🤔 मुख्यमंत्रीपदावर ममता बॅनर्जी ठाम! राजीनामा देण्याची कोणतीही चर्चा नाही? काय आहे नेमका वाद? #TMC #BJPBengal #Polictics


सोमवारी चार मे ला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. सलग 15 वर्षांपासून सत्तेत असलेली टीएमसी या निवडणुकीत 100 जागांचा आकडा सुद्धा पार करू शकली नाही. स्वतः ममता बॅनर्जी या त्यांच्या भवानीपूर या बाले किल्ल्यातन पराभूत झाल्या. निकाल लागल्यानंतर आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती सरकार स्थापनेची. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट आहे पण त्याआधी राज्यामध्ये पुन्हा मोठा गोंधळ सुरू


झालेला आहे ममता बॅनर्जी यांनी पराभूत झाल्यानंतर सुद्धा आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीये असं म्हटलय त्यांनी मंगळवारी प्रेस कॉन्फरन्स घेत ही माहिती दिली आहे त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये नवा राजकीय पेच निर्माण झालेला आहे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा जर राजीनामा दिला नाही तर राज्यात नव सरकार कस स्थापन होईल भाजपचा मुख्यमंत्री मंत्री कसा होईल असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच निवडणुकीनंतर बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळलेला पाहायला मिळालाय. राज्यातल्या अनेक ठिकाणी


हिंसाचाराच्या घटना या समोर आलेल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये नक्की घडतय काय? ममता बनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार का दिलाय? आणि यामुळे राज्यामध्ये नव सरकार कधी स्थापन होणार होणार की नाही? सध्या घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटना नेमक्या आहेत काय? सगळी माहिती समजून घेऊयात आजच्या लेखात. सुरुवातीला ममता बॅनर्जी यांचं नेमकं म्हणणं काय ते समजून घेऊयात तर चार मे ला विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पाच मे च्या दुपारी प्रेस कॉन्फरन्स घेतली.


यावेळी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना त्यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत गंभीर असे आरोप केलेत. ममता बॅनर्जी म्हणाल्यात की तृणमूल काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झालेला नाहीये. निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पक्षपाती भूमिका बजावली. निवडणूक आयोग खरा विलाय. त्यांनी भाजप सोबत मिळून आमच्या 100 जागा लुटलेल्या आहेत असं ममता बॅनर्जी यांच म्हणण आहे. ममता बॅनर्जी यांना यावेळी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांकडन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या असं म्हणाल्या की मी राजीनामा देणार नाही कारण माझा

पराभव झालेला नाहीये. मी राजभवनात जाणार नाही ते ऑफिशियली आम्हाला हरवू शकतात पण नैतिक दृष्ट्या ही निवडणूक आम्ही जिंकलेली आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरती आणखी अनेक गंभीर असे आरोप केले. त्या असं म्हणालेत की मी माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारची निवडणूक कधीच पाहिली नाही. एसआयआरच्या नावाखाली 90 लाख मत ही वगळण्यात आली. मतमोजणीची फक्त पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर भाजपन 195 ते 200 जागा जिंकण्याचे दावे सुरू केले. त्यांनी अंतिम निकालाची वाटही पाहिली नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं सीआरपीएफचा गैरवापर केला. पोलीस


अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या. केंद्रीय दलांना गुंडांप्रमाणे तैन्यात करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी मतदार आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमक्याही देण्यात आल्या होत्या. आमचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबावर अत्याचार करण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते हे मतदान केंद्रांमध्ये घुसून बूथ एजंट्सना मारहाण करत होते असे अनेक गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या निकालानंतर भाजप वरती केलेले आहेत. ममता बॅनर्जी यांनी यावेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही केलाय. त्या म्हणाल्यात की जेव्हा मी स्वतः


मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला रोखण्यात आलं. ममता यांच्या म्हणण्यानुसार मतमोजणी केंद्राला हायजॅकही करण्यात आलं. सीसीटीव्ही कॅमेरेज बंद करण्यात आले होते. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत फेरफार करण्यात आला होता. त्या म्हणाल्या की त्यांना धक्के देऊन बाहेर काढण्यात आलं. माझ्या पोटावर आणि पाठीवर मारहाण करण्यात आली असा देखील खळबळजनक आरोप ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे. निवडणुकीत हे सगळं घडल्यानंतर आता मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असं देखील ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलेल आहे. त्यामुळे आता प्रश्न उभा


राहतो की पुढे काय होणार? जर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही तर पश्चिम बंगालमध्ये नव सरकार कसं स्थापन होईल. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की नाही? ते समजून घेण्यासाठी आपण बघूयात की आता पश्चिम बंगालमध्ये विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ जो आहे तो 7 मेच्या दिवशी संपतोय. त्यानंतर राज्यामध्ये नव्या सरकारची स्थापना केली जाईल यासाठी मावळत्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी हे स्वतःहूनच करणं अपेक्षित असतं पण जर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यासाठी नकार दिला तर संविधानानुसार मग


राज्यपालांना विशेष अधिकार प्राप्त होतात. अशा परिस्थितीत राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी करू शकतात. मात्र तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला तर राज्यपालांना थेट विधानसभा विसर्जित करण्याचे अधिकार असतात. एकदा विधानसभा विसर्जित झाली की मुख्यमंत्र्यांचा पदावर राहण्याचा कायदेशीर आणि घटनात्मक अधिकारच आपोआप संपुष्टात येतो. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला तर अशा परिस्थितीत राज्यपाल मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ देखील करू शकतात. जर मुख्यमंत्र्यांकडन काही हालचाल करण्यात


