अनेक लोक आजही एक गोष्ट ठामपणे सांगतात अजित दादा गेलेले नाहीत
ते कुठेतरी जिवंत आहेत ही वाक्य आज कुठे ऐकायला मिळत नाहीत असं नाही WhatsApp ग्रुप Facebook पोस्ट YouTube कमेंट्स चहाच्या टपरीवरची चर्चा सगळीकडे हा विषय सतत परत परत पुढे येतो आहे. कोणी म्हणतं मृतदेह नीट ओळखूच आला नाही. कोणी म्हणतं फक्त घड्याळावरून ओळख पटली मग खात्री कशी? तर काही जण थेट असही म्हणतात की हा सगळा प्रकार एखाद्या मोठ्या डावाचा भाग असू शकतो. पण इथे एक प्रश्न अत्यंत शांतपणे आणि जबाबदारीने विचारणं गरजेच आहे. हे सगळं लोक का म्हणत आहेत?
28 जानेवारीच्या त्या सकाळी महाराष्ट्र हादरला. विमान अपघाताची बातमी आली आणि काही तासातच संपूर्ण राज्य शोकमग्न झालं पहिल्या दिवशी कुणाच्याही मनात शंका नव्हती. सगळ्यांना वाटलं ही एक दुर्दैवी पण अंतिम घटना आहे. माध्यमांनी सांगितलं की हवामान प्रतिकूल होतं दृश्यमानता कमी होती. तांत्रिक बिघाडाची शक्यता आहे विमान अपघात ही अशी घटना असते की ती अनेक कारणांच्या एकत्र परिणामामुळे घडू शकते हे लोकांनी मान्य केलं पण जस जसे दिवस गेले तस तसे काही प्रश्न हळूहळू पुढे यायला लागले सर्वात पहिला प्रश्न होता विमानात नेमके किती लोक होते पहिल्या बातम्यांमध्ये आणि अधिकृत निवेदनांमध्ये सांगण्यात आलं की विमानात पाच जण होते आणि पाच जणांचेच मृत देह सापडले परंतु काही दिवसांनी काही वृत्तपत्रीय नोंदी काही प्राथमिक कागदपत्रातील उल्लेख आणि काही पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या यादीत सहा जणांची नोंद असल्याची चर्चा समोर आली हा बदल नेमका का झाला याच स्पष्ट आणि सविस्तर स्पष्टीकरण
सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं नाही आणि याच ठिकाणी संशयाच बीज रोवली गेली लोक विचारू लागले जर नोंदी बदलत असतील तर बाकी माहिती किती अचूक आहे जर सुरुवातीला सहा जण होते तर अपघात स्थळी फक्त पाच मृतदेह कसे सापडले या प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे चर्चा अधिक तीव्र होत गेली अपघातानंतर जे मृतदेह सापडले त्यांची अवस्था अत्यंत विदारक होती ओळख पटवणं अवघड होतं असं तपासाशी संबंधित लोकांनीही मान्य केलं अजित अजित दादांची ओळख एका वैयक्तिक वस्तूवरून पटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं हे शक्य आहे का? हो जगात अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत जिथे ओळख वैयक्तिक वस्तूंवरूनच पटवावी लागली आहे. पण तरीही लोकांचं मन ते स्वीकारायला तयार नव्हतं. कारण अजित दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते ते एक सवय होते ते रोज दिसणारा रोज ऐकू येणारा चेहरा होते राजकारणातला एक ठांब स्पष्ट आणि प्रभावी आवाज होते अशा व्यक्तीच अचानक जाणं मनाला स्वीकारणं कठीण असतं आणि तिथूनच ते जिवंत असतील का हा विचार जन्माला येतो या विचाराला सोशल मीडियाने आणखी खत पाणी घातलं कोणी म्हणालं अपघात स्थळाचे फोटो फारसे स्पष्ट दाखवले गेले नाहीत कोणी म्हणालं अंत्यसंस्कार खूप लवकर झाले कोणी म्हणालं सगळं फार पटकन मिटवलं गेलं यातली प्रत्येक गोष्ट खरी आहे असं नाही. पण या सगळ्या गोष्टींनी लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला. आपल्याला जे सांगितलं गेलं ते पूर्ण सत्य होतं का यानंतर चर्चेत आला ब्लॅक बॉक्सचा मुद्दा सामान्य लोकांना वाटलं होतं की ब्लॅक बॉक्स सगळं स्पष्ट करेल अपघाताच्या आधी नेमकं काय घडलं वैमानिकाने कोणते शब्द उच्चारले आपत्कालीन संकेत दिला गेला का हे सगळं त्यातून समोर येईल पण ब्लॅक बॉक्स संदर्भातली माहिती ही मर्यादित स्वरूपातच बाहेर आली. तपास सुरू आहे अंतिम अहवाल येईल असं सांगण्यात आलं तोपर्यंत मात्र अफवा तर्क आणि अंदाज वाढत राहिले काही लोकांनी थेट असही विचारलं जर हा केवळ अपघात असता तर इतकी गुप्तता कशासाठी याच ठिकाणी दोन वेगळे प्रवाह स्पष्टपणे दिसतात. एक प्रवाह म्हणतो ही एक दुर्दैवी घटना होती. हवामान तांत्रिक बिघाड मानवी चूक हे सर्व शक्य आहे आणि तपास पूर्ण होईपर्यंत थांबायला हवा दुसरा प्रवाह म्हणतो इतक्या मोठ्या आणि प्रभावी व्यक्तीबाबत घडलेली घटना इतक्या सहज संपून जावी हे पचणी पडणं कठीण आहे नोंदींतील विसंगती प्रवासी संख्येतील प्रश्न आणि काही अनुत्तरित बाबी संशय वाढवतात यात आणखी काही मुद्दे चर्चेत आले
