काय आहे ?..इराण ची डान्सिंग मिसाईल् sejjil 2 जिन्हे इराण इस्राईल युद्धात हादरवून सोडले आहे



 मागच्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या इरान विरुद्ध अमेरिका युद्धाला आता वेगळच वळण मिळालय. या युद्धामध्ये एका अशा मिसाईलची एंट्री झाली आहे जी मिसाईल आतापर्यंत वापरण्यात आली नव्हती. इराणन रविवारी इजराईल आणि अमेरिकेच्या एअर बेसेस वरती अनेक मिसाईल्स टाकल्या यादरम्यान इराण कडन पहिल्यांदाच या बॅलेस्टिक मिसाईलचा वापर करण्यात आलाय. ही मिसाईल थेटपणे इजराईल वरती टाकण्यात आली होती. इराणच तेहराण ते इजराईलच तेल अवीव यांच्यातल अंतर जवळपास 500 किलोमीटर आहे ही मिसाईल हे अंतर फक्त सात मिनिटात पूर्ण करू शकते 
           सुप्रीम लीडर खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इरान आता या मिसाईलचा वापर करत असल्याचं म्हटलं जातय या मिसाईलच नाव आहे सेजिल मिसाईल पण ही मिसाईल आणखी एका नावाने ओळखली जाते ते नाव म्हणजे डान्सिंग मिसाईल ही मिसाईल नेमकी आहे काय तिला डान्सिंग मिसाईल असं नाव कसं मिळालं खामेन यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण तिचा चा कसा वापर करतोय? इराणकडे आणखी कशी आणि कोणकोणती शस्त्र आहेत जाणून घेऊयात या बातमी च्या माध्यमातन  युद्धामध्ये इजराईल विरोधात ऑपरेशन टू प्रॉमिस सुरू केलय. या अंतर्गत रविवारी इराणच्या आयआरजीसीन
इजराईलला टार्गेट करत अनेक मिसाईल्स टाकल्या. इराणन तेल अव्ू पासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या बीर सेवा इथल्या दोन मिलिट्री बेसेसना टार्गेट केलं. आयआरजीसी ने असा दावा केलाय की त्यांच मुख्य लक्ष इजराईली सैन्याच प्रमुख कमांड इंटेलिजन्स बेस आणि टेक्नॉलॉजी पार्क यामध्ये असलेल इंटेलिजन्स कॉम्प्लेक्स हे होतं रविवारच्या हल्ल्यामध्ये तेल अवी इथल्या अमेरिकन दूतावासातल्या एका अधिकाराच्या घराच नुकसान झाल्याची सुद्धा माहिती आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तेल अव् मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये तीन इजराईली 

नागरिक गंभीर जखमी झालेत. तसच इजराईलच्या मध्यवर्ती भागात मिसाईलचा मलबाहा कोसळून एका इजराईली नागरिकाला दुखापत झाली आहे. आयआरजीसीन असं म्हटलंय की इराणच्या मिसाईल्सन अलहरीर आणि अली अल सालेम सारख्या एअर बेसेस वरती हल्ला केलाय. तसच कुवेत मधल्या कॅम आरिफजान बेसला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं. या हल्ल्यांमुळे या सगळ्या बेसिस वरती मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं इराणनी म्हटलेल आहे आता इरानन हे हल्ले कोणत्या मिसाईल्सने केले तर यासाठी इरानन खोरम शहर खैबर शेकन कद्र आणि इमाद यांसारख्या मिसाईलचा वापर केलाय पण सोबतच आणखी एक मिसाईल इरानन पहिल्यांदाच वापरलय
तिचं नाव आहे सेजिल जिला डान्सिंग मिसाईल असही म्हणतात ती एक मिड रेंज मिसाईल आहे जी सॉलिड फलवर चालते तिची रेंज जवळपास 2000 किलोमीटर इतकी अशाप्रकारे संपूर्ण इजराईल आणि मिडल ईस्ट मधले अमेरिकेचे सगळे एअरबेसेस हे मिसाईलच्या टप्प्यात येतात. ही मिसाईल अंदाजे 700 किलो वजनाची स्फोटक वाहून नेऊ शकते पण या मिसाईलची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ती हवेत असताना अचानकपणे आपली दिशा बदलू शकते. जनरली कुठल्याही मिसाईलचा मार्ग हा ठरलेला असतो. 




टार्गेट फिक्स असल्यामुळे मिसाईल ही ठरलेल्या मार्गानेच उड्डान करते पण अशा मिसाईल्सना ट्रॅक करून इंटरसेप्ट करणं हे
सोपं जातं. इथेच या डान्सिंग मिसाईलच वेगळेपण दिसतं डान्सिंग मिसाईल ही अचानक हवेतच आपला मार्ग बदलू शकते जेव्हा डिफेन्स सिस्टीम गोंधळून जाते अशा मिसाईलला इंटरसेप्ट करणं सुद्धा सहजासहजी शक्य होत नाही आणि या क्षमतेमुळेच या मिसाईलला डान्सिंग मिसाईल असं नाव देण्यात आलय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणची ही मिसाईल पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असल्याचं म्हटलं जातं खरं तर इराणन ही मिसाईल बनवण्याचं काम 1990 च्या दशकातच सुरू केलं होतं तिची पहिली चाचणी 2008 मध्ये झाली होती त्यावेळी या मिसाईलनला जवळपास 800 किलोमीटर इतक अंतर पार केलं
होतं त्यानंतर तिच्यावरती आणखी काम करण्यात आलं या मिसाईलची रेंज वाढवण्यात आली त्यानंतर जी चाचणी करण्यात आली आहे त्यावेळी या मिसाईलन 1900 किलोमीटर च विक्रमी अंतर पार केलेलं आता इराण या युद्धामध्ये या मिसाईलचा वापर सुरू केलाय पण युद्ध तर 28 फेब्रुवारीला सुरू झालं मग इराणन ही डान्सिंग मिसाईल वापरण्यासाठी इतका उशीर का केला तर इराण हे युद्ध सुरू झाल्यापासून आपल्या फतेह शाहब कियाम अशा मिसाईलचा वापर करत होता. सोबतच तो शाहे सारखे ड्रोन्सही वापरत होता. इराणन मिसाईलच्या अटॅकमध्ये मिडल ईस्ट मधल्या अमेरिकेच्या तब्बल चार थाट डिफेन्स
सिस्टीम नष्ट केलेल्या आहेत. शिवाय इराणच्या ड्रोन्सना मोठ्या प्रमाणात इंटरसेप्ट केल्यान आता अमेरिका आणि इजराईल या दोन्ही देशांना इंटरसेप्टर मिसाईलचा तुटवडा जाणवू लागलाय. आणि हीच संधी साधत इराणन आपल्या डान्सिंग मिसाईल्स बाहेर काढलेल्या आहेत. काही रिपोर्ट्स नुसार इरानी इंजिनियर्सनी डान्सिंग मिसाईलला अँटी रडार कोटिंग लावलेल आहे. त्यामुळे तिला रडार वरती डिटेक्ट करणं सुद्धा अत्यंत अवघड जातं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार या डान्सिंग मिसाईलचे वेगवेगळे वर्जन असू शकतात. 2008 च्या चाचणीनंतर इराणन 2009 मध्ये सुद्धा या
मिसाईलची चाचणी केली होती. तिला सेजील टू असं नाव देण्यात आलं होतं. काही रिपोर्ट्स नुसार इराण सध्या सेजील थ्री सुद्धा डेव्हलप करत असल्याची शक्यता आहे या मिसाईलची रेंज तब्बल 4000 किलोमीटर पर्यंत असू शकते पण रविवारी इराणन इजराईल वरती जो हल्ला केलेला तो सेजीलच्या कोणत्या वर्जननी केला होता हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये हे झालं डान्सिंग मिसाईल बद्दल पण इराणकडे अशा आणखी कोणकोणत्या मिसाईल्स आहेत तर फते वन आणि फतेह टू या इराणच्या हायपरसोनिक मिसाईल्स आहेत ज्यांची रेंज 1400 ते 1500 किलोमीटर पर्यंत आहे या मिसाईलचा वेग एक प्रचंड
असतो. त्यांच्यात कोणत्याही डिफेन्स सिस्टीमला भेदण्याची ताकद आहे. खोरम शहर ही मिडियम रेंज मिसाईल आहे जिची रेंज 2000 किलोमीटर पर्यंत आहे. ती तब्बल 1500 किलो स्फोटक वाहून नेऊ शकते. ही मिसाईल तिच्या अचूकतेसाठी ओळखली जाते. फायबर शिकन ही सेजील प्रमाणे सॉलिड फ्यूल मिसाईल आहे जिची रेंज 1500 किलोमीटर पर्यंत आहे. ही मिसाईल सहजपणे हाताळता येऊ शकते त्यामुळे तिचा वार मोठ्या प्रमाणात केला जातो. जुलफागर ही शॉर्ट रेंज मिसाईल आहे. तिची रेंज फक्त 300 ते 700 किलोमीटर पर्यंत आहे. पण या मिसाईलची खासियत म्हणजे ही अत्यंत अचूक आहे. त्यामुळे एखाद्या
टार्गेटला ठरवून अचूक अटॅक करायचं असेल तर इराण या मिसाईलचा वापर करतो. खरं तर युद्ध सुरू झाल्यापासून इराण या सगळ्या मिसाईल्स आणि ड्रोन्सचा वापर करत होता. पण त्यान आता पहिल्यांदा सेझील म्हणजे डान्सिंग मिसाईल वापरणं सुरू केलेल आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मिसाईलन थेटपणे तेल अव्यू सारख्या मोठ्या शहरावरती हल्ले झालेले आहेत. इजराईलचा आयन डोम या मिसाईलला इंटरसेप्ट करण्यात यशस्वी झाला नाही अशी शक्यता वर्तवली जाती आहे. एकीकड अमेरिकेची थाड सारखी अत्यंत ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झालेली आहे इजराईलच्या
इंटरसेप्टरचा साठा वेगाने संपतोय. अमेरिकेला इराणच्या मिसाईल्स इंटरसेप्ट करण्यात प्रचंड खर्च होतोय. अशा सगळ्या परिस्थितीत आता इरानन डान्सिंग मिसाईल्स लॉन्च करून अमेरिका आणि इजराईलची डोकेदुखी वाढवण्याचं काम केलय असं म्हटलं जातय आता हे दोन देश इराणच्या या सगळ्या हल्ल्यांना नेमकं कसं प्रति उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल अमेरिका आणि इजराईल इरानच्या डान्सिंग मिसाईलचे उत्तर शोधू शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच नव नवीन माहितीपूर्ण बातम्या वाचण्यासाठी व जाणून घेण्यासाठी आपण आमच्या unikmarathi 365 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या