पश्चिम बंगालच्या सर्वात ताकदवान नेत्या,3 वेळा सलग मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव . कोणत्या कारणामुळे?

 

,3 वेळा सलग मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव . कोणत्या कारणामुळे?

वयाच्या 29व्या वर्षी खासदार 36साव्या वर्षी केंद्रीय राज्यमंत्री 42व्या वर्षी एका राजकीय पक्षाच्या संस्थापिका 44 व्या वर्षी केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि 56 व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्री ही ओळख आहे एका महिला नेत्याची अशा नेत्या ज्यांनी तब्बल 34 वर्ष सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना सत्तेतन बाहेर केलं त्यांनी पुढची सलग 15 वर्ष त्या मुख्यमंत्री राहिल्या त्यांनी दोन वेळा राज्यामध्ये दोन तृतींश बहुमत मिळवलं एकीकडे भाजपन देशभरात विजयाचा सपाटा लावलेला असताना त्या पक्षाला त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान


मोदींना अमित शहांना नडणाऱ्या नुसत्या नडता त्या सगळ्यांना पुरण उरणाऱ्या एकमेव महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं या नेत्या म्हणजे अर्थातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी चार मे च्या दिवशी पश्चिम बंगालच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा भाजप भाजप च्या हातून दारुण पराभव झालाय आणि ममता बॅनर्जी सत्तेतन बाहेर फेकल्या गेल्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव नाहीये तर त्या स्वतः त्यांच्या भवानीपूरच्या बाले किल्ल्यातन सुद्धा पराभूत झाल्यात
भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केलाय पण एकेकाळी मोदी अमित शहा यांना नडणाऱ्या ममता बॅनर्जी विरोधकांचा खंबीर आवाज मानल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी त्यांच्यावरती आज ही वेळ का आली आहे एकेकाळी पश्चिम बंगालच्या सगळ्यात ताकदवान नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी आता पराभूत कशा झाल्या त्यांचा इतका मोठा डाऊनफॉल कसा झाला सगळा राजकीय प्रवास आणि ममता बॅनर्जींच्या डाऊनफॉलची स्टोरी पाहूयात आजच्या बातमी मधून तर ममता बॅनर्जी यांचा डाऊनफॉल जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री


पदापर्यंत कशी मजल मारलेली हे सुद्धा पाहणं गरजेच आहे यासाठी आपल्याला 20 वर्ष मागे जावं लागतं तो काळ होता 20067 च्या आसपासचा पश्चिम बंगाल मध्ये तेव्हा डाव्या पक्षांच सरकार सत्तेत होतं या सरकारन राज्यातल्या सिंगूर इथे टाटा कंपनीला नॅनो कारचा कारखाना उभारण्यासाठी 1000 एकर जमीन उपलब्ध करून दिली होती पण म आरोप झाला की ही जमीन सुपीक आहे आणि बंगालचे शेतकरी त्यांची जमीन सोडण्यासाठी तयार नाहीयेत शेतकऱ्यांचा सरकारकडन होत असलेल्या जमीन अधिग्रहणाला विरोध होता त्यावेळी ममता बनर्जी या शेतकऱ्यांच्या नेत्या म्हणून


पुढे आल्या त्यांनी सरकार विरुद्ध मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली त्या उपोषणाला सुद्धा बसल्या पुढे सिंगूर पाठोपाठ नंदीग्राम इथे सुद्धा अशा प्रकारच आंदोलन सुरू झालं बंगालच्या डाव्या सरकारने नंदीग्रामची 14 ह000 एकर जमीन एका कंपनीला केमिकल हब उभारण्यासाठी दिली होती पण शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणाला विरोध केला ज्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. त्यावेळी नंदीग्रामचा एक तरुण नेता आंदोलनाचा चेहरा म्हणून पुढे आला होता तो ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा सदस्य होता. जो पुढे जाऊन ममता बॅनर्जी यांचा राईट हँड आणि नंतर त्यांचा कट्टर


शत्रू झाला. हा नेता म्हणजे सुवेंदू अधिकारी. त्यावेळीस सिंगूर आणि नंदीग्राम मध्ये जी आंदोलन झाली त्या आंदोलनांनी बंगालच्या राजकारणाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. या आंदोलनादरम्यान 14 मार्च 2007 च्या दिवशी बंगाल पोलिसांनी नंदीग्राम इथे आंदोलकांवर गोळीबार केला. ज्यात तब्बल 14 आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलन आणखीनच तापलं. शेवटी सरकारलाच माघार घ्यावी लागली. नंदीग्राम आणि सिंगोर या दोन्ही ठिकाणची जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली. या आंदोलनाचा पश्चिम बंगाल मधल्या डाव्या सरकारला मोठा हादरा बसला.