अपघाताच्या आधी वैमानिक बदलण्यात आला होता का? जर बदल झाला असेल तर तो का करण्यात आला? वैमानिकाचा पूर्वीचा अनुभव आणि इतिहास तपासण्यात आला होता का? या प्रश्नांची अधिकृत उत्तरं अजून सार्वजनिक रित्या समोर आलेली नाहीत. याशिवाय तपासाच्या दरम्यान एका संशयिताची अटक झाल्याची माहिती समोर आली. अटक महाराष्ट्राबाहेरून का करण्यात आली हा प्रश्नही लोक विचारू लागले. चौकशी झाली काही धागेदोरे मिळाल्याचं
सांगण्यात आलं पण नेमकं काय निष्पन्न झालं हे तपशीलवार सांगितलं गेलेलं नाही या सगळ्या घटनांमुळे लोकांचा संशय अधिक गडद होत गेला आणि इथूनच अजित दादा जिवंत आहेत ही चर्चा अधिक जोरात पुढे आली पण इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगणं गरजेच आहे आजपर्यंत कोणत्याही अधिकृत यंत्रणेने तपास संस्थेने किंवा सरकारने अजित दादा जिवंत आहेत असा दावा केलेला नाही. कोणताही ठोस प्रत्यक्ष पुरावा समोर आलेला नाही. मग लोक असं का म्हणत आहेत? कारण मानवी मन कधी कधी वेदनादायक सत्य स्वीकारायला वेळ घेतं. इतिहासात अशा अनेक घटना आहेत जिथे मोठ्या नेत्यांच्या मृत्यूवर लोकांनी विश्वास ठेवायला बराच काळ लावला. कुठे ते परत येतील अशी आशा तर कुठे हे खोट आहे असा ठांब नकार ही एक मानसिक प्रक्रिया आहे आज अजित दादां बाबत जे चाललं आहे ते संशय भावना राजकारण आणि अपूर्ण माहिती यांचा एकत्रित परिणाम आहे संशय विचारणं चुकीचं नाही प्रश्न उपस्थित करणं लोकशाहीचा भाग आहे पण ठोस पुरावा नसताना निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं आज अजित दादा जिवंत आहेत असं म्हणणाऱ्यांकडे भावना आहेत प्रश्न आहेत शंका आहेत पण पुरावा नाही आणि दुसरीकडे
अधिकृत माहिती आहे पण ती सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल इतकी सविस्तर नाही आणि म्हणूनच ही दरी निर्माण झाली आहे हा व्हिडिओ कुणाला काही पटवण्यासाठी नाही ती कोणताही अंतिम निकाल देत ती फक्त एक आरसा आहे लोकांच्या मनात काय चाललं आहे तपासात काय प्रश्न आहेत आणि आपण काय विचार करायला हवा याचा शेवटी एकच प्रश्न उरतो आपण सत्य शोधतोय की आपल्या भावनांना आधार देतोय उत्तर आज नाही ते कदाचित उद्या येईल कदाचित अजून वेळ लागेल अजित दादा जिवंत आहेत पण शरीराने नाही ते जिवंत आहेत लोकांच्या मनात लोकांच्या आठवणींमध्ये आणि लोकांच्या भावनांमध्ये कारण लोकांनी एक नेता गमावला नव्हता तर त्यांनी एक ओळखीचा आवाज गमावला होता अजित दादा म्हणजे फक्त एक राजकीय पद नव्हतं ते एका विशिष्ट शैलीच नाव होतं थेट बोलणं ठांब निर्णय आणि संकटाच्या वेळी समोर उभं राहणं गावातल्या शेतकऱ्याला ते आठवतात कारण पाण्याच्या प्रश्नासाठी ते लढले शहरातल्या तरु करुणाला ते आठवतात कारण त्यांनी भीती न बाळकता भूमिका घेतली. कार्यकर्त्याला ते आठवतात कारण मी आहे असं म्हणणारा एक माणूस होता. म्हणूनच जेव्हा ते गेले तेव्हा लोकांच्या मनाने ते स्वीकारायलाच नकार दिला. म्हणून काही लोक म्हणाले ते गेले नसतील हे खरं वाटत नाही आपण त्यांना अजून पाहू ही अफवा नव्हती हा नकार होता दुःख स्वीकारण्याचा नकार मानवी मनाचे एक वैशिष्ट्य असतं जे खूप जवळचं असतं ते अचानक गेलं तर मन ते मान्य करायला वेळ घेतं आई गेल्यावर ती अजून कुठेतरी आहे असं वाटतं वडील गेल्यावर त्यांचा आवाज अजून घरात घुमतो असं वाटतं अजित दादांचही तसंच झालं आजही एखाद्या सभेत एखाद्या निर्णयात एखाद्या संघर्षात लोक नकळत म्हणतात दादा असते तर असं झालं नसतं हेच तर जिवंत असण आहे शरीर संपतं पण प्रभाव संपत नाही......
0 टिप्पण्या