राज्यात सध्या अशोक खरात या भोंदू बाबाची प्रचंड चर्चा आहे या बाबाचे विकृत कारनामे समोर येतात त्याचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो खतरनाक स्पीडने वायरल होतात हे सगळं सुरू असतानाच बुधवारी रात्री उशिरा एक बातमी आली राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल खरात च्या प्रकरणात वेगवेगळे व्हिडिओ पुढे येत असताना झिरवाळ यांच्या बाबत अशी बातमी आल्यान सगळ्यांच्याच भुवाया उंचावल्या होत्या पण जेव्हा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आला तेव्हा जास्त मोठा धक्का बसला कारण झिरवाळांचा हा व्हिडिओ एका तृतीयपंथी सोबत आहे त्यातही हा व्हिडिओ शासकीय निवासस्थानातला असल्याचा सांगण्यात येतय ज्यात अश्या स्थितीत झिरवळ दिसत आहेतच पण सोबतच मध्यपान सुरू असल्याचही दिसतय त्यात हा व्हिडिओ ज्या तृतीयपंथी सोबतचा आहे त्याच्या भावानेच हा व्हिडिओ माध्यमांना दिल्याचं सांगण्यात येतय हा सगळा प्रकार पुढे आल्यानंतर झिरवळ्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते व्हायरल व्हिडिओचे सगळं प्रकरण समजून घेऊयात या बातमी मधून नमस्कार मंडळी आता सगळ्यांना पडलेला पहिला प्रश्न म्हणजे व्हिडिओत आहे काय तर माध्यमांमध्ये आलेल्या
या व्हिडिओत शासकीय निवासथानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या सोबत गादीवर आहे शेजारी चिकनच ताट आणि दारू आहे या व्हिडिओत झिरवाळ रूममध्ये येताना दिसतात त्यानंतर हा तृतीयपंथीय व्यक्ती कपडे बदलताना दिसतो झिरवाळ्यांच्या गादीवर झोपताना दिसतो काही वेळा कॅमेरा हा जिरवाळांच्या दिशेने जाताना दिसतो तर काही वेळा सोफ्याच्या आडून व्हिडिओ शूट होत असल्याचं दिसतं आता सगळ्यांना पडलेला दुसरा प्रश्न म्हणजे व्हिडिओ बाहेर कसा आला तर लोकशाही मराठी या चॅनलने केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ रवी यादव या व्यक्तीने समोर आणला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्या सोबत जो तृतीयपंथी व्यक्ती दिसतो तो पवन यादव असून आपण पवनचे बंधू असल्याचं रवी यादवने माध्यमांशी बोलताना सांगितलं रवी यादवने आणखी काही धक्का धक्कादायक दावे सुद्धा केले त्यानुसार पवन यादवने हा व्हिडिओ मुद्दामून काढायला लावला पवन मंत्री नेते यांच्याशी ओळख झाल्यानंतर जवळीक वाढवायचा त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी असे व्हिडिओज काढायचा आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा
पवनची महाराष्ट्रातल्या अनेक आमदार खासदार आणि मंत्र्यांसोबत ओळख होती त्यांच्यासोबत त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत त्याच्या मोबाईलमध्ये याबद्दल स्क्रीनशॉट आहेत. बवन यादवने माझ्यावरती खोट्या केसेस दाखल केल्या होत्या. 25 लाख रुपयांची मागणी केली होती असा दावा रवी यादव यांनी केला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार पवन यादव गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून पवनवर कुरार पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागणं ब्लॅकमेल करणं असे गुन्हे दाखल आहेत. पवन यादवचे नरहरी जिरवाळ यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी सुद्धा फोटो आहेत. एका फोटोत जिरवाळ पवन यादवला पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत.
