इराणने भारतासह पाच देशांसाठी स्टेट ऑफ होर्मुझ उघडले! गॅस सिलेंडर व पेट्रोल तेलाचे संकट टळणार?...

मित्रांनो 
इराण आणि इस्रायल, अमेरिका यांचे गेले कित्येक दिवस युद्ध सुरूच आहे आखातामधला संघर्ष सुरू होऊन ऑलमोस्ट आता एक महिना होत आलेला आहे आणि या संपूर्ण चार आठवड्याच्या अनेक नकारात्मक आणि दुर्दैवी अशा अनेक घडामोडींनंतर एक अतिशय सकारात्मक बाब ही भारतासाठी घडलेली आहे भारताला दिलासा देणारी बाब आहे आणि आजच ही महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे. इराणचे जे परराष्ट्रमंत्री आहेत अब्बास अर्गाची यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे आणि ती घोषणा भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 



            त्यांनी पाच देशांना इराणचे मित्र देश म्हणून घोषित केलाय आणि  यांनाच केवळ स्टेट ऑफ हार्मूज जी आहे जी आता बंद पडलेली आहे जिच ब्लॉकेड इराण कडन करण्यात आलेल आहे. या स्टेट ऑफ हार्मोज मधन केवळ या पाच देशांचीच जी जहाज आहेत तेलानी भरलेली जहाज आहेत ही केवळ स्टेट ऑफ हार्मोज मधन सेफली सुरक्षित पद्धतीने पास होऊ शकतील त्यांचच फक्त तेलाच ट्रान्सपोर्टेशन होऊ शकेल अशा पद्धतीची अधिकृत घोषणा ही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडन झालेली आहे आणि ही भारतासाठी महत्त्वाची आहेत आता हे पाच देश कोणते आहेत तर यामध्ये रशियाचा प्रामुख्याने समावेश आहे या चायनाचा समावेश आहे याच्या मध्ये इराकचा समावेश आहे 


भारताचा आणि पाकिस्तानचा ही समावेश आहे अर्थात ही पाच देश आहेत ही ग्लोबल साऊथचा ज्याला म्हणू जरी रशियाच्या बाबतीमध्ये अर्धा रशिया युरोपमध्ये जरी असला तरी बेसिकली ह्या सगळ्या देशांना ग्लोबल साऊथचाच एक भाग म्हणून मानलं जातं ब्रिक्स असेल किंवा एसओ असेल या दोन्ही संघटना ज्या आहेत या प्रामुख्याने रशियाच्या आणि चीनच्या पुढाकारानेच आलेल्या आहेत आणि आता ब्रिक्समध्ये इराण देखील सदस्य बनलेला आहे. या पाच देशांची जी जहाज आहेत ही आता प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मोज मधनं पास होणार आहेत आणि त्यांना जे तेल आणि नैसर्गिक गॅसचा जो सप्लाय प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मोसच्या माध्यमातन होतो.



 तो आता येत्या काळामध्ये सुरक्षित पद्धतीने होणार आहे ही भारतासाठी केवळ मोठा दिलासा देणारी बाब नाहीये तर भारताच्या दृष्टिकोनातन हा एक राजनैतिक विजय आहे एक डिप्लोमॅटिक मास्टर स्ट्रोक आहे असं आपल्याला याच्याकडे या दृष्टिकोनातन या संपूर्ण घडा मोडीकडे बघाव लागणार आहे कारण पण तशाच पद्धतीने आहे की सध्याच जे इतक असुरक्षित वातावरण आहे .
ज्यामध्ये इरान अमेरिका आणि अमेरिकेचे मित्र देश असतील विशेष म्हणजे युरोपियन देशांना देखील स्टेट ऑफ हार्मूज मधन त कोणत्याही पद्धतीचे जहाज या देशांचे पास ऑन होऊ देत नाहीये त्यांच्यावरती अटॅक्स केले जात आहेत .



आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये या फ्रेंडली लिस्ट मध्ये भारताचा समावेश होतोय मित्रांनो 28 फेब्रुवारीला हा संघर्ष सुरू झाला अमेरिका आणि इजराईल पुरस्कृत पहिला अटॅक हा इराणवरती झाला त्यामध्ये पहिल्या 24 तासांमध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आया खामेनी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर इराण कडन जे रिटलिशन केलं गेलं त्या रिटिएशनचा एक भाग म्हणून म्हणजे परत हल्ल्याचा एक भाग म्हणून त्यांनी स्टेट ऑफ हरमूस ब्लॉकेड केलं स्टेट ऑफ हर्मूज हा एक स्ट्रॅटेजिकली अशा पद्धतीचा चोक पॉईंट आहे तेलाच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये आणि ज्याच्यामुळे जर तो ब्लॉकेड केला गेला किंवा बंद केला गेला तर तेलाच जे ट्रान्सपोर्टेशन जगाला जे तेल सप्लाय होतं वेगवेगळ्या देशांना तेल सप्लाय होतं त्याच्यापैकी ऑलमोस्ट वन फ जे आहे सप्लाय जो आहे तो स्टेट ऑफ हार्मूज मधन होतो अर्थात स्टेट ऑफ हार्मू जे आहे हे पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान याच्याशी निगडित अशा स्वरूपाची अत्यंत निमुळती अशा प्रकारची समुद्रधुनी आहे मी मागे माझ्या अनेक बातम्या मधन आपल्याला सांगितले स्टेट ऑफ हार्मू महत्त्व देखील आपल्याला सांगितल आहे की तेलाच जे एकूण
ट्रान्सपोर्टेशन एशियन देशांना होतं या ट्रान्सपोर्टेशन मध्ये दोन अतिशय महत्त्वाचे चोक पॉईट्स आहेत एक आहे स्टेट ऑफ हारमूज आणि दुसरा स्टेट ऑफ तैवान आणि हे दोन्ही पण जे स्टेट किंवा समुद्रधुनी ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो या या दृष्टिकोनात महत्त्वाच्या आहेत की जपान पासून म्हणजे जपान साऊथ कोरिया पासून दक्षिण पूर्व आशिया असेल दक्षिण आशिया असेल चीन आहे या सगळ्या देशांना जो तेलाचा सप्लाय होतो म्हणजे हा प्रामुख्याने जो रूट आहे 
हा पर्शियन गल्फ पर्शियन गल्फ नंतर अरेबिक ओशन अरेबिक ओशन नंतर इंडियन ओशन इंडियन ओशन नंतर साऊथ चायना
 साऊथ चायना सी नंतर वरती पॅसिफिक ओशन अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रवास जो होतो आणि ज्याच्या माध्यमातन या दोन स्टेट मधन ही जहाज पास ऑन होतात आणि ती करत आपल्याला साधारणतः जगाला किंवा एशियन देशांना प्रामुख्याने हा सप्लाय जो होतो त्या माध्यमातन होत असतो आता याच्यामध्ये कळीचा मुद्दा असा आहे की हे स्टेट ऑफ हार्मोज जे आहे याच्यामधन जे तेलाच ट्रान्सपोर्टेशन होतं हे प्रामुख्याने जे अरब देश आहेत किंवा ज्यांना जीसीसी मेंबर्स म्हणतात किंवा ओपेक आहे किंवा जे ब्रेन क्रुड ऑईल प्रोड्यूस करतात या ब्रेन क्रुड ऑईल प्रोडक्शन करणाऱ्या जे देश आहेत


त्याच्यामध्ये प्रामुख्याने सौदी अरेबिया आहे इराक आहे इरान आहे कुवेत आहे युएई आहे हे जे देश आहेत हे देश कतार पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा देश आहे जो एलएनजीच्या प्रोडक्शन साठी फार इम्पॉर्टंट कंट्री आहे हे सगळ्या देशांचे जे तेल आहे हे प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मोन्स मधन पास ऑन होत असतं हे स्टेट ऑफ हार्मोस स्ट्रॅटेजिकली इतकी महत्त्वाची असल्यामुळे ती आज पर्यंत पर्यंत इतिहासात कधीही त्याच ब्लॉकेड करण्यात आलेलं नव्हतं त्याला कधी बंद करण्यात आलेलं नव्हतं यापूर्वी अशा स्वरूपाचे संघर्ष म्हणजे फर्स्ट गल्फ वॉर


