कोल्हापूर - पुणे 3 तासात तर सातारा पुणे दीड तासात सुसाट वेगाने प्रवास होणार....

 


कोल्हापूर ते पुणे हा प्रवास हा तसा सुमारे 250 किमी चे अंतर असलेले ठिकाण व हे अंतर रोड द्वारे महामार्गाद्वारे सुमारे पाच ते सात तास लागतात व याच मार्गावर लागणारे सातारा पुण्यापासून 100  किमी अंतरावर आहे पण आता पुणेकर साठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच पुणे ते कोल्हापूर हा पल्ला आता पार आता सुसाट होणार असून मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे ज्यामुळे आता पुणे ते बंगळूरु या राष्ट्रीय महामार्गाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे. शिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुद्धा या कामाची पूर्ण होण्याची तारीख आता सांगितली आहे. चला तर मग या मार्गाची वैशिष्ट्य जाणून घेण्यासोबतच किती वेळात प्रवाशांना हा प्रवास पूर्ण करता येणार अशा सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर रीत्या पाहू या.


 पुणे बंगरूर राष्ट्रीय महामार्ग हा महामार्ग राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा महामार्ग आहे आणि पुढे हाच मार्ग दक्षिण भारताशी सुद्धा जोडला जातोय त्यामुळे हा सतत व्यस्त असणाऱ्या महामार्गांपैकी एक सुद्धा मांडला जातोय आणि म्हणूनच मागील अनेक वर्षांपासून या मार्गावर विविध ठिकाणी काम सुद्धा सुरू होती जी आता अंतिम टप्प्यात आल्याचं म्हटलं जातंय. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे कोल्हापूर पेठ नाका पेठ नाका ते सातारा आणि सातारा ते पुणे या रस्त्याची बहुतांश काम हे पूर्णत्वाच्या मार्गावर


असून जून पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचआयच्या कोल्हापूर कार्यालयातील प्रकल्प संचालक संजय एस कदम यांनी म्हटलय आता आपण बघूया की कोणत्या भागाला याचा काय फायदा होणार आहे तर सध्याच्या परिस्थितीनुसार पाहायला गेलं तर कोल्हापूर पुणे या 232 किलोमीटर च्या प्रवासासाठी साधारण पाच ते सहा तास लागतात आणि त्यात सण सुदीच्या काळात तर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हाच वेळ आठ ते नऊ तासांवर जातो मात्र सध्या सुरू असलेली काम ज्यामध्ये रस्त्याचे सहा पद्रीकरण उड्डाण


पूल सेवा रस्ते आणि भुयारी मार्ग ज्यामुळे हा प्रवास अधिकच सुसाठ होईल आणि ज्यामुळे फक्त तीन तासांमध्ये हा प्रवास पूर्ण होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर पुणे बंगळूरु  महामार्गातील विशेषतः सातारा ते पुण्यातील नवले ब्रिज हा टप्पा तर अवघ्या दीड तासांमध्ये पार करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते कारण पुणे ते सात सातारा या सुमारे 140 km रस्त्याचं सहा पदरीकरणाचं काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला 2010 ते 2035 या कालावधीसाठी बीओटी तत्वावर देण्यात आलं होतं आणि या कामाचं 90% काम हे पूर्ण झालं होतं मात्र


शिंदेवाडी उड्डाण पूल सेवामार्ग छोटे पूल आणि काही स्ट्रक्चर्स अपूर्ण राहिल्यामुळे एनएचआयने संबंधित कंपनीचा ठेका रद्द करून उर्वरित काम स्वतः पूर्ण केले तर खेड शिवापूर शिवरे हरिश्चंद्री आणि वेळे या अपघात प्रवण अर्थात ब्लॅक स्पॉट असणाऱ्या ठिकाणी देखील सुधारणा करण्यात आली असून वेळे आणि हरिश्चंद्री येथील काम जून पर्यंत पूर्ण होणार असल्याचं म्हटलं गेलय. याशिवाय सातारा पुणे दरम्यानचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे खंबाटकी घाट. इथे नवीन बोगद्याच काम अंतिम टप्प्यात असून सध्या एकेरी वाहतूक ही सुरू आहे. पुढील


सहा महिन्यामध्ये दुहेरी वाहतूक सुरू करण्याच सुद्धा नियोजन आहे यामुळे कधी काळी अपघात प्रवण क्षेत्र असणारा हा घाट जो अनेकांना धडकी भरवायचा तो आता इतिहास जमा होणार असून या घाटातील वळण आणि चड उतार टाळून प्रवास अधिकच सुरक्षित आणि जलद होणार आहे. याचबरोबर इंटिग्रेटेड सेपरेटेड स्ट्रक्चर द्वारे पुण्यातील चांदणी चौक जंक्शन विकसित करून वाहतूक कोंडीचा प्रश्न आधीच मार्गी लावलाय कारण इथे विविध दिशानी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आणि उड्डाण पूल उभारल्यामुळे इथली जी वाहतूक कोंडी आहे तो प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर


मार्गी लागल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. याचबरोबर हे काम पूर्ण होण्यासाठी अनेक अडथळे आतापर्यंत यामध्ये आले होते. जसं की पेठ नाका ते कराड या 27 kमी रस्त्याच काम 2022 मध्ये अदानी रोड इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आलं होतं मात्र कराड उड्डाण पुलासाठी भूसंपादनामध्ये विलंब ठिकठिकाणी भुयारी मार्गाच्या मागण्या आणि मुख्य व उपठेकेदारातील वाद यामुळे सुमारे 15 महिने हे काम रखडलं होतं. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करून ऑगस्ट 2025 मध्ये बोरगाव नागठाणे अतील काशीळ आणि निसराळे इथे


भुयारी मार्ग मंजूर केले त्यानंतर कामाला वेग आला असून आता 80% काम पूर्ण झालय त्यामुळे कराड उड्डाण पूल जून पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याच सुद्धा नियोजन असल्याचं म्हटलं जातय यानंतर पेठ नाका ते कोल्हापूर या 45 किलोमीटर रस्त्याच काम रोडवेज सोलुशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीकडे आहे आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे हे काम सुद्धा एक वर्ष संतगतीने झाल्याची टीका करण्यात आली त्यानंतर यातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराची शब्दात कान उघडणी केल्याने जानेवारी 2026 मध्ये काम सुरू झालं दरम्यान गावकऱ्यांच्या मागणीनुसार


महामार्ग ओलांडण्यासाठी कणेगाव किली मंगरयाची वाडी शिरोली सरणोबत वाडी उजळाई वाडी गोकुळ शिरगाव या ठिकाणी अतिरिक्त भुयारी मार्ग मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे ही सर्व काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होण्याच सुद्धा नियोजन असल्याचं कदम यांनी सांगितलेल आहे आणि महामार्गावर प्रवास सुरक्षित होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर यामध्ये केलाय. नवीन क्रॅश बॅरियर, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सुविधा सुद्धा वापरण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर, कराड, सातारा येथील एमआयडीसी क्षेत्रांना सुद्धा आणि


लॉजिस्टिक कंपन्यांना सुद्धा मोठा फायदा होणार असल्याचं म्हटलं जातय. याशिवाय पुणे आणि कोल्हापूर मधील आयटी व ऑटोमोबाईल उद्योगांना सुद्धा वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. हा महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कोल्हापूर, सातारा, पुणे यातील प्रवासाचा वेळ खूप वाचेल, वेळ वाचेल, इंधन वाचेल शिवाय मालवाहतुकीसाठी सुद्धा सुटसुटीत प्रवासाला मार्ग एक उपलब्ध असेल. त्यामुळे अपघातांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होणार आहे. मात्र जसा हा महामार्ग सुपरफास्ट होणार यामुळे काम झाल्यानंतर टोल वाढणार का? याबद्दल सुद्धा आता


नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झालाय. जर हा नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील सर्व जनतेला विशेष फायदा होणार आहे ज्यामुळे फक्त महाराष्ट्र राज्य च नाही तर सर्व भारताला याचा लाभ होणार आहे.

भारतातील उद्योग विकास यांच्या भरभराटी साठी दळणवळण रस्ते असणे अतिशय महत्वाचे आहे ज्यामुळे रस्ते बांधणी दर्जेदार व उत्कृष्ट प्रतीची असली पाहिजे जेणेकरून वाहतुकी दरम्यान लागणाऱ्या वेळेची बचत होईल वेळेची बचत म्हणजेच आर्थिक बचतीला आपसूक पाठबळ मिळेल व देशाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे 

हा ह्या प्रकल्पा मुळे हि  महत्त्वाची शहरे एकमेकाला जोडली  जातील ह्या पुणे, कोल्हापूर,सातारा,कराड,सांगली, ह्या जिल्ह्याना पारंपरिक वारसा लाभला आहे .


त्यामुळे आता या प्रश्नांची उत्तर सुद्धा आपल्याला लवकरच मिळतील. त्यामुळे कोल्हापूर ते पुणे प्रवास आता केवळ वेगवान नाही तर अधिक सुरक्षित आधुनिक आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. अनेक वर्षांच्या या प्रतीक्षेनंतर हा महामार्ग आता विकासाचा खरा हायवे ठरणार असं देखील म्हटलं जातय. त्यामुळे तुरताच आपण इथेच थांबूया मात्र याबद्दलच तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी सुद्धा unikmarathi 365च्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या