अमेरिका व इराण यांनी युद्धाला दिला विराम!

        अमेरिका आणि इराण यांच्यात 8 एप्रिलला सीज फायर ची घोषणा झाली आणि मागच्या 40 दिवसांपासून सुरू असलेल युद्ध अखेर थांबलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बुधवारी पहाटे सोशल मीडियावर पोस्ट टाकून युद्ध थांबल्याची घोषणा केली पाठोपाठ इराण कडूनही अधिकृत घोषणा झाली दोन्ही देश पुढचे दोन आठवडे एकमेकांवर हल्ले न करण्यासाठी तयार झाले पण  या युद्धात आणखी एक देश सहभागी होता खरंतर त्याच्याच सांगण्यावरून अमेरिकेन या युद्धात भाग घेतला होता हा देश अजूनही हे युद्ध थांबवायला तयार नाहीये ट्रंप युद्ध थांबवून तातडीने माघार घेत असले तरी हा देश मात्र होऊ देणार नाही असं दिसतय तो देश म्हणजे अर्थातच इजराईल 

अमेरिका आणि इराणमध्ये सिझफायर झालं तरी इजराईलला हे युद्ध चालू ठेवायच अमेरिकेने थांबवलं असलं तरी इजराईल युद्ध थांबवणार नाही असं दिसतय हा विषय नक्की आहे काय अमेरिकेने माघार घेतली असताना इजराईलला हे युद्ध का चालू ठेवायचं इजराईल इराण विरुद्ध युद्ध का थांबवणार नाहीये समजून घेऊया या बातमी मधून सगळ्यात आधी इजराईल हे युद्ध कशाप्रकारे चालू ठेवतोय ते सांगतो बुधवारी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सीझफायर झालं मात्र अधिकृत

घोषणेनंतर काही तासातच इजराईलने लेबनॉनच्या किनार पट्टीवरच्या टायर या शहरावरती हल्ला चढवला या हल्ल्याच्या काही मिनिटा आधी इजराईलने त्या भागातल्या रहिवाशांना आपली घर तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले होते. इजराईली सैन्याच्या आव्हानानंतर काही वेळातच प्रचंड मोठा स्पोट झाला. ्याचे व्हिडिओ फुटेजही समोर आलय. त्यानंतर इजराईलन लेबनॉनची राजधानी बैरूजच्या दक्षिण भागातल्या रहिवाशांना घर रिकामी करण्याचा इशारा दिला. हा भाग अत्यंत दाट लोकसंख्येचा आहे. जिथून आधीच मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाले आहेत. इथं 2 मार्च पासून सतत संघर्ष सुरू आहे पण आता

परिस्थिती आणखीन चिघळली आहे. युद्धविरामानंतरही इजराईलने लेबनॉनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात एका दिवसात 254 लोकांचा मृत्यू झाला. तर 1165 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. यानंतर लेबनॉनने देशात राष्ट्रीय शोक जाहीर केलाय. इजराईलने स्पष्ट केलय की अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम लेबनॉन साठी लागू असणार नाही पंतप्रधान बेंजामिन नेनाहू यांच्या कार्यालयानेही याला अधिकृत दुजोरा दिलाय आता याचा अर्थ काय तर अमेरिकेने जरी युद्ध थांबवला असलं तरी इजराईलला युद्ध थांबवायचं नाहीय यावरती इराण कडूनही प्रतिक्रिया आली इराणच्या एका

वरिष्ठ अधिकाऱ्यान अलजीजराला सांगितलं लेबनॉन मध्ये इजराईलन युद्धबंदीच्या अटेच जे उल्लंघन केलं त्याला उत्तर म्हणून इराण इजराईलला शिक्षा करेल म्हणजे आता पुन्हा इजराईल आणि इराण यांच्यात नव्या संघर्षाला सुरुवात होण्याची शक्यता आहे पण असं का अमेरिकेन माघार घेतली असली तरी इजराईलला युद्ध का थांबवायचं नाहीये ते सांगतो इजराईलला हे युद्ध थांबवायचं नाहीये यामागचं पहिलं कारण म्हणजे इजराईलला कोणत्याही परिस्थितीत इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स नकोयत मुळात इजराईलने युद्ध का सुरू केलं तर यामागचं सर्वात मोठं कारण इराणचे न्यूक्लिअर वेपन्स इराण हा मागच्या

