अजित पवार ज्या विमानात बसले होते ते विमान दोन दिवस आधी सुरतला जाऊन आलं होतं जो पायलट आहे तो दोनदा दारू पिऊन सापडला होता. एका नेत्याने अजित पवारांना एका फाईलवर सही करावीच लागेल असा आग्रह केला त्यामुळे अजित पवारांना मुंबईत थांबाव लागलं असे खळबळजनक दावे करत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का? अजित पवारांच्या पायलटच्या मनात काळबेरो होतं का? मुख्य पायलट काहीच का बोलत नव्हते धोका असून सुद्धा उड्डाणाची परवानगी का
देण्यात आली असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले त्यांनी काही चॅट्स दाखवले काही संदर्भ दाखवले आणि हा अपघात नाही तर 100% घातपात आहे असं म्हणत अनेक शंका घेतल्या पण रोहित पवार यांनी नेमके काय आरोप केले कुठल्या शंका घेतल्या पाहूयात या लेखा मधून रोहित पवार यांनी अजित पवार जिवंत आहेत तो त्यांचा मृतदेहच नव्हता या अफवांना उत्तर दिलं ते म्हणाले दादांचा जळालेला स्वेटर त्यांची चप्पल त्यांच घड्याळ आम्ही पाहिलं एवढंच सांगायचं आहे की दादांना काहीही झालं नाही असं आपल्याला वाटत असेल तर ती
घटना झालेली आहे आणि दादा आपल्यात नाहीयेत हे सत्य आहे असं म्हणत त्यांनी आम्ही जी काही माहिती गोळा केली आहे ती तुम्हाला देणार आहे असं म्हणत एक प्रेझेंटेशन दाखवलं ज्यातून त्यांनी काही शंका उपस्थित केल्या काही प्रश्नही विचारले सुरुवात सुरुवातीला रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाराची टाईमलाईन सांगितली सोबतच व्हीएसआर कंपनीची माहिती दिली या कंपनीचे मालक विजय कुमार सिंग सिमी सिंग आणि विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड यांची नाव घेतली सोबतच शेअर होल्डरची नाव सुद्धा पुढे आणली त्यानंतर त्यांनी विमानाची माहिती दिली ज्यात
त्यांनी एक मुद्दा मांडला की दोन दिवस आधी म्हणजे 25 आणि 26 जानेवारीला हे विमान मुंबई सुरत आणि सुरत मुंबई असा प्रवास करून आलं होतं जे व्हीएसआर कंपनीचे मालक आहेत त्यांनी सांगितलं की विमान चांगल्या ल्या स्थितीत आणि मेंटेन होतं वैमानिक अनुभवी होते अपघात विजिबिलिटी मुळे झाला पण प्रत्यक्षदर्शी लोकांच म्हणणं होतं की विमानाचा वेगळाच आवाज येत होता त्यानंतर रोहित पवारांनी विमान हवेत गिरट्या घालत असतानाचा एक व्हिडिओ दाखवला जो दादांच्या अपघातानंतर व्हायरल झाला होता. सीसीटीव्ही मुळे अनेक गोष्टी पुढे येतील असेही रोहित
पवार म्हणाले त्यानंतर रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले विमानात काय बिघाड झालेला की ते बंद पडून एका बाजूला वळलं मेकॅनिकल फेलर होता का? विमान टेकऑफ पूर्वी चेक झालं होतं का? चेक करणारे कर्मचारी कोण होते? विमानाचा टेकलॉक कुठे आहे? विमानाचा एअरवर्दी रिपोर्ट कुठे आहे? विमानाचा रुटीन मेंटेनन्स झाला नव्हता का? कोणी केला होता? हँंगर सीसीटीव्ही का मिळाले नाहीत? विमानाचा हेवी मेंटेनन्स कधी झाला होता? त्याचा रिपोर्ट कुठे आहे असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यानंतर त्यांनी व्हीएसआरच्या लेयर जेट 45 विमानाच्या 2023 मधल्या अपघाताचा व्हिडिओ
