Pune Damini Marshal पुण्यात धक्कादायक प्रकरण पोक्सोची धमकी देत... रिलस्टार पोलीस महिलेकडून महिला ब्लॅकमेल उकळली ७ लाखांची खंडणी सोबत दोन पोलिस कर्मचारी ही सहभागी

 

Pune Damini Marshal पुण्यात धक्कादायक प्रकरण पोक्सोची धमकी देत... रिलस्टार पोलीस महिलेकडून महिला ब्लॅकमेल उकळली ७ लाखांची खंडणी सोबत दोन पोलिस कर्मचारी ही सहभागी

     आजच्या काळात मोबाईल फोन च्या माध्यमा मुळे गल्लोगली व शहरात उपनगरात सोशल मीडिया चा वापर बऱ्याच प्रमाणात वाढला आहे अनेक तरुण मुले मुली आजकाल सर्रास reel व्हिडिओ टाकता बनवत असतात तसेच ते फेसबुक, यूट्यूब,इंस्टा पेजवर अपलोड करत असतात.
आता सध्याच्या काळात पोलिस खात्यातील अनेक तरुण कर्मचारी ही ह्या पासुन अलिप्त राहिली नाही 
त्यांना ही ह्या मोह आवरता आला नाही यातीलच एक पोलिस खात्यातील कर्मचारी सोनाली हिंगे ही एक प्रसिद्ध रिल्स्टर इन्स्टा वर प्रसिद्ध पोलिस लेडी सिंघम म्हणून ओळखली जाते ती सोशल मीडियावर फेमस आहे. पण रिल लाईफ मध्ये व रिअल आयुष्यात बराच फरक असतो हे ह्या बातमी मुळे कळते.
असं म्हणतात कर्म जेव्हा वसूलीला येतं तेव्हा कोणाचाच वशीला चालत नाही आणि नेमकं हेच सांगितलं पुढे पोलीस दलातील सोनाली हिंगे तशी स्टोरीज तिने इंस्टावर अपलोड केली होती पण त्यानंतर काहीच तासात तिशावर सात लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तिच्यासह पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि कर्मचारी सुदाम तायडे या दोन पोलिसांवरही हा गुन्हा दाखल झालाय. त्यांनी एका महिला प्राचार्याला धमकी देऊन त्यांच्याकडून सात लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकळले. पण इंस्टा रील्सवर लेडी सिंघम म्हणून वावरणारी सोनाली हिंगे रियल लाईफ मध्ये खंडणी खोर


निघाल्याने या प्रकरणाची राज्यात चर्चा रंगली आहे. पुणे पोलीस दलात सुद्धा या घटनेमुळे एकच खळवळ उडाली आहे. खंडणीखोर पुणे पोलीस खाकीला डाग आहेत असं म्हणत पुणेकर आता या घटनेबद्दल संताप व्यक्त करतायत. कारण सामान्य जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते ते पोलीसच जेव्हा वर्दीचा गैरवापर करून खंडणी उकळतात तेव्हा खाकीवरील विश्वास नक्कीच डळमळीत होतो. पण ज्या प्रकारामुळे पुणे पोलीस दलाची मान शर्मेन झुकली आहे ते प्रकरण नक्की काय आहे? यातील आरोपी सोनाली हिंगे आहेत कोण? ते या बातमी मधून जाणून घेऊयात. 
 मंडळी ही घटना उजेडात यायच्या काही तास आधीच पुणे पोलीस दलात खळबड उडून देणारी एक घटना समोर आली होती. पुण्याच्या वाघोली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. किरण अब्दागिरे, गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी त्या पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहेत. आयटी क्षेत्रातील तरुण तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत आणि तरुणाला मारहाण करत त्याच्या फोन पे मधून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघड किस आला होता. या प्रकरणात तीन पोलीस कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळताच त्यांनी

थेट त्यांच्या निलंबनाची कारवाई केली. आता ही घटना ताजी असतानाच इतर तीन पोलिसांचा पराक्रम समोर आलाय. सात लाखांच्या खंडणी प्रकरणी त्यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिलेत. यातील सोनाली हिंगे ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दामिनी मार्शल म्हणून कार्यरत आहे. सुदाम तायडे हा इथलाच एक कर्मचारी आहे तर अजित बडे हा सायबर पोलीस ठाण्यात पीएसआय असल्याचं सांगण्यात येतय. वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी या तिघांनी संगणमत करून एक कट रचला.

पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला आपल्या जाळ्यात ओडलं. पीएसआय बडे त्या महिला प्राचार्याकडे जाऊन त्यांना भेटला आणि एका मुलीची कागदपत्र तुम्ही काढून ठेवली आहेत का अशी विचारणा केली. त्यावर प्राचार्यांनी नियमानुसार कागदपत्र ठेवतो असं स्पष्ट केलं त्यावर पीएसआय बडेन संबंधित विद्यार्थिनीने तुमच्या विरोधात अर्ज केल्याचं तसच त्या विद्यार्थिनीला तुम्ही बंदुकीचा धाग दाखवून गाडीत ओढल्याची देखील तक्रार असल्याचं प्राचार्यांना सांगितलं त्यामुळे तुमच्याकडे पिस्तूल आहे का अशी विचारणा पीएसआयने प्राचार्यांना केली. तक्रारदार

मुलीच वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याच पोक्सो अंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्हाला अटक केली जाईल. यात तुमच्या संस्थेचीही बदनामी होईल म्हणून आम्ही आजपर्यंत तो अर्ज रेकॉर्डवर घेतलेला नाहीये. पोलिसांच्या दामिनी पदकात कार्यरत असलेल्या सोनाली हिंगे यांनी त्या मुलीला समजावून सांगितलं आम्ही केस रजिस्टर केली तर तुमची बदनामी होईल. यातून काही मार्ग निघतो का ते पाहतो. अशी धमकी देत आणि भीती घालत पीएसआय बडेन त्या महिला प्राचार्यावर मानसिक दबाव वाढवला आणि बडे तिथून निघून गेला. त्यानंतर पीएसआय बडे सोनाली हिंगे

आणि तायडे यांनी त्यांची पुढची चाल खेळली. संबंधित महिला प्राचार्याला संपर्क करून हे प्रकरण मिटवायचं असल्यास द लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. प्राचार्यांनी सुरुवातीला पैसे द्यायला नकार दिला पण त्यावर बडेन पुन्हा धमक्या दिल्या. शेवटी बदनामीला घाबरून प्राचार्यांनी त्या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी म्हणून सा लाख रुपये दिले यासाठी त्यांनी स्वतः सह कुटुंबीयांच्या खात्यावर असलेली रक्कम पोलिसांना काढून दिली. दरम्यान 8 मार्चला दुसऱ्या एका प्रकरणाच्या बाबतीत शिवाजीनगर पोलिसांनी त्या प्राचार्यांना पोलीस ठाण्यात बोलावून

घेतलं होतं त्यावेळी विद्यार्थिनीन दिलेल्या तक्रार अर्जावर देखील प्राचार्यांनी चौकशी केली पण त्या चौकशीत त्यांना धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आपल्याला ब्लॅकमेल करून पोलिसांनीच ते सा लाख रुपये उकळल्याच त्यांना लक्षात आलं. त्यांनी या प्रकरणी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खात्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिले. त्यात पुराव्यांच्या आधारे बडे हिंगे आणि तायडे या पोलिसांचा खंडणी प्रकरणात सहभाग असल्याच समोर आलं आणि त्या आधारावर आरोपी पोलिसां विरोधात बंड गार्डन

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे पुढे पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली असून आता या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणती कठोर कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मंडळी अडचणीत सापडलेल्या लोकांकडून पैसे उकळणं ही खरं तर पोलिसांसाठी कॉमन गोष्ट मानली जाते पण पुण्यातील या प्रकरणाची सध्या राज्यभरात चर्चा होण्याच कारण म्हणजे सोनाली हिंगे कारण दामिनी पदकातील लेडी सिंघम म्हणून तिची ओळख आहे. पुण्यातील [फुत्कारणे] शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीची घरची परिस्थिती

हलाखीची असल्यानं तिच्या कुटुंबीयांनी तिचं शिक्षण थांबवलं आणि लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं पण सोनाली हिंगेन त्या कुटुंबाच समुपदेशन केलं आणि तो बालविवाह रोखत त्या मुलीला पुन्हा शाळेत पाठवलं या कौतुकास्पद कामगिरीमुळे काही दिवसांपूर्वी सोनाली हिंगे चर्चेत आली होती. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवर ती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण देत असते. पोलीस दलातील कामगिरीमुळे देखील तिला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. एक मॉडेल म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं मिस आयकॉन इंडिया या स्पर्धेची ती विजेती असल्याच सुद्धा कळतय.

एमकॉम एमफिल जीडीसीए या पदव्या तिच्याकडे असून ती उच्चशिक्षित आहे. सोशल मीडियावर ती चांगली सक्रिय असून Instagram वर तिच्या जवळपास 40 हज फॉलोवर्स सुद्धा आहेत. तिने केलेल्या पोस्ट सगळ्याच लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. याशिवाय नाही म्हटलं तरी दर आठ दिवसाला तिचं नाव वर्तमान पत्रामध्ये झळकत पण आता एका वेगळ्या कारणान तिच्या नावाची चर्चा होते. दामिनी पदकातील लेडी सिंघम म्हणून ओळख असलेली सोनाली हिंगे आता खंडणीखोर निघाल्यान सर्वांनाच धक्का बसलाय. कदाचित खंडणी प्रकरणात आपल्यावर कारवाई होईल आणि त्यातून आपल्याला कोणीच वाचवणार नाही

याची तिला कल्पना असावी म्हणूनच काय की गुन्हा दाखल व्हायच्या आधी तिने तिच्या इंस्टावर स्टोरी अपलोड केली होती कर्म जेव्हा वसूलीला येत तेव्हा कोणाचाच वशीला चालत नाही या प्रकरणावरची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि unik marathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या