अनेक वर्षांपासून स्वतःचा न्यूक्लिअर प्रोग्राम चालवतोय. इराणचा प्रयत्न न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याचा आहे आणि इजराईलचा याला अर्थातच विरोध आहे. मिडल ईस्ट रिजनमध्ये सध्या इजराईल वगळता कोणत्याही देशाकडे न्यूक्लिअर वेपन्स नाहीत. किंबहुना पाकिस्तान शिवाय एकही मुस्लिम देश अणवस्त्र सज्ज नाही जर इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवण्यात यशस्वी झाला तर तो इजराईलच्या वर्चस्वासाठी मोठा धोका बनू शकतो इजराईल हा आकारण अत्यंत लहान असा देश आहे त्याच्या आजूबाजूला असलेले सगळे मुस्लिम देश त्याचे शत्रू आहेत त्यामुळे या देशांना काउंटर करण्यासाठी इजराईल

त्याच्याकडे असलेल्या न्यूक्लिअर वेपन्सचा धाग दाखवतो आता जर इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवले तर मिडल ईस्ट रिजन मध्ये इजराईलचा सध्या असलेला डॉमिनन्स उरणार नाही त्यामुळे इराणला हे करण्यापासून रोकणं हा इजराईलचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न राहिला आहे इजराईलने अनेक वेळा म्हणले की इराण हा देश न्यूक्लियर वेपन्स ठेवू शकत नाही त्यामुळे इराण जोपर्यंत त्यांचा अणुकारयक्रम पूर्णपणे बंद करत नाही तोपर्यंत इजराईल इराण सोबत संघर्ष करतच राहणार गेल्या वर्षी जून मध्ये इजराईल आणि इराण यांच्यात जो संघर्ष झाला त्यामागे सुद्धा हेच कारण होतं आत्ताच्या

युद्धानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात जे सीज फायर झालं त्यातही न्यूक्लिअर वेपन्सच्या मुद्द्यावरतीच इजराईल सर्वात जास्त आडून आहे इजराईलच म्हणण आहे की इराणन त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम बंद करावा पण इराणच म्हणण आहे की त्यांना न्यूक्लिअर एनरिचमेंटचा अधिकार आहे दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर अडून आहेत अशाप्रकारे हा संघर्ष यापुढेही सुरूच राहणार असंच दिसतय इजराईलला हे युद्ध थांबवायचं नाही यामागचं दुसरं कारण म्हणजे ग्रेटर इजराईलच नरेटिव्ह इजराईल अजूनही युद्ध कुठे लढतोय तर ते लेबनॉन लेबन या देशात हिजबुल्ला ही संघटना ऍक्टिव् आहे

जिचा वापर इरानन प्रॉक्सी म्हणून केलाय इजराईल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरुवातीपासून संघर्ष आहे मध्यंतरी त्यांच्यात सिसपायर झालं होतं पण हे युद्ध सुरू झाल्यानंतर हिजबुल्लान पुन्हा इजराईलवर हल्ला केला याला प्रत्युत्तर देताना इजराईल आता चांगलाच आक्रमक झालाय हिजबुल्लाचा बंदोबस्त करण्यासाठी इजराईल थेट दक्षिण लेबन मध्ये घुसलाय सध्या इजराईलन तिथल्या अनेक भागांवर आपलं वर्चस्व निर्माण केल्याच असं म्हणलं जातय लेबनॉनच्या जमिनीवर इजराईलन आपली लष्करी तळ उभा राहायला सुरुवात केली आहे आता इजराईल तिथून माघार घेईल अशी शक्यताच दिसत

नाहीये अनेकांच्या म्हणण्यानुसार इजराईलन आता ग्रेटर इजराईलची संकल्पना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे ग्रेटर इजराईल संकल्पना 2000 वर्ष जुनी आहे या संकल्पनेनुसार इजराईल हे राष्ट्र नाईल नदीपासून युफ्रेटीस नदीपर्यंत पसरलेला असेल असं म्हणलंय आजच्या काळात या दोन नद्यांच्यामध्ये मध्ये इजराईल आणि पॅलेस्टाईन सह जॉर्डन, लेबनॉन, कुवेत हे देश तसेच इजिप्त, सौदी अरेबिया, सिरिया आणि इराक या देशांचे काही भाग येतात. या संपूर्ण प्रदेशाला ग्रेटर इजराईल असं म्हणतात. इजराईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याआधी अनेक वेळा ग्रेटर

इजराईलचा उल्लेख केलाय. हा सर्व प्रदेश जू धर्मियांच्या ताब्यात आणण्याच नित्यन्याहू यांच स्वप्न आहे आता या युद्धाच्या माध्यमातून त्यांनी त्या दिशेने पावलं टाकली असल्याचं म्हणलं जाते एकीकडे इजराईलने वेस्ट बँकचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतलाय गाजावरही इजराईल आपलं वर्चस्व निर्माण करतोय आता तो लेबनॉन मध्ये घुसलाय हळूहळू तो भागही इजराईलला जोडला जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे लेबनॉन हा ग्रेटर इजराईल संकल्पनेचा भाग आहे त्यामुळे हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तरी इजराईल संघर्ष करत राहणार अशी चर्चा आहे इजराईलला हे युद्ध

थांबवायचं नाही यामागच तिसरं कारण म्हणजे या युद्धाचा बेंजामिन नित्यनाहू यांना देशांतर्गत राजकारणात होणारा फायदा खरं तर हे युद्ध सुरू होण्याआधी नित्यनाहू यांचा लिकुड पक्ष निवडणुकीच्या सर्वेक्षणांमध्ये बराच मागे होता पण युद्ध सुरू झाल्यापासून नित्यनाहू यांच्या इमेजला याचा मोठा फायदा झालाय इजराइलमध्ये त्यांच अप्रुवल रेटिंग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलय इजराईल डेमॉक्रेसी इन्स्टिट्यूट म्हणजेच आयडीआयच्या ताज्या सर्वेनुसार 74 टक्के जू लोकांचा युद्ध मॅनेज करण्याबाबत नेनाहू यांच्यावरती विश्वास आहे 2024 2025 या

काळात नित्यनहू यांचा अप्रूव्ल रेटिंग 30 च्या आसपास होतं पण या युद्धानंतर ते अचानक वाढून 62 टक्क्यापर्यंत पोहोचले नित्यन्याहू यांच्या पक्षाने 27 जागांवरून 31 जागांपर्यंत आघाडी घेतली आहे ज्यामुळे त्यांचा पक्ष इजराईलच्या संसदेत पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष बनलाय इतकच नाही तर युद्धाच्या काळात इजराईलचे विरोधी पक्षही नित्यन्याहू यांच्या बाजूने उभे राहिलेत. याईर लॅपिड बेनीगॅड्स यांच्यासारख्या प्रमुख विरोधी नेत्यांनी युद्धात नित्यनेहू यांना पाठिंबा दिला. आता समजा युद्ध अचानक थांबलं तर नित्यनाहू यांच्या

देशांतर्गत इमेजला मोठा धक्का बसू शकतो इजराईली जनता ही सहसा युद्धाच्या विरोधात नसते युद्ध दीर्घकाळ चालू राहिलं तरी इजराईलमध्ये जनतेचा याला पाठिंबा असतो मात्र समजा एवढं मोठं युद्ध सुरू करून ते कोणत्याही ठोस आउटकम शिवाय थांबवल गेलं तर मात्र नित्यनाव यांची अडचण होऊ शकते युद्धात इराणचा विजय झाला आणि अमेरिका आणि इजराईलन मागार घेतली अस नरेटिव्ह बिल्ड होऊ शकतं हे टाळण्यासाठी नित्यनाव यांना कोणत्याही परिस्थितीत युद्ध चालू ठेवाव लागेल त्यामुळे अमेरिकेने जरी मागार घेतली तरी इजराईल हे युद्ध सुरू ठेवणार असं

म्हणलं जातय सध्या तरी इजराईल संपूर्ण सीज फायर साठी तयार नाहीये हे सीज फायर लेबनला लागू असणार नाही असं इजराईलन म्हणल त्यामुळे त्यांनी अजूनही लेबनॉन मध्ये आपले हल्ले चालू ठेवलेत आता इजराईल हे हल्ले कधी थांबवतो इजराईल आणि हिजबुलला यांच्यातला संघर्ष कधी संपतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं अमेरिकेने माघार घेतल्यानंतरही इजराईल युद्ध चालू ठेवेल का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बातम्या साठी unik marathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका