बेंजामिन नेतन्याहू इजराईलचे पंतप्रधान जगातल्या सर्वात ताकदवान व्यक्तींपैकी एक मागच्या 30 वर्षांपैकी जवळपास 18 वर्ष इजराईलवर त्यांची सत्ता राहिली आहे अमेरिका आणि इजराईलन 28 फेब्रुवारीला इराण वरती जो हल्ला केला त्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला त्यांच्यासोबत इराणचे अनेक प्रमुख नेते सुद्धा ठार झालेत त्यानंतर मागच्या 16 दिवसांपासून या तीन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धात इराणन इजराईल वरती अनेक हल्ले केलेत. ते लवीव, हैफा, रामल्ला, इजराईलच्या अनेक प्रमुख शहरांवरती इराण कडून अटॅक झालाय. आता त्यापैकीच एका हल्ल्यामध्ये इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. नेतहू यांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून इजराईल आणि अमेरिका जगापासून हे लपवत असल्याचे दावे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. हे दावे एवढ्या मोठ्या संख्येने व्हायला लागले की यावरती नेतहू यांच्या कार्यालयाकडूनही स्पष्टीकरण आल आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? बेंजामिन नेतहू ठार झाल्याचे दावे कशाच्या आधारे केले जातायत? या दाव्यांवरती इजराईल कडून काय प्रतिक्रिया आली आहे सगळं जाणून घेऊ या बातमी मधून.
सगळ्यात आधी या दाव्यांची सुरुवात नेमकी कशी झाली ते पाहू. इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतहू यांनी 12 मार्चला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी घेतलेली ही पहिलीच प्रेस कॉन्फरन्स. या युद्धाची सुरुवात 28 फेब्रुवारीला झाली आहे म्हणजेच युद्धाच्या तब्बल 13 दिवसानंतर नेत नेहू यांनी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली महत्त्वाचं म्हणजे या 13 दिवसांमध्ये ते फारसे कॅमेरासमोर आले नाहीत त्यांनी 2 मार्चला एका नुकसानग्रस्त ठिकाणाला भेट दिली होती. 7 मार्चला त्यांनी एक प्री रेकॉर्डेड व्हिडिओ मेसेज पोस्ट केला होता. पण ते लाईव्ह पत्रकारांसमोर एकदाही बोलले नाही दुसरीकडे अमेरिकेचा विचार केला तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे युद्धाच्या परिस्थितीत चांगलेच ऍक्टिव् आहेत ते सोशल मीडियावरती सातत्याने पोस्ट करतायत पत्रकारांशी रोज बोलतायत अधिकाऱ्यांच्या बैठका घेतायत त्यामुळे नेतहू यांच्या तबेतीबाबत वेगवेगळे दावे सुरू झाले. इराणच्या मीडियाकडून म्हटलं जाऊ लागलं की नेतनेहू यांचा इराणच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालाय. इराणच्या मिसाईल्सन नेतनेहू यांच्या घरावरती जोरदार हल्ला केला होता त्यात त्यांचा मृत्यू झाला असा दावा सोशल मीडियावरती व्हायला लागला. अखेर 12 मार्चला बेंजामिन नेतनेहू यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली इजराईलच्या ऑपरेशन रोलिंग लायन बाबत देशाला संबोधित करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स होती. सोबतच तिचा आणखी एक उद्देश्य होता.
नेतनेहू जगासमोर येत नाहीयेत असे दावे वाढल्यामुळे त्याच खंडन करण्यासाठी नेतहू यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. यादरम्यान नेतहू यांनी त्यांच्या मृत्यूच्या दाव्यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं. इराणचे सर्वोच्च नेतेच जगासमोर येत नाहीयेत असं नेतहू यावेळी म्हणाले. त्यांचा इशारा अर्थातच इराणचे नवे सुप्रीम लीडर मोस्तबा खामिने यांच्याकडे होता. अयादुल्ला खामे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव मोस्तबा यांची इराणच्या सुप्रीम लीडर पदी निवड झाली आहे. मात्र ते सुद्धा अजूनही कॅमेरासमोर आलेले नाहीत. अशाप्रकारे स्वतः नेतहू यांनीच त्यांच्या मृत्यूचे दावे फेटाळून लावले. पण या प्रेस कॉन्फरन्स नंतर बेंजामिन नेतहू यांचा मृत्यू झालाय असे दावे आणखी मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आता नेमकं घडलं काय ते पाहू तर झालं असं की नेतहू यांच्या प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ इजराईल कडून पोस्ट करण्यात आला मात्र हा व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचा दावा सोशल मीडियावरती सुरू झाला. व्हिडिओमध्ये नेतहू यांच्या हाताला पाच ऐवजी सहा बोट दिसतायत असं म्हटलं जाऊ लागलं. व्हिडिओमध्ये बोलताना नेतहू आपल्या हातांशी वेगाने हालचाली करत होते. एका स्टील फ्रेम मध्ये त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या खाली सहाव्या बोटासारखं काहीतरी दिसतं त्यावरून हा व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचा दावा सुरू झाला.
