भारतात पुढच्या काही महिन्यात महागाई चा दर वाढण्याची शक्यता ? RBI च्या गव्हर्नर यांनी व्यक्त केला अंदाज... जनतेने पैसे काटकसरी ने वापरण्याचा सल्ला...


       गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरिका इराण व इस्रायल या देशांमध्ये युद्ध चालू आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचा परिणाम दिसू लागले आहेत 
आखातात सुरू असणाऱ्या युद्धामुळे देशातला सामान्य नागरिक आधीच वैतागून गेलाय पेट्रोल डिझेल नॅचरल गॅस घरगुती गॅस सगळ्यांचेच दर वाढलेत महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जाते पण हे सगळं सुरू असतानाच 5 जूनला रिझर्वह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सामान्यांचे टेन्शन आणखी वाढवणारे अंदाज व्यक्त करण्यात आलेत यंदाच्या आर्थिक वर्षात देशामध्ये महागाईचा दर आधी वर्तवलेल्या 4.7% या अंदाजापेक्षा 5.1 एक टक्क्यांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महागाईचा हा दर गेल्या तीन वर्षातला



सगळ्यात जास्त दर असल्याचं सांगण्यात येतय. म्हणजेच यंदाच्या आर्थिक वर्षात आणि विशेष करून सणासुधीच्या दिवसांमध्ये महागाई अजून जास्त वाढण्याची शक्यता वर्तवली जाते पण याचबरोबर जीडीपी सुद्धा 6.9 टक्क्यावरून 6.6 टक्क्यांवर घसरणार असल्याचा अंदाज आरबीआय च गव्हर्नर मल्होतराय यांनी व्यक्त केलाय. आरबीआयच्या गव्हर्नरनी हे अंदाज वर्तवण्या मागची कारणं काय? महागाई वाढल्यास कोणकोणत्या वस्तूंच्या किंमती वाढू शकतात महागाई वाढली आणि जीडीपी दर कमी झाला तर त्याचा कसा परिणाम होणार या सगळ्या प्रश्नांबद्दल जाणून घेऊयात या बातमी मधून



 सगळ्यात आधी बघूयात 5 जूनला झालेल्या पत्रकार परिषदेत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा नेमकं काय म्हणाले तर आरबीआयच्या नियमानुसार दर दोन महिन्यांनी देशाच्या मॉनिटरी पॉलिसीवर चर्चा करण्यासाठी तीन दिवसांची बैठक आयोजित केली जाते ही बैठक यंदा जून ते 5 जूनला आयोजित ित करण्यात आली होती. नंतर 5 जूनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट 5.25 टक्के एवढाच राहील असं सांगून भारताचा फॉरेक्स रिझर्व वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती दिली. पण त्यात



सगळ्यात महत्त्वाची माहिती ही महागाई वाढण्याच्या अंदाजाची होती. मल्होत्रा यांनी सांगितल्यानुसार आरबीआय न आर्थिक वर्ष 202627 साठी याआधी महागाईचा दर 4.7% असल्याचा अंदाज वर्तवला होता. पण जागतिक अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलामुळे तो आकडा आता थेट 5.1 टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे जीडीपी वाढीचा अंदाज 6.9 टक्क्यावरून कमी करत 6.6 टक्क्यांवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ्यानंतर येत्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार असल्याचं सांगण्यात येतय. पण आधी वर्तवलेल्या आकडेवारीमध्ये आरबीआय कडून


एवढा बदल का करण्यात आला? त्याची ही तीन प्रमुख कारणं सांगितली जातात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे जगभरातल्या सप्लाय चेन मध्ये आलेला अडथळा फेब्रुवारी महिन्यापासून आखातात इरान अमेरिका इजराईल युद्ध सुरू झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ हुरमूस बंद करण्यात आलं नंतर समुद्रातून जाणारे रेड सी आणि सुयस कालव्यासारखे प्रमुख व्यापारी मार्ग धोक्यात आले ज्यामुळे जागतिक सप्लाय चेन मध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. उशिरा आणि वेगळ्या मार्गाने प्रवास करून येतोय. मालवाहू जहाजांच्या कंपन्यांनी विम्याचे दर वाढवल्यामुळे बाजारपेठांमध्ये भाववाढ होऊ



लागली आहे आरबीआयच्या म्हणण्यानुसार महागाई वाढण्याच दुसरं महत्त्वाच कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल आणि बाकवी वस्तूंच्या वाढलेल्या किंमती याआधी आरबीआयन चालू वर्षासाठी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 95 डॉलर एवढा राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण फेब्रुवारी मध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर त्याची किंमत 110 ते 115 डॉलर प्रति बॅरल एवढी वाढली परिणामी डिझेलच्या किंमती 7.5 रुपयानी वाढल्या ज्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आणि कच्च्या मालासहित रोजच्या वापरातल्या वस्तू महागल्या दुसरीकडे कमर्शियल गॅसचे दर