दाखवला. हा अपघात मुंबई विमानतळावर झाला होता. त्यावरून ते म्हणाले लोक म्हणतात बारामतीत आयएलएस सिस्टीम नाही म्हणून हा अपघात झाला पण मग मुंबईत सगळं आयएलएस वगैरे असताना तिथे कसा काय अपघात झाला आजवर बारामतीत इतकी विमान आली त्यांचा कसा काय अपघात झाला नाही 2023 मध्ये काय झालं होतं याचा आत्तापर्यंत रिपोर्ट आलेला नाही. अजित पवारांच्या अपघातानंतर या 2023 च्या अपघाताचा रिपोर्ट सप्टेंबर मध्ये येईल असं सांगण्यात आलय. म्हणजे व्हीएसआर कंपनीचा डीजीसीएवर होल्ड आहे का असा प्रश्न उपस्थित होतो पण या अपघाताचा रिपोर्टच आला नाही तो दाबला का? तो आला
असता तर कदाचित आज अजित पवार आपल्यात असते असं रोहित पवार म्हणाले त्यानंतर त्यांनी व्हीएसआर कंपनीवर आणखी एक शंका घेतली. ते म्हणाले व्हीएसआरच्या 2023 मधल्या अपघाताची दखल युरोपियन ईएसए ने घेतली होती. यांनी अपघाताबद्दलची माहिती मागितली पण ती माहिती अजूनही व्हीएसआर कंपनीने दिलेली नाही. ईएसए ने व्हीएसआर कंपनीच्या सगळ्या युरोपातल्या ऍक्टिविटीज बंद केल्या तरी सुद्धा ही कंपनी भारतात कोऑपरेट करते माझे काका गेले एक नेता गेला पण बाकीच्या नेत्यांच काय अजूनही या विमानाने अनेक नेते प्रवास करतात दादांचा अपघात होऊ नये
आज व्हीएसआर कंपनीचा एवढा होल्ड का आम्ही व्हीएसआर कंपनीचे माजी पायलट डीजीसी चे माजी अधिकारी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी या कंपनीबद्दल अनेक खुलासे केले त्यांनी सांगितलं 12 तासांचा गॅप देणं शक्य असताना आणि गरजेचं असताना पाय पायलटला वारंवार उड्डाण दिली जातात ऑकपीट व्ॉईस रेकॉर्डर बंद ठेवलं जातं चेकलिस्ट वापरण्याची पद्धत नाही स्वतःची एसओपी या कंपनीकडे नाही कॉस्ट कटिंग साठी चेक आणि मेंटेनन्स नाही डीजीसीए मधले काही माजी अधिकारी एमआरओ मध्ये काम करतात त्यामुळे अधिक वेळ घालवल्यास कागदपत्रांसोबत छेडछाड
होऊ शकते का अशी शंका सुद्धा त्यांनी घेतली त्यानंतर त्यांनी आणखी एक गंभीर प्रश्न विचारला ते म्हणाले व्हीएसआर कंपनी हेवी मेंटेनन्स योग्य पद्धतीने करत नाही त्यांची सगळी विमान स्वतः मेंटेन केली जातात मग यांना रिपोर्ट कोण देतं अप्रूव्ल कोण देतं रमेश नावाचा माणूस कोण आहे असा प्रश्न त्यांनी विचारला पुढे ते म्हणाले व्हीएसआर मध्ये काम केलेल्या काही माजी पायलट्सने आम्हाला सांगितलं की व्हीएसआर ची सवय आहे की विमानात फेल कॅन घेऊन जायचे म्हणजे फ्युएल रिफिलला वेळ लागणार नाही पुढचं उड्डाण लवकर करता येईल डीजीसीए
अलाऊड करत नाही तरी 50-50 लिटर चे फ्युएल कॅन ठेवतो असं एका माजी पायलटने सांगितलय जिथे ही विमान उतरली तिथला सीसीटीव्ही पाहिला पाहिजे विमानात इलिगली पेट्रोल ठेवला असेल तर ते एखाद्या बॉम्ब सारखंच असतं या कंपनीच्या मालकांवर मनुष्यवदाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या युरोपियन कंपनीने जर यांचा परवाना रद्द केला आहे डीजीसी कडे याची कॉपी आहे तरी तुम्ही व्हीएसआरला का परवानगी देता एवढं सगळं असताना सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे व्हीएसआर कंपनीची विमान का वापरतात असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला. हे विमान बारामतीमध्ये उतरल्यानंतर पाटण्याला
जाणार होतं त्यामुळे पुढचं भाड बुडेल 10 लाख रुपयांच नुकसान होईल म्हणून पायलटवर प्रेशर होतं का? विमान स्टॉल होण्यापूर्वी आधीच अंदाज येतो. या विमानाची स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद होती. स्टॉल वॉर्निंग सिस्टीम शिवाय विमान उडवलंच कसं जात होतं त्यामुळे ही घटना घडली. पीटीटी पुश टू टॉक बटन बंद होतं. कोपायलट इंटरॅक्शन करतात तेव्हा सुद्धा आणि आधी सुद्धा आवाज येत नव्हता. स्टॉल वॉर्निंग सिस्टीम नव्हती ही बाब हेवी बेस मेंटेनन्स मध्ये समोर आली नव्हती का स्टॉल वॉर्निंग सिस्टीम नसल्याचे टेकलॉक मध्ये आलं होतं का विमान अत्यंत खाली होतं मग तिथे ईजी
पीडब्ल्यूएस इशारा दिला होता का असे प्रश्न सुद्धा रोहित पवार यांनी विचारले त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवार यांनी विमान कसं बुक केलं हे सांगितलं ते म्हणाले शासकीय व्हीआयपी व्यक्तींचे विमान बुक करण्यासाठी दोन कंपन्या आहेत एक साई एविएशन आणि दुसरी रो एक ते 15 तारखेपर्यंत साई तर 16 ते 30 तारखे पर्यंत रो कार्यरत असते बुकिंग साठी दोन व् ग्रुप असतात साईचा एक ग्रुप रोचा एक ग्रुप या ग्रुपमध्ये दोन्ही कंपनीचे हँडलर कंपनीचे मालक आणि व्व्हीआयपी व्यक्तींचे सगळे पीए देखील असतात या ग्रुपमध्ये विमान संचलनालय महाराष्ट्राचे डायरेक्टर देखील असतात
रोच्या ग्रुपला 27 तारखेला संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी मेसेज आला आणि विमान बुक करायचा आहे असं सांगितलं म्हणजे 27 तारखेला संध्याकाळी 7 वाजता अजित दादा विमानाने जाणार आहेत हे नक्की झालं त्यानंतर त्यांनी रो नावाच्या कंपनीबद्दल प्रश्न विचारले. ते म्हणाले या कंपनीचे डायरेक्टर पतंजली कंपनीत डायरेक्टर असल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात नसून घातपात आहे अशी शंका घेतली. त्यासाठी राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकातला मजकूर वाचून दाखवला ज्यात मोसाटच्या एका एजंटचा संदर्भ देऊन
लिहिण्यात आले. कधी कधी हत्या करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे चालकाला ठार करणं आणि तेवढंच पुरेस असतं असं म्हणत त्यांनी पायलट सुमित कपूर यांच्यावर सुद्धा शंका घेतल्या त्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांनी ठरलेल्या शेडल नुसार गाडीने न जाता विमानाने जायचं का ठरवलं याबद्दल काही खुलासे केले ते म्हणाले आदल्या दिवशी 27 तारखेला दादा संध्याकाळी मुंबईवरून गाडीने पुण्याला येणार होते ताफा देखील लागला होता पण दादा का निघाले नाहीत तर एक फार मोठे नेते दादांना भेटा भेटायला येणार होते पण ते उशिरा आले त्यात
दादांचा वेळ गेला आणि पाच साडेच ला गाडीने जायचं कॅन्सल झालं आणि दुसऱ्या दिवशीसाठी विमान बुक झालं दादांचे मोबाईल आणि लँडलाईन चेक करा फार महत्त्वाची फाईल आहे सही करावीच लागेल असं म्हणून पूर्व विदर्भातले नेते आलेले ती फाईल घरी नव्हती मंत्रालयातल्या कार्यालयात होती ती फाईल पोहोचेपर्यंत वेळ गेला मोठा नेता आपल्या पक्षाचा बोलत असेल तर काम कराव लागेल त्यामुळे त्याच्यात वेळ गेला संध्याकाळी एका कन्सल्टंट बाबत चर्चा होती एका पॉलिटिकल कन्सल्टंट बद्दल दादा निर्णय घेणार होते. त्यांचं काम फक्त सर्वे करायच आहे. राजकारण कसं करायचं हे आम्हाला शिकू
नये असं दादा त्या कन्सल्टंट बद्दल आमच्याशी बोलले होते असा गंभीर दावा सुद्धा रोहित पवार यांनी केला. त्यानंतर रोहित पवार यांनी विमानाची वेळ पायलट बदलणं याबद्दल प्रश्न विचारले. विमानाची नियोजित वेळ 7:00 वाजण्याची होती. मग विमान 8 वाजून दहा मिनिटांनी का निघालं दादा कायम वेळेच्या आधी पोहोचायचे कधीच उशीर करत नव्हते तर मग विमानाची वेळ का बदलली कोणामुळे उशीर झाला काही जण म्हणतात दादांनी रिस्क घेऊन विमान उतरवायला सांगितलं पण दादा जो एक्सपर्ट असतो त्याचा ऐकायचे आणि रिस्क घ्यायचे नाहीत रोहित पवार यांनी काही ईमेल सुद्धा दाखवले
त्यामध्ये पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि यश असे दोन नाव प्रपोज केलेली पण दुसऱ्या दिवशी कॅप्टन बदलण्यात आले कॅप्टन सुमित आणि शांभवी पाठक हे दोघं ऐनवेळी आले कपूर यांचे मित्र सांगत होते अचानक त्यांना विमान उडवण्यासाठी सांगण्यात आलं मग टेक ऑफच्या आधी पायलट का बदलले गेले आधीचे दोन ट्रॅफिक मध्ये अडकले तर एवढ्या सकाळी कसे अडकले नवीन दोन पायलट जे अपॉईट केले ते लगेच कसे आले ते जवळ राहत होते का सुमित कपूर जर आंतरराष्ट्रीय फ्लाईट करून आले होते तर ते दारू पिऊन आले होते का त्यांना लगेच फ्लाईट का दिली गेली आम्ही
असे प्रश्न उपस्थित करतोय कारण आमचा माणूस गेलाय आम्हाला उत्तर मिळाली पाहिजेत असेही रोहित पवार म्हणाले याबद्दल रोहित पवारांनी प्रश्न प्रश्न विचारले की विमान प्रवासाची पूर्वीची नियोजित वेळ सात वाजता होती तर पायलटने साडेहा वाजता येणं अपेक्षित होतं मग एवढ्या सकाळी कुठे ट्रॅफिक होतं जे पायलट आले नाहीत त्यांचे सीडीआर काढण्यात यावेत तसच पायलट ट्रॅफिकच्या कारणाने आले नसतील तर ट्रॅफिक कॅमेराप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे आधीचे दोन्ही पायलट ट्रॅफिक मध्ये अडकले होते का की एकच पायलट ट्रॅफिक मध्ये अडकला होता ट्रॅफिकमध्ये अडकले होते
त्याचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक का केले नाही एकच पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला असेल तर दोन्ही पायलट का बदलले गेले त्याच त्याच ठिकाणी होते तर मग आधी ते कुठल्या फ्लाईट करून आले होते? त्यांचा एफडीटीएल किती होता? दोन्ही पायलटला ऐनवेळी बदललं तेव्हा त्यांच्या सर्व टेस्ट केल्या होत्या का? त्याचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत? असे प्रश्न सुद्धा रोहित पवारांनी विचारले. त्यानंतर रोहित पवारांनी सुमित कपूर यांचा इतिहास मांडत आणखी काही शंका घेतल्या. त्यांनी सुमित कपूर प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्ट मध्ये दोनदा पॉझिटिव्ह आले
होते हे सांगत दादांच्या निधनानंतर सांत्वनाला आलेल्या एका मोठ्या नेत्याने सांगितलं की त्याला सुद्धा नांदेडला या पायलटने नेलेलं तेव्हा डेंजर लँडिंग केलं त्याची तक्रार मी वेसआर कडे केली होती असेही तो नेता म्हणाला मग त्या तक्रारीचं काय झालं अशी शंका रोहित पवार यांनी घेतली रोहित पवारांनी एक व् चॅट सुद्धा समोर आणलं म्हणाले या चॅट मध्ये कंपनीचा मालक 2 जानेवारी 2026 ला दारू पिण्याबद्दल पार्टी करण्याबद्दल सगळ्यांना वन करतोय ज्यात कॅप्टन सुमित कपूरचे नाव आहे द ग्रेट कॅप्टन सुमित तू नीट रहा इव्निंगचे स्टंट
करू नकोस असं लिहिलय त्याला सुमित कपूर नोटेड सर असं उत्तर देतो मग कसले स्टंट करायचा या कंपनीच एक महत्त्वाच उड्डाण पायलट प्रचंड दारू पिल्यामुळे रद्द झालं होतं असं म्हणत त्यांनी सगळ्या चॅटचा स्क्रीनशॉटच दाखवला. रोहित पवारांनी शेवटच्या एका मिनिटात काय झालं असा प्रश्न सुद्धा विचारला. ते म्हणाले पीआयबी म्हणतं की केंद्राच्या अहवालानुसार 8:18 मिनिटांनी विमान एटीसी च्या संपर्कात आलं. बारामती एटीसी म्हणत 8:19 मिनिटांनी आलं आगीचे लोट 8:44 ला दिसले. एटीसीला 8 वाजून 44 मिनिट 13 सेकंदांनी पायलटचा आवाज आहे ज्यात शांभवी पाठक ओ शिट असं म्हणतात लाईट
रडारचा सिग्नल 8 वाजून 43 मिनिट 18 सेकंदांनी तुटला आहे मग हा सिग्नल एक मिनिट आधी का तुटला या एका मिनिटात काय झालं हा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केला त्यानंतर त्यांनी लँडिंग बद्दल काही प्रश्न विचारले ते म्हणाले बारामतीला रनवे 11 टेबल टॉप आहे आणि रनवे 29 टेबल टॉप नाही 29 साईड ही सोपी साईड होती मग रनवे 11 चा हट्ट का केला 827 ला रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली होती एटीसी ने परवानगी सुद्धा दिली होती पण लगेच दोन मिनिटांनी रनवे 11 ची परवानगी मागण्यात आली एकदा मागितली का तर नाही दुसऱ्यांदा 836 ला गो अराऊंड केल्यानंतर परत मागण्यात
आली परत कॅन्सल केली असं का? त्याच रनवेचा हट्ट का केला? विमान डोंगराळ भागात का नेलं? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. त्यांनी पायलट सुमित कपूर आणि विमान हँडलर कंपनीवर आणखी काही प्रश्न उपस्थित केले. हे म्हणाले 5 km पेक्षा कमी व्हिजिबिलिटी असताना विमान लँड का केलं गेलं? ट्रान्सक्रिप्टनुसार 8:31 मिनिट 11 सेकंदाला पायलटने व्हिजिबिलिटी विचारली असता एटीसी कडून ती 3 km असल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे रोच्या चॅट मध्ये सांगितलं होतं की 7 वाजून दोन मिनिटांनी व्हिजिबिलिटी ओके आहे मग नंतर ती कमी कशी काय होईल? पायलटला जर विजिबिलिटी कमी दिसत