झालं इराण आणि इराक मधलं सेकंड गल्फ वॉर झालं त्यापूर्वी इजराईल आणि अरब देशांमधले अनेक संघर्ष पार पडले यानंतर अनेक देशांमध्ये इस्लामिक देशांमध्ये यादवी युद्ध झाले दहशतवादी हल्ले झाले या सगळ्या जरी घडामोडी घडत असल्या तरी कधीही स्टेट ऑफ हार्मूस बंद पडलं नाही कारण स्टेट ऑफ हार्मूज मधन ऑईल ट्रान्सपोर्टेशन हे चालू राहावं हा अमेरिकेचा मेन कन्सर्न होता कारण जर स्टेट ऑफ हार्मोन्स बंद पडलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किंमती प्रचंड वाढतात वाढू शकतात आणि जे आपण आज पाहतो आहोत आणि तो अमेरिकेसाठी मेन कन्सर्न आहे यामध्ये प्रामुख्याने


अमेरिकेचा जो एक संपूर्ण यामधला जो कन्सन आहे हा कन्सन असा आहे की अमेरिकेमधले त्या तेलाच्या किंमती आहेत पेट्रोल डिझेलच्या किंमती या प्रामुख्याने ब्रेन क्रुड ऑईल जो एक पद्धती चा ऑईलच्या किंमत ठरवण्याचा तेलाची किंमत ठरवण्याचा एक बेंचमार्क आहे ब्रेंच क्रुड ऑईल ्याच्याशी निगडित अमेरिकेच देशांतर्गत तेलाच्या किंमती याच्याशी निगडित आहेत आणि त्यामुळे अमेरिकेचा कन्सन हा असतो की कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये जे ब्रेन क्रूड ऑईल आहे त्याच ट्रान्सपोर्टेशन थांबायला नको मात्र या 27 28 दिवसांच्या संघर्षामध्ये स्टेट ऑफ हार्मोन्स ठप्प


झालेला आहे आणि त्यामुळे याचा परिणाम स्वाभाविकपणे आपण जगभरामध्ये बघतोय अनेक देशांमधन तेलाच्या किमती या वाढलेल्या आहेत याचा परिणाम हा महागाईवरती होणार आहे महागाईवर होणार असल्यामुळे मी त्याचा उल्लेख केला माझ्या कालच्याच व्हिडिओमध्ये की इवन अमेरिकेच जे फेडरल रिझर्व आहे यांनी इंटरेस्ट रेट देखील कट करायला स्पष्टपणे नकार दिलेला आहे त्यांच्या दोन बैठका पार पडल्या या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये पण दोन्हीमध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्वहनी कोणत्याही पद्धतीने इंटरेस्ट कटडाऊन केलेले नाहीयेत या सगळ्या गोष्टी आहे की महागाईला काउंटर करण्यासाठी


आणि महागाई वाढण्याची शक्यता फार जास्त आहे कारण तेलाच्या किंमती ह्या साधण 70 डॉलर वरन 120 डॉलर पर्यंत ब्रेन क्रुड ऑइल च किमती पोहोचलेल्या आहेत आणि म्हणूनच अमेरिकेने रशियावरती तेला रशियन तेलावरती जे आर्थिक निर्बंध टाकले होते ते उठवले इराणच्या तेलावरती जे आर्थिक निर्बंध टाकले होते ते पण उठवले कारण तेलाच्या किंमती वाढू नयेत आणि या सगळ्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये विशेष करून भारताच्या दृष्टिकोनातन जर आपण विचार केला तर आपल्याला ह्या संपूर्ण संघर्षामध्ये आपले जे दोन मेन कन्सर्न आहेत त्यातला पहिला कन्सर्न जो आहे तो प्रामुख्याने आपलं जे



