नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातचे एक एक कारणामे रोज समोर येतात मंगळवार 24 मार्चच्या सकाळी खरात हा एक किलो मध दैवी शक्ती असल्याचं सांगून न लाख रुपयांना विकायचा असं समोर आलं होतं त्यानंतर मंगळवारी दुपारी अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय हा व्यक्त करण्यात आलाय खरातकडे मोठी रोकड राजमुद्रा असलेल पिस्तूल आणि 31 काडतूस सापडलेली आहेत पण अशोक खरातला कोर्टातन ने येताना त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्याच्या पोलीस कोठडीमध्ये आता पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कोर्टाबाहेर सुद्धा बराच राडा पाहायला मिळाला पण कोर्टामध्ये आणि कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं खरात वरती नरबळीचा संशय का घेतला जातोय पाहूयात आजच्या या बातमी तून भोंदू बाबा अशोक खरात ला कोर्टामध्ये हजर करण्याआधी पोलिसांनी कोर्ट परिसराची रेकी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात मागच्या तीन दिवसापासून खरात ची एसआयटी कडन कसून अशी चौकशी झाली होती. सोमवारी एसआयटी ने त्याची 10 तास चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी सुद्धा एसआयटी कडून खरात ची चौकशी करण्यात आली. पण पोलिसां कडन खरात ची कोठडी वाढवून मिळण्याची मागणी होणार हे अगदी स्पष्ट होतं. खरातला न्यायालयात आणण्याआधीच प्रचंड गर्दी जमली होती. महिला सुद्धा मोठ्या संख्येन कोर्ट परिसरात जमा झाल्या होत्या. या सगळ्यामध्ये खरातला चेहरा झाकून न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. तृप्ती देसाई या खरंतर सकाळीच नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी भोंदू बाबाच्या ईशान्येश्वर मंदिराची देखील पाहणी केली होती. त्यानंतर त्या न्यायालयाच्या परिसरात पोहोचल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी बोलताना खरातला दोन कानाखाली दिल्या पाहिजेत. त्याला महिलांच्या ताब्यात द्या आम्हाला तिकडे जाऊ द्या तो दुसऱ्यांच भविष्य सांगत होता त्याला आता त्याच भविष्य सांगू द्या की तो फासावर जाणार आहे असं तृप्ती देसाई यांचं म्हणणं होतं हे म्हणताच तृप्ती देसाई पोलिसांकडे त्यांना सोडण्याची मागणी करत होत्या पण अशोक खरात न्यायालयात जाईपर्यंत आणि सुनावणी होऊन बाहेर पडेपर्यंत तृप्ती देसाई यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवलं होतं या सगळ्यामध्ये नावाचा पुकारा झाल्यानंतर 17 मिनिटांनी खरात हा कोर्टासमोर हजर झाला एकीकडे तृप्ती देसाई खराच्या अंग्यावरती धावून जाण्याची वक्तव्य करत असताना खरातला सुनावणीनंतर बाहेर आणल्यावर एक व्यक्ती त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याने हल्ला करण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. हा झाला कोर्ट परिसरात घडलेला घटनाक्रम. पण सुनावणी दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय घडलं तर पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी आधी प्रकरणाची माहिती ही कोर्टासमोर दिली. तो भक्तांना खडे देतो महिला भक्तांना पाणी पेढा देतो आणि त्यानंतर अत्याचार करतो. घरातवरती दाखल असलेले गुन्हे त्याच्या चौकशीत पुढे आलेल्या गोष्टी आणि पुरावे यांची माहिती अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. हा 67 वर्षांचा व्यक्ती 30 ते 35 वर्षांच्या महिलांवर अत्याचार करतो यावरन त्याची मानसिकता लक्षात येते. त्याच फार्महाऊस आणि त्याच्याशी संबंधित इतर ठिकाणांचा तपास हा करायचा आहे हे पेढ आणि पाणी तो कुठून आणतो याचा शोध घ्यायचा आहे असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर सरकारी वकील अजय मिसर यांनी कोर्टामध्ये खरात बद्दल काही दावे केलेले आहेत. त्यानुसार आरोपी अशोक खरातने नरबळी दिल्याचा संशय खरातने एका हरणाचा बळी घेतल्याचा संशय कारण खरात हा काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा या कस्तुरीसाठी त्याने हरणांचा बळी घेतलेला असू शकतो. त्याच्याकडे वाघाच आणि इतर प्राण्यांच कातड असल्यान त्याच्यावरती वन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. खराकडे 6,53,000 