आंदोलनानंतर ममता बॅनर्जी शेतकऱ्यांच्या सामान्य वर्गांच्या नेत्या म्हणून पुढे आल्या. बंगाल मधल्या सत्तेचा पाया कमकुवत होतोय याचीच ही चिन्ह होती. त्यानंतर आली 2011 सालची पश्चिम बंगालची निवडणूक. ही निवडणूक खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरली. सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनाने राज्यभरात हिरो बनलेल्या ममता बॅनर्जींनी या निवडणुकीत डाव्या पक्षांचा पूर्णपणे सफाया केला. राज्यात पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. ममता बॅनर्जींच्या पक्षानं 294 पैकी तब्बल 184 जागा जिंकल्या. तर तीन दशकांपासून सत्तेत


असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला फक्त 40 जागांवरती समाधान मानावं लागलं. ममता बॅनर्जी यांनी प्रचंड मोठ्या अंतरान ही निवडणूक जिंकली आणि पहिल्यांदा त्या बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. अशाप्रकारे बंगालमध्ये ममता यांच्या कार्यकाळाला सुरुवात झाली. पुढे 2014 केंद्रात सत्ता बदल झाला. काँग्रेसच्या नेतृत्वातल यूपीएच सरकार जाऊन भाजपच एनडीए सरकार सत्तेत आलं. नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना एनडीए कडून होत्या ना यूपीए कडन. त्या दोन्हींपासून सारखंच अंतर राखून होत्या. 2011 ते 2016 या पाच वर्षात ममता


बॅनर्जींनी बंगालमध्ये त्यांच्या पक्षाचा मोठा विस्तार केला राज्यात अजूनही त्यांची मुख्य फाईट कम्युनिस्ट पार्टी सोबतच होती कारण बंगालमध्ये अजून भाजपची एन्ट्री व्हायची होती त्यानंतर 2016 ची विधानसभा निवडणूक सुद्धा ममता बॅनर्जींनी वन साईड जिंकली त्यांच्या पक्षाला 294 पैकी तब्बल 211 जागांवर विजय मिळाला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला 44 तर कम्युनिस्ट पक्षाला अवघ्या 26 जागा मिळाल्या या निवडणुकी की पासून राज्यात खऱ्या अर्थाने डाव्या पक्षांचा डाऊनफॉल हा सुरू झाला आणि ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या निर्विवाद नेत्या म्हणून समोर


आल्या पण त्यानंतर ममता बॅनर्जी यांना एका पक्षाने चॅलेंज दिलं ज्यान पुढे जाऊन ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून लावली हा पक्ष म्हणजे अर्थातच भाजप 2016 च्या निवडणुकीत फक्त तीन जागा जिंकणाऱ्या भाजपन आता आपल्याला सगळं लक्ष बंगालवरती केंद्रित केलं होतं 2018 राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना झाला यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासन भाजपन खऱ्या अर्थाने बंगालमध्ये प्रवेश केला त्या निवडणुकीत भाजपन बंगालमध्ये तब्बल 18 खासदार निवडून आणले हा ममता


बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला बसलेला पहिला धक्का होता. याच काळात बंगालमध्ये शारदा चिटफंड घोटाळा, रोज व्हॅली चिटफंड घोटाळा, नारद स्ट्रिंग ऑपरेशन, शिक्षक भरती घोटाळा असे अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले. सुवेंदू अधिकारी मुकुल रॉय यांच्यासारख्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच काळात भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातली राजकीय लढाई हिंसक झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक हिंसक आंदोलन झटापटी सुद्धा झाल्या. यावेळी 2021 पर्यंत भाजपनं बंगालमध्ये आपला चांगला जम बसवला होता. सीपीएम आणि काँग्रेसला बाजूला करून


भाजप राज्यातला मुख्य विरोधी पक्ष झालेला 2021 ची विधानसभा निवडणूक ही पहिली निवडणूक होती जिथे थेट भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी फाईट झाली. भाजपन त्या निवडणुकीत आपली सगळी ताकद लावलेली. पक्षान सीएए एनआरसीचा मुद्दा उचलून धरला होता. बंगालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बांगलादेशी घुसकोरांचा मुद्दा भाजपन चर्चेत आणला पण ममता बॅनर्जी या सगळ्यासाठी तयार होत्या. भाजपच्या ध्रुवीय राजकारणाचे उत्तर त्यांच्याकडे निश्चित होतं ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या आधी लक्ष्मी भंडार योजना सुरू केली या योजने अंतर्गत 25 ते 60 वर्षांच्या महिलांना दर