तेल आपण भारत आपल्या गरजेच्या 88% तेल हे आयातीच्या माध्यमातून आपली गरज भागवतो आणि त्यापैकी 40% जे आहे ते ऑलमोस्ट गल्फ नेशन कडन येतं ज्याच्यात ते प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मोज मधन येत विशेष म्हणजे भारताचा जो एलएनजीचा सप्लाय आहे जो प्रामुख्याने कतार कडन येतो ऑलमोस्ट आपला 607% एलएनजीचा जो सप्लाय आहे तो स्टेट ऑफ हार्मूज मधन येतो तर भारतासाठी हा कन्सर्न होता की जरी आपल्याकडे साठा हा जवळपास 74 75 दिवसांचा तेलाचा साठा असला आणि आता सध्या तरी कोणत्याही प्रकारची पॅनिक सिचुएशन भारतामध्ये नसली तरी भविष्यामध्ये जर हा



ब्लॉकेड कंटिन्यू राहिला तर भारताच्या चिंता निश्चितपणे वाढू शकत होत्या मात्र आता इरानने अशा प्रकारचा दिलासा दिल्यामुळे भारताला आता या दृष्टिकोनातून पण बघाव लागेल आणि दुसरं या संपूर्ण संघर्षामध्ये ज्या पद्धतीचा स्ट्रॅटेजिक पेशन्स ज्याला म्हणतो मी सामरिक संयम हा भारताने प्रामुख्याने बाळगलेला आहे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की भारत हा एकमेव असा देश आहे की जो एकाच वेळेला शियापंथी आणि सुन्नीपंथीय देशांबरोबर समान संबंध ठेवतो भारत हा एकमेव असा देश आहे की जो इजल आणि पॅलेस्टाईन बरोबर समान संबंध ठेवतो हा एकमेव असा देश आहे की जो अमेरिका


आणि रशिया बरोबर पण समान संबंध ठेवतो रशिया आणि युक्रेन बरोबर पण समान संबंध ठेवतो तो प्रकार चीनच्या बाबतीत नाहीये तो प्रकार अमेरिकेच्या बाबतीत नाहीये किंबवना तो प्रकार रशियाच्या बाबतीमध्ये पण नाहीये म्हणून भारताचा ह्या संपूर्ण याच्याकडे जो अप्रोच होता हा प्रामुख्याने संघर्ष शांततेच्या माध्यमातून सुटावा जगामधला तेलाचा सप्लाय कंटिन्यू राहावा या प्रकारचं भारताच देखील इंटरेस्ट होता. मात्र आता ह्या पाच देशांना अलाड केल्यामुळे या एकूणच भारताची लूक वेस्ट पॉलिसी आहे जस आपण आपल्या पूर्वेकडच्या देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी भारताने


लक ईस्ट पॉलिसी जी आता ्ट ईस्ट म्हणून ओळखली जाते ती ते धोरण स्वीकारलं आणि तसच आता इस्लामिक देशांबरोबर आपले संबंध घनिष्ठ करण्यासाठी आपण ज्या लूक वेस्ट पॉलिसीचा स्वीकार केलाय मी निश्चितपणे ह्या संपूर्ण म्हणजे इराणनी हा जो निर्णय घेतलेला आहे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे की आम्ही पाच देशांना फ्रेंडली नेशन म्हणून घोषित करतो हे होस्टाईल नेशन नाही आहेत हे फ्रेंडली नेशन्स आहेत आणि यांचे प्रामुख्याने तेल असेल किंवा एलएनजी असेल यांची जहाज सेफली आता स्टेट ऑफ हार्मोस मधन पास ऑन होतील त्यामुळे भारतामध्ये जे


साधारणत तीन चार महिन्यानंतर कदाचित हा स्टेट ऑफ हार्मोसचा ब्लॉकेड कंटिन्यू राहिला तर काही समस्या निर्माण होऊ शकल्या असत्या आता त्याही समस्या निर्माण होणार नाही त्यामुळे निश्चितपणे भारतासाठी मोठा दिलासा देणारी ही बाब आहे हा भारताचा एक डिप्लोमॅटिक मास्टर स्ट्रोक आहे मी भारताला एक राजनैतिक विजय म्हणून या संपूर्ण घडामोडीकडे पाहतो आपल्याला त्याबद्दल काय वाटते ते आपण आम्हला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा अनेक बातम्या वाचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या