रुपयांची रोकड सापडली आहे. सोबतच एक लॅपटॉप, रंगाच राजमुद्रा असलेल पिस्तूल, पाच रिकाम्या पुंगळ्या 31 काडतूस सापडली आहेत. खरात हा ईशानेश्वर मंदिरात सिद्ध पूजा करायचा त्या जागेची तपासणी करणं बाकी आहे. त्यान पाच गोळ्या कुठे फायर केल्या याची माहिती घ्यायची आहे. कारण फायर झाल्यान खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय आहे त्याबद्दल चौकशी करायची आहे. तसच त्याच्याकड काही प्रमाणपत्र सापडली आहेत त्यांचा तपास करायचाय. वनदा, खोट्या नागांचा वापर या गोष्टींची चौकशी करायची आहे त्यामुळे खराची पोलीस कोठडी ही सात दिवसांनी वाढवून देण्यात यावी. कारण या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी यापेक्षा जास्त दिवस लागू शकतात. असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. त्यातही सरकारी वकिलांनी खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केल्याने खरातच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. त्यानंतर खरातच वकील संजय भाटे यांनी युक्तिवाद केला. जे व्हिडिओ जमा केले आहेत किंवा सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत त्यातून माहिती मिळालेली आहे. लॅपटॉप सुद्धा जप्त केलाय चौकशी सुद्धा झाली आहे मग कुठली माहिती घेणं बाकी आहे या प्रकरणात पेनड्राईव्हचा उल्लेख कुठेही नाहीये. आता कोणतीही कागदपत्र घेण्याचं बाकी राहिलेलं नाहीये. जी कागदपत्र हवी आहेत ती रजिस्टर ऑफिस मधन मिळू शकतात. जे द्रव्य पाजल गेले आहे त्यासाठी रिमांड वाढवून मागत आहेत. त्यामुळे पोलीस कोठडी देण्यात येऊ नये असं खरातच्या वकिलांच म्हणणं होतं पण त्यांची ही मागणी मात्र कोर्टामध्ये मान्य झाली नाही. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद हा झाल्यानंतर कोर्टाने अशोक खरातला काही बोलायचंय का? असं विचारलं कोर्टात युक्तिवाद सुरू असताना खरात मान खाली घालून उभा होता. त्याच्या चेहऱ्याला मास्क लावलेलं होतं पूर्ण वेळ तो नख कुरतडत होता. कोर्टाने बोलायचंय का असं विचारल्यावर तो म्हणाला नकली वाघाच कातड साप नाग यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही आपण ईशानेश्वर मंदिरात रोज जात नव्हतो तर ओकेजनली जात होतो श्रावणी सोमवार महाशिवरात्री अशा दिवशीच तिथे पूजा करायला जायचो आणि त्यावेळी माझ्यासोबत जवळपास 100 ते दीडशे लोक असायचे असं उत्तर खरातने दिलं. कोर्टाने सगळ्यांच म्हणणं ऐकून घेतल्यानंतर खरातला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे आता खरात हा 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीमध्ये असणार आहे. खरात वरती आता एकूण सहा गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात त्याने पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यानं खरातच्या अडचणी वाढताना दिसतात. याआधीच शिर्डी मधल्या एका कुटुंबान खरातने आपल्या जमिनीच्या बदल्यात आपल्या मुलाचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यातही खरातकडे पाच रिकाम्या पुंगळ्या सापडल्याने या पाच गोळ्यांच गुढ आणखीनच वाढलेल आहे. खरातने खरच नरबळी घेतले की त्याने जमिनीच्या वादातन खून केले या प्रश्नाचे उत्तर आता शोधलं जाऊ शकतं सोबतच त्याच्या मोबाईल मधन डिलीट केलेला डेटा सुद्धा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे याआधी अत्याचार जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि जमिनीचा गैरव्यवहार यात अडकलेला अशोक खरात आता खुनाच्या गुन्ह्यात सुद्धा अडकण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांच्या पुढच्या चौकशीत नेमकं काय समोर येतं खरातचे कुठले विकृत कारनामे जगासमोर येतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार बाकी या भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणा मध्ये काय वाटते आम्हला कमेंट मध्ये सविस्तर कळवा आणि अशा भोंदू बाबा पासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे देवाच्या नावाखाली हे लोक सामान्य जनतेला आपले सावज बनवून फसवत आहेत त्या करिता प्रत्येक व्यक्ती हा सजग असला पाहिजे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुम्हाला
0 टिप्पण्या