तर एका फोटोत सत्कार करताना दिसत आहेत. आजूबाजूला माणसही असल्याचं दिसतय. सोबतच बातम्यांमधून असेही सांगण्यात येत आहे आपला असा व्हिडिओ व्हायरल होण्याची कुणकुण नरहरी जरवाळ यांना लागली होती. बुधवारी रात्री हा व्हिडिओ समोर आला असला तरी बुधवारी दुपारीच झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी जिरवाळ यांनी या व्हिडिओ बद्दलच फडणविसांशी चर्चा केल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहेत पण राज्याच्या मंत्र्यांचा शासकीय निवासथानामधला असा व्हिडिओ समोर आल्यान नैतिकतेचा प्रश्न उभा राहिलाच पण
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला झिरवाळ यांनी शासकीय निवासस्थानी तेही बेडरूममध्ये प्रवेश कसा दिला नेमके काय संबंध होते असा प्रश्नही विचारला जातोय हा व्हिडिओ समोर आणणाऱ्या रवी यादव यांनी पवन यादव बद्दल आणखी काही धक्का धक्कादायक दावे केले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले पवनने मला खोटी केस दाखल करण्याची धमकी दिली आणि झिरवाळ यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावला. त्यावेळी आपण रूममध्ये झोपलो होतो. आपण याबद्दल झिरवाळ यांना सतर्क केलं होतं तुम्ही पवन सोबत रिलेशन ठेवू नका तो तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असं
मी त्यांना म्हणालो तेव्हा त्यांनी मी बघतो असं उत्तर दिलं. पवन यादव 10 दिवसांपूर्वी झिरवाळ यांच्याकडे गेला होता. तेव्हा त्यान लग्न करा मंगळसूत्र द्या अशी मागणी केली होती त्याला ट्रान्सजेंडर समितीवर पद हव होतं त्यासाठी सुद्धा ब्लॅकमेल करत होता त्यामुळे हा सगळा प्रकार नेमका कशासाठी सुरू होता असा प्रश्न आता पुढे येतोय त्यात सध्या राज्यात अशोक खराच प्रकरण गाजतय नेत्यांवर आरोप होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांशी अडचण होत आहे आणि त्याच वेळी हा व्हिडिओ का बाहेर आला अशी शंका घेतली जाते त्यात जेरवाळ यांचा हा व्हिडिओ सहा ते सात
महिने जुना असल्याचं सांगण्यात येतय त्यामुळे व्हिडिओ बाहेर येण्याचा टाइमिंग हा कळीचा मुद्दा ठरलाय त्यावर रवी यादवने माध्यमांशी बोलताना सांगितलं की हे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड झाल्याने माझ्याकडे होते पण यात मंत्री आणि मोठी लोक असल्याने मी घाबरत होतो की हा व्हिडिओ बाहेर आला तर माझ्या जीवाला धोका निर्माण होईल त्यामुळे मी हा व्हिडिओ माझ्याकडे आल्यावर लगेचच सीपी साहेबांना एक पत्र पाठवलं होतं पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही आता मी व्हिडिओ समोर आणल्यानंतर मला धमका कवण्यात येत आहे
पवन यादव सह मंत्री आणि आमदारांच्या ऑफिस मधून सुद्धा मला धमक्या येत आहेत पवन यादव तृतीयपंथीय असल्याचा फायदा घेतो आपले राजकीय कनेक्शन्स वापरतो मंत्रालयाचा आयकड दाखवतो मंत्री बिझनेसमन यांचे अक्षेपारीय अवस्थेमधले फोटो काढतो आणि त्यांना ब्लॅकमेल करतो त्यांच्याकडून फेवर्स घेतो त्यामुळे मी इतर आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा सतर्क राहण्याची विनंती करतो पण अर्थातच नरहरी जिरवाळ यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर चहू बाजूंने टिकाऊ लागली त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होऊ लागली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे त्याच्याकडून अशा प्रकारच अश्लील आणि अनैतिक वर्तन होणं अत्यंत संतापजनक आणि निषेधार आहे. हा प्रकार केवळ व्यक्तिगत मर्यादांचा भंग नाही तर सार्वजनिक जीवनातली नैतिकतेलाच काळीमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी ही साधी अपेक्षा असते.
मात्र हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचं स्पष्ट होतं या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोणताही विलंब न लावता नरहरी जिरवाळ यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझं डोकं फिरलय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का असं म्हणत या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी भोंदू बाबांबरोबर काही लोकांच जे धार्मिक कनेक्शन उघड होत ते समोर येत आहे असं लक्षात येताच सहा सात महिन्यांपूर्वी काढून ठेवलेला जिरवाळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला
त्यांच्या ऑफिसमध्ये एसीबीचा ट्रॅप लावणे व नंतर आता हा सात महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ काढून मीडियाला सोपवणे एका सरळ माणसाला बदनाम करायचं नंतर मीडिया ट्रायल हे जहरीतील शुक्राचार्य कोण अशोक खरात प्रकरण अंगलट येतय म्हणून स्वतःवरच लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येत आहे असं म्हणत एका प्रकारे जिरवाळ यांचीच बाजू घेतली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी नरहरी जिरवाळ यांनी या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार त्यांचे दोन्ही मोबाईल फोन स्विच ऑफ येत आहेत. त्यांच्या कार्यालयाने मात्र अशा कोणत्याही व्हिडिओची कल्पना नसल्याचं आणि जिरवाळ आत्ता कुणाशी बोलणार नसल्याची माहिती दिल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतय. पण आधी मंत्रालयातल लाचखोरीच प्रकरण आणि आता हा व्हिडिओ यामुळे नरहरी जिरवाळांची पुरती अडचण झाली आहे हे नक्की शासकीय निवासस्थानात झालेली पार्टी जिरवाळ यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि हा व्हिडिओ बाहेर येण्याचा टाइमिंग या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बातम्या वाचण्यासाठी आमच्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
0 टिप्पण्या