आली किंवा एखादं राजकीय संकट निर्माण झालं तर राज्यपाल हे घटनेच्या कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट हे लागू करण्याची शिफारसही करू शकतात. पण पश्चिम बंगाल मध्ये हे होण्याची शक्यता नाहीये. कारण राज्याचे निकाल स्पष्ट आहेत. राज्यात भाजपला संपूर्ण बहुमत मिळालेल आहे त्यामुळे इथे घटनात्मक संकटाची परिस्थिती नाहीये असं चित्र दिसतं. आता पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारची स्थापना कशी होईल ते देखील पाहूयात. तर घटनेच्या कलम 164 अंतर्गत राज्यपालांकडे नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याचा आणि त्यांना पदाची शपथ देण्याचा अधिकार असतो.


सरकार बरखास्त झाल्यानंतर आणि निवडणुकीत पराभूत झालेले मुख्यमंत्री यांना बडतर्फ केल्यानंतर राज्यपाल विजयी आमदारांनी निवडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून निवड करू शकतात. अशाप्रकारे नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जरी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही तरी निवडणुकीत जनतेने जो कौल दिलेला आहे त्यानंतर त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून पदावरती राहू शकत नाहीत. राज्यपाल आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून त्यांचे अधिकार या


तात्काळ काढून घेऊ शकतात आणि राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू करू शकतात पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी स्पष्ट केलय की राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 9 मे रोजी पार पडणार आहे त्यामुळे आता भाजप कडन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निवडीला वेग आलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उद्याच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत असं कळतय आता एकीकड हे सगळं घडत असताना दुसरीकडे निवडणूक आटोपल्यानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात


झाली आहे. मागच्या 24 तासात राज्यामध्ये चार जणांची हत्या झाली आहे यात भाजपचे दोन आणि तृणमूलचे दोन कार्यकर्ते आहेत असं सांगण्यात येतय. भाजपचा असा आरोप आहे की तृणमूलच्या गुंडांनी उत्तर 24 परगणाच्या न्यू टाऊन आणि हावडाच्या उदयनारायणपूर इथे दोन कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. तर टीएमसीचा आरोप आहे की त्यांच्या दोन कार्यकर्त्यांची कोलकाताच्या बेलेघाट आणि बिरभूमच्या नानोर इथे हत्या झाली आहे. मंगळवारी रात्री उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या संदेशखाली इथे गस्त घालणाऱ्या पोलीस आणि केंद्रीय दलांवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी गोळीबार


केला ज्यात पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एक हवालदार एक महिला पोलीस अधिकारी आणि केंद्रीय दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. इकडे कोलकाताच्या न्यू मार्केटमध्ये सुद्धा हिंसाचार झालेला आहे तिथे जमावान बुलडोजरचा वापर करून तृणमूल काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाची नासधूस केली. दंगेखोरांनी परिसरातल्या दुकानाचही नुकसान केलय. टीएमसीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय. टीएमसीन असं लिहिलंय की भाजपचं परिवर्तन आय. ते आपल्यासोबत बुलडोझर घेऊन आलेले आहेत. आणखी एका घटनेत तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक

बॅनर्जी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. टीएमसी चा असा आरोप आहे की ही तोडफोड भाजप समर्थकांनी केली आहे तसच पोस्टर्स आणि बॅनर्सही फाडून टाकले. मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये लेनिनच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. लेनिन हा डाव्या विचारसरणीच्या रशियन क्रांतिकारी होता. ज्याने 1917 च्या रशियन क्रांतीचे नेतृत्व हे केलेलं होतं. जगत बल्लपूर इथे टीएमसी कार्यालयाला देखील आग लावण्यात आली. तृणमूलन भाजप समर्थकांवर जाळपोळीचा आणि आग लावल्याचा आरोप केलेला आहे. थोडक्यात काय तर पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आटोपल्यानंतर सुद्धा गदारोळ काही

थांबलेला नाहीये. आता ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला नकार दिल्यानं गोंधळ वाढलेला दिसतोय. पण राज्यपालांकडे सरकार बरखास्तीचे अधिकार असल्यान राज्यात आता नव सरकार स्थापन व्हायला कोणतीही अडचण येणार नाही हे स्पष्ट आहे. आता बंगालमध्ये भाजपच सरकार नेमकं कधी स्थापन होतं राज्याचा नवा मुख्यमंत्री नेमकं कोण असतो आणि राज्यातल्या हिंसाचाराच्या घटना कधी थांबतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी या सगळ्या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जी यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर जे आरोप केलेले आहेत त्याबद्दलची

तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी वाचण्यासाठी unik मराठी चॅनलला सबस्क्राईब करा







#ममताबॅनर्जी #बंगालराजकारण #भाजप #BJPIndia  
#WestBengal #PoliticsIndia #IndianPolitics  
#TMCvsBJP #BreakingNews #PoliticalUpdate  
#बंगालनिवडणूक #सत्तांतर #राजकारण  
#IndiaNews #TrendingNow #NewsUpdate  
#MarathiNews #मराठीबातम्या #LatestNews  
#BengalPolitics #ElectionTalk #PoliticalDebate

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या