महिन्याला पं00 ते स00 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. ममता बॅनर्जी या सुरुवातीपासूनच महिलांमध्ये प्रसिद्ध होत्या. ही योजना जाहीर करत त्यांनी महिलांची मत आपल्यालाच मिळतील याची खात्री करून घेतली. 2021 च्या निवडणुकी दरम्यान एक अशी घटना घडलेली ज्यामुळे प्रचाराची सगळी दिशाच बदलली. झालेलं असं की प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. पण त्यांनी आराम न करता प्लास्टर लावून व्हीलचेयर वर बसून निवडणुकीचा प्रचार केला. याचा मोठा परिणाम मतदारांवरती झाला. ममता बॅनर्जी यांची सुरुवातीपासूनची इमेज ही स्ट्रीट फायटर


म्हणजे रस्त्यावरती उतरून लढणाऱ्या नेत्या अशीच राहिलेली आहे. सिंगूर नंदीग्राम सारख्या आंदोलनापासन त्यांनी ही इमेज तयार केलेली आहे. 21 च्या निवडणुकीत बंगालच्या जनतेन या जुन्या ममता बॅनर्जींना पुन्हा एकदा पाहिलं. रस्त्यावरती उतरून लढणाऱ्या कधीच हार न मानणाऱ्या ममता बॅनर्जी या निवडणुकीत सगळ्यांना दिसल्या. निकाल लागला आणि ममता यांनी विजयाची बंगालमध्ये हॅट्रिक केली. तृणमूल काँग्रेसन 294 पैकी तब्बल 215 जागा जिंकल्या टीएमसीला राज्यामध्ये 48% मत मिळाली. ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. पण या निवडणुकीत त्यांच्यासाठी एक


वेकअप कॉल होता. तो म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेल्या भाजपनं बंगालमध्ये तब्बल 77 जागा जिंकल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे पक्षानं बंगालमध्ये 38% मत घेतली होती. आता बंगालची लढाई फक्त तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच होणार आहे हे मात्र या निवडणुकीपासन क्लियर झालं पण मग पुढच्या पाच वर्षात असं काय झालं की सलग तीन निवडणुका एक हाती जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यंदाच्या निवडणुकीत 100 चा आकडा सुद्धा पार करू शकल्या नाहीत त्यांचा बंगालमध्ये इतका मोठा डाऊनफॉल कसा झाला तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रवेश झाल्यावर


राज्याच राजकारण धार्मिक मुद्द्यांच्या अवतीभवती फिरायला लागलं सीए असू देत एनआरसी असू देत बांगलादेशी घुसकोर असू देत मूर्ती स्तुती विसर्जनावरचा वाद, दुर्गापूजेवरचा वाद, रामनवमीची सुट्टी. प्रत्येक मुद्द्यावरन राज्यात ध्रुवीकरण व्हायला लागलं. बंगाल मधले मुस्लिम मतदार हा ममता बॅनर्जी यांचा हक्काचा मतदार राहिलेला आहे. यावरन भाजपनं ममता यांना घेरायला सुरुवात केली. ममता बॅनर्जी या हिंदू विरोधी आहेत. त्या मुस्लिम धारिने ही भाजपच्या प्रचाराची लाईन होती. भाजपला बंगालचे राजकारण हिंदू विरुद्ध मुस्लिम, असं करायचं होतं. ममता बॅनर्जी यांच्या


राजकारणाची स्टाईल अशी आहे की भाजपला हे करणं फारस अवघडच गेलं नाही ममता बॅनर्जी यांचे नमाज अदा करतानाचे व्हिडिओज व्हायरल झाले जय श्रीराम म्हटल्यानंतर त्यांचा पारा चढल्याचा व्हिडिओ सुद्धा तुफान व्हायरल झाला या सगळ्याद्वारे भाजपला ममता बॅनर्जी हिंदू विरोधित आहेत असं नरेटिव्ह उभा करणं सोपं गेलं ममता बॅनर्जी या भाजपच्या ट्रॅप मध्ये अडकत गेल्या आणि याचा फायदा भाजपला होत गेला. या पाच वर्षात बंगाल मधली हिंदू मत हळूहळू ममता बॅनर्जी यांच्यापासन दूर होत गेली पण अजूनही ममता यांना बंगालच्या महिलांचा पाठिंबा होता. त्या मतांच्या जोरावरतीच


त्यांनी 2021 ची निवडणूक जिंकलेली होती पण ही महिला मत सुद्धा ममता बनर्जी यांच्यापासन दूर केली ज्यासाठी कारणीभूत ठरली 2024 सालची एक घटना 9 ऑगस्ट 2024 ला कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी महिला डॉक्टर सोबत अत्याचाराची घटना घडलेली तिच्यावरती अत्याचार करत तिची निर्घुडपणे हत्या करण्यात आलेली या घटनेने बंगालच राजकारण ढवळून निघालं ज्या राज्याची मुख्यमंत्री महिला आहे त्या राज्याच्या राजधानीतच अशी घटना घडते याचा मोठा परिणाम मतदारांच्या आणि महिलांच्या मानसिकतेवर झाला. ही घटना ममता बॅनर्जी यांच्या इमेजला डॅमेज करणारी ठरली. या