सहसा एआय व्हिडिओ मध्ये अशा प्रकारची चुकी होते त्यामुळे हा सुद्धा तसाच व्हिडिओ असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र अनेकांच्या म्हणण्यानुसार नेत नेहू यांच्या करंगळीच्या खाली जे दिसतय ते एक्स्ट्रा बोट नाही तर रिकामी जागाच आहे कॅमेरा अगल मुळे ते बोट असल्याच भाजतय यावरून सोशल मीडियावरती सध्या अनेक मतमतांतर पाहायला मिळतय याच व्हिडिओमध्ये एका क्षणी नेतहू यांचे दात अचानक गायब झाल्याचा दावा केला जातोय तर पुढच्याच क्षणी ते दात पुन्हा दिसायला लागतात यावरून हा व्हिडिओ एआय जनरेटेड आहे असे दावे सुरू झाले पण फक्त ही एक घटना नाही मागच्या काही दिवसात अशा अनेक घटना घडल्या ज्यावरून नेतहू यांचा मृत्यू झाल्याचे दावे सातत्याने केले जात आहेत. स्कॉट बेसंट हे अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी आहेत. अलीकडेच ते एक इंटरव्ू देत होते मात्र इंटरव्ू दरम्यान डोनाल्ड ट्रंप यांनी तातडन बेसंट यांना बोलावून घेतलं. ट्रंप यांनी बेसंट यांना व्हाईट हाऊस मधल्या सिचुएशन रूममध्ये बोलावलं होतं सिचुएशन रूम म्हणजे अशी जागा जिथे अमेरिकेच्या युद्धाची स्ट्रॅटेजी ठरवली जाते. ट्रंप यांनी बोलावल्यानंतर बेसेंट तिथे गेले ते जवळपास दोन तास ट्रंप यांच्या सोबतच होते. दोन तासानंतर ते परत आले त्यांनी इंटरव्ू पुन्हा सुरू केला मात्र आता बेसंट हे अत्यंत घाबरल्याच दिसत होते.
त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते मुलाखत घेणाऱ्यान प्रश्न विचारल्यानंतर ते फार अडखळत बोलत होते. बेसंट यांच्या अशा वागणुकीचा संबंध नेतहू यांच्या मृत्यूशी लावला जातोय. सोशल मीडियावरती दावे केले जात आहेत की ट्रंप यांनी बेसंट यांना नेतहू यांच्या बाबत सांगितलं जे एकूण बेसंट यांची ही अवस्था झाली होती. आता आणखी एक घटना आहे मिडल ईस्ट मधले अमेरिकेचे विशेष दूत स्टीव् विटकफ आणि ट्रंप यांचे जावई आणि त्यांचे माजी सल्लागार जरेड कुशनर हेनऊ आणि 10 मार्चच्या दरम्यान इजराईलच्या दौऱ्यावरती जाणार होते. इराण युद्धाबाबत इजरायली अधिकाऱ्यांशी चर्चा करणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश होता. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला. दौरा रद्द का झाला याबाबत अधिकृत कारण देण्यात आल नाही. आता याचा संबंध नेतहू यांच्या कथेत मृत्यूशी असल्याच म्हटल जात आहे.
याबाबतचा आणखी एक दावा बेंजामिन नेतहू यांच्या मुलाशी संबंधित आहे. बेंजामिन नेतहू यांचे चिरंजीव याईर नेतहू हे सोशल मीडियावरती चांगलेच ऍक्टिव्ह असतात. युद्धाच्या काळात ते रोज सोशल मीडियावरती पोस्ट करायचे. मात्र याईर यांनी मागच्या पाच दिवसांपासून सोशल मीडियावरती एकही पोस्ट केलेली नाही. एक्स वरती त्यांनी शेवटची पोस्ट 9 मार्चला केली आहे आता याचा संबंध सुद्धा बेंजामिन नेतनेहू यांच्या कथेत मृत्यूशी लावला जातोय. सोशल मीडियावरती असे दावे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर शेवटी यावर बेंजामिन नेतनेहू यांच्या कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली. 15 मार्चला नेतनेहू यांच्या कार्यालयाने त्यांच्या मृत्यूचे सर्व दावे फेटाळून लावत हे दावे पूर्णपणे चुकीचे असल्याचं म्हटलं. त्यांच्या कार्यालयाने एक अधिकृत निवेदन जारी केलं ज्यात म्हटलं की बेंजामिन नेतण्याहू हे पूर्णपणे सुस्थितीत आहेत आणि त्यांच्या मृत्यूबाबत पसरवल्या जाणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत युद्धाच्या काळात शत्रू देशांकडून अशा बातम्या जाणूनबुजून पसरवल्या जातात असं या निवेदनात म्हटलय एकूणच सध्या सोशल मीडियावरती बेंजामिन नेतहू यांच्या मृत्यूच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यासाठी वेगवेगळे पुरावे दिले जात आहेत मात्र कोणत्याही पुराव्यावरून नेतहू यांचा मृत्यू झाल्याचं ठोसपणे म्हणता येत नाही. त्यातच इराणच्या आयआरजीसीने नेतनेहू यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.
अलझाजीदारच्या रिपोर्ट नुसार आयआरजीसीने म्हटल आहे की लहान मुलांचे मारेकरी नेतहू अजूनही जिवंत असतील तर ते पूर्ण ताकदनेशी त्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारतील. त्यामुळे सध्या तरी हा विषय सगळीकडे चर्चेत आहे. तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं इराणच्या हल्ल्यात बेंजामिन नेतण्याहू यांचा मृत्यू झाला असावा का? तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण लेख वाचण्याकरिता आमच्या unikmarathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
0 टिप्पण्या