाला ही बातमी राज्यभर प्रचंड चर्चेत आली सिकंदरवर अन्याय झाल्याचेही बोललं गेलं इतकी चर्चा झाली कारण सिकंदर हा सध्या सध्या देशातला एक नंबरचा पैलवान आहे त्याच्याभोवती वलय आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर पंजाब मध्ये सुद्धा त्याच्या कुस्तीला गर्दी होते त्यात सिकंदरची याआधी एकदा उकलेली महाराष्ट्र केसरीची संधी पंजाबच्या प्रकरणात आलेलं त्याचं नाव या सगळ्याची चर्चा झाली होती त्यामुळे त्याच्याविषयी कुठलीही घटना घडली तरी त्याची चर्चा होते आणि सिकंदर टार्गेटवर आल्याचं बोललं जातं कारण सिकंदरने प्रचंड मेहनतीने नाव कमावलय कुस्तीत त्याचा दरारा तयार केलाय यातूनच त्याचे चहाते तयार झालेत आणि यातूनच त्याच्या यांच्याबद्दल आपुलकी आहे अर्थात हल्ल्याचा प्रयत्न झाला नसला तरी प्रेक्षकांने आखाड्यात शिरून पैलवानाला मारहाण करणं हा प्रकार महाराष्ट्राच्या कुस्तीला शोभा देणार नाही हा पैलवानांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण करणारा आहेच पण कुस्तीच्या परंपरेला धक्का पोहोचवणारा सुद्धा कारण या सगळ्यामुळे मुळशीच्या आखाड्यात महाराष्ट्रातले दोन टॉपचे पैलवान भिडून सुद्धा दुर्दैवाने चर्चेत राहिला तो फक्त राडाच
0 टिप्पण्या