घटनेनंतर बंगालमध्ये आता महिला सुरक्षित नाहीयेत. हे चित्र भाजपन उभं करायला सुरुवात केली याच उत्तर मात्र ममता बनर्जी देऊ शकल्या नाहीत आणि अशा प्रकारे ज्या महिला मतांच्या जोरावरती ममता बॅनर्जी यांनी बंगालची सत्ता काबीज केलेली ती मतच त्यांच्यापासन यंदाच्या निवडणुकीमध्ये दूर झाली खरं तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा डाऊनफॉल हा काही एका दिवसात झालेला नाही तो टप्प्याटप्प्याने होत गेला सगळ्यात आधी बंगालची हिंदू मत ममता बॅनर्जीपासन दूर झाली उत्तर बंगाल हा हिंदू बहुल भाग आहे भाजपने सगळ्यात आधी त्याच भागात आपली पकड मजबूत केलेली


त्यानंतर राज्याचे युवा आणि तरुण मतदार ममता बॅनर्जीपासन दुरावले. ममता बॅनर्जी सत्तेत येण्याआधी तब्बल 34 वर्ष बंगालमध्ये डाव्यांचे सरकार होतं त्या काळात बंगाल हा औद्योगीकरण आणि रोजगार निर्मितीच्या शर्यतीत इतर राज्यांपासन बराच मागे गेलेला. ममता बॅनर्जी हे सगळं चित्र बदलतील. त्या बंगालमध्ये उद्योग धंदे रोजगार आणतील अशी अपेक्षा बंगाली लोकांना होती. पण ते काही घडलं नाही डाव्यांच्या काळात बंगालची जी आर्थिक दुरावस्था झाली होती ती परिस्थिती सुधारण्यात ममता बॅनर्जी अपयशी ठरल्या सिलिगुडी कोलकत्ता यांच्यासारख्या
औद्योगिक पट्ट्यांमध्ये मोठ्या कंपन्या आणण्यामध्ये ममता बॅनर्जींना अपयश आलं त्यामुळे राज्यातली बेरोजगारी चांगलीच वाढली. याच काळात ओडिसा तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये गुंतवणुकीचा ओग वाढला हे राज्य बंगालला मागे टाकत पुढे निघून गेली. त्यामुळे बंगाली तरुणांना आपण मागे पडत असल्याची जाणीव व्हायला लागली. बंगालमधले सुशिक्षित मध्यमवर्गीय या ममता बॅनर्जींचा मूळ मतदार होता पण या तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये जाणं भाग पडल्यान ते ममता बॅनर्जी यांच्यापासून दूर व्हायला लागले आणि अशाप्रकारे आधी हिंदू मतदार मग तरुण युवा मतदार आणि शेवटी महिला


मतदार सगळ्यांनी ममतांची साथ सोडली आणि त्यांचा बंगालमध्ये इतका मोठा पराभव झाला. थोडक्यात काय? तर ममता बॅनर्जी यांचे जमीन आंदोलनातन पुढे येणं डाव्यांची 34 वर्षांची सत्ता उलथवून लावणं ही घटना ऐतिहासिक होती. त्यानंतर त्यांनी सलग तीन वेळा निवडणूक एक हाती जिंकणं त्या सलग 15 वर्ष मुख्यमंत्री सुद्धा राहिल्या ही घटना भारतीय राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा फार मोठी आहे पण सोबतच मागच्या काही वर्षात बंगालच्या बदललेल्या राजकारणामुळे त्यातच त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे बंगालमध्ये त्यांचा डाऊनफॉल होत गेला. आता
ममता बनर्जी या डाऊनफॉल मधन नेमक्या कशावर येतात त्या पुन्हा बंगालमध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं बंगालमध्ये ममता बनर्जी यांच्या डाऊनफॉल मागच नेमकं कारण काय याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी वाचण्यासाठी unik मराठी 365 ला सबस्क्राईब करा


ममता बॅनर्जी पराभव
वेस्ट बंगाल निवडणूक निकाल
West Bengal election results
Mamata Banerjee defeat news
बंगाल राजकारण बातम्या
Indian politics latest news
Marathi political blog
Unikmarathi365



#ममता_बॅनर्जी #WestBengalPolitics #ElectionResults #PoliticalNews #MarathiBlog
#IndianPolitics #BreakingNews #Unikmarathi365 #BengalElection #TrendingNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या