सुद्धा वाढल्यान छोट्या उद्योगांवर परिणाम झाला. गॅसवर अवलंबून असलेले उद्योग बंद पडले. महागाई वाढण्याच तिसरं कारण म्हणजे पावसाची अनिश्चितता आणि अलनिनो इफेक्ट. यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी तयार झालेल्या परिस्थितीमुळे हवामान अभ्यासकांनी यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरी पेक्षा कमी म्हणजेच 92 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आता पावसाच प्रमाण कमी झालं की त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होतो पण यंदा आधीच कमी अंदाज वर्तवलेल्या पावसावर गॉडझिला अलनिनोच सावट असल्याने पावसाची सरासरी टक्केवारी 92 वरून 90 टक्क्यांवर



येणार असल्याचं सांगितलं जातय. यामुळे यंदा शेतकऱ्यांवर नापिकीचे सावट असल्याचे अंदाज वर्तवले जातात. रिझर्वह बँकेच्या मते या तीन कारणांमुळे चालू वर्षात महागाई वाढण्याची भीती आहे. पण ही महागाई वाढली तर सामान्यांच्या वापरात असलेल्या महाग होणाऱ्या वस्तूंच्या यादीत दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्य तेल, भाज्या, गहू, तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर, औषध अशा वस्तू महाग होण्याचा अंदाज आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे शेतातल उत्पादन कमी झालं तर मागणी पुरवठा साखळी कोलमडून मोठी भाववाढ होऊ शकते. यासोबतच पेट्रोल डिझेल गॅस



सिलेंडर आणि विमानांची तिकीट वाढू शकतात त्यातच इरान अमेरिका इजराईल युद्ध पुन्हा पेटलं तर यामध्ये जास्त वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सरकारन एप्रिल ते जून या क्वार्टर साठी रेपो रेट आहेत तेवढेच ठेवले असले तरी भविष्यात ते वाढवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रेपो रेट वाढला तर सामान्यांसाठी कर्ज महाग होऊ शकतं. रोजगार कमी होत गेल्याने कुटुंबाच्या एकूण उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो पण आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात महागाईचा दर सगळ्यात जास्त म्हणजेच 5.9 न टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला



जातोय या काळात देशभरात सगळ्यात जास्त सण उत्सव साजरे केले जातात पण त्याच महिन्यांमध्ये महागाई वाढणार असल्याने ही गोष्ट सामान्यांसाठी काळजीची असल्याचं बोललं जातय आरबीआयने एकीकडे महागाई वाढण्याचे संकेत दिले असले तरीही देशात अन्नधान्याचा मुबलक प्रमाणात साठा असल्याने देशांतर्गत पुरवठा सुरहित राहणार असल्याचं सांगण्यात येतय. सोबतच धान्याचा दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याने सर्वसामान्यांनी काळजी न करण्याचा आवाहन देखील करण्यात आलय. पाच तारखेच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये भारताचा फॉरेक्स रिझर्व वाढवण्यासाठी आणि गेल्या



काही महिन्यात भारतातून जाणाऱ्या परकीय गुंतवणूकदारांना भारतातच थांबवण्यासाठी नवीन प्लन्स आणले जाणार असल्याचं आरबीआयने सांगितलं ज्यात सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे परकीय गुंतवणूकदारांना टॅक्स मधून दिलेली मोठी सूट पूर्वी गव्हर्मेंट सिक्युरिटीज मधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर सरकारकडून विथ होल्डिंग टॅक्स आणि कॅपिटल गेन्स टॅक्स लावला जायचा पण आता ते पूर्णपणे माफ करण्यात आलेत यासोबत अनेक नवीन नियम लागू केल्यान देशातल्या गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं आरबीआय कडून सांगण्यात आलय. एकीकडे महागाईचा दर वाढत असल्याचं दिसत असताना



गेल्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक करणारा भारताचा जीडीपी दर यंदा घसरणार असल्याचही संजय मल्होत्रा यांनी सांगितलय. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 7.1% एवढा होता. हा आकडा गेल्या काही वर्षातला सगळ्यात मोठा असल्याचं बोललं गेलं. त्याच आकडेवारीवरून आरबीआयन यंदाच्या आर्थिक वर्षात जीडीपी दर 7.8 8 पर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला होता पण 5 जूनला झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आधी सांगितलेल्या आकडेवारीतून 0.3 ती 3 टक्के कमी करण्यात आले यासाठी आखातल युद्ध परिणामकारक ठरल्याचं संजय मल्होतरा यांनी सांगितल एकंदरीतच



आरबीआयच्या गव्हर्नरनी वर्तवलेला महागाईचा अंदाज समोर आलेली आकडेवारी सर्वसामान्यांसाठी काळजीच कारण बनल्याचं सांगितलं जातय आरबीआय न काळजी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं असलं तरी अशा परिस्थितीला ग्राउंड रीयालिटी वेगळीच असल्याच चित्र आधी दिसलंय. त्यामुळे येत्या काळात महागाईची परिस्थिती काय असणार हे बघणं महत्त्वाच असणार आहे. दरम्यान तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं महागाईचा मोठा भडका आगामी काळात उडणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या साठी आमच्या unik marathi 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या