होती तर मग तो का गेला? त्याला स्टंट करायचा होता का? शेवटच्या एका मिनिटात सगळी कनेक्शन तोडण्यात आली जेव्हा एमिंग पॉईंट येण्यासाठी ज्या योग्य अंतरावर विमानाची उंची खाली घेण्यास सुरुवात करायची होती त्या योग्य अंतराच्या पूर्वीच विमान खाली का घेतलं असाही प्रश्न त्यांनी विचारला. रोहित पवारांनी कॉकपेटमध्ये संभाषण झालं नाही असाही दावा केला. ते म्हणाले शेवटच्या क्षणी को पायलट शांभावी म्हणाल्या ओ शिट यानंतर काही सेकंदात विमान कोसळलं पण मुख्य पायलट एकही शब्द बोलला नाही अपघात होताना सुमित कपूर काहीच कसं बोलला नाही मृत्यू समोर असताना पायलट
गप्प असणं याचा अर्थ काय की त्याच्या डोक्यात दुसरं काही सुरू होतं हे विमान आपल्याला लँड करायचंच नाहीये हे विमान क्रॅशच करायचं आहे हे त्याच्या डोक्यात सुरू होतं का अशी शंका रोहित पवार यांनी पायलटवर घेतली त्यानंतर रोहित पवारांनी तपासाबद्दल सुद्धा शंका व्यक्त केली ते म्हणाले सीआयडी कडे तपास दिला आहे पण मागच्या 10 दिवसात त्यांनी फक्त सीसीटीव्ही फुटेज गोळा केला आहे. ते सुद्धा बारामती विमानतळावरच सीआयडीला मुंबई विमानतळावर रनवेवर जायची परवानगी आहे का? सीआयडी दिल्लीत जाऊन व्हीएसआर कंपनीची चौकशी करू शकणार आहे का? जर
त्यांच्याकडे अथॉरिटी नसेल तर ते कसा तपास करतील यात उच्चस्तरीय यंत्रणांचा आणि गरज लागल्यास आंतरराष्ट्रीय विमान अपघात तपास यंत्रणांचा समावेश झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे असेही रोहित पवार म्हणाले शेवटी त्यांनी अजित पवार मागच्या काही दिवसांपासून काचेच्या बाटलीतूनच पाणी प्यायचे प्लास्टिकच्या बाटलीत कोणी काहीही मिसळेत अशी भीती त्यांना होते का असा गंभीर आरोप केला. घातपात असण्याबद्दल आम्हाला व्हीएसआर विमान कंपनी हँडलर रो कंपनी आणि पायलट सुमित कपूर यांच्यावर संशय आहे अशी थेड भूमिका त्यांनी घेतली आपल्याला कुठल्याही राजकीय नेत्याच नाव
यात घ्यायचं नाहीये पण पूर्ण चौकशी होऊन सगळं काही जनतेसमोर आलंच पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली अजित दादांचा अपघात नाही घातपात आहे असं म्हणण्याच कारण त्यांनी सांगितलं दादांचा दौरा बदलणं विमानाची वेळ बदलणं पायलट बदलणं केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल एटीसी ट्रान्सक्रिप्ट यांमधल्या वेळेच्या विसंगती फ्लाईट रडारचा एक मिनिट आधीच बंद पडलेला डेटाव्हिजिबिलिटी कमी असताना लँड करणं रनवेइलेन वर उतरण्याचा आग्रह आधीच विमान कमी उंचीवर आणल जाणं शेवटची काही मिनिट पायलट एकही शब्द बोलला नसणं त्यामुळे आता रोहित पवार यांनी उपस्थित
केलेल्या प्रश्नांबद्दल आरोपांबद्दल आणि शंकांबद्दल काय उत्तर मिळतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल

0 टिप्पण्या