अपोलो 17 नंतर तब्बल ५४ वर्षांनी नासा पुन्हा एकदा 4 मनुष्यांना घेऊन चंद्राच्या दिशेनं झेपावलाय. Mission Moon नासानं इतक्या वर्षांनंतर चंद्राच्या दिशेनं मानवाला पाठवण्याचा निर्णय का घेतला? Artimis 2 या मिशनद्वारे नासा नेमकं काय साध्य करणार आहे? या सगळ्यामध्ये चीनचा काय रोल आहे?
जागतिक स्तरावर इराण इस्राईल अमेरिका युद्धजन्य परिस्थिती असताना देखील अमेरिकेनी आपले संशोधनाचे कार्य निरंतर सुरूच ठेवले आहे . 7 डिसेंबर 1972 या दिवशी नासाचा अपोलो से स्पेस मिशन लॉन्च झालं होतं हे तेच मिशन होतं ज्याद्वारे मानवान अखेरच्या वेळी चंद्रावरती पाऊल ठेवलं जीन सेरनन आणि हॅरिसन हेगन स्मिट नासाचे दोन अंतराळवीर त्यावेळी चंद्रावरती उतरले होते या मिशन नंतर नासान चंद्रावरती अनेक मोहिमा आखल्या पण कोणत्याच मोहिमेत मानवाचा सहभाग नव्हता आता अपोलो से नंतर तब्बल 54 वर्षांनी नासा पुन्हा एकदा मानवाला घेऊन चंद्राच्या दिशेने झेपावलाय. नासाच्या चार अंतराळवीरांनी 2 एप्रिलच्या पहाटे अमेरिकेच्या फ्लोरिडा इथून उड्डाण केलं ते स्पेसक्राफ्ट मध्ये बसून चंद्राच्या दिशेने गेले.
या मिशनला मागच्या पाच दशकातल जगातलं सर्वात महत्त्वाचं स्पेस मिशन म्हणलं जातय. सध्या या मिशनची चर्चा जगभरात सुरू आहे. पण नासाच हे मिशन नेमक आहे काय? नासाने इतक्या वर्षांनंतर चंद्राच्या दिशेने मानवाला पाठवण्याचा निर्णय का घेतला? एवढी वर्ष अशा प्रकारची मिशन्स का होत नव्हती? या मिशन द्वारे नासा नेमकं काय साध्य करणार आहे? आणि या सगळ्यांमध्ये चीनचा काय रोल आहे? समजून घेऊयात या बातमी मधून. सगळ्यात आधी नासा चे मिशन आहे काय? ते पाहू. नासाच्या या ऐतिहासिक मिशनच नाव आहे आर्टेमीस टू.
भारतीय वेळेनुसार गुरुवारी 2 एप्रिलच्या पहाटे 4:05 मिनिटांनी हे मिशन लॉन्च झालं. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून नासाचे चार अंतराळवीर ओरायन स्पेसक्राफ्ट मध्ये बसून चंद्राच्या दिशेने झेपावले रीड वाईजमन व्हििक्टर ग्लोवर आणि क्रिस्टीना कोच हे तीन अंतराळवीर अमेरिकन नागरिक आहेत तर जेरेमी हन्ससेन हे कॅनेडियन आहेत अपोलो से मिशन नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा ह्युमन स्पेसशिप लो अर्थ ऑर्बिट पार करून चंद्राच्या जवळ पोहोचेल हे चार अंतराळवीर चंद्राभोवती जवळून प्रदक्षिणा घालतील त्यानंतर पृथ्वीवर परततील हे एकूण 10 दिवसांचे मिशन असेल.
या दरम्यान अंतराळवीर चंद्राच्या दुसऱ्या बाजूलाही प्रवास करणार आहेत. चंद्राची ही अशी बाजू आहे जी पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. तसं पाहायला गेलं तर या मिशनचं लॉन्चिंग सोप्पं नव्हतं. टेकऑफच्या फक्त एक तास आधी रॉकेटच्या लॉन्च अबाउट सिस्टीम मध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळं ऐन वेळेवर लॉन्चिंग कॅन्सल होतं की काय असं वाटत होतं. पण रॉकेटच्या इंजिनियर्सन ही अडचण काही वेळातच दूर केली यादरम्यान सेफ्टी चेक साठी काउंटडाऊन 10 मिनिट थांबवण्यात आलं होतं त्यानंतर जेव्हा इंजिनियर्स कडून ऑल क्लियर हा मेसेज आला तेव्हा लॉन्चिंग करण्यात आलं आता पुढच्या दहा दिवसात हे अंतराळवीर तब्बल 11 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहेत यावरून हे मिशन किती मोठं आहे हे लक्षात येतं आता महत्त्वाचा प्रश्न नासा हे सगळं का करतोय या मिशन द्वारे नासाला नेमकं काय साध्य करायचंय? तर नासाचा उद्देश आहे स्पेसक्राफ्टच्या लाईफ सपोर्ट सिस्टीमची चाचणी करणं. नासाला हे पाहायचंय की अंतराळात मानवाचं राहणं सुरक्षित आहे का? नासाच हे अंतराळ यान प्रत्यक्ष चंद्रावरती उतरणार नाही. मात्र भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत बनवण्याच्या दृष्टीने हे मिशन महत्त्वाच आहे. खरं तर नासाला 2028 पर्यंत पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवायचंय. त्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे. नासान 2022 मध्ये आर्टेमिस वन अंतर्गत मानवररहित यान चंद्राच्या दिशेने पाठवलेलं आता 2026 मध्ये आर्टेमिस टू अंतर्गत चार अंतराळवीर चंद्राच्या दिशेने पाठवले आहेत. हे मिशन सक्सेसफुल झालं तर 2028 मध्ये आर्टमीस थ्री मिशन राबवल जाईल ज्यामध्ये 1972 नंतर पहिल्यांदाच मानवाला चंद्रावर उतरवल जाईल त्यामुळेच हे मिशन एवढं महत्त्वाच आहे आणखी एक प्रश्न म्हणजे नासा इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानवाला पाठवण्याचे मिशन का आखतोय मागच्या 50 वर्षात अशा प्रकारचे मिशन का राबवण्यात आले नाहीत तर 1960 आणि 70 च्या दशकात नासान अशा प्रकारचे अनेक मिशन्स राबवले होते कारण त्याकाळी अमेरिका आणि सोवियत युनियन यांच्यात स्पेस रेस सुरू होती. सोवियत युनियनन 1961 युरी गागारीन यांना अंतराळ्यात पाठवलं त्या अंतराळात जाणारे जगातले पहिले व्यक्ती ठरले. याला उत्तर म्हणून अमेरिकेन अपोलो स्पेस मोहीम सुरू केली. या मोहिमे अंतर्गत नासान 1969 पहिला मानव चंद्रावर उतरवला. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावरती पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती ठरले. 1960 आणि 70 च्या दशकात अमेरिका आणि सोवियत युनियन यांच्यातली स्पेस रेस अत्यंत तीव्र असल्यामुळे त्याकाळी अशा अनेक मोहिमा राबवल्या गेल्या पण नंतर 1980 च्या दशकापासून सोवियत युनियनची ताकद कमी व्हायला लागली. 1991 सोवियतच विघटन झालं त्यानंतर अमेरिका जगातली एकमेव महासत्ता उरली तेव्हापासून अमेरिकेने आपले स्पेस मिशन सही कमी केले. खरं तर नील आमस्ट्रॉंग यांनी चंद्रावरती पाऊल ठेवल्यानंतरच अमेरिकेने स्पेस रेस जिंकली होती. ते देय साध्य झाल्यानंतर अमेरिकन सरकारन नासाच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली. नासान चंद्रावर जाऊन माती आणि खडक गोळा करण्याचं काम पूर्ण केलं होतं त्यामुळे त्यानंतर नासान आपलं लक्ष लो अर्थ ऑर्बिट कडे वळवलं. नासान आपला पैसा आणि टेक्नॉलॉजी स्पेस शटल आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उभारण्यासाठी खर्च केला. या दरम्यानच्या काळात अमेरिकेकडे चंद्रावर पुन्हा जाण्याचं ठोस असं कोणतही कारण नव्हतं. पण आता असं काय घडतय की अमेरिकेला पुन्हा एकदा चंद्रावरती मिशन आखावं लागतंय. तर एकविसाव्या शतकात अमेरिकेच्या अंतराळातल्या मक्तेदारीला आव्हान द्यायला एक नवा देश पुढे आलाय. या देशामुळे अमेरिकेला पुन्हा एकदा आपल्या अंतराळ मोहिमांकडे लक्ष देणं भाग पडलं हा देश आहे चीन. चीन सध्या अंतराळ क्षेत्रात प्रचंड इन्हेस्टमेंट करतोय. चीन याआधी चंद्रावर आपले रोव्हर्स उतरवले आहेत. आता चीनला 2030 पर्यंत चंद्रावरती आपला बेस तयार करायचा आहे. चीन तेवढ्यावरच थांबणार नाही तो मंगळ ग्रहाचाही विचार करतोय यामुळे अमेरिकेची चिंता वाढली अमेरिकेलाही या शर्यतीत मागे राहायचं नाही चीनन चंद्रावर आपला बेस बनवायच्या आधी अमेरिकेला तिथं आपली उपस्थिती निर्माण करायची त्यासाठी हे सगळं सुरू झालय. अशाप्रकारे 60 वर्षांनंतर जगात पुन्हा एकदा स्पेस रेस सुरू झाल्याचे चित्र निर्माण झालय. खरं तर नासाचा मेन उद्देश चंद्र नाही तर मंगळ ग्रह असल्याचं म्हणलं जातं नासाला चंद्रानंतर आता मंगळावरती पहिला माणूस उतरवायचा आहे पण मानवाला मंगळावर पाठवण्यासाठी अनेक महिने प्रवास करावा लागेल. पृथ्वीवरून थेट मंगळापर्यंत प्रवास करणं अत्यंत खर्चिक आणि कठीण काम आहे यामुळेच नासाला चंद्राचा वापर एखाद्या बेस कॅमप प्रमाणे करायचा आहे मंगळ ग्रहापर्यंतच्या प्रवासा दरम्यान चंद्रावर थांबा घेतला जाईल तिथं फल रिफन करून मग मंगळ ग्रहापर्यंत प्रवास केला जाईल सध्या ज्या प्रकारे अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पर्यंत सहज जातात तिथं काही महिने थांबतात मग पृथ्वीवर परततात तसच चंद्राच्या बाबतीत करण्याचा नासाचा चा लॉंग टर्म प्लॅन आहे. यासाठीच आर्टेमिस मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या तरी नासाच हे मिशन जगभरात चर्चेचा विषय ठरलय. हे चार अंतराळवीर पुढचे 10 दिवस चंद्राच्या भोवती चक्कर मारून भरपूर माहिती गोळा करणार आहेत. 2028 मध्ये जेव्हा आर्टेमीस थ्री मिशनला सुरुवात होईल त्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल. आता अमेरिकेच्या या मोहिमांना चीन कशाप्रकारे उत्तर देतो या दोन देशांपैकी कोणता देश सर्वात आधी चंद्रावर बेस उभारण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाच असेल तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं जगात पुन्हा एकदा स्पेस रेसला सुरुवात झाली आहे का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बातमी लेख वाचण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
0